रोझरी: हा शब्द लॅटिन शब्द "Rosarium" ज्याचा अर्थ "गुलाबाचा मुकुट" किंवा
"गुलाबाचा हार" ह्यांतून उदयास आला आहे. रोझरी हा विशेषत:
कॅथोलिक चर्च मध्ये डोमिनिकन जपमाळेतीळ घटक मणी मोजून प्रार्थना म्हणायचा एक
प्रकार आहे. ह्यातील घटक मणी ह्यांचा उपयोग हा त्यामध्ये प्रार्थना मोजण्यासाठी
होतो.
पार्श्वभूमी: प्रार्थना ही परमेश्वर भक्तीचे मुख्य साधन आहे. प्रत्येक मनुष्य आपआपल्या श्रद्धेप्रमाणे परमेश्वराची
निरनिराळ्या पद्धतीने प्रार्थना करत असतो. इतर धर्मांप्रमाणे ख्रिस्ती लोकांची पण
प्रार्थनेची एक विशिष्ट पद्धत आहे. पण आज ख्रिस्ती लोकांना योग्य प्रकारे
प्रार्थने कशी करावी ह्याबद्दल बऱ्याच ख्रिस्ती लोकांच्या मनात खूप संभ्रम आहेत.
आजच्या ख्रिस्ती जगतात बहुतांशी ख्रिस्ती लोकं
हे प्रार्थनेसाठी रोझरीची/जपमाळेची पद्धत वापरत आहेत. ह्यात रोमन कॅथॉलिक पंथीय हे अग्रेसर आहेत. इतर ख्रिस्ती
पंथीय व प्रोटेस्टंट पंथीयानुसार ही पद्धत शास्त्रानुसार नाही म्हणून ते ती
वापरण्यास नाकारतात. कोणताही पंथ काही शिकवतो, म्हणून तो खरा किंवा चूक असे प्राथमिकरित्या
ठरवता येत नाही. तसेच कोणत्याही शिकवणीची पारख ही तिची शास्त्राबरॊबर केलेली तुलना
किंवा तिला शास्त्रात असलेला आधार ह्याने होते.
म्हणून आता सामान्य ख्रिस्ती माणसांच्या मनात
अनेक प्रश्न उभारतात ते असे की,
१) जसे प्रोटेस्टंट पंथीय म्हणतात की जपमाळेंच्या
प्रार्थनेला शास्त्र खरंच आधार नाही का ?
२) ह्या जपमाळेची प्रार्थना पद्धत कधी व कोणी
सुरू झाली ? आणि त्या प्रार्थना खरी आहे का ?
३) शास्त्रानुसार प्रार्थनेची योग्य पद्धत कोणती
आहे ?
आज गरज आहे ती म्हणजे पवित्र शास्त्रात
ह्याबद्दल शोध घेऊन, हे सर्व मुद्धे नीट तपासून पाहण्याची !!!
१)
जपमाळेंच्या प्रार्थनेला शास्त्र खरंच आधार नाही का ?
होय!! शास्त्रामध्ये कुठेही रोझरीची /जपमाळेंची
प्रार्थनेचा उल्लेख सापडत नाही. ह्या जपमाळेच्या प्रार्थनेत कॅथलिक धर्मातील
सर्वात परिचित अशा सहा प्रार्थनांचा समावेश होतो. ह्यातील पहिले दोन भाग
शास्त्राप्रमाणे आहे; परंतु बाकी चार प्रार्थना जे ह्या प्रार्थनेचा मुख्य भाग आहेत
त्यांना शास्त्रात कोणताही आधार सापडत नाही.
पहिला भाग ज्यात 'प्रेषितीय मार्ग' ज्याला "Apostle Creed" म्हणतात, त्याचा शास्त्रात उल्लेख नाही. आता ह्या भागाचा
जरी शास्त्रात उल्लेख नसला तरीही तो प्रेषितांच्या शिकवणीचा सारांश असा असल्यामुळे, त्याला बहुतांशी शास्त्रात आधार आहे.
दुसरा भाग ज्यात प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आहे; ती बायबलवर आधारित आहे.
तिसरा भाग ज्यात "पवित्र मरिया" म्हणजेच "Hail Mary" आहे, ह्या भाग ज्यात पूर्ण मरीया भक्ती आहे, त्याला शास्त्रांत कोणताही आधार सापडत नाही. कारण शास्त्रात कुठेहि मरीयेची
भक्ती केलेली आपल्याला सापडत नाही.
बाकीचे तीन भाग म्हणजे "गौरवी हो"”The Glory Be” "फातिमेची प्रार्थना"”Fatima’s Prayer” "पवित्र राणी" म्हणजॆ “Hail Holy Queen” ह्यांनाही शास्त्रात कुठेही आधार सापडत नाही. थोडक्यात म्हणजे मरीया भक्तीला शास्त्रात कोणताही आधार सापडत नाही.
मरीयेचा आदर व मरियेची भक्ती ह्यात फरक आहे.
बायबल मध्ये सांगितल्या प्रमाणे मरीया ही
तिच्या काळातील सर्वात पवित्र स्त्री होती; म्हणूनच परमेश्वराने पृथ्वीवर अवतारण्यासाठी
तिच्या गर्भाशयाचा वापर केला. ती पवित्र होती म्हणून तीच या आदर करणे हे
शास्त्राप्रमाणे आहे व ते प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींनी करणे आवश्यक आहे. पण येथे
आदर आणि भक्ती ह्यामध्ये बराच फरक आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. मरीयेची भक्ती
म्हणजेच तिची प्रार्थना करणे हे शास्त्राशी विसंगत आहे. तिच्या पुढे नमन करणे हेही शास्त्राप्रमाणे नाही; शास्त्र की परमेश्वरा व्यतिरिक्त कोणालाहि नमन करू नको.
मग आता मनात प्रश्न येतो तो म्हणजे, जर ह्या चार प्रार्थनांना शास्त्रात आधार नाही, मग त्याचा उगम कुठे आणि कोणी केला ? साहजिकच ज्या शिकवणीला शास्त्रात आधार नाही, म्हणजेच ती शिकवण मनुष्यांच्या तत्वज्ञानावर किंवा विचारावर आधारित आहे.
२)
ह्या जपमाळेची प्रार्थना पद्धत कधी व कोणी सुरू झाली? आणि त्या प्रार्थनेत किती तथ्य आहे ?
ह्या शिकवणीचा उगम हा रोमन कॅथोलिक मंडळीमध्ये
झाला. कॅथॉलिक परंपरेनुसार, सन इ.स. 1214 मध्ये धन्य व्हर्जिन मरीयेने एका
साक्षात्कारांत सेंट डॉमिनिक ह्यांना ही जपमाळ दिली होती. पण जपमाळेचा सर्वदूर
प्रचार हा १५ व्या शतकात अॅलन डे ला रॉचे ह्या तत्वज्ञानीनी केला असे काही रोमन
शास्त्र पंडित मानतात. ह्यावरील दंतकथेत असे सांगण्यात येते की, ह्या अॅलन डे ला रॉचे ह्यांनी एक स्वप्न पहिले. त्यात त्यांनी संत डॉमनिक
ह्यांना मरीयेने रोझरी देऊन तिचा प्रचार करण्यास सांगितले असे पाहिले. तरीपण
अजूनहि जपमाळेच्या उदयावरून काही अंशी संभ्रम आहे. जपमाळेतील सहा प्रार्थना हे
टप्या टप्याने ह्यात सामील केल्या गेल्या आहेत.
२)
ह्या जपमाळेची प्रार्थना पद्धत कधी व कोणी सुरू झाली ? आणि त्या प्रार्थनेत किती तथ्य आहे ?
ह्या शिकवणीचा उगम हा रोमन कॅथोलिक मंडळीमध्ये झाला. कॅथॉलिक परंपरेनुसार, सन इ.स. 1214 मध्ये धन्य व्हर्जिन मरीयेने एका साक्षात्कारांत सेंट डॉमिनिक ह्यांना ही जपमाळ दिली होती. पण जपमाळेचा सर्वदूर प्रचार हा १५ व्या शतकात अॅलन डे ला रॉचे ह्या तत्वज्ञानीनी केला असे काही रोमन शास्त्र पंडित मानतात. ह्यावरील दंतकथेत असे सांगण्यात येते की, ह्या अॅलन डे ला रॉचे ह्यांनी एक स्वप्न पहिले. त्यात त्यांनी संत डॉमनिक ह्यांना मरीयेने रोझरी देऊन तिचा प्रचार करण्यास सांगितले असे पाहिले. तरीपण अजूनहि जपमाळेच्या उदयावरून काही अंशी संभ्रम आहे. जपमाळेतील सहा प्रार्थना हे टप्या टप्याने ह्यात सामील केल्या गेल्या आहेत.
रोमन
कॅथॉलिक चर्चची रोझरी बद्दलची अधिकृत शिकवण
रोमन कॅथॉलिक चर्चची रोझरी बद्दलची अधिकृत
शिकवण आपल्याला खालील संकेत स्थळावर वाचायला मिळेल.
रोमन कॅथोलिक चर्च मानते की जपमाळेंने विश्वास
बळकट होतो, वाईट प्रतिकार आध्यात्मिक वृद्धी, आणि सामान्यतः समाजाचा फायदा होतो. ही शिकवण कोणत्याही शास्त्रीय पायांवर
आधारित नाही.
रोझरी प्रार्थनेमध्ये ह्या खालील गोष्टींना शास्त्रप्रमाणे काहीही आधार नाही:
१) मरीयेची प्रार्थना / भक्ती
२) मरिया ही येशूची आई आहे आणि म्हणून मरीयेकडे पापीजनासाठी
(आता आणि मृत्यू वेळी) प्रार्थना करण्यास
(मध्यस्थी
करण्यास) केलेली विनंती
३) मरीयेला तू "आमचे जीवन "आणि" आमची आशा' म्हणून संभोधन.
ह्या वरील सर्व रोमन कॅथॉलिक तत्वांना शास्त्रात
आधार सापडत नाही. शिकवणीवर काही आक्षेप घेण्यात आले आहेत, जे खालील प्रमाणे शास्त्राला सुसंगत होत नाहीत.
मरीयेची
प्रार्थना / भक्ती
जपमाळ प्रार्थनेमध्ये मूलभूत आक्षेप हा आहे की, ती फक्त मारियेला उद्धेशीली आहे, देवाला नाही! दुसरे म्हणजे मरीयेला भक्तीचे स्थान दिले आहे. ह्या दोन्ही गोष्टी शास्त्राप्रमाणे नाहीत.
फक्त देवालाच भक्तीचे स्थान आहे. मोशेला
दिलेल्या दहा आज्ञेत देवाने म्हटल्याप्रमाणे "माझ्या शिवाय तुम्हांला वेगळे
देव नसावेत". (निर्गम २०:३ वाचा) इथे मरियेची भक्ती करून तिला रोमन
कॅथॉलिक चर्चने देवासमान करण्याचा प्रयत्न केला आहे,जो अत्यंत चुकीचा आहे.
निर्गम २०:३
"माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत"
बायबलमध्ये कधीच सांगितले नाही की, स्वर्गात देवाखेरीज इतर कोणीही प्रार्थना ऐकतो म्हणून. फक्त देवच सर्वकाही
जाणणारा, सर्व-शक्तिशाली, आणि सर्व- उपस्थित आहे. बायबलमध्येही मरियेची व कोणत्याही संताची किंवा देवदूताची प्रार्थना केलेली
उदाहरण कुठेच सापडत नाही.
सत्य हे आहे की मरियेचे भक्ती करणे म्हणजे
देवासाठी असलेली भक्ती, महिमा आणि गौरव मरियेला अर्पिने, आणि हे देवासमोर मोठे पाप आहे. कारण परमेश्वर आपला महिमा दुसऱ्या कोणास ही देऊ
इच्छित नाही. (यशया ४२:८ वाचा) तसेच दहा आज्ञेत देव म्हणतो की, परमेश्वर तुझा देव हा ईर्ष्यावान देव आहे. म्हणजेच त्याचा महिमा तो दुसऱ्याला
देऊ इच्छित नाही. (निर्गम २०:५ वाचा)
निर्गम २०:५
".. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. "
यशया ४२:८
"मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसऱ्यांस देऊ देणार नाही; "
आता ह्या "दुसऱ्यां" मध्ये
मरीया, संत व देवदूत हे सर्व गणले जातात के नाही ? आणि हेच रोमन कॅथॉलिक चर्च भाविकांना करण्यास
शिकवते, जे अत्यंत चुकीचे आहे.
जपमाळ प्रार्थनेमध्ये रोमन कॅथॉलिक चर्च
मरीयेला "पवित्र राणी" म्हणून संभोधतात. मुळात बायबल
मारियेला "राणी" म्हणून कधीच उधेशत नाही. त्याउलट मारिया स्वतः
म्हणते की "मी प्रभूची दासी आहे". (लूक १:३८ वाचा)
लूक १:३८
"तेव्हा मारिया म्हणाली, पाहा मी प्रभूची दासी आहे,”
आता दासी आणि राणी ह्यामधील अंतर ह्या
तत्वज्ञान्यांना काहीसा समजला नसावा. जेथे मरीया आपल्या स्वतःला तो मान घेत नाही,तेथे
ही मंडळी तिला तो मान देऊ पाहतात.
सत्य हे आहे की प्रार्थना, भक्ती, महिमा हे फक्त देवालाच अर्पण केले पाहिजे असे शास्त्र
शिकविते; म्हणून देवाबरोबर मरियेची भक्ती करणे हे सपशेल चुकीचे आहे.
मरिया
ही येशूची आई आहे आणि म्हणून मरीयेकडे पापीजनासाठी (आता आणि मृत्यू वेळी)
प्रार्थना करण्यास (मध्यस्थी करण्यास) केलेली विनंती
रोमन कॅथॉलिक चर्च आपल्या अधिकृत शिकवणीत मरियाला "येशूची आई" असे मानते; आणि म्हणूनच तिच्याकडे मध्यस्थीची विनंती करण्यास शिकवते. आता जपमाळेच्या प्रार्थनेत मरियेला आपल्यासाठी विनंती करण्यास सांगणे म्हणजेच तिला आपल्यासाठी मध्यस्थी करण्यास सांगणे.
मुळात येशूने मरियेला या भूतलावर तो असताना
कधीच "आई" अशी हाक मारली नाही; तर "बाई" म्हणून तो हाक मारत असे. येशू एवढा नर्म मनुष्य पृथीवर नव्हता. तरीपण पण त्याने तिला
कधीही आई म्हणून हाक का नसेल मारली नसावी ? ह्याचा विचार ह्या रोमन तत्वज्ञान्यांना का
केला नसावा ?
सत्य हे आहे की त्या सर्व समर्थ परमेश्वराने या
भूतलावर जन्म घेण्यासाठी तिचा एक साधन म्हणून वापर केला. त्याचा गर्भ हा पवित्र
आत्म्यापासून होता हे आपण वाचतो. (लूक १:३४-३५, मत्तय १:२०, वाचा) म्हणजेच येशूच्या गर्भात मरियेचे कोणतेही घटक
वापरले गेले नाहीत. म्हणून त्याने तिला कधीच "आई" म्हणून हाक
मारली नाही.
मत्तय १:२०
"... कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.”
जपमाळ प्रार्थनेमध्ये "तुझा जयजयकार
असो पवित्र राणी" ह्या भागत मरियेला तू आमची "सर्वात दयाळू वकील"
(मध्यस्थ) म्हणून संबोधिले जाते. दरम्यान हे शिक्षण बायबलप्रमाणे नाही. कारण शास्त्र आपल्याला शिकवते की, फक्त देव आपल्या प्रार्थनांचे ऐकू शकतो. फक्त
देव आपल्या प्रार्थनांचे उत्तर देऊ शकतो. आपल्याला फक्त एक मध्यस्थ (प्रभू येशू ख्रिस्त) आहे, (१ तीमिथ्याला पत्र २: ५ वाचा) जो मनुष्यांच्या पापे शुद्ध करून त्यांना
सार्वकालिक जीवन देऊ शकतो. कारण तो अधिकार फक्त प्रभू येशू कडेच आहे. (योहान
१७:२ वाचा)
१ तीमिथ्याला पत्र २ : ५
“कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशु हा
मनुष्य एकच मध्यस्थ आहे".
योहान १७:२
"जे तू त्याला (म्हणजे येशू स्वतःला) दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावें, म्हणून तू मनुष्यमात्रांवर त्याला अधिकार दिला आहे.
ह्या कारणांसाठी सर्व मनुष्यांनी फक्त
येशुच्याच नावे प्रार्थना करावी, मरीयाच्या नावे नव्हे, किंवा कोणा संतांच्या नावेही नाही!!!!
मुळात मरीया भक्ती हीच
शास्त्राप्रमाणे चुकीची आहे. (सविस्तर वाचनासाठी "देव आणि मनुष्य ह्यांमध्ये येशू ख्रिस्त हाच
एकमेव मध्यस्थ
..." हा आमचा ब्लॉग वाचा)
मरीयेला
तू "आमचे जीवन "आणि" आमची आशा' म्हणून संभोधन.
रोमन कॅथॉलिक चर्च हे रोझरीच्या प्रार्थनेत
मरियेला तू आमची अशा आहेस असे संबोधतात. परंतु शास्त्रातील प्रेषित पौल व प्रेषित
पेत्र हे खोदून काढतात. प्रेषित पौल तीमिथ्याला प्रभू येशू मनुष्यांची आशा म्हणून
लिहितो. (१ तीमिथ्याला पत्र १:१ वाचा) प्रेषित कृत्यांमध्ये पेत्र
मनुष्यांना केवळ येशूच एक आशा आहे हे घोषित करतो. (प्रेषितांचे कृत्ये ४:१२ वाचा)
१ तीमिथ्याला पत्र १:१
"देव आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा ....”
प्रेषितांचे कृत्ये ४:१२
"आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव
आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही."
ह्या वरील संदर्भावरून हे सिद्ध होते की
मनुष्यांना येशूच केवळ एक आशा आहे; मरीया नव्हे. तसे असते तर शास्त्रात तसे लिहिले
असते.
शास्त्रानुसार
प्रार्थनेची योग्य पद्धत कोणती आहे ?
मुळात रोझरीची प्रार्थना ही व्यर्थ बडबड आणि
निरर्थक घोकंपट्टी नाही का ? शास्त्र पण आपल्याला तसे करण्यापासून आगाऊच
सावध केले आहे (मत्तय ६:७-८ वाचा) तरी पण ख्रिस्ती मंडळी तीच चूक पुन्हा पुन्हा करत राहतात.
मत्तय ६:७-८
"तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ
बडबड करू नका; आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल
असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्या सारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे."
रोझरीच्या प्रार्थने मध्ये वारंवार तेच तेच
घोकल्याने परमेश्वर प्रसन्न होत नाही. परमेश्वर काय बहिरा आहे काय ? त्याला एक वेळा सांगून काळात नाही काय ? की तो झोपला आहे, की आपण तीच प्रार्थना वारंवार बोलायची ? सत्य हे आहे की, तो अंतर्यामी परमेश्वर तुमची प्रार्थना
किलोवारी मापाने किंवा त्याच्या लांबीने मोजत नाही; तर ती अंतःकरणातून खरी व शुद्ध हेतूने केलेली
प्रार्थना आहे का ? हे तो तपासत असतो.
प्रभू येशू म्हणतो की तुम्ही परराष्ट्रीयांसारखी
व्यर्थ बडबड करू नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे; कारण तो अंतर्यामी परमेश्वर आहे. (यिर्मया १७:१० वाचा)
यिर्मया १७:१०
“प्रत्येकांस
ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास
मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखितो.”
प्रार्थना
करण्याची शास्त्रानुसार शिकवलेली पद्धत
शास्त्रात प्रभू येशू ने आपल्याला योग्य
प्रकारे प्रार्थना कशी करावी ह्याची पद्धत शिकवली आहे. (मत्तय ६:६)
मत्तय ६:६
"तू तर जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हां ' आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन' आपल्या गुप्तवासी पित्याची 'प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ
देईल.
येशूने देखील जेव्हा बायबलमध्ये प्रार्थना शिकवली, तेव्हा ती फक्त देवाला उद्धेशून अशी केली, इतर कोणालाही नाही. ना मारियेला किंवा कोणा संतांला किंवा दूताला नाही!!
मत्तय ६:९-१३
ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा:
हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानिले जावो.
तुझे राज्य येवो.
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही
तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.
आमची रोजची भाकर आज आम्हांस दे;
आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी
तू आमची ऋणे आम्हांस सोड;
आणि आम्हांस परीक्षेत आणू नको; तर आम्हांसवाईटापासून सोडीव . (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत; आमेन)
ह्या वरील प्रार्थनेमध्ये अजून भर घालण्यास
देवाखेरीज अजून कोणीही व्यक्ती समर्थ आहे काय ? तर नाही! मग आपण देवाने शिकविलेल्या प्रार्थनचे पद्धत
वापरायची, की मनुष्याच्या विचाराच्या आधारित प्रार्थनचे पद्धत वापरायची ? आपली प्रार्थना ही देवाला ग्रहणिय यज्ञ आणि त्याने आपल्याला
शिकविल्याप्रमाणे असावी.
सारांश: ह्या सर्व वरील वचनाचे तात्पर्य हेच आहे कि रोझरीची/ जपमाळेची प्रार्थना
जी मरीयेला उद्धेशीली आहे ती बायबल प्रमाणे नाही. मरीया पृथ्वीवरील सर्वात पवित्र स्त्री
होती; म्हणून तिचा आदर करणे जरी योग्य असले तरी तिची भक्ती
करणे हे काही शास्त्राप्रमाणे नाही. सत्य हे आहे की, परमेश्वर तुमची प्रार्थना किलोवारी मापाने किंवा
त्याच्या लांबीने मोजत नाही; तर अंतर्यामी परमेश्वराला खऱ्या अंतःकरणाने व शुद्ध
हेतूने केलेली प्रार्थना आवडते. रोझरीतील त्याच त्याच प्रार्थनेच्या ओली वारंवार म्हटल्याने
देव प्रसन्न होत नाही. खरी प्रार्थना ही खऱ्या भक्तीभावाने आणि दृढ विश्वासाने आपली
विनंती परमेश्वरापुढे ठेवणे ही आहे. परमेश्वर अशाच प्रार्थनेला उत्तर देत असतो, कोणत्या व्यर्थ बडबडीला नव्हे!!!


No comments:
Post a Comment