Wednesday, 7 September 2016

Christian Gospel - Beyond the Curtains of Time- Paradise; “काळाच्या पडद्या पलीकडे - सुखलोक


“काळाच्या पडद्या पलीकडे - सुखलोक Beyond the Curtains of Time - Paradise”





पार्श्वभूमी: हजारो वर्षांपासून आपण सर्व मर्त्य मनुष्य "मृत्यू नंतरचे जीवन" ह्याबद्दल विचार करीत आहोत. पवित्र शास्त्रातील जुन्या करारात ईयोबाने तो शाश्वत प्रश्न विचारला आहे की


 "मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?“ (ईयोब १४:१४ वाचा

आजच्या एकविसाव्या शतकातदेखील मर्त्य मनुष्याकडून अजूनही हाच प्रश्न विचारला जात आहे. त्यात २००० वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त खरोखर मृतांतून उठला ह्यावर विश्वास ठेवणे हे आजच्या मनुष्यांसाठी फार आश्चर्यकारक आहे. परंतु ह्यात एकमात्र सत्य हे आहे कि, प्रभू येशू ख्रिस्त हा मृतांतून उठला आहे आणि तो आजही जिवंत आहे. तरी पण पवित्र शास्त्र ह्या संदर्भात काय सांगते ते आपण ह्या खालील लेखात पाहू या.

पवित्र शास्त्रातील अनेक संदर्भाच्या आधारावर प्राथमिकरित्या असे सिद्ध होते कीमृत्यूनंतर मनुष्यांच्या आत्म्यांना केवळ दोन निवास्थाने आहेत; ते म्हणजे सुखलोक आणि अधोलोक. जे मनुष्य नीतिमान म्हणून मरतात, ते आत्म्याने सुखलोकांत प्रवेश करतात. त्याचप्रमाणे जे मनुष्य अनीतिमान किंवा पापी म्हणून मरण पावतात ते अधोलोकांत (ज्याला नरक पण म्हटले जाते) प्रवेश करतात. ह्या दोन्ही ठिकाणांचा शेवट हा प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यानंतर होणाऱ्या त्या महान पांढऱ्या राजासनाच्या न्यायावेळी होईल.

व्याख्या: सुखलोक हा स्वर्गाचाच एक भाग आहेजेथे नीतिमान आत्मे विसावा घेत प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत आहेत. इथे चीर आनंद आणि सुख आहे. त्याचप्रमाणे अधोलोक हा एक मृत क्षेत्र आहे जो नरकाचा भाग आहे.  इथे फार कष्ट व यातना आहेत.

'मृत्यूनंतरचे जीवन' विषय हा वाचकांच्या सोयीसाठी आम्ही तीन भागात विभागला आहे.


ह्या भागात आपण सुखलोकासंदर्भात पवित्र शास्त्र काय सांगते ते सावितरपणे पाहू या.

पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्तापूर्वी जुन्या करारात हनोख व एलीया ह्या दोघांचे स्वर्गारोहण झालेले आपल्याला आढळते(उत्पत्ति ५:२४, इब्रीकरांस पत्र ११:५२ राजे २:११ वाचा) त्याचप्रमाणे जुन्या करारात यशयायहेजकेलयिर्मया ह्या संदेष्टयांना त्यांच्या पाचारणाच्यावेळी स्वर्गाचा दर्शन घडल्याचे आपल्या वाचनात येते. त्याप्रमाणे मिखा संदेष्ट्यानेहि ती स्वर्गातील दिव्य सभा अनुभवल्याचे आपल्याला पाहायला मिळते. (यशया ६ अध्याययिर्मया १ अध्याययहेजकेल १ अध्याय१ राजे २२:१७-२३ संदर्भ वाचा)

नव्या करारामध्ये येशूने मेलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल थोडी माहिती स्पष्ट आहे. प्रभू येशू ह्या भूतलावर असताना त्याने सदुकी लोकांना पुनरुत्थानावरून उपदेश करताना ह्या सुखलोकासंदर्भात काही गोष्टी विदित केल्या आहेत. हे सदुकी लोक हे पुनरुत्थान होते ह्यावर विश्वास ठेवत नसत. त्यामध्ये त्याने हे स्पष्ट केले आहे कीमेल्यानंतर पुनरुत्थान झालेले लोकं लग्न करत नाहीततर ते देवदूतांसारखे असतात. (मत्तय २२:३०मार्क १२:२५ वाचा)

मत्तय २२:३०
"कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या (महिला) लग्नात दिल्या जात नाहीततर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात."

त्याचप्रमाणे नवीन करारात प्रेषित पौल ह्यानेहि सुखलोकाचा (स्वर्गाचाअनुभव घेतला आहे. (२ करिंथकरांस पत्र १२:२-४ वाचा)

२ करिंथकरांस पत्र १२:२-४
ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहित आहेत्याला चौदा वर्षांमागे तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते; (त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेहि असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाहीदेवाला ठाऊक आहे;) त्याच मनुष्यविषयी मला माहित आहे कीत्या मनुष्याला सुखलोकांत उचलून नेण्यात आले, (सदेह किंवा विदेह हे मला ठाऊक नाहीदेवाला ठाऊक आहे;) आणि माणसांना ज्यांचा उच्चारहि करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली."

येशूच्या मृत्यू समयी तो क्रुसावर असताना आपल्या उजव्या हाताकडील चोराला त्याने "सुखलोकांत" नेण्याचे अभिवचन दिले. (लूक २३:४३ वाचा)

लूक २३:४३
"तो त्याला म्हणालामी तुला खचित सांगतोतू आज माझ्याबरोबर सुखलोकांत असशील."

पण आता कोणी म्हणेल हे अनुभव तर फार जुने आहेत. आपल्या युगांत असा अनुभव कोणाला आहे का त्याचबरोबर सुखलोकांत जीवन कसे आहे असे अनेक प्रश्न मनुष्यांच्या मनांत येणे स्वाभाविक आहे.

एक अदभुत लोकांतर

देवाच्या कृपेने ह्याविषयी आपल्या सर्व भीती आणि शंका ह्यांना आता आपण निश्चितपणे पूर्णविराम देऊ शकतो; कारण विसाव्या शतकात प्रभू येशूने त्याचा सेवक आणि संदेष्ठा ह्याच्याद्वारे स्वतःला तो जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे; तो सेवक म्हणजे ब्र. विल्यम मॅरियन ब्रॅन्हम. त्यांच्या ५६ वर्षांच्या आयुष्यात व सेवाकाईत प्रभू येशूने हजारो वेळा आपली उपस्थिती दाखवून दिली आहे. अमेरीकेत त्यांच्या सेवाकाईत शेकडो आजारी बरे झालेअदभूत चमत्कार झालेमानवी हृदयांतील विचार व कल्पना निदर्शनास/प्रकट करण्यात आले आणि मृत उठविले गेले. महत्वाचे म्हणजे एकाहि वेळा ब्र. विल्यम मॅरियन ब्रॅन्हम ह्यांचे कोणतेही दृष्टान्त किंवा भविष्यवाण्या अपयशी/खोटे ठरले नाहीत.

पुढे आपल्या ह्याच सेवकाच्या समर्थनासाठीआपल्या प्रभु येशू ख्रिस्ताने त्याला काळाच्या पडद्यापलीकडे नेऊन त्याच्याद्वारे मृत्यूनंतरचे जीवन व पुरुत्थानाचे रहस्य प्रकट केले आहे. ह्या घटनेचा उल्लेख त्यांनी आपल्या काही संदेशात केला आहे.  हेच भाऊ ब्रॅन्हम १९५३ साली मुंबईत येऊन गेले. त्यावेळी त्यांच्या सभेमध्ये अनेक असे चिन्ह चमत्कार झाले होते.

त्यांच्याबद्दल व त्याच्या सेवकाईबद्दल अधिक माहिती तुम्हांला या संकेत स्थळांवर मिळेल.       


                                   Bro. William Marrion Branham (1906- 1965)


भाऊ ब्रॅन्हम त्याच्या त्या पडद्यापलीकडील अनुभव, अशाप्रकारे मांडतात.....

गेल्या रविवारी सकाळीमला लवकर जाग आली होती.  नाहीशनिवारीहा दृष्टान्त आला होता. नेहमीच काळजी करतमी नेहमी मरणाचा विचार करत असतो. आता मी पन्नास वर्ष्यांचा आहे...आणि माझ्याकडे आता फार काळ राहिला नाही. मी विचार करत होतो की त्या दैवी शरीरात मी कोण असेंन? काय मी एक छोटा पांढरा ढग पाहून, मी माझ्या मित्रांना म्हणेन की पहाते भाऊ नेव्हिल चालले आहेत. कि त्या स्वरूपात भाऊ नेव्हिल आम्हांला हॅलो बोलू शकतील काकि जेव्हा येशू पृथ्वीवर परत येईलतेव्हा पुन्हा मी काय मनुष्यच असेंन? असे प्रश्न मला नेहमी सतावीत असतात. 
मी स्वप्नात पाहत होतो की मी पश्चिमेकडील प्रदेशात आहे. आम्ही म्हणजे मी आणि माझी पत्नी आम्ही एक छोट्या सुगंधी झुडूपांच्या ठीकनातुन येत होतो, जेथे आम्ही मासली पकडण्यास गेलो होतो. मी थांबलो, आणि फाटक उघडले. आकाश फार सुंदर होते. ते इथल्या खोऱ्यांसारखे नव्हते. ते निळे आकाश होते व् सुंदर पांढरे ढंग होते. मी माझ्या पत्नीला म्हटले, प्रिये,आपण इथे फार अगोदर यायला हवे होते. ती म्हणाली, बिली, मुलांसाठी ....नाहीतर ....आपण आलो असतो. मी म्हणालो, तेच...... मी जागा झालो.
मी विचार केलामी हल्ली फार स्वप्नात असतो!!.... का कुणास ठाऊक ? मी खाली पाहिलेतर ती माझ्या बाजूला पहुडलेली होती.
मी माझ्या उशीवर उभारतजसे आपण अनेक जन करतो तसे... बिच्छाण्याच्या फलाटावर टेकुन आणि हात असे मागे करत असा पडलो होतो ....मी विचार केला, "त्यापलिकडे कसे असेल?" मी पन्नास वर्षाचा आहेआणि मी अजुन काही ही केले नाहीमी जर प्रभुच्या सेवेसाठी काहीतरी करू शकलो तर,....कारण मी अमर्त्य तर नाहीमाझे अर्धे आयुष्य सरले आहेनाही अर्ध्याहुन अधिक!! जरी मी माझ्या वंशंजांएवढे जरी जगलोतरीही माझे अर्धी वेळ संपली आहेमी अजुबाजुला पाहिलेमी तेथेच पडलो होतोआणि उठण्याचा प्रयत्न करत होतो.

जवळजवळ सात वाजले होते. मी म्हटले "माझा विश्ववास आहे कि मी आज सकाळी चर्चला जाऊ शकेन. जर माझा घासा कर्कश झालातर मला भाऊ नेव्हिल कडून कडून संदेश ऐकायला आवडेल. " मी म्हटले " प्रिये तू जागी आहेस का ? "आणि ती फार गाढ झोपली होती.

आता माझी इच्छा नाही की तुम्ही ही गोष्ट चुकवू नये. ह्या गोष्टीने मला पार बदलून टाकले आहे. तिच्यानंतर मी तो भाऊ ब्रम्हम असू शकत नाहीजसा मी आधी होतो.

मग मी पाहिले. आणि मी काहीतरी ऐकलेजे म्हणत होते, "तू फक्त सुरुवात करत आहेस. प्रयत्न करत राहा. फक्त प्रयत्न करत रहा."

मी एक क्षण माझे डोके हलवले. मला वाटले,"मी कदाचित फक्त ह्या विचारात आहे." तुम्हांला माहित आहेमाणसांच्या मनात कुठल्याही कल्पना येऊ शकतात. मी म्हटले, "मी केवळ तशी कल्पना केली असेल."

जे म्हणत होते,” प्रयत्न करत राहासुरू ठेव. सुरू ठेव."

मी म्हटले,"कदाचित मीच हे बोलत असेन". मी माझे ओठ माझ्या दातांत ठेवले आणि तोंडावर हात ठेवला.

तेथे ते परत आलेम्हणाले ,"क्त प्रयत्न करत रहा. या रस्त्याच्या शेवटी काय आहे हे फक्त तुला माहीत असते तर .....?"

आणि असे वाटत होते की मी ग्रॅहम स्नेल्लिंग ह्यांचा आवाज ऐकत आहेकिंवा कुणीतरीजो या सारखे गीत गात आहे. ते इथे जसा गातात तसाअण्णा मे (गायिकाआणि तुम्ही सर्व.

मला घराची ओढ लागली आहे आणि फार आतुर आहेआणि मी येशू पाहू इच्छित आहे.
मला त्या गोड हार्बर घंटानाद ऐकायला आवडेल,
तो माझा मार्ग उजळून टाकील आणि सर्व भीती  नाहीसे करील,
परमेश्वरामला वेळेंच्या पडद्याआड पाहू दे.

तुम्ही हे गाणे ते चर्चमध्ये गाताना ऐकलेले आहे.

आणि मी कुणीतरी असे बोलताना ऐकले"तू पडद्यापलीकडे पाहू इच्छितोस काय ?"
मी म्हटले, "मला त्याची फार मदत होईल."

मी पाहत होतो. आणि  एका क्षणातमी..... एक  श्वासात मी थोडे तिरकी असलेल्या ठिकाणामध्ये पोहचलो होतो. मी मागे वळून पाहिलेमी तिथे होतोबिछाण्यावर पहुडलेला!! मी म्हटले,"ही एक विचित्र गोष्ट आहे."

आतातुम्ही ह्याचा पुनर्रउच्चार करावा असे मी इच्छित नाही. हे माझ्या स्वतःच्या मंडळीसाठी आहेकिंवा माझी मेंढरे ह्यांसाठी आहे ज्याचा मी पाळक आहे. आतामी शरीरात होतो किंवा नाहीकिंवा तो एक लोकांतर होताते माझ्या इतर दृष्टांतासारखा नव्हता. त्यात मी इकडे तिकडे पाहू शकत होतो.

आणि मी जेव्हा त्या लहान ठिकाणी धडकलोतेव्हा मी अनेक लोक धावत आणि ओरडत येतांना पाहिली, "ओह्हआमचे मौल्यवान भाऊ! "

मी पाहत होतो. आणि युवतीज्या कदाचित त्यांच्या लवकर विशीतल्याजवळजवळ अठरा - वीस व्यांतल्याते माझ्याभौती त्यांचे हात टाकूनमला त्यांच्या मिठीत घेऊन ओरडत होते  "आमचे मौल्यवान बंधू!!!"

त्यानांतर येथे युवक आलेतारुण्याच्या तेजाने भरलेले असे. त्यांचे डोळे चमकदार आणि अंधकारमय रात्री प्रकाशणाऱ्या ताऱ्यांसारखे होते. मोत्यांसारखे शुभ्र त्यांचे दांत. आणि ते ओरडत होतेआणि मला खेचत होतेओरडत होते, "ओह्हआमचे मौल्यवान बंधू!"

आणि मी थांबलोआणि पाहिले. आणि मीही तरुण होतो. मी माझ्या जुन्या थकलेल्या शरीराकडे मागे वळून बघितलेमाझे हात माझ्या डोक्यामागे असलेले. आणि मी म्हटले , " हे काही मला समजले नाही."

आणि या तरुण महिला मला त्यांच्या मिठीत घेत होते. आतामला या मिश्र श्रोत्यांची जाणीव झालीआणि हे मी गोडव्याने व सौम्यते म्हणतो आहे. कोणीही पुरुष एका महिलेवर मानवी संवेदनेशिवाय हात ठेवू शकत नाहीपण ती तेथे नव्हती. तेथे ना कालचा दिवस होताना उद्याच्या दिवस होता. ते तेथे थकत नाहीत. ते तेथे ..... मी माझ्या  सर्व आयुष्यात अशा सुंदर महिला पाहिले नाहीत. ज्यांचे केस कमरेचा घेराखालपर्यंत ओघळत होतेत्यांचे स्कर्ट्स (परकर) पायांपर्यंत ओघळत होते. आणि ते फक्त एक मला मिठी होते. ती मिठी माझ्या स्वत: च्या बहिणीसारखी जी इथे बसली आहेतिच्यासारखी देखील नव्हती. ते माझे मुके घेत नव्हतेकिंवा मीही त्यांचे मुके घेत नव्हतो. ते काहीतरी असे होते कि मी.... माझ्याकडे शब्द नाहीत. मला ते म्हणायला शब्द सुचत नाहीत. "पूर्णावस्था" हाहि शब्द योग्य होणार नाही. 

"उत्कृष्ट" हाहि शब्द त्याच्या जवळपास कोठेही नाही. ते असे होते कीमी कधीच ..... आपण फक्त तेथे असायला हवे.

मी एकदा याबाजूला पाहिलेएकदा त्याबाजूला पाहिले. ते येत होतेहजारोच्या संख्येने... आणि मी म्हटले , "हे काही मला समजले नाही." ते तसेच..... 

आणि आता होप येतात. ही माझ्या पहिली पत्नी. धावत आलीपण ती म्हणाली नाही, "माझे पती". ती म्हणाली "आमचे मौल्यवान बंधू." तेथे दुसरी एक स्त्री उभी होतीजिने मला मिठी मारलीनंतर होपने ह्या स्त्रीला मिठी मारलीएकमेकींनी. मी विचार केला, "हे काहीतरी वेगळे आहे. असे असू शकत नाही ...... काहीतरी आहे .... ".  मला वाटले, "अरेमला पुन्हा कधीही त्या जुन्या मर्त्य शरीरात परत जायला वाटेल काय ?''

मग मी सभौताली पाहिले. मी विचार केला "हे काय आहे ?".... मग मी स्वतःप्रत्यक्ष चांगला दिसत होतो. आणि मी --- मी म्हटले "हे काही मला समजले नाही." पण होप अशी वाटत होती जशी,ओहखास अतिथी. ती काहीही वेगळी नव्हतीपण खास अतिथीसारखी.

आणि नंतर मी माझ्याशी बोलणारी एक वाणी ऐकली,जो मी खोलीमध्ये होतोम्हणाली"जे तू पवित्र आत्मा म्हणून प्रर केला ते हेच. हे परिपूर्ण प्रेम आहे. आणि त्याशिवाय इथे काहीही प्रवेश करू शकत नाही".

मी माझ्या आयुष्यात कधी नव्हे तर आता अधिक निर्धारीत आहे कीपरिपूर्ण प्रेमाशिवाय तिथे प्रवेश नाही. तेथे मत्सर नाही. तेथे थकवा नाही. तेथे मृत्यू नाही. आजारपणाला तेथे थारा नाही. मरणाधीनताशक्य - शक्य झाले तरी तुम्हांला म्हातारे करू शकत नाही. आणि ते.... ते रडू शकत नव्हते,... तेथे फक्त तो फक्त एक आनंद होता.

"ओह्हमाझे मौल्यवान बंधू" आणि मग त्यांनी मला उचलूनआणि एका चांगल्या मोठ्या उच्च स्थानी उभे केले.

मी विचार केला, "मी स्वप्नात नाही”, मी फिरून मागे माझे -माझे शरीरमाझे शरीर खाली बिछाण्यावर झोपलेले पाहत होतो. 

आणि त्यांनी मला तेथे वर बसवले. आणि मी म्हणालो,"ओह्हमी इथे वर बसू नये."
आणि येथे महिला आणि पुरुष येत होतेदोन्ही बाजूनेत्यांच्या तारुण्यात बहरलेले असेओरडत. आणि एक महिला तेथे उभी होतीती ओरडली"ओह्हमाझे मौल्यवान बंधूआम्ही आपणांस येथे पाहून आनंदी आहोत."

मी म्हटले "हे काही मला समजले नाही."

आणि नंतर ती माझ्याशी वरून बोलणारी वाणी म्हणाली, "तुम्हाला माहित आहेबायबलमध्ये लिहिलेले आहेकीसंदेष्टे त्यांच्या पूर्वजांशी जाऊन मिळाले."

मी म्हटले,"होयशास्त्रातील ह्याबद्दल मला आठवण आहे".

म्हणाली "तसेचआपण आपल्या लोकांशी गोळा होणे म्हणजेचहे आहे.

मी म्हटले, "मग ते खरे असतीलकाय मी त्यांना अनुभवू शकतो काय ?"

"अरेहोय"

मी म्हणालो " पण,इथे लाखो आहेत. पण मुळात एवढे ब्रह्नम्स नाहीत. " (ब्रह्नम्स म्हणजे ब्र. ब्रम्हमचे भाऊबंद)

ती वाणी म्हणाली," ते ब्रह्नम्स नाहीत. ते तर तुझे रुपांतरीत आहेतते ज्यांना तू परमेश्वराकडे वळवले." आणि म्हणाली, " आणि येथील स्त्रियांमधील काहीजे तुम्हांला सुंदर दिसत आहेतते तर चांगले नव्वद वर्षांपलीकडे होतेजेव्हा तुम्ही त्यांना परमेश्वराकडे वळवले होते.” तेव्हाच हे काही आश्चर्य नाही की ते ओरडत आहेत "आमचे मौल्यवान बंधू!"

आणि मग ते सर्व एकाच वेळी ओरडून म्हणाले, " जर तुम्ही गेले नसतेतर आम्ही येथे असू शकत नव्हतो."

मी आजूबाजूला पाहिले. मी विचार केला, " हे काही मला समजले नाही."

मी म्हटले," अरेयेशू कोठे आहेमी त्याला पाहण्यासाठीफार आतुर आहे. "

ते म्हणाले," आता तोफक्त काहीसा वरती आहेअगदी त्या मार्गाने वरती." म्हणाले," एखादे दिवशी तो तुमच्याकडे येईल. पाहिले?" म्हणाले, "तुम्हांला एक नेता म्हणून पाठवले होते.  आणि देव येत आहे. आणि तो जेव्हा येईल, तेव्हा तो तुम्हांला त्यांना जे शिकविलेत्याप्रमाणे तुमचा न्याय करील. पाहिल्यानेते आंत गेले किंवा किंवा न गेल्यासही. आम्ही तुमच्या शिकवणीनुसार आत जाऊ."

मी म्हणालो, "अरेमी अतिशय आनंदित आहे. आणि पौलकाय त्यालाहि असेच उभे राहाने जरुरीचे आहे काय काय पेत्रालाहि असे उभे राहाने भाग आहे काय ?"

"होय"

मी म्हणालो, "त्यांनी प्रचार केलेल्या प्रत्येक शब्द हाच मी पण प्रचार केला. मी कोणताही बाजूने त्यापासून कधीही ढळलो नाही. त्यांनी जेथे  येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा दिलामीही तेच केले. जेथे त्यांनी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा शिकवलातोच मीही शिकवला. त्यांनी जे शिकवलेतेच मी शिकवले."

आणि ते लोकांनी ओरडून म्हटलं,"आम्हांला हे माहीत आहे. आणि आम्हांला हेही माहीत आहे की आम्ही एकेदिवशी तुमच्याबरोबर पृथ्वीवर परत आहोत. म्हणाले, "येशू येईलआणि आपण आम्हांला प्रचारलेल्या प्रत्येक शब्दानुसार आपला न्याय केला जाईलआणि नंतर त्या वेळी जर तुमचा स्वीकार झाला तर,  जो तुमचा होणार आहे," आणि म्हटले, "नंतर तुमच्या सेवकाईची चषक म्हणून तुम्ही आम्हांला त्याच्यापुढे सादर कराल." म्हणाले, "आपण आम्हांला त्याच्याकडे मार्गदर्शित करालआणिआपण सगळे पुन्हा सार्वकाळ जगण्यासाठी पृथ्वीवर परत जाऊ."

मी म्हटले, "काय मला परत जाणे आवश्यक आहे ?"

"होय. पण प्रयत्न चालू ठेवा."

मी पाहिले. आणि जिथपर्यंत माझी दृष्टी पाहोचत होती तिथपर्यंत मी अजून लोकांना येतांना पाहत होतोजे मला मिठी मारण्यासाठी ओरडत येत होते, "आमचे मौल्यवान बंधू."

त्यानंतर लगेच ती वाणीने म्हटले, "तुम्हाला प्रिय असलेल्याआणि तुमच्यावरहि प्रेम करणारे सगळे देवाने तुम्हांला इथे दिले आहेत." आणि  मी पहिले. आणि तिथे माझा म्हातारा कुत्रा चालत येत आहे. नंतर माझा घोडाहि येतोआणि मंदपणे खिंकाळत त्याने त्याचे डोके माझ्या खांद्यावर ठेवले. ती वाणी म्हणाली, "तुम्हाला प्रिय असलेल्याआणि तुमच्यावरहि प्रेम करणारे सगळे देवाने तुमच्या सेवाकाईद्वारे इथे तुमच्या हातात दिले आहेत."

आणि नंतर मी स्वत:स त्या सुंदर ठिकानांतून बाहेर येताना जाणवले.

आणि मी सभौवार पाहिले. मी म्हटले, "प्रियेतू जागी आहेस का?" ती अजूनही गाढ झोपली  होती.

आणि मी विचार केला, "हे देवा! मला सहाय्य करहे देवा. मला एका वचनासंदर्भातहि कधी तडजोड करू देऊ नकोस. मला वचनावर सरळ उभा राहून ते प्रचार करू दे. काय येते किंवा जाते ह्याची मी काळजी करणार नाहीकिंवा कुणी काय करतोकिशाच्या पुत्रांतील कितीही शौलउभे राहूदेकिती हे कीकिंवा इतर. प्रभूमला त्या ठिकाणी जाण्यास प्रयत्न करू दे." मृत्यूची सर्व भीती.....

मी आजच्या सकाळी हे बायबल समोर ठेऊन बोलतोय. माझ्याकडेमाझा चार वर्षाचा मुलगा वाढत आहे. माझ्याकडे माझी एक नऊ वर्षीय मुलगी आहेआणि एक किशोरवयीन आहे ज्यांच्यासाठी देवाचा मी आभारी आहेकारण ते देवाच्या मार्गावर आहेत. देवामला त्यांना तुझ्या भयात वाढवण्यासाठी जगू दे.

वरूनसंपूर्ण जग माझ्यावर किंचाळताना दिसतेनव्वद वर्षीय महिला आणि पुरुषआणि सर्व प्रकारचे. "जर तुम्ही गेले नसतेतर आम्ही येथे असू शकत नव्हतो."

आणि देवामला प्रयत्न करू दे. पण जर ते मरणा पर्यंत जाणार असेलतर मी यापुढे नसेन... तो एक आनंद असेलते एक सुख असेलह्या भ्रष्टाचारांतून आणि कलंकापासून तेथे प्रवेश करणे.

जर मी वर पलीकडे एक शंभर अब्ज मैल उंचीचा एक ओंडका बनवलाजो परिपूर्ण प्रीती असेल. त्यावरून प्रत्येक पाऊल ह्या मार्गाने तो आखूड होत जाऊनआता आपण आहोत तिथेपर्यंत असे खाली येत राहील. ते फक्त भष्ट्राचाराची एक सावली असेलआम्ही फार कमी अर्थ लावू शकतो आणि कुठेतरी काहीतरी आहे असे आपणांस जाणवते. आपल्याला हे काय हे माहीत नाही.

हेमाझ्या मित्र-मैत्रिणींनोमाझ्या प्रियांनोशुभवर्तमानातील माझ्या प्रियांनोप्रभू मध्ये मिळवलेल्या मुलांनोतुमचा पाळक म्हणून माझे ऐका. तुम्हांला ते स्पष्ट करू शकेन असा काही मार्ग मी पाहत होतो. असे शब्दच सापडत नाहीतते कुठेच आढळत नाहीत. पण फक्त या शेवटच्या श्वासापलीकडेसर्वात वैभवशाली अशी गोष्ट आहे जी कधीही .... ते स्पष्ट करण्यासाठी कोणताही मार्ग नाही. कोणताही मार्ग नाही. मी ते करू शकत नाही. पण तुम्ही जे काही करालमित्र-मैत्रिणींनोसर्व बाजूला सारून  प्रथम परिपूर्ण प्रीती मिळवा. अशा जागी पोहचा जेथे तुम्ही सर्वांवर प्रीती करू शकालप्रत्येक शत्रूबाकी सर्व काही.

तेथील एक भेटमाझ्यासाठीमला एक वेगळा मनुष्य बनवले आहे. मी कधीचकधीचकधीच पुन्हा तसा बंधू ब्रम्हम असू शकत नाही.  जरी का विमाने उडत घोंघावत असतीलवीजा चकाकत असतीलकिंवा गुप्तचर ने माझ्याकडे बंदूक रोखली असेल. ते काहीहि असोमला काही फरक पडत नाही. मी देवाच्या कृपेने प्रयत्न करत राहणार आहे. कारण मी मला शक्य तितक्या प्रत्येक जीवधारी आणि प्रत्येक व्यक्तीना मी सुवार्ता सांगितली आहेत्या पलीकडील सुंदर जागेची  त्यांना खात्री पटविण्याचा प्रयत्न केला आहे.

हे कठीण वाटू शकते. ह्यामागे खूप शक्ती लागू शकते. अजून किती काळ मला माहीत नाही. वास्तविकरित्या आपल्याला माहित नाही. ते.... त्यादिवशी माझ्या परीक्षेमधूनतो म्हणाला, "तुमच्याकडे सुधृद जीवनाची अजून चांगली पंचवीस वर्षे आहेत. आपण धडधाकड आहात." त्याने मला मदत केली. पण ते तसे नव्हते. ते तसे नाही. ते काहीतरी इथं आपल्या आंत आहे. ह्या भ्रष्टाचाराला ते अविनाशीपण धारण करणे आहे. या मर्त्य शरीराला अमरत्व धारण करणे आहे.

ते किशाचे पुत्र अभे राहतील, .... मी ..... ते ज्या चांगल्या गोष्टी  करतील,.....माझ्यात त्यांच्याबद्दल काहीही वाईट नाही.... गरीबांना देणे आणि धर्मादाय देणे. आणि लक्ष्यात तेव्हाका शमूएल शौलास म्हणाला,"तू भविष्यवाणी सांगशील." आणि अनेक असे महान लोकंपराक्रमी प्रचारकजे आद्यदेवदूतांसारखे वचन प्रचार करू शकतात. तरीही ती देवाची इच्छा नव्हती. देव स्वतः त्यांचा राजा असणार होता. भावा - बहिणींनोपवित्र आत्म्याला तुम्हांला मार्गदर्शन करू दे.

आपण काही क्षण आपल्या डोके लावू या. 


भाऊ गाण्यास सुरु करतात...

मला घराची ओढ लागली आहे आणि फार आतुर आहेआणि मी येशू पाहू इच्छित आहे.
मला त्या गोड हार्बर घंटानाद ऐकायला आवडेल,
तो माझा मार्ग उजळून टाकील आणि सर्व भीती नाहीसे करील,
परमेश्वरामला वेळेंच्या पडद्याआड पाहू दे.
परमेश्वरामला मागील दुःख आणि भयाच्या पडद्यापलीकडे  बघू दे,
मला तो तेजस्वी चांगल्या हवामानाचा प्रदेश पाहू दे,
तो आमचा विश्वास दृढ करील आणि सर्व भीती नाहीसे करील,
परमेश्वरामला वेळेंच्या पडद्याआड पाहू दे.

परमेश्वरामला खात्री आहे की ही छोटी मंडळी ह्या सकाळच्यावेळीफक्त त्या पडद्यापलीकडे पाहू शकली असती तर! त्यांच्यामध्ये दु: ख नाहीते असूच शकत नाहीआजारपण नसणारकाही नाही, फक्त परिपूर्णता!!  इकडे आणि त्या मध्ये फक्त एक श्वासाचा अंतर आहेम्हातारपण आणि युवास्थितीमधेह्या काळामध्ये अनंतकाळापर्यंत;   कंटाळवाण्या उद्याच्यापासूनआणि कालच्या दुःखांपासूनते सध्यस्थिती पासून सार्वकालिक परिपूर्णतेपर्यंत.

मी प्रार्थना करत आहेदेवाइथल्या प्रत्येक व्यक्तीना तू आशीर्वादित करजर आज इथे कोणी असतील ज्यांना तुझ्या त्या प्रीतीची जाणीव नसेल. खरोखरकोणीही तशाप्रकारच्या प्रीतीशिवाय तेथे प्रवेश करू शकत नाहीनव्याने जन्मपुनर्जन्मित असा मनुष्य.  तो पवित्र आत्मादेवहे प्रेम आहेतआणि आम्हांला माहित आहे की हे सत्य आहे. जरी आम्ही आमच्या विश्वासाने डोंगर ढलवत असूजरी आम्ही महान कार्य करत असूतरीही, तिच्याशिवाय (प्रितीशिवाय) तिथेआम्ही ती पलीकडील शिडी चढू शकत नाही. पण त्याच्याबरोबरती या पृथ्वीवरील आपल्या चिंत्याच्या पलीकडे आम्हांला उचलून नेईल. मी प्रार्थना करत आहेकि तू येथील लोकांना आशीर्वादित करशील.

आणि होऊ दे कीआज सकाळी ज्या - ज्यांनी माझे ऐकलेते हे सत्य सांगतीलकि तू माझा साक्षी आहेजुन्या करारातील शामूएलाप्रमाणे. काय कधीही  मी तुझ्या  नावात त्यांना काहीही सांगितले आहेपण जे सत्य तेच ते न्यायाधीश आहेत. आता मी त्यांना सांगू इच्छतोकी तू मला त्या भूमीवर नेऊन आणले. आणि तुला ठाऊक आहे की ते सत्य आहे.

आणिआता हे पित्याइथे असा कोणी असेल ज्याला तुझी ओळख नाहीतर ह्या तासाला ते म्हणोत, "परमेश्वरामला तू तुझ्या इच्छेत ठेव" हे प्रदान  करहे पिता.

मी आजहे मागत आहेपित्याकि आज सकाळीज्या-ज्यांनी मला हा दृष्टान्त सांगतांना ऐकले आहेत्या प्रत्येकाला मी त्या दुसऱ्या बाजूला भेटू शकेन. जरी इथलं काही लोक माझ्याशी सहमत नसतीलस्त्रियाही ...पणपिताते तुझ्या मार्गात कधीही आड येऊ देऊ नको. होऊ दे की आम्ही त्यांना तेथे भेटूतेही धावतीलआणि आम्ही एकमेकांना मिठी मारू आणि म्हणू ,"आमचा मौल्यवान बंधू." प्रभूसगळं ज्यांवर मी प्रीती करतोआणि माझ्यावर जे प्रीती करतात त्यासाठी ते तिथं होते तसे होऊ दे. मी प्रार्थना करत आहेते तसेच होवो. मी त्या सर्वांवर प्रीती करतो. त्यांना प्रकट होऊ दे. मी आता त्यांना अनंतकाळचे जीवन प्रदान करू इच्छित आहे. त्यांना त्यांचे कार्य करू देआणि स्वीकार करू दे. कारण मी येशूच्या नावात मागत आहे. आमेन.

आतामाझ्या भावा-बहिणींनोकृपया गैरसमज करून घेऊ नका. मला माहित नाही नक्की काय झाले ते. मला माहित नाही काय झाले ते. पणदेवामाझ्या मृत्यूनंतर मला तेथे परत जाऊ दे. फक्त मला त्या ठिकाणी जाऊ देत्याच ठिकाणी मला जाणे आहेते कुठेही असो. मी पौल ज्याला तिसऱ्या स्वर्गातपर्यंत नेण्यात आले होते,  त्याच्याशी माझी तुलना करण्याचा प्रयत्न करत नाही. मी असे म्हणत नाहीये. मलाठाऊक आहे की तो मला माझा नव्या सेवाकाईसाठी थोडे उतेजन देऊ इच्छित होता.
--------------------------------------------------------x-------------------------------------

स्रोत: हा वरील उतारा भाऊ ब्रॅन्हम ह्यांच्या "नाकारलेला राजा" ह्या संदेशातून (The Rejected King' १५ मे१९६०) ग्रहण करण्यात आला आहे.

'The Rejected King' हा संदेश आपण ह्या खालील संकेत स्थळावर वाचू शकता. 

http://www.en.branham.ru/message3bd6.html?sermonum=646


सारांश:

§  प्रेषित पौल व भाऊ ब्रॅन्हम ह्यांनी अनुभवलेला सुखलोक वर्णनाचे सारांश: ह्या मर्त्य जीवनापलीकडे एक सुंदर अशी भूमी आहेज्याला सुखलोक म्हटले जाते.

§  सुखलोक हा स्वर्गाचा असा एक भाग आहे जेथे जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत मेलेले सर्व नीतिमान आत्म्यांचा वास्तव्य आहे. ह्यापुढेहिजो पर्यंत प्रभू येशूचे दुसरे येणे होत नाही तोपर्यंतसर्व नीतिमान आत्मे हे सुखलोकांत सामील होतील. ते तिथे चीर विसाव्यात आहेत आणि ते प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत आहेत. (प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनाचे संदर्भ - प्रेषित कृत्ये १:११प्रकटीकरण १:७१९:११-१६१ थेस ४:१६-१७५:२मत्तय २५:३१-४६२४:३६मार्क १३:२६-२७इब्री ९:२८तिताला पत्र २:१३ वाचा)

§  जेव्हा प्रभू येशू त्याच्या सर्व गौरवाने पृथ्वीवर पुन्हा येईलतेव्हा हे सर्व नीतिमान आत्मे त्यांचे प्रत्येकाचे गौरववी शरीर धारण करून त्याचाबरोबर पृथीवर राज्य करायला येतील. ( थेसल ४:१४रोम ५:१७)

§  मनुष्यांना सुखलोकांत प्रवेश मिळवण्यासाठी परिपूर्ण प्रीती आणि नीतिमत्व (जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासाद्वारे मिळते) हे अत्यावश्यक आहेत. तसेच मनुष्यांना ती परिपूर्ण प्रीती आणि नीतिमत्व हे नव्याने जन्मल्याशिवाय (Born Again - योहान ३:३) मिळू शकत नाही. (इब्री १३ अध्याय, गलतीकरांस पत्र ५:२२ रोमकरांस पत्र ३:२२४:२४-२५१०:९ वाचा)

§  सुखलोकांत फार रम्य असे वातावरण आहे आणि लांबपर्यंत असे हिरव्या कुरणासारखे मोकळे मैदान आहे. ही जागा स्वर्गाचा एक खालचा भाग असूनप्रभू येशूचे वास्तव्य त्या जागेहुन अजून थोडे वर असलेल्या जागी आहे.

§  तेथील रहिवासी चिर तरुण असूनहे सर्व एकमेकांचे भाऊ - बहिणी म्हणून तेथे आहेत. पृथ्वीवरील पती -पत्नीचे असे नाते तेथे आढळत नाही.

§  त्यांचे सरासरी वय साधारणतः अठरा ते बावीस वर्षापर्यंत आहे. त्या सर्वांचे रूप हे तारुण्याने व तेजाने भरलेले आहे. तेथे ते म्हातारे होत नाहीत. तेथे थकवा नाहीरोगराई नाहीआजारपण नाही आणि मृत्यूहि नाही.

§  §  ते सर्व पांढरे शुभ्र असे कपडे परिधान केलेले होते. तेथील महिलेच्या वेशभुषा ही पायापर्यंत लांब असे ओघळणारे परकर (skirts) आणि त्यांचे केस कंबरेच्या खालीपर्यंत असे आहेत. 

§  तेथे मत्सर नाहीअश्रू नाहीतफक्त आनंदी - आनंद आणि परिपूर्ण प्रेम आहे. महत्वाचे म्हणजे ह्या प्रेमात मानवी वासना / ग्रंथी (Hormones) नाहीत; म्हणून लैगिक वासना व संबंधही नाहीत. त्या परिपूर्ण प्रीतीशिवाय तेथे प्रवेशच नाही.

§  तेथे वेळेचे बंधन नाही. तेथे आज नाहीकाल नाही आणि उद्याहि नाही. (हे वेळेचे बंधन फक्त पृथ्वीवर आहे. शास्त्रातहि आपण वाचतो कि देवाला वेळेचे बंधन नाही)

§  आणि हो, तेथे प्राणीहि आहेत. (यशया ११:६-९)



ह्या लेखामागचे प्रयोजन व बोध: ह्या लेखाचा मुख्य उद्देश हा ख्रिस्ती बांधवांचे "मृत्यूनंतरचे" जीवनाबद्दलच्या शंकेचे निरसन करण्याचा आहे. ह्या लेखातील सर्व गोष्टी हे मनुष्यांसाठी आश्चर्यकारक व अद्भुत आहेतअगदी ज्या प्रमाणे प्रेषित पौल करिंथकरांस पत्रात म्हणतो की'डोळ्याने जे पाहिले नाहीकानांनी जे ऐकले नाहीव माणसाच्या मनात जे आले नाहीते देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने प्रगट केले आहे'.

बंधुनोआपल्या प्रभू येशू ने आपल्याला दिलेल्या त्या तारणाच्या अभिवाचनाला धृढ असे पकडून राहाकारण ते अभिवचन सत्य व देणारा विश्वसनीय आहे.

आम्हांस अशा आहे कीहा लेख तुम्हांसर्वानापापांपासून परावृत्त होऊन ते स्वर्गीय नीतिमत्व मिळवण्यास व पर्यायाने तारण प्राप्त करण्यास उतेजीत करेल. आपला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांसर्वास त्याकडे आकर्षित करो व सर्व सत्यात राखो, हीच नम्र प्रार्थना. आमेन.


-------------------------------------------------X-------------------------------------------

सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.

Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                                    

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक