Friday, 12 August 2016

Christian Gospel -Water Baptism - पाण्याचा बाप्तिस्मा

पाण्याचा बाप्तिस्मा “Water Baptism"



व्याख्या: बाप्तिस्मा म्हणजे इंग्रजीत 'Baptism' शब्द मूळ ग्रीक शब्द "Baptizo" ज्याच्या अर्थ "धुणे " (To wash) ह्यांतून आला आहे.

पार्श्वभूमी: ख्रिस्ती शिकवणीप्रमाणे सार्वकालिक जीवनासाठी  "नवा जन्म" घेणं ही एक प्राथमिक गरज आहे. नव्याने जन्म घेण्याचे तीन टप्पे आहेत; ते म्हणजे मनुष्याला नीतिमत्व प्राप्त करणेपवित्रीकरण आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. ह्या तीन टप्यांतील प्राथमिक टप्पा, ज्यात मनुष्याला नीतिमत्व (पापांपासून मुक्ती) प्रदान केले जाते, त्यात मनुष्यांना पश्चाताप करून प्रभू येशूच्या नावाने पाण्याचा बाप्तिस्मा घेणे क्रमप्राप्त आहे. 

त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला लावून दिलेले असे तीन भौतिक पवित्र नियम आहेत (Physical divine ordinances); ह्यांपैकी 'पाण्याचा बाप्तिस्माहा एक आहे. हे तीन पवित्र नियम किंवा सॅक्रामेंट हे खालील प्रमाणे आहेत:

१. सहभोजन / प्रभूच्या मेजावरील भोजन (Communion)

२. पाय धुणे (Feet Washing)

३. पाण्याचा बाप्तिस्मा (Water Baptism)

प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र शास्त्रात मार्क १६:१६ मध्ये आपल्याला स्पष्ट्पणे हे सुचित केले आहे  कीबाप्तिस्मा हा पापांपासून मुक्त होऊन (म्हणजेच नीतिमत्व प्राप्त करणे) नवा जन्म प्राप्त करून सार्वकालिक जीवन / मोक्ष प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे. देवाचे वचन आपल्याला असे सूचविते की बाप्तिस्मा घेण्यापूर्वी त्या मनुष्याचा प्रभू येशू ख्रिस्तावर व पर्यायाने त्याचे वधस्तंभावरचे अर्पण ह्यावर 'विश्वासअसणे आवश्यक आहे. मार्क  लिखित शुभवर्तमान मध्ये प्रभू येशू म्हणतो कीतुम्ही जाऊन सर्व जगात संपूर्ण श्रुष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो 'विश्वासधरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईलजो 'विश्वासधरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल.

मार्क १६:१६
"जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईलजो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल."

हे वरील वचन आपल्याला हे सुचविते की एका वैध बाप्तिस्मासाठी त्या मनुष्याचा विश्वास असला पाहिजे. हा विश्वास कोणावर तर प्रभू येशू ख्रिस्तावर व त्याच्या सुवार्तेवर विश्वास असला पाहिजे. विश्वास हा सुवार्ता ऐकून ती समजण्याने येतो.

बाप्तिस्म्याचा खरा अर्थ

बाप्तिस्मा हा विधी मनुष्याच्या आंतील देवाच्या कृपेचे काम पूर्ण झालेले आहे, ह्याची बाहेरील कबुली आहे. बाप्तिस्मा हा  जो एक लाक्षणिक भाह्य विधी आहे; तो हे प्रतीत करतो कीमनुष्य येशू ख्रिस्तामध्ये आपल्या पापांसाठी पश्चाताप करून मरतो आणि येशू ख्रिस्तामध्ये पुरला जाऊन येशूच्या पुनरुत्थानावर विश्वासाद्वारे त्याच्याबरोबर पुनुरुस्थित होतो. (१ पेत्र ३:२१ वाचा) इथे मरणे म्हणजे वास्तविक शारीरिक मरणे नव्हेतर स्वत्व:ला / पापी देहस्वभावाला मरणे किंवा स्वतःचा त्याग करणे. (रोमकरांस पत्र ६:३कलस्सेकरांस पत्र २:१२ वाचा)


बाप्तिस्मा ह्या विधीत एक मनुष्य आपल्या पापांसाठी मरून आपले आयुष्य देवाला अर्पण करतो. म्हणजेच आपले आयुष्य देवासाठी व्यतीत करण्याची कबुली देतो व नीतिमान गाण्यात येतो. आणि जेव्हा तो मनुष्य बाप्तिस्मा घेतो, तेव्हा तो येशू ख्रिस्ताला परिधान करतो, म्हणजेच तो मनुष्य 'ख्रिस्ती' गणला जातो.

१ पेत्र ३:२१
"त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हेतर शुद्ध भावाने देवाचे ऐकणेअसा आहे."

रोमकरांस पत्र ६:३
किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतलाह्याविषयी तुम्ही अजाण आहा काय ?"

कलस्सेकरांस पत्र २:१२
"तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेलाआणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविलेही गेला;"

परंतु इथे लक्ष्यात घेण्यासारखी महत्वाचे गोष्ट ही आहे कीबाप्तिस्मा घेण्याअगोदर मनुष्यांना आपल्या पापांसाठी पश्चाताप करणे आवश्यक आहे.

पश्चाताप करणे ह्याचा अर्थ म्हणजे; एका पापी मनुष्याला आपल्या पापांची जाणीव होऊन त्याने आपल्या पापांबद्दल दुःख / खेद व्यक्त करून पापांपासून परावृत्त होणे / पापाचा मार्ग सोडून देणे.

शास्त्र आपल्याला असे सुचित करते कीजो मनुष्य पाश्च्याताप करून येशू खिस्तावर विश्वास ठेऊन बाप्तिस्मा घेतोतो मनुष्य ख्रिस्त येशूला परिधान करतो. (गलतीकरांस पत्र ३:२७ वाचा) ख्रिस्त येशूला परिधान करणे म्हणजे त्याचा आत्माने चालणे. हाच तो आत्मा ज्याबद्दल प्रेषित पेत्र प्रेषित कृत्ये २:३८ मध्ये घोषणा करतो. (ह्या आत्म्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत )

गलतीकरांस पत्र ३:२७

"कारण तुम्हांमधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे;"

बाप्तिस्मा घेण्याची खरी पद्धत

येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर तेराशे वर्षांपर्यंतबाप्तिस्मा हा पाण्यात डुबवून देण्यात आला. बाप्तिस्मा हा विधी हा मुळात पाण्याशी निगडित आहे. बायबल आपल्याला बाप्तिस्मा पाण्यात डुबून / बुडून घेण्यास शिकवते. पण रोमन कॅथॉलिक चर्च आणि काही प्रोटेस्टंट पंथीय पाणी शिंपडून बाप्तिस्मा देतातज्याला बायबलमध्ये कोणताहि आधार सापडत नाही.

बाप्तिस्मा पाण्यात डुबून घेण्याचे शास्त्रातील आधार

    1.    बाप्तिस्मा करणारा योहानाने ही इस्राएलात लोकांना पाण्यात बुडवून बाप्तिस्मा दिला. (मत्तय ३:१६ वाचा) ह्यात म्हटले आहे की येशू पाण्यातून वर आलाम्हणजेच तो पाण्यात डुबला गेला होता.


     मत्तय ३:१६
     "मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहाआकाश उघडले"

    2.   पुढे प्रेषित्यांच्या कृत्यांमध्ये जेव्हा फिलिप्प हबशी षंढाला बाप्तिस्मा देतोतेव्हा पण ते दोघे पाण्यात उतरतात असे लिहिले आहे. (प्रेषितांचे कृत्ये ८:३८ वाचा)


     प्रेषितांचे कृत्ये ८:३८
"तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितलेआणि फिलिप्प व षंढ असे ते दोघे पाण्यात उतरलेआणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला".

ह्या वरील शास्त्र वचनावरून आपल्याला हे स्पष्ट होते की बाप्तिस्मा हा मुळात मनुष्यांना पाण्यात डुबवून देण्यात येत होता. इंग्रज़ी मध्ये ज्याला ‘Immerse’ म्हणतात; नुसते पाणी शिंपडून नव्हे! (रोमन कॅथॉलिक पद्धत)

ह्याचाच अर्थ प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याने बाप्तिस्मा हा पाण्यात डुबून घेण्यात घ्यावा असे पवित्र शास्त्र आपल्याला शिकविते.


नीतिमत्व प्राप्तीमध्ये बाप्तिस्माचा सहभाग ग्राफिक्सच्या मध्यातून असा आहे 



जर एका मुनुष्याचे शरीर हे काचेच्या भांड्याप्रमाणे आहे असे आपण जर कल्पिले तरनीतिमत्व प्राप्तीची पद्धत खालील चित्राप्रमाणे आहे.


आता कोणी म्हणेल की आम्हांला बाप्तिस्म्याची खरी पद्धत लक्षात आली आहे पण मग कोणाच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा ?

कोणत्या नावात बाप्तिस्मा घ्याचा ?

आजच्या ख्रिस्ती जगतात बाप्तिस्मा कोणाच्या नावाने घ्यावा ह्यावर अनेक मतमतांतरे आहेत. कोणी म्हणते येशूने सांगितल्या प्रमाणे तिघांच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा (म्हणजेच बापाच्यापुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने), कोणी म्हणते की देव एक असल्यामुळेत्याच्या नावात बाप्तिस्मा घेतला पाहिजे. पण शास्त्र आपल्याला ह्यासंबंधाने काय सांगते ते आपण पाहू या.

तीन देव असल्याची शिकवण ही रोमन कॅथॉलिक चर्चने उभारलेली आहे आणि म्हणूनच ते व काही प्रोटेस्टंट पंथीय हे तिघांच्या नावाने बाप्तिस्मा देतात. त्यासाठी ते मत्तय २८:१९ हे वचन पुढे करतात. पण ते ह्या वचनात काय नक्की सांगितले आहे ते समजून घेत नाहीत. ह्या वचनात येशू ख्रिस्त त्याच्या स्वर्गारोहणाअगोदर आपल्या शिष्यांस तारणाची सुवार्तेची जबाबदारी सोपवितो. (मत्तय २८:१९ वाचा)

मत्तय २८:१९
तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करात्यांस पित्याच्यापुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यायुगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करात्यांस पित्याच्यापुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या,”

आता इथे तीन देव मानणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की ह्या ठिकाणी येशूने "नावाने" (म्हणजे एकवचन) (singular) बाप्तिस्मा देण्यास सांगितले होते, "नावांनी" (अनेकवचन) (plural) नव्हे. ह्याचाच अर्थ ह्या तीन नावांचे एक असे नाव आहे.  म्हणूनच तीन देवांच्या नावाने बाप्तिस्मा देणे हे फोल व खुकीचे आहे.

जेथे दहा आज्ञेत देव म्हणतो "मी एक देव आहेम्हणून तुला अन्य देव नसावेत" तेथे ही  मंडळी तीन देवाची शिकवण उभारतातजी संपूर्णपणे चुकीची आहे आणि त्याला शास्त्रात कुठेही आधार नाही. 
जरी मत्तय शुभवर्तमानामध्ये ह्या गोष्टीबद्दल संदिग्धता असेल, तर आपण ह्याच घटने बद्दल लूक आपल्या पुस्तकात काय म्हणतो ते पाहू या. लूक २४:४७ ह्या वचनामध्ये येशू स्वतः म्हणतो की त्याच्या म्हणजेच (येशू ख्रिस्ताच्या) नावात बाप्तिस्मा द्या.

लूक २४:४७
"आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या (म्हणजेच येशू ख्रिस्ताच्यानावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी."

मत्तय २८:१९ ह्या वचनाचे योग्य स्पष्टीकरण

मुळात बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तीन नावे नसून ते तीन उपाध्या आहेत. पिता कोणाचे नाव असते का ? तर ती उपाधी/ कार्यकक्ष आहे. पुत्र कोणाचे नाव आहे का? तर नाही! नवीन करारात येशूला 'देवाचा पुत्र' ही उपाधी देण्यात आली आहे; तीही एक उपाधी आहे आणि त्याचप्रमाणे पवित्र आत्मा ही पण एक उपाधी आहे. ह्या तीन उपाधी कोणाच्या आहेत आणि त्याचे नाव काय आहे हे आपल्याला समजले तर आपल्याला खऱ्या देवाची ओळख होईल. त्या उपाधींचे खरे नाव "प्रभू येशू ख्रिस्त" हे आहे आणि तोच खरा देव आहे, अन्य कोणी नाही. (प्रेषितांचे कृत्ये ४:१२ वाचा)

प्रेषितांचे कृत्ये ४:१२
"आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाहीकारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. (येशू ख्रिस्ता शिवाय)


शास्त्रानुसार दिलेला बाप्तिस्मा

बायबलमध्ये नवीन करारात सगळीकडे प्रेषितांनी पाण्याच्या बाप्तिस्मा हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात दिला आहे. (संदर्भ वाचा: प्रेषितांची कृत्ये २:३८ प्रेषितांची कृत्ये १९ : १-५प्रेषितांची कृत्ये १०: ४६-४८ प्रेषितांची कृत्ये ८:१४)

प्रेषितांचे  कृत्ये २:३८

पेत्र त्यांना म्हणालापश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्याम्हणजे तुम्हाला पविता आत्म्याचे दान प्राप्त होईल.

प्रेषितांचे कृत्ये १९:१-५
"त्यांना तो म्हणालातुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हांस पवित्र आत्मा मिळाला कायत्यांनी त्याला म्हटलेपवित्र आत्मा आहे कीं काय हे आम्ही ऐकलेहि नाही. तो त्यांना म्हणालातर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतलाते म्हणाले योहानाचा बाप्तिस्मा. पौलाने म्हटलेयोहान पश्चयतापाचा  बाप्तिस्मा देत असेतो लोकांना सांगत असे कीमाझ्यामागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला;"


कोणाच्या नावाने तर "प्रभू येशूच्या नावाने".

जे येशूच्या शिष्यांना समजले  ते रोमन कॅथॉलिक चर्चच्या तत्वज्ञान्यांना समजले आहे काय ? कधीच नाही. मग जर येशूने तीन नावात बाप्तिस्मा देण्यास आज्ञापिल्यावर सुद्धा येशूच्याच नावाने बाप्तिस्मा देणारे त्याचे प्रेषित मूर्ख होते काय कधीच नाही. त्यांना प्रकटीकरणाने हे समजले होते की प्रभू येशू वास्तविकरित्या तीन वेगळे नावे सुचवत नव्हतातर तो एकाच माणसाचे तीन कार्यकक्ष / उपाधींबद्दल सुचवत होता. ह्याचा अर्थ मत्तय २८:१९ ह्या वचनाचा शब्दशः  अर्थ लावून विपर्यास केला जात आहेएकाच्या बदल्यात तीन देव तयार केले आहेतज्यात काडीमात्र तथ्य नाही.

बायबलमध्ये खरे विश्वासणारेयहूदी यहूदीतर राष्ट्रे,  शोमरोनी व इतर सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतला होताकारण तोच एक खरा आणि शास्त्रवर आधारित मार्ग आहे. 

मग काय येशूच्या नावाने बाप्तिस्मा देऊन प्रेषित चुकीले होते काय ?

कधीच नाही!! कारण ते प्रेषितांनी जे ओळखले होते ते आजच्या युगाचे धार्मिक नेते ओळखाण्यात अपयशी ठरले आहेत. प्रेषितांचे ह्याविषयीचे म्हणजेच एकच देवासंदर्भात असलेले सिद्धांतआपल्याला ह्या खालील वचनांतून समजतील.

प्रेषितांचे कृत्ये ४:१२
"आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाहीकारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. (येशू ख्रिस्ता शिवाय)”

फिलिप्पंकरांस पत्र २:९-११
"ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केलेआणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलेह्यांत हेतू हा कीस्वर्गातपृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक घुडघा येशूच्या नावाने टेकला जावाआणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे."

कलस्सेकरांस पत्र २:९
"कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते,"

प्रेषित पौल करिंथकरांस पत्रात म्हणतो कीआपणा सर्वाना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहेतो आत्मा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा. (१ करिंथकरांस पत्र १२:१३ वाचा)

१ करिंथकरांस पत्र
".... एक शरीर होण्याकरिता आपणां सर्वाना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहेआणि आपण एकाच आत्म्याने संचारीत झालो आहो."


ह्याचाच अर्थ खरा बाप्तिस्मा हा एकाच नावात म्हणजे "प्रभू येशू ख्रिस्ताच्या" नावात घ्यावा असे बायबल आपल्याला सुचविते.

मग तीन नावाने बाप्तिस्माचा उगम कुठून झाला ?

रोमन कॅथॉलिक चर्चची बाप्तिस्म्याचा सिद्धांत :हे जे रोमन चर्चच होते ज्यांनी शिंपडून बाप्तिस्मा देण्याची शिकवण उभारली; ज्यात प्रभु येशू ख्रिस्ताचे नाव वगळून त्याला पित्याच्यापुत्राच्या व पवित्र आत्म्या ह्यांनी बदलण्यात आलेआणि त्याचबरोबर नवजात अर्भकाचे बाप्तिस्म्याची प्रथा चालू केली. 

(नवजात बालक ह्याला त्याच्या पापाची जाणीव नसल्यामुळे ते पाश्च्याताप करू शकत नाहीआणि पर्यायाने बायबलप्रमाणे बाप्तिस्मा हे घेऊ शकत नाही.)



येशूच्या स्वर्गरोहणानंतर ते ३२५ A.D पर्यंत येशूच्या नावाने बाप्तिस्मा देण्यात येत होता. बायबलमध्ये सगळीकडे प्रेषितांनी सर्व पाण्याच्या बाप्तिस्मात प्रभू येशूचेच नाव वापरलेले आहे.  पण ३२५ A.D मध्ये निसिया कौन्सिल मध्ये रोमन कॅथॉलिक चर्चला हा तीन देवांचा चुकीचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी ही चुकीची शिकवण उभारली जी आजपर्यंत चालत आली आहे. त्यांच्यानंतर त्यांच्यातूनच उदयास आलेल्या काही प्रोटेस्टंट पंथीयांनी तीच विशिष्ट शिकवण घेतली व ती अजूनपर्यंत आंधळेपणाने आचारात आहेत.

पण प्रभू म्हणतो “सत्य तुम्हांला समजेलआणि ते तुम्हांला बंधमुक्त करील". खरोखर हे सत्य तुम्हा-आम्हांला अशा चुकीच्या शिकवणीपासूनचुकीच्या तत्त्व व सिद्धतांतपासून बंधमुक्त करो हीच परमेश्वराकडे नम्र प्रार्थना. आमेन.

सारांश: ह्या सर्व वचनांचा सारांश असा आहे कीशास्त्राप्रमाणे तारण प्राप्तीसाठी पाण्याचा बाप्तिस्मा जो एक लाक्षणिक विधी आहे तो घेणे अत्यावश्यक आहे. बाप्तिस्मा ह्या विधीत एक मनुष्य आपल्या पापांसाठी / देहस्वभावासाठी मरून आपले आयुष्य देवाला अर्पण करतो. म्हणजेच आपले आयुष्य देवासाठी व्यतीत करण्याची कबुली देतो. बाप्तिस्म्या अगोदर प्रभू येशू व त्याच्या सुवार्तेवर विश्वास व पापांसाठी पश्चाताप करणे क्रमप्राप्त आहे. आणि जेव्हा तो मनुष्य बाप्तिस्मा घेतोतेव्हा तो येशू ख्रिस्ताला परिधान करतो, म्हणजेच तो मनुष्य 'ख्रिस्तीगणला जातो

शास्त्राप्रमाणे बाप्तिस्मा हा पाण्यात डुबवून /बुडून घेतला जावा आणि तो एका नावाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याच नावाने घ्यावादोन किंवा तीन नावाने नाही!!!


त्याचप्रमाणे नवजात बालक ह्याला त्याच्या पापाची जाणीव नसल्यामुळे ते पाश्च्याताप करू शकत नाहीआणि पर्यायाने बायबलप्रमाणे बाप्तिस्मा घेऊ शकत नाही


सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.



Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                                 

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक