“काळाच्या
पडद्या पलीकडे - अधोलोक
Beyond the Curtains of Time - Hell”
Beyond the Curtains of Time - Hell”
पार्श्वभूमी: हजारो वर्षांपासून आपण सर्व मर्त्य मनुष्य "मृत्यू नंतरचे जीवन" ह्याबद्दल विचार करीत आहोत. पवित्र शास्त्रातील जुन्या करारात ईयोबाने तो शाश्वत प्रश्न विचारला आहे की
"मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?“ (ईयोब १४:१४ वाचा)
आजच्या एकविसाव्या शतकातदेखील मर्त्य मनुष्याकडून अजूनही हाच प्रश्न विचारला जात आहे. त्यात २००० वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त खरोखर मृतांतून उठला ह्यावर विश्वास ठेवणे हे आजच्या मनुष्यांसाठी फार आश्चर्यकारक आहे. परंतु ह्यात एकमात्र सत्य हे आहे कि, प्रभू येशू ख्रिस्त हा मृतांतून उठला आहे आणि तो आजही जिवंत आहे. तरी पण पवित्र शास्त्र ह्या संदर्भात काय सांगते ते आपण ह्या खालील लेखात पाहू या.
"मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?“ (ईयोब १४:१४ वाचा)
आजच्या एकविसाव्या शतकातदेखील मर्त्य मनुष्याकडून अजूनही हाच प्रश्न विचारला जात आहे. त्यात २००० वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त खरोखर मृतांतून उठला ह्यावर विश्वास ठेवणे हे आजच्या मनुष्यांसाठी फार आश्चर्यकारक आहे. परंतु ह्यात एकमात्र सत्य हे आहे कि, प्रभू येशू ख्रिस्त हा मृतांतून उठला आहे आणि तो आजही जिवंत आहे. तरी पण पवित्र शास्त्र ह्या संदर्भात काय सांगते ते आपण ह्या खालील लेखात पाहू या.
व्याख्या: सुखलोक हा स्वर्गाचाच एक भाग आहे, जेथे नीतिमान आत्मे विसावा घेत प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत
आहेत. इथे चीर आनंद आणि सुख आहे. त्याचप्रमाणे अधोलोक हा एक मृत क्षेत्र आहे जो नरकाचा भाग
आहे. इथे फार यातना व कष्ट आहेत.
मृत्यूनंतरच्या जीवनाचा विषय हा वाचकांच्या
सोयीसाठी आम्ही तीन भागात विभागला आहे.
ह्या
भागात आपण अधोलोकासंदर्भात पवित्र शास्त्र काय सांगते ते सावितरपणे पाहू या.
बायबलमध्ये अधोलोकाचा उल्लेख हा प्रथम जुन्या
करारात गणनाच्या पुस्तकात सापडतो; जेथे कोरह, दाथान व अबीराम ह्यांनी मोशेविरुद्ध (म्हणजेच
देवाविरुद्ध) बंड केले होते. त्यामुळे देवाचा क्रोध त्यांच्यावर फार भडकून ते
अधोलोकांत जिवंत असे उतरवले गेले. (गणना १६:३१-३३ वाचा)
गणना १६:३१-३३
"हे त्यांचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या
पायाखालची भूमी दुभंगली आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून ते, त्यांचे सर्व मालमत्ता गिळून टाकिली. ह्या प्रमाणे ते व
त्यांचे सर्वस्व अधोलोकांत जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळींतून
ते नष्ट झाले."
अधोलोक
कसा आहे ?
आता अधोलोकांत वातावरण कसे आहे ह्याबद्दल
शास्त्र आपल्याला अनेक ठिकाणी स्पष्ट सांगते. शास्त्रात अनुवाद ह्या पुस्तकातील
उल्लेखात अधोलोक हा अग्नीने भरलेला आहे असे प्रतीत होते. (अनुवाद ३२:२२ वाचा) तसेच प्रेषित पेत्र आपल्या पत्रात लिहितो की, अधोलोकांत निबिड अंधकार आहे. (२ पेत्र २:४ वाचा) पवित्र शास्त्रातील मत्तय शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू आपल्या
शिष्यांना एक दाखला समजावत असताना अधोलोकाचे वर्णन करतो की, तेथे रडणे म्हणजेच दुःख, पीडा व दात खाणे आहे. (मत्तय १३:४१-४३ वाचा)
अनुवाद ३२:२२
"कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकांच्या तळापर्यंत ती पसरली आहे,"
२ पेत्र २:४
"कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांस नरकात (ग्रीकमध्ये त्याला 'टरटरॉस' म्हटले आहे) टाकले आणि न्यायनिवाड्याच्याकरिता
राखून अंधकारमय खाड्यात ठेवले;"
मत्तय १३:४१-४३
"मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व 'अडखळविणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना'त्याच्या राज्यांतून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व
दांत खाणे
चालेल,"
अधोलोकांत
कोणाचा प्रवेश होतो ?
मृत्यूनंतर ज्या मानवी आत्म्यांचा प्रवेश
सुखलोकांत झाला नाही, तो आत्मा अधोलोकांत जातो. आपण अगोदर वाचले की
मृत्यूनंतर केवळ दोनच ठिकाणं आहेत, जेथे मनुष्याचे आत्मे सामील होतात. थोडक्यात
म्हणजे जे मनुष्य अनीतिमान किंवा पापी म्हणून मरण पावतात ते अधोलोकांत प्रवेश
करतात. आपण वर वाचल्याप्रमाणे
काही लोक जिवंतपणे अधोलोकांत उतरले किंवा ठेवले गेले आहेत. त्यात उत्पत्तीच्या
सैतानाच्या नदी लागून देवाविरुद्ध बंड पुकारणारे देवदूत हे आहेत जे अगोदर पासून
तेथे पीडा भोगीत आहेत व न्यायची वाट पाहत आहेत. (२ पेत्र २:४, यहुदाचे पत्र १: ६ वाचा)
२ पेत्र २:४
"कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात राखून ठेवले;"
यहुदाचे पत्र १:६
"आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद राखता आपले वसतिस्थान सोडले,त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान न्यायाकरता राखून ठेवले."
२ पेत्र २:४
"कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात राखून ठेवले;"
यहुदाचे पत्र १:६
"आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद राखता आपले वसतिस्थान सोडले,त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान न्यायाकरता राखून ठेवले."
त्याचप्रमाणे देवाविरुद्ध
बंडखोर वृत्तीचे ईस्राएली कोरह, दाथान, अबीराम ह्यांचे कुटुंब (गणना १६:३१-३३) आणि सदोम व गमोरा ह्यातील ते सर्व जरकर्मी व अमंगळ लोकं हे
देखील अधोलोकांत आहेत. (यहुदाचे पत्र १:७ वाचा)
यहुदाचे पत्र १:७
"त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्य कोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उधाहरणादाखल पुढे ठेवली आहेत."
यहुदाचे पत्र १:७
"त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्य कोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उधाहरणादाखल पुढे ठेवली आहेत."
आता ह्याबाद्दल कोण म्हणेल की दुष्ट, दुर्जन, देवाला विसरणारी व देवाविरुद्ध बंड पुकारणारे
हेच केवळ अधोलोकांत जातात ह्याला शास्त्रात काय पुरावा आहे ? तर स्तोत्रकरता दावीद देवाच्या न्यायीपणावरील आपल्या एका
स्रोतात म्हणतो की, देवाला विसरणारे दुर्जन लोकं हे अधोलोकांत
जातील. (स्रोत्रसंहिता ९:१७ वाचा)
स्रोत्रसंहिता ९:१७
"देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकांत परत जातील."
त्याच प्रमाणे प्रभू येशू ही मार्क शुभवर्तमानात हेच नमूद करतो की, जो कोणीहि पाप करेल, तो न विजणाऱ्या अग्नी असलेल्या नरकात टाकला जाईल. म्हणून इथे प्रभू येशू मनुष्यांना नरकाची भयाणता निर्दशनास आणून त्यांना पापापासून परावृत्त होण्यास सांगतो. (मार्क ९:४३-४५ वाचा) आणि ह्यापासून बोध घेऊन जो मनुष्य आपला पापी मार्गांपासून परावृत्त होईल, तो आपला जीव अधोलोकात (नरकांत) जाण्यापासून वाचवील.
मार्क ९:४३-४५
"तुझा हात तुला पापासी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन हात असून नरकांत म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे.
तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक; दोन पाय असून नरकांत टाकिले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन
जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे."
शल्मोन राजाहि आपल्या नीतिसूत्रांत हेच लिहितो की, सुज्ञ मनुष्य आपले मार्ग तपासतो व अधोलोकापासून स्वतःला सावरतो. (नीतिसूत्रे १५:२४ वाचा)
नीतिसूत्रे १५:२४
"सुज्ञ इसमाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवन
मार्ग वर (म्हणजेच स्वर्गास) जातो.
अधोलोकाचे
एक सविस्तर वर्णन
आतापर्यंत आपण अधोलोक कसा आहे व त्यांत कोण
आहेत व जाणार हे पाहिले. पण आता कोणी स्वाभाविकपणे म्हणेल की अधोलोक अनुभवेलेला
असा कोण ह्या आपल्या युगांत आहे का ? तर तसा कोणीहि मनुष्य नाही, कारण कोणीही तेथून परत पृथीवर आल्याचे आपल्याला शास्त्रात किंवा वास्तविक
जीवनात आढळत नाही.
पण प्रभू येशूने पवित्र शास्त्रात एका ठिकाणी अधोलोकाचे
वर्णन केले आहे. ते म्हणजे लूक शुभवर्तमानत प्रभू येशूने श्रीमंत मनुष्य व दरिद्री
लाजर ह्यांबद्दल सांगितलेली कथा. (लूक १६:१९- ३१ वाचा) बायबलमधील अधोलोकाच्या
सर्व संदर्भांपेक्षा हा अत्यंत महत्वाचा आणि सविस्तर उल्लेख आहे;
लूक १६:१९- ३१
“कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या
दरवाज्याजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता; त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट
भरावे अशी त्याची इच्छा असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या
उराशी नेऊन ठेवले; श्रीमांतहि मेला त्याची उत्तरक्रिया करण्यात आली.
तो अधोलोकांत यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या
उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हांक मारून म्हटले, हे बाप अब्राहामा, माज्यावर दया करून लाजराला पाठीव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी
जीभ थंड करावी; कारण ह्या जाळांत मी क्लेश भोगीत आहे. अब्राहाम
म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यांत आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश
भोगीत आहेस; एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हांकडे पार जाऊ
पाहतात त्यांस जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हांकडे येऊ नये म्हणून आमच्या व
तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे.
मग तो म्हणाला,तर बापा, मी विनंती करितो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठिव; कारण मला पांच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने
त्यांस इकडची साक्ष द्यावी. पण अब्राहामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्ट्ये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणला,हे बापा अब्राहामा, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते
पाश्च्याताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनहि
कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही."
काय
हा अधोलोक अनंत काळासाठी आहे काय ? किंवा अधोलोकाचा शेवट कसा होईल
पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तर प्रभू येशूच्या
दुसऱ्या येण्यापर्यंत जे सर्व मृत मनुष्य नीतिमान (म्हणजेच पापविरहित) असे मरण
पावले आहेत, ते सुखलोकांत आहेत. तेथे ते सुख उपभोगत विसावा
घेत आहेत. त्याचप्रमाणे जे मनुष्य अनीतिमान म्हणून मरण पावले आहेत ते व
देवाविरुद्ध बंडखोरी करणारे दूत हे अधोलोकांत यातना भोगीत आहेत. ह्या दोन्ही
ठिकाणातील आत्मे हे प्रभू येशुच्या दुसऱ्या येण्याची फार आतुरतेने वाट पाहत आहेत.
पहिले मरण
प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यानंतर पृथ्वीवर
आणि आकाशात काही मोठे चिन्हे, अदभुते आणि भयानक घटना (युद्धे , पीडा इत्यादी) ह्या घडतील. त्यात पृथीवरील सर्व
मनुष्यांना मरणाचा अनुभव येईल; त्यांचे शरीर क्षय
पावल्यामुळे ते त्यांच्या आत्म्यांत रूपांतर होतील व न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले
सुखलोकांतील आणि अधोलोकांतील आत्मे ह्यांना येऊन मिळतील. ह्यालाच ‘पहिले
मरण’ असे म्हटले जाते; पहिले मरण म्हणजे शरीराचे मरण. त्यानंतर हे सर्व आत्मे त्या
राजासनावर बसलेला व्यक्ती समोर न्यायासाठी उभी राहतील.
ह्या राजासनासमोर सर्व मानवी आत्म्यांचा न्याय
होईल आणि प्रत्येक आत्म्याला ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे निश्चित वतन
मिळेल. हे वतन म्हणजे एकतर 'सार्वकालिक जीवन' किंवा ''सार्वकालिक अग्नीतला मृत्यू'. ह्या न्यायाला ‘पांढऱ्या
राजासनाचा न्याय’ किंवा ‘शेवटचा
न्याय’ म्हणून म्हटले जाते.
(प्रकटीकरण २०:१३-१५ वाचा)
प्रकटीकरण २०:१३-१५
"तेव्हा समुद्राने अपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी अपल्यांतील मृतांस बाहेर सोडले; आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय
ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरांत टाकली गेली.अग्नीचे
सरोवर हे दुसरे मरण होय."
ह्या न्यायामध्ये ज्यां कोणाची नावे 'कोंकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात' लिहिलेली असतील, म्हणजेच जे नीतिमान असे सापडतील त्यांचेच केवळ
तारण होऊन ते वाचले जातील; आणि ते सर्वकाळ प्रभू येशू बरॊबर वास करतील. आता कोणी म्हणेल ह्या नीतिमाणांना नीतिमत्व कुठून प्राप्त झाले ? तर ते नीतिमत्व येशू ख्रिस्ताच्यावर त्यांनी ठेवलेला विश्वास ह्याद्वारे
त्यांना देण्यात आले. (रोमकरांस पत्र ३:२२, रोमकरांस पत्र १०:९ वाचा)
रोमकरांस पत्र ३:२२
"हे देवाचे नितीमत्व (पापक्षमा) तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे
विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे; त्यांत भेदभाव नाही."
रोमकरांस पत्र १०:९
"की येशू प्रभू आहे असे जर 'तू आपल्या मुखाने कबूल करिशील आणि देवाने त्याला
मेलेल्यांतून उठविले असा 'आपल्या अंत:करणात' विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणात विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो
मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.”
दुसरे मरण
परंतु ज्यां कोणाची नावे 'कोंकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात' लिहिलेली नसतील, म्हणजेच जे कोणी अनीतिमान (पापी) गणण्यात येतील, ते सर्व त्या अधोलोक व मरण ह्याच्याबरोबर त्या अग्नीच्या सरोवरात टाकले जातील.
जेथे ते सर्वकाळ यातना भोगणार आहेत. ह्यालाच ‘दुसरे मरण’ म्हणजेच आत्म्याचे मरण म्हटले जाते. ह्या दुसऱ्या मरणाची सविस्तर माहिती प्रकटीकरण २१:८ मध्ये लिहिलेली आहे.
प्रकटीकरण २१:८
"परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ,'खून करणारे,' जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, क सर्व लबाड माणसे ह्यांच्या वांट्यास अग्नीचे व
गंधकाचे सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”
अशाप्रकारे इथे अधोलोक व त्यांतले सर्व अनीतिमान आत्मे
ह्यांचा शेवट होईल.
- अधोलोक हा मृतांचा प्रदेश आहे; जेथे सर्व उत्पत्तीपासून तर प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यापर्यंत सर्व अनीतिमान असे मरण पावलेले मनुष्यांचे आत्म्यांचा वास आहे. त्याचबरोबर बंडखोर देवदूत हेही इथे बंधनात आहेत.
- तसेच अधोलोक हा अग्नीने भरलेला आहे व तेथे निबिड अंधकार आहे.
- तेथील अनीतिमान आत्मे फार कष्टात व पिढेत असून फार यातना भोगीत आहेत.
- ह्या सर्व आत्म्यांचा शेवट हा त्या पांढऱ्या राजासनाच्या न्यायाच्यावेळी होईल; जेव्हा हे अनीतिमान म्हणून गणण्यांत येतील.
- शेवटी अधोलोक हा अनंत नाही; त्या पांढऱ्या राजासनाच्या न्यायानंतर ह्या अधोलोकाला मरणाबरोबर त्या अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल. इथेच अधोलोकाचा शेवट असेल.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2018 Digital सुवार्तिक All Rights Reserved

No comments:
Post a Comment