“पापक्षमा: केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच मिळते” “Remission of Sin: Only by Blood of Lord Jesus Christ”
पापक्षमा - व्याख्या: पापक्षमा ज्याला इंग्रजीत "Remission of Sin" म्हटले आहे, ह्याचा अर्थ हा म्हणजे ‘पापांची क्षमा किंवा पापाच्या डागापासून मुक्ति' असा होतो.
पापक्षमेची
गरज
ह्या जगात जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा पापांत
जन्मलेला आहे. (रोमकरांस पत्र ३:२३ वाचा) प्रेषित योहान पण आपल्या पत्रात ह्याला
दुजोरा देतो (१ योहान १:८, १० वाचा) हे पाप जरी त्या मनुष्यांनी प्रत्येक्षात
केलेले नसले, तरी ते त्यात आढळते. कारण ते पाप मनुष्यांत वरश्याने आले; म्हणजेच आदाम व हव्वा ह्यांचे पाप त्यांच्यातून
आज सर्व मानवजातीत चालून आले आहे. (रोमकरांस पत्र ५:१२ वाचा)
रोमकरांस पत्र ३:२३-२४
"कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे
पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून
प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात."
१ योहान १:८, १०
"आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवितो, व आपल्या ठायी सत्य नाही..... आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवितो, आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. "
रोमकरांस पत्र ५:१२
"एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे
मरण शिरले; आणि सर्वानी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा
प्रकारे मरण पसरले.”
तसेच कोणीही पापी मनुष्याला तारण / सार्वकालिक जीवन / मोक्ष / स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाही; कारण शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की पापाचे वेतन/ शेवट हे मरण आहे. (रोमकरांस पत्र ६:२३ वाचा)
रोमकरांस पत्र ६:२३
"कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये
सार्वकालिक जीवन आहे."
हे मरण म्हणजे दोन्ही शारीरिक व आत्मिक मरण
होय. शारीरिक मरण म्हणजे पापद्वारे उपजले रोग, विकार इत्यादी ह्याने आलेले मरण आणि आत्मिक मरण म्हणजे नाश - म्हणजेच मेल्यानंतर
आत्मा स्वर्गात न जाता नरकात जाऊन तेथे न विजणाऱ्या अग्नीत त्याला आलेला मृत्यू.
ह्याच कारणासाठी मनुष्यांना नीतिमत्व म्हणजेच, आपल्या पापांपासून मुक्ति मिळवून व शुद्ध होणे क्रमप्राप्त आहे. स्वर्ग आणि त्यात वसणारा परमेश्वर देव हे दोघेही
पवित्र व शुद्ध आहेत.
नीतिमत्व ही अशी स्थिती आहे जेथे मनुष्याचे पाप
पुसले जातात; असे की जणू त्याने 'पाप केलेच नाही' आणि त्याला 'नीतिमान' गणण्यात येते. म्हणूनच स्वर्गात जाण्यासाठी प्रत्येक मनुष्यांना
पापक्षमा (नीतिमत्व) अत्यावश्यक आहे; आणि बायबालप्रमाणे ती पापक्षमा केवळ येशू
ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच मिळू शकते. ते कसे ते सविस्तरपणे आपण पुढे पाहू या.
पापक्षमा हा विषय वाचकांना बारकाईने समजण्यासाठी, तो आपण तीन भागात विभागला आहे. ते तीन भाग म्हणजे:
या
भागात आपण "पापक्षमा कशाने मिळते" ते पाहू या.
ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर म्हणजे: या जगात पापी लोकांना पापक्षमा फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच मिळते; जे रक्त त्याने तुम्हां-आम्हांसाठी कालवारी क्रुसावर अर्पण केले. (मत्तय २६:२८, १ योहान १:७ वाचा) आता हे कोणा मनुष्याच्या विचारांवर आधारित नसून
पवित्र शास्त्रावर आधारित आहे. (इब्रीकरांस पत्र ९:२२ वाचा) इथे प्रेषित पौल म्हणतो की, रक्त ओतल्यावाचून/अर्पण केल्यावाचून पापक्षमा मिळत नाही.
मत्तय २६:२८
"हे माझे (नव्या) 'कराराचे रक्त' आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले
जात आहे."
१ योहान १:७
"पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करिते."
इब्रीकरांस पत्र ९:२२
"नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते, आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही."
इथे कोणी म्हणेल की शरीरातील सर्व भागांतून
केवळ रक्तच का अर्पण करण्यास सांगितले आहे ? इतर काही म्हणजे चामडी, नखं, इत्यादी का नाही ? ह्याचे उत्तर असे आहे की, 'रक्तात जीवन आहे'; म्हणजेच शरीराचे जीवन हे रक्तात असते. ह्या संदर्भासाठी आपल्याला जुन्या करारात जावे लागेल. पवित्र शास्त्रातील लेवीयच्या पुस्तकात परमेश्वराने इस्राएल लोकांना पापक्षेमेंसंदर्भात विधी
लावून दिला होता. (लेवीय १७:११ वाचा) त्यात परमेश्वराने इस्राएल लोकांना त्यांच्या
पापांसाठी प्रत्येक वर्षी एक निर्दोष कोकरा किंवा बकऱ्याची रक्त अर्पण करण्यास
अज्ञापिले होते.
लेवीय १७:११
"शरीराचे जीवन तर रक्तात असते; आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते मी
तुम्हांला दिले आहे; कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच
प्रायश्चित होते."
इथे पाप हे मरण दर्शवते आणि रक्त हे जीवन
दर्शवते. मुळांत देवाला पापक्षमेसाठी प्रायश्चित म्हणून त्या मनुष्यांचे रक्त हवे होते. म्हणजेच लोकं त्यांच्या पापांच्या प्रयश्चितासाठी त्या प्राण्याचे (कोकऱ्याचे व बकऱ्याचे) रक्त खंडणी म्हणून अर्पित होते. मनुष्यांच्या रक्त ओतण्याबद्दल / ओतण्याच्या बदल्यात देवाने मनुष्यांना दिलेली
ही मोठी सूट किंवा मुभा होती. मुळांत जेथे देवाला त्या मनुष्यांचे रक्त हवे
होते, तेथे प्राण्याचे लाक्षणिक रक्त अर्पिल्यामुळे, हे पापे केवळ झाकले जात होते. कोकऱ्याचे व बकऱ्याचे रक्त मनुष्यांचे पाप कायम पुसण्यास असमर्थ होते. (इब्रीकरांस पत्र १०:४ वाचा)
इब्रीकरांस पत्र १०:४
"कारण बैलांचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.
म्हणून तो (म्हणजे येशू) जगात येते वेळेस म्हणला, ' यज्ञ व अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले;"
पापे कायम पुसण्यासाठी एका निर्दोष मनुष्याचे
रक्त अर्पिण्याची गरज होती. पण सर्व मनुष्ये तर पापी होते व आहेत. मग निर्दोष मनुष्य आणणार कुठून? त्यासाठी परमेश्वर देव स्वतः येशू रुपी देहात
अवतरला आणि एक निर्दोष कोकरा म्हणून जगात आला. (योहान १:२९ वाचा)
योहान १:२९
“दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो (बाप्तिस्मा करणारा योहान)
म्हणाला, हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!!”
त्याचा जन्म सर्व मनुष्यांसारखा शरीर वासनेने
झाला नाही, तर देवाच्या आत्म्याद्वारे झाला होता. म्हणून
त्याच्यावर मूळ पापाचा डाग नव्हता. त्यांनी सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन
कालवरी क्रुसावर आपले निर्दोष रक्त अर्पण केले. (रोमकरांस पत्र ५:८-९ वाचा)
रोमकरांस पत्र ५:८-९
"परंतु देव अपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण
विशेषकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहो."
ज्याला (म्हणजे येशूला) पाप ठाऊक नव्हते, तरी तो मनुष्यांसाठी पाप असा झाला. (२ करिंथकरांस ५:२१ वाचा). प्रभू येशूने जगाच्या पापांसाठी
आपल्या स्वतःला एकदाचेच अर्पण केले. त्याने सर्व मनुष्य जातीच्या पापांसाठी खंडणी म्हणून आपले ते
रक्त अर्पण केले. (इफिसकारांस पत्र १:७ वाचा)
त्याच्या या अर्पणामुळे
मनुष्यांना आता पूर्वीप्रमाणे त्यांच्या पापांसाठी वारंवार अर्पण करण्याची गरज नाही. (इब्रीकरांस पत्र ९:२८ वाचा) रोमकरांस पत्रात प्रेषित पौल म्हणतो की, आता त्याच्ये (म्हणजे येशूचे) ते रक्त जरी नसले, तरी येशूच्या ह्या कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वाना तो विनामूल्य नीतिमान
ठरवतो. (रोमकरांस पत्र ३:२२ वाचा) ह्या नीतिमत्वाद्वारेच मनुष्यांना स्वर्गात
प्रवेश मिळू शकतो. येशू ख्रिस्ताने आपल्या अर्पणाद्वारे देव आणि मनुष्य ह्या
दोघांमध्ये समेट घडवून आणला आहे.
२ करिंथकरांस ५:२१
"ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता
पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे."
इफिसकारांस पत्र १:७
"त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी
त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ति म्हणजे आपल्या आपराधांची
क्षमा आपल्याला मिळाली आहे;"
रोमकरांस पत्र ३:२२
"हे देवाचे नितीमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या
द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे; त्यांत भेदभाव नाही."
इब्रीकरांस पत्र ९:२८
"त्याअर्थी ख्रिस्त 'पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी' एकदांच अर्पिला गेला,”
पापक्षमा
केवळ येशूच्याच रक्ताने मिळते ह्याचे पवित्र शास्त्रातील अनेक संधर्भ खालील
प्रमाणे आहेत.
१ करिंथकरांस १५:३
".....शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला;"
कलस्सैकरांस पत्र १:१४
"त्या पुत्राच्या ठायी, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ति म्हणजे आपल्या
पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे."
कलस्सैकरांस पत्र १:२०
"आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून
त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला
बरे वाटले."
इब्रीकरांस पत्र १०:१६-२०
"परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन
तो हा: मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन. आणि त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच
नाही. तर मग जेथे क्षमा झाली तेथे पापबद्दल अर्पण
व्हावयाचे राहिले नाही. म्हणून बंधुजनहो , त्याने पडद्यांतून म्हणजे स्वदेहांतून जो नवीन व जीवनयुक्त
मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परम पविञस्थानात येशूच्या
रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे;"
१ योहान २:२,१२
“आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि
पापांबद्दल आहे......मुलांनो मी तुम्हांस लिहितो, कारण त्याच्या (म्हणजेच येशूच्या) नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांस क्षमा झाली आहे."
प्रकटीकरण १:५
"आणि 'विश्वसनीय साक्षी', मेलेल्यांमधून 'प्रथम जन्मलेला' व 'पृथ्वीवरील राजांचा अधिपति' येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांस कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांअम्हांला 'पटकांतून मुक्त केले',"
सारांश: ह्या सर्व वरील वचनाच्या आधारे
आपल्याला हे समजते कि पापक्षमा ही केवळ प्रभू येशू
ख्रिस्ताचे निर्दोष निष्कलंक रक्ताद्वारेच होते.
रक्ताने अशासाठी, कारण रक्तात जीवन आहे. जुन्या करारात
पापक्षमेबद्दल अर्पिलेल्या कोंकऱ्याचे किंवा बकऱ्याचे रक्त मनुष्यांचे पापे कायम
पुसण्यास असमर्थ होते. म्हणून परमेश्वर स्वतः येशूरुपी पवित्र व निर्दोष शरीरात
अवतरून, त्याने जगाच्या पापासाठी प्रायश्चित म्हणून आपले निर्दोष रक्त
अर्पिले. त्याच्या त्या रक्तावर व त्या अर्पणावर जो कोणी विश्वास ठेवणार्यांना
सर्वाना त्याने नीतिमत्व (म्हणजेच पापक्षमा) विनामूल्य अशी देऊ केली आहे.
त्यामुळे आज प्रत्येक मनुष्यांना पापक्षमा मिळविण्यासाठी गरज आहे ती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवण्याची. आमेन.
त्यामुळे आज प्रत्येक मनुष्यांना पापक्षमा मिळविण्यासाठी गरज आहे ती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवण्याची. आमेन.
सुचना: वरील बायबलमधील
संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया,
ह्या अधिकृत भाषांतरित
आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2020 Digital सुवार्तिक All Rights Reserved


No comments:
Post a Comment