पार्श्वभूमी: रोमन कॅथोलिक चर्चची अधिकृत भूमिका अशी आहे की येशूची आई
मरीया तिचे संपूर्ण जीवन एक कुमारिका अशी राहिली. कॅथॉलिक चर्च जरी ही शिकवण पुढे करत असले तरी
ही संकल्पना बायबलप्रमाणे आहे का ? हे आपल्याला नीट तपासून पाहायला हवे. अगोदर आपण कॅथॉलिक चर्च
ह्या शिकवणीविषयी काय मानते त्यावर प्रकाश टाकू या.
रोमन कॅथोलिक चर्च मरियेला "देवाच्या आई" आणि
"स्वर्गाची राणी" म्हणून मानते. त्याचबरोबर ते हे
ही मानते की मरियेला स्वर्गात एक उच्च स्थान आहे, त्याबरोबरच येशू आणि देव जो पिता ह्यांच्याकडे जाण्याचा ती एक जवळचा प्रवेश आहे. पण ह्यातील कोणतीही संकल्पना पवित्र शास्त्रात कोठेही शिकविले जात नाही, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
मुळांत जरी मरीयेने कामसंभोग केला असला तरीही ती पवित्रच गणली गेली असती, कारण विवाहात कामसंभोग करणे हे पाप गणले जात नाही. त्यामुळे मारियेने
जरी आपला पती योसफाबरोबर
कामसंभोग केला असला, तरीही ती पवित्रच गणली असती. त्यामुळे ही "शाश्वत
कौमार्य" ही संकल्पनाच मुळांत अनावश्यक नाही.
रोमन कॅथॉलिक चर्चची ह्या शिकवणीची अधिकृत प्रत आपल्याला
ह्या खालील संकेत स्थळावर वाचायला मिळेल.
Catechism
of Catholic Church (Paragraph 2. "Conceived by the Power of the Holy
Spirit and Born of the Virgin Mary" verse – 499-501)
आता आपण पवित्र शास्त्र बायबल मरीयेच्या शाश्वत कौमार्यबद्दल काय म्हणते ते
पाहू या. हे सत्य आहे की मरीयेने कुमारवस्थेत येशूला जन्म दिला. म्हणजेच योसेफ व मरीया ह्या दोघांचा येशूचा जन्म होईपर्यंत
लैंगिक संबंध नाही. (मत्तय १:२५ वाचा) ह्याचाच अर्थ हा होतो की येशू जन्मल्यावर सुद्धा मरियेचे कुमारीपण साबूत होते.
मत्तय १:२५
"तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने (योसफाने) तिला जाणले नाही"
तरी पवित्र शास्त्र बायबल आपल्याला येशूनंतर मरीयेच्या इतर मुलांबद्दल सांगते.
म्हणजेच मरियेला येशूनंतर इतर मुले ही होती. मत्तय १३:५३ आपल्याला स्पष्टपणे सांगते की, येशू त्याच्या गावी सभास्थानात शिकवीत असता, लोक आश्चर्य करून म्हणाले की, "हा सुताराचा (योसेफ) पुत्र ना ? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना ? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे ह्याचे भाऊ ना ? ह्यांच्या बहिणी, त्या आपणाबरोबर नाहीत काय ? मग हे सर्व (ज्ञान) ह्याला कोठून ?" हे वचन हे सिध्द करते की येशूला भाऊ - बहिणी होते. आता हे
आपल्याला माहीत आहे की ते मरिया आणि योसेफ ह्यांना येशूच्या जन्मानंतर झाले होते.
शास्त्र आपल्याला त्यांची नावे सुद्धा सांगते.
मत्तय १३:५३
"हा सुताराचा (योसेफ) पुत्र ना? ह्याच्या आईला मारिया म्हणतात ना ? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे ह्याचे भाऊ ना ? ह्यांच्या बहिणी, त्या आपणाबरोबर नाहीत काय ? मग हे सर्व ह्याला कोठून ?"
ह्यावर कॅथॉलिक चर्च म्हणते की मूळ ग्रीक भाषांतरमध्ये (नवीन करार हा मूळ ग्रीक भाषेत लिहिला गेला आहे) "भाऊ"
आणि "बहिणी" चा अर्थ हा शब्दशः भाऊ - बहिणी असा होत नाही, तर त्याचे चुलते (Cousin) किंवा जवळचे नातेवाईक (Relatives) असा होतो. ही तर कॅथॉलिक चर्चची निवळ पळवाट आहे, जे ते अगोदर पासून करत आले आहेत. जेथे येशूच्या भावांचे नाव
लिहिले आहे, तेथे कॅथॉलिक चर्च म्हणते की ते भाऊ बहिणी नसून
नातेवाईक आहेत, म्हणजेच इथे ह्या शिकवणीचा फोलपणा उघड होतो कि नाही ?
आता कोणी म्हणेल कि ते जरी त्याचे नातेवाईक नसले तरी ते त्याचे सावत्र भाऊ-बहिणी असू शकतात (म्हणजेच योसेफाचे दुसऱ्या पत्नीचे मुले असू शकतात). तर ह्या तर्काला मत्तय १२: ४७ अधिक स्पष्ट उत्तर आहे. इथे त्याच्या भावा - बहिणी बरोबर त्याची आई (मरीया) हिचाही उल्लेख आहे. (मत्तय १२: ४६- ५० वाचा)
आता कोणी म्हणेल कि ते जरी त्याचे नातेवाईक नसले तरी ते त्याचे सावत्र भाऊ-बहिणी असू शकतात (म्हणजेच योसेफाचे दुसऱ्या पत्नीचे मुले असू शकतात). तर ह्या तर्काला मत्तय १२: ४७ अधिक स्पष्ट उत्तर आहे. इथे त्याच्या भावा - बहिणी बरोबर त्याची आई (मरीया) हिचाही उल्लेख आहे. (मत्तय १२: ४६- ५० वाचा)
मत्तय १२: ४७
"तेव्हा कोणीएकाने त्याला सांगितले, पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर
उभे राहिले आहेत".
म्हणजेच ते त्याचे सावत्र भाऊ बहिणी नसून खरे भाऊ बहिणी होते. (म्हणजेच ते मरियेचेच इतर मुले होते)
ज्यांना तिथले लोक येशूचे भाऊ बहिणी म्हणतात, त्यांना कॅथॉलिक चर्च नातेवाईक म्हणते, हे कसले तर्कशास्त्र ? जरी मत्तयने आपल्या शुभवर्तमानात लिहिण्यात चूक केली असली असे जरी आपण एकवेळ मानले, तरी दुसऱ्या तिन्ही शुभवर्तमानात (मार्क, लूक आणि योहान) त्यांना "भाऊ आणि बहिणीच" म्हटले आहे.
म्हणजे हे सर्वश्रुत आहे की ते त्याचे जात्याच भाऊ बहिणी होते. (मार्क ३:३१-३४, लूक ८:१९-२१, योहान २:१२ आणि प्रेषितांचे कृत्ये १:१४ हे संधर्भ वाचा) म्हणजे शुभवर्तमानाचे लेखकांपेक्षा रोमन कॅथॉलिक चर्चच्या तत्वज्ञानांना जास्त येशू विषयी माहिती आहे, जे कधीही शक्य नाही. कारण शुभवर्तमान लिहिणारे येशू बरोबर सर्वकाळ होते आणि त्यांनी मांडलेल्या सर्व घटना सत्य आहेत.
आता आपण शास्त्रातील वरील सर्व संदर्भ पाहता आपल्या लक्षात येईल की मरीयेची "शाश्वत कौमार्य" ही
कल्पना पवित्र शास्त्र पासून घेतली गेली नाही, तर ती मानवी तर्कज्ञानवर आधारित आहे. हे तर्कशास्त्र आपल्यावर लादले गेले
आहे आणि हे शास्त्रवचनाला नाकबूल आहे.
सारांश: ह्या सर्व वचनाच्या आधारे आपल्याला स्पष्ट होते की मरीयेचा
" शाश्वत कौमार्य" ही संकल्पना शास्त्रापासून घेतली गेली नाही. तर ती रोमन कॅथॉलिक चर्चच्या मानवी तर्कज्ञानावर आधारित असून, मुळांत अनावश्यक असूनही ख्रिस्ती जणांवर लादली गेलेली शिकवण आहे.
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2020 Digital सुवार्तिक All Rights Reserved


No comments:
Post a Comment