क्षालनस्थळ -व्याख्या: ह्या 'क्षालनस्थळाला' इंग्रजीत 'Purgatory' म्हटले जाते. Purgatory हा शब्द लॅटिन भाषेंतून घेतलेला शब्द "purgare" म्हणजेच "स्वच्छ करणे" किंवा "शुद्ध करणे" ह्यातुन उदयास आलेला आहे.
ह्याच्या रोमन कॅथॉलिक शिकवणीप्रमाणे व्याख्या
अशी आहे की - "हे क्षालनस्थळ म्हणजे शारीरिक मरण आणि
स्वर्गामधील (म्हणजेच सार्वकालिक जीवनांमध्ये) अशी एक जागा आहे, जेथे
देवाच्या कृपेखाली मरण पावलेले मनुष्यांचे आत्मे त्यांच्या क्षमा न झालेल्या
पापांबद्दल क्षणिक शिक्षा भोगत असतात. तेथे त्या आत्म्यांने आपल्या पापसाठी शिक्षा
भोगून शुद्ध झाल्यानंतर ते स्वर्गाच्या सार्वकालिक आनांदात सामील होतात. तेथे फक्त
देवाच्या कृपेखाली मरण पावलेले आत्मेच जातात व ते आत्मे तेथे कायम राहत नाही. ते फक्त
त्यांच्या पापांच्या क्षालनासाठी तात्पुरता काही क्षण तेथे असतात.”
थोडक्यात म्हणजे क्षालनस्थळ हे असे एक ठिकण आहे
जेथे मरण पावलेले ख्रिस्ती आत्मे त्यांच्या पूर्वी क्षमा होण्याचे बाकी असलेल्या
पापांच्या क्षालन / क्षमा / पापांपासून शुद्ध होण्यासाठी नेले जातात.
ह्या रोमन कॅथॉलिक शिकवणीची अधिकृत व्याख्या
तुम्हांला ह्या खालील व्हॅटिकन संकेत स्थळावर वाचायला मिळेल.
Catechism of Catholic Church - THE FINAL PURIFICATION, OR
PURGATORY (1030-1032)
क्षालनस्थळ
- ह्या शिवणीचा उदय व त्यासाठी शास्त्रातुन दिलेले संधर्भ:
"क्षालनस्थळा"ची शिकवण रोमन
कॅथॉलिक चर्चने आपल्या फ्लॉरेन्स परिषद (१४३९-१४४५)
व ट्रेंट परिषद (१५४५)
ह्या दोन परिषदामध्ये विकसित केली. ह्या परिषदेमध्ये चर्चने, निवडलेल्या
लोकांचे "अंतिम शुध्दीकरणाला ", क्षालनस्थळ" (Purgatory) हे
नाव निश्चित केले. त्यांच्या मते चर्चची ही परंपरा पवित्र शास्त्रातील काही
संदर्भावर आधारलेली आहे. ह्यासाठी रोमन कॅथॉलिक चर्च
हा खालील तीन संदर्भ पुढे करते.
१)
पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण
मत्तय १२:३२
"मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही.”
इथे "येणाऱ्या युगी" हा शब्द
महत्वाचा आहे, कारण ह्या एका शब्दाचा उहापोह करून, रोमन
कॅथॉलिक चर्चने क्षालनस्थळाची शिकवण प्राथमिकरीत्या उभारली आहे.
२)
मकाबईसने केल्याला मृतांसाठी प्रार्थच्या
त्याचबरोबर मकाबईस पुस्तकात केल्याला मृतांसाठी
प्रार्थच्या संदर्भांवर, चर्च ने मृतांसाठी प्रार्थनेची प्रथा पुढे
केली. ह्या आधारवर रोमन कॅथॉलिक चर्च हे मृतांसाठी मध्यस्थीची प्रार्थनेचा खुला
पुरस्कार करत आले आहे.
सुचना: वाचकांनी हे लक्ष्यात घ्यायला हवे की, मकाबाईचे पुस्तकाला बायबलचे अधिकृत पुस्तकात गणले जात नाही. पण आपल्या ह्या
शिकवणीच्या आधारासाठी रोमन कॅथॉलिक चर्चने हे मकाबईचे २ पुस्तके त्यांच्या
बायबलमध्ये सामील करून घेतले आहेत.
३)
प्रामाणिक ईयोब ह्याने आपल्या मुलांसाठी शुद्धतेसाठी केलेले बलीचे हवन.
ईयोबाच्या पुस्तकात १ अध्यायात ईयोबाच्या
प्रामाणिकपणा व त्याच्या सत्कृत्यांसंदर्भात लिहिले आहे.
ईयोब १:५
"हे भोजनसभारंभ आटोपल्यावर ईयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी; तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतके बलीचे हवन करी; कारण तो म्हणे की, न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि
आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल. असा ईयोबाचा नित्यक्रम असे."
ईयोबाच्या ह्या संधर्भावर रोमन कॅथॉलिक चर्चची, मृतांच्या
नावाने दानधर्म, उपभोगकार्य व प्रायश्चित्त कामांची शिकवण
उभारलेली आहे.
तसेच रोमन कॅथॉलिक चर्चमधील
मृत व्यक्तींच्या नवे मिस्साबली अर्पण करणे हि प्रथा क्षालनस्थळ ह्या शिकवणीवर
आधारित आहे.
रोमन
कॅथॉलिक चर्चची क्षालनस्थळाबद्दल शिकवणीचे सविस्तर मांडणी
रोमन कॅथॉलिक चर्च हे क्षालनस्थळाबद्दल
बायबलमधील संदर्भ देते की “स्वर्गात कोणीही पापी मनुष्य जाऊ शकत नाही”. मग जो
कोणी मनुष्य पापी म्हणून मरण पावतो त्याचा नाश होणार की काय ? ह्यावर ते म्हणतात की, नाही, अशा
आत्म्यांचा नाश होणार नाही.
ह्याचे कारण देवाने त्यांच्यासाठी खास पाप
क्षालनाचे ठिकाण बनवले आहे, जिथे ते अग्नी व पीडा ह्यांमध्ये आहेत. पण
त्यांच्या नावाने जर पृथ्वीवरील जिवंत मनुष्यांने प्रार्थना किंवा सत्कर्मे किंवा
दानधर्म केल्यास, त्या आत्मयांचे पाप क्षमा होऊ शकतात.
जस-जसे त्यांचे एक-एक पाप माफ होतात, तस- तसे ते आत्मे स्वर्गाकडे वर उचलले जातात, आणि
त्यांना तिकडल्या पीडेपासून थोडा आराम मिळतो.
ह्या शिकवणीच्या आधारे आज रोमन कॅथॉलिक चर्च
मध्ये मृतांसाठी प्रार्थना, त्यांच्या नावाने मिस्साबली, दानधर्म, देणग्या हे देण्याची पद्धत पूर्वीकाळापासून
रुजविलेली आहे.
इथे एका सुज्ञ ख्रिस्ती मनुष्याला प्रश्न पडू
शकतो की, जिवंत असताना ज्या मनुष्याचे पापे क्षमा झाले
नाहीत, ते त्याच्या मरणानंतर कसे काय क्षमा होऊ शकतात ? ह्यामुळे इथे ह्या क्षालनस्थळाबद्दलच्या सत्यता जाणून घेण्याची गरज पडते. आणि
ती सत्यता आपल्याकडे फक्त पवित्र शास्त्रच ठरवू शकते; कारण
ते देवाकडून आहे.
काय क्षालनस्थळ ही शिकवण
बायबलशी सहमत आहे काय ? नाही!!
बायबलप्रमाणे
क्षालनस्थळाचे अस्तित्वच कसे नाही ह्याचे सविस्तर विश्लेषण
बायबल आपल्याला शिकवते की मृत्यूनंतर मनुष्य
आपल्या शरीराने मारतात, पण आत्म्याने जिवंत असतात; कारण
आत्मा मरत नाही. ह्याला ते मनुष्य
शरीराने झोपी जाणे असेही म्हणतात. परंतु त्यानंतरच्या त्या आत्म्यांचे काय होते
ह्यांबद्दल रोमन कॅथॉलिक चर्चने क्षालनस्थळ ही शिकवण उभारून संभ्रम निर्माण केला
आहे; जो मुळांत चुकीचा आहे.
क्षालनस्थळाची शिकवण ही बायबलप्रमाणे का नाही
ह्याची ही खालील तीन मुख्य कारणे आहेत. ते म्हणजे:
१) बायबल
क्षालनस्थळाचे अस्तित्वच नाकारते
२) प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त मनुष्याचे
सर्व पापक्षमा करण्यास समर्थ आहे; त्यासाठी क्षालनस्थळात जाण्याची गरज
नाही
३) पापक्षमा केवळ प्रभू येशूवरच्या विश्वासानेच
मिळते ... कोणतेही कर्म केल्याने नाही
१.
बायबल क्षालनस्थळाचे अस्तित्वच नाकारते
बायबलमधील जुन्या करारातील ज्ञानी असा गणलेला
शल्मोन राजा आपल्या उपदेशक पुस्तकात लिहितो की, ‘हे
तरुणा,आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या
निर्माणकर्त्याला स्मर; कारण नंतर तुला संधी नसणार आहे. मनुष्य
माती आहे आणि तो मारून मातीला मिळेल; पण आत्मा देवाने दिलेला आहे म्हणून तो देवाकडे
परत जाईल. (उपदेशक १२:७ वाचा)
उपदेशक १२:१, ७
"आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या
निर्माणकर्त्याला स्मर;..... तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल. "
ह्यात त्यांनी कुठेही क्षालनस्थळचा
उल्लेखसुद्धा केला नाही. ह्याचाच अर्थ मनुष्याला मरणानंतर पापक्षमेचे संधी नाही
आणि मेल्यानंतर त्याचा त्यानंतर फक्त न्यायच होणे बाकी आहे.
नवीन करारात ज्याला स्वर्गाचे दर्शन झाले आहे
असा प्रेषित पौल आपल्या इब्रीकरांस पत्रात असे लिहितो की, मनुष्यांना
एकदाच मरणे व त्यानंतर त्याचा न्याय होणे नेमून ठेवले आहे. (इब्रीकरांस पत्र ९:२७ वाचा)
इब्रीकरांस पत्र ९:२७
"ज्याअर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,”
ह्याचा अर्थ मेल्यानंतर मनुष्यांचा सरळ न्याय
होणे आहे. म्हणजेच मनुष्याला मृत्यू
व न्याय ह्या दोन घटनांमध्ये पापक्षमेचे संधी उपलब्धच नाही.
ह्या वरील संदर्भावरून आपल्याला कळते की बायबल
क्षालनस्थळ म्हणून संबोधलेली अशी एक जागा, जेथे
मृत्यूनंतरही पापक्षमा होते, असे मान्यच करत नाही. मग आजचे रोमन कॅथॉलिक
चर्चचे तत्त्वज्ञांनी, ज्यांनी ही क्षालनस्थळाकजी शिकवण जन्माला घातली, त्यांना
शल्मोन राजा (ज्याबरोबर खुद्द देव बोलत असे) आणि प्रेषित पौल (ज्याला स्वर्गाचे
दर्शन झाले होते) ह्या दोघांपेक्षा अधिक कळाले आहे की काय ? कधीच नाही!!
२.
प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त सर्व पापक्षमा करण्यास समर्थ आहे
आता आपण ह्याविषयाच्या मूळ प्रश्नावर हात घालू
या.
मूळ प्रश्न म्हणजे हे "क्षालनस्थळ"आहे कशासाठी ? तर पापक्षमेसाठी !!!!!
म्हणजेच जर मनुष्याच्या मरणापर्यंत, त्याचे
पाप पूर्णपणे क्षमा होत नसतील, तर त्याला क्षालनस्थळी पापक्षमेचे गरज पडू
शकते. पण जर त्याच्या
मरणाअगोदर त्याचे सर्व पापे क्षमा झाली असतील तर ? तर मग क्षालनस्थळाची गरजच पडणार नाही.
होय !!!! बायबल आपल्याला हेच शिकवते.
प्रेषित पौल बायबलमध्ये हेच लिहितो की, प्रभू
येशू ख्रिस्ताने आम्हां मनुष्यांच्या पापांसाठी स्वतःला अर्पण केले. त्याने आमचे
पापे स्वतःवर घेऊन आम्हां मनुष्यांना नीतिमान ठरविले; म्हणजेच पाप मुक्त ठरविले. (रोमकरांस
पत्र ५:८-९, यशया ५३:५, १ योहान २:२, १ करिंथकरांस पत्र १५:३ वाचा) आणि
ते नीतिमत्व किंवा पापक्षमा त्याने आम्हांला केवळ त्याच्यावरच्या विश्वासाद्वारेच
विनामूल्य दिले आहे. (इफिसकरांस पत्र २:८-९ वाचा)
रोमकरांस पत्र ५:८-९
"परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने
नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेषकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून
तारले जाणार आहो."
यशया ५३:५
"खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला; आम्हांस शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली; त्यास बसलेल्या फटक्याने आम्हांस आरोग्य प्राप्त झाले."
१ योहान २:२
"आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्या पापांबद्दल आहे."
१ करिंथकरांस पत्र १५:३
".......शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला;"
इफिसकरांस पत्र २:८-९
"कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून
झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून (चांगले) कर्मे केल्याने हे झाले नाही."
म्हणजे मनुष्यांना पापक्षमा येशूच्या रक्ताने
मिळते. आता जेथे येशू ख्रिस्ताचे रक्त मनुष्यांना त्यांच्या ‘सर्व’ पापांपासून मुक्त करते, (इथे
सर्व हा शब्द महत्वाचा आहे) (१ योहान १:९ वाचा), तर मग ह्या तथाकथित क्षालनस्थळाची गरज
अनावश्यक ठरते कि नाही ?
१ योहान १:९
"जर आपण आपली पापे पदरी घेतले, तर तो (येशू) विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या
पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून दूर करील."
आणि जेव्हा येशूच्या रक्ताने मनुष्याचे सर्व
पाप क्षमा होऊ शकतात, मग मनुष्य पापक्षमेसाठी पुन्हा ह्या
क्षालनस्थळची गरज कशी काय भासु शकते ? आणि ह्याने तो मनुष्य येशू ख्रिस्ताच्या
अर्पणावर अविश्वास दाखवत नाही का ? ही क्षालनस्थळाची शिकवण किंवा त्याबरॊबर
मृतांच्या नावात केलेले सत्कर्मे, उपभोग्यवस्तू, हे
सर्व येशूच्या रक्ताची पापक्षमा करण्याची समर्थतेवर अविश्वास दर्शवितात; जे मुळांत
सत्य नाही.
ही क्षालनस्थळाची शिकवण स्वीकारणारे कॅथॉलिक
चर्च हे समजण्यास कमी पडते की, येशूचा एकदाचाच यज्ञ हा मनुष्याचे
पापक्षमा करण्यास नि:संशय आणि पूर्णपणे पुरेसा होता व आहे. मनुष्य जेव्हा
क्षालनस्थळाची शिकवण स्वीकारतो, तेव्हा तो येशूचे रक्त त्याचे सर्व पाप क्षमा
करण्यास अपुरे किंवा असमर्थ आहे असे तो जाहीर करतो; जे
शास्त्राप्रमाणे सत्य नाही.
सत्य हे आहे की, प्रभू येशूचे निर्दोष रक्त जे त्यांना आम्हां मनुष्यांसाठी कालवारी क्रुसावर
अर्पिले, ते मनुष्यांच्या सर्व पापे पुसून टाकण्यास कायम
समर्थ आहे. त्यासाठी त्या क्षालनस्थळात जाऊन पाप क्षमा मिळवण्याची गरजच नाही.
३. पापक्षमा
केवळ प्रभू येशूवर विश्वासानेच मिळते; कोणत्या चांगली कर्माने केल्याने नाही.
प्रेषित पौल आपल्या इफिसकरांस पत्रात लिहितो की, प्रभू
येशूच्या कृपेने त्याच्यावरच्या विश्वासानेच मनुष्याचे तारण झाले आहे, कोणते
ही कर्मे केल्याने नाही. (इफिसकरांस पत्र २:८-९ वाचा)
इफिसकरांस पत्र २:८-९
"कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून
झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून (चांगले) कर्मे केल्याने हे झाले नाही."
म्हणजेच जर बायबल सांगते की, जिवंत
मनुष्याने कोणतेहि सत्कर्मे केले तरीही त्याला पापक्षमा मिळत नाही, तर
मग जिवंत मनुष्याने मेलेल्यांसाठी केलेले सत्कर्मे त्यांना कसे काय पापक्षमा
मिळवून देऊ शकते, हा मोठा प्रश्न आहे ?
ह्याचे उत्तर हे की, बायबलप्रमाणे
चांगली कर्मे केल्याने मनुष्यांस (जिवंत किंवा मृत) पापक्षमा मिळत नाही; ती
केवळ प्रभू येशूवर ठेवलेला विश्वासानेच मिळते. आणि
म्हणूनच मृतांच्या नावाने केलेले सत्कर्मे हे व्यर्थ आहेत.
तसेच मृत व्यक्तींच्या नवे मिस्साबली अर्पण करणे व दानधर्म करणे, रोमन कॅथॉलिक चर्चने भूतकाळात वाटलेल्या 'क्षमापत्रां' ची शिकवण हेहि तितकेच व्यर्थ आहे.
आता कोण
म्हणेल रोमन कॅथॉलिक चर्चने पुढे केलेल्या ईयोबाच्या उदाहरणाचे काय ?
तर रोमन कॅथॉलिक चर्चचा ईयोबाचा संदर्भांबद्दल
आपण पाहतो की, जुन्या करारात मनुष्यांना त्यांच्या पापांतून
शुद्ध होण्यासाठी त्यांच्या पापाबद्दल अर्पण करणे अत्यावश्यक होते. (लेवीय ४
अध्याय - पापार्पणे वाचा) नवीन करारात येशूने स्वतःला मनुष्यांच्या
पापांसाठी अर्पिल्यामुळे, पापक्षमेसाठी हे अर्पण करणे आवश्यक नाही; फक्त त्याच्या वर विश्वास (म्हणजेच
त्याच्या वधस्तंभावरच्या अर्पणावर विश्वास ठेवल्याने) ठेवल्याने पापक्षमा होते. त्याचप्रमाणे जुन्या करारातील ते पापार्पण फक्त जिवंत मनुष्याच्या पापासाठी
होते; मेलेल्यांसाठी नव्हे!!! हेच सत्य रोमन कॅथॉलिक
चर्च सोयीस्करपणे दुर्लक्ष्य करते आहे.
कॅथॉलिक
चर्चने क्षालनस्थळ ह्या शिकवणीच्या आधारासाठी पुढे केलेले इतर काही संदर्भ
कॅथॉलिक चर्च म्हणते की प्रेषित पौलाच्या करिंथकारांस
पत्रातील हा संदर्भ हा त्या क्षालनस्थळासंदर्भात आहे. (१ करिंथकरांस ३:११-१५
वाचा) त्यांच्या मतानुसार हे उदाहरण निवडलेल्या ख्रिस्ती आत्म्यांचे अग्नीने
तारले जाण्याचे प्रमाण आहे. पण त्या ठिकाणी हा संदर्भ नक्की काय म्हणतो ते आपण
सविस्तरपाने पाहू या.
१ करिंथकरांस ३:११-१५
"येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या-वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रूपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो; तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि
प्रत्येकांचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.
ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. आणि ज्या
कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो तारला जाईल; परंतु जणू काय अग्नींतून बाहेर पडलेल्यासारखे तारला जाईल."
आपण नीट वाचले तर इथे मनुष्याचे "कामे"
म्हटले आहेत, "आत्मे" नाही. म्हणजेच हे उदाहरण क्षालनस्थळाचे
नाही तर युगाच्या समाप्ती दर्शवणाऱ्या पांढऱ्या राजासनाच्या न्यायाचे आहे, ज्यात
प्रत्येक आत्म्यांना त्यांचे त्यांच्या पृथ्वीवरील कृत्यांप्रमाणे वेतन मिळणार
आहे. (प्रकटीकरण २०:११-१५ वाचा) ह्यात १२
व्या वचनात स्पष्ट्पणे लिहिले आहे की, मृतांचा
न्याय 'ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे' ठरविण्यात येईल.
प्रकटीकरण २०: १२
“…त्या
वेळी पुस्तके उघडली गेली; तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे
होते; आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून
मृतांचा न्याय 'ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे' ठरविण्यात आला.
ह्यांतून हे अगदी स्पष्ट होते की, हे उदाहरण क्षालनस्थळाचे नाही, तर पांढऱ्या राजासनाच्या न्यायाचे आहे; आणि म्हणून त्यावर उभारलेली ही शिकवण फोल किंवा
आधाररहित आहे.
आता
कोणी म्हणेल की हे वरील संदर्भ सत्य आहेत, तरी पण मत्तय १२:३२ मधील "येणाऱ्या युगा" बद्दल काय ?
ह्याचे उत्तर होय असे
आहे. म्हणजेच रोमन कॅथॉलिक चर्च म्हणते त्याप्रमाणे मृत्यूनंतर अजून एक युग आहे; मात्र
त्याला क्षालनस्थळ असे म्हटले जात नाही. पवित्र शास्त्रात आपण वाचतो कि आताची पृथ्वीचा अंत हा जाळून होणार आहे. पृथीवचा जाळून शेवटापासून ते प्रभू
येशूच्या दुसऱ्या येण्यापार्यंत एक क्षणिक युग / काळ आहे आणि त्यात फक्त मृत
मनुष्याचे आत्म्यांचा वास आहे. त्यासाठी काळाच्या सविस्तर माहितीसाठी प्रकटीकरण
२०:४-७ वाचा.
प्रकटीकरण २०:४-७
""नंतर 'मी राजसने पहिली,' त्यांच्यावर
'कोणी बसले होते;' त्यांना
'न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता;' आणि
येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वाचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि
ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळांवर व
आपल्या हातांवर त्याची खून धारण केलेले नव्हती, त्यांचे
आत्मे पाहिले; ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक
हजार वर्षे राज्य केले.
मृतांपैकी
बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच
पहिले पुनरुत्थान.
पहिल्या
पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अशा
लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर
ते 'देवीचे' व
ख्रिस्ताचे 'याजक' होतील; आणि
त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील. "
ह्याचाच अर्थ प्रभू येशू ज्या येणाऱ्या
युगाबद्दल बोलत होता ते युग हेच आहे(एक हजार वर्षांचे युग); कोणते क्षालनस्थळ नव्हे.
पवित्र शास्त्रातील अनेक संधर्भाच्या आधारावर प्राथमिकरित्या असे सिद्ध होते की, मृत्यूनंतर
मनुष्यांच्या आत्म्यांना केवळ दोन निवास्थाने आहेत. ते म्हणजे सुखलोक आणि अधोलोक. जे मनुष्य नीतिमान
म्हणून मरतात, ते आत्म्याने सुखलोकांत प्रवेश करतात.
त्याचप्रमाणे जे लोकं अनीतिमान किंवा पापी म्हणून मरण पावतात ते अधोलोकांत (ज्याला नरक पण
म्हटले जाते) प्रवेश करतात. ह्या दोन्ही ठिकाणांचा शेवट हा प्रभू येशूच्या दुसऱ्या
येण्यानंतर होणाऱ्या त्या महान पांढऱ्या राजासनाच्या न्यायावेळी होईल.
म्हणूनच रोमन कॅथॉलिक चर्चची शिकवण, ज्यात सर्व आत्मे एकच निवास्थानात पापक्षमेसाठी जातात; ही फोल ठरते.
रोमन कॅथॉलिक चर्च म्हणते की मृत्यूनंतर अजून
एक युग आहे हे जरी सत्य असले तरीही, पुढे त्या युगाबद्दल त्यांनी मांडलेली शिकवण ही शास्त्राप्रमाणे नाही. त्याचप्रमाणे
चर्च म्हणते तसे त्या जागेला क्षालनस्थळ म्हटले जात नाही; आणि त्या ठिकाणी मनुष्याच्या मृत्यूवेळी न क्षमा झालेले पापे तेथे क्षमा केले
जातात ही शिकवण चुकीची आहे. त्याचबरोबर क्षालनस्थळातील मृत आत्म्यांच्या नावाने
केलेले चांगले कर्मे त्यांना पापक्षमा मिळवण्यास मदत करतात, हेही चुकीची आहे.
पवित्र शास्त्रच क्षालनस्थळ
ह्या शिकवणीला फोल ठरविते
ही शिकवण चुकीची आहे असे आम्ही तुम्हांला आपल्या
मानवी बुद्धीने सांगत नाही, तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन ही शिकवण
खोटी ठरवते. (लूक १६:१९- ३१ वाचा) ते
म्हणजे पवित्र शास्त्रातील लूक शुभवर्तमानत प्रभू येशूने श्रीमंत मनुष्य व
दरिद्री लाजर ह्याबद्दल सांगितलेली कथा. (लूक १६:१९- ३१ वाचा) बायबलमधील
अधोलोकाच्या सर्व संदर्भांपेक्षा हा अत्यंत महत्वाचा आणि सविस्तर उल्लेख आहे;
लूक १६:१९- ३१
“कोणीएक
श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाज्याजवळ फोडांनी
भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता; त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा
असे; शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमांतहि मेला त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकांत यातना भोगीत
असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना
दुरून पाहिले. तेव्हा त्याने हांक मारून म्हटले, हे बाप अब्राहामा, माज्यावर दया करून लाजराला पाठीव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळांत मी क्लेश भोगीत आहे. अब्राहाम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यांत आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश
भोगीत आहेस; एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हांकडे पार जाऊ
पाहतात त्यांस जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हांकडे येऊ नये म्हणून आमच्या व
तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे.
मग तो म्हणाला,तर
बापा, मी विनंती करितो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठिव; कारण मला पांच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून
त्याने त्यांस इकडची साक्ष द्यावी. पण अब्राहामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्ट्ये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. तो म्हणला,हे
बापा अब्राहामा, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पाश्च्याताप करतील. तेव्हा
त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर
मेलेल्यांमधूनहि कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही."
रो. कॅथो. शिकवण १) क्षालनस्थळात (बायबलप्रमाणे अधोलोकांत) मनुष्याच्या मृत्यूवेळी न क्षमा झालेले पापे तेथे क्षमा
केले जातात.
वरील संदर्भात आपण पाहिले की त्या मनुष्याला
पापक्षमेसाठी त्या ठिकाणी मार्गच उपलब्ध नाही. ह्याचाच अर्थ मनुष्याला तो जिवंत
आहे तोपर्यंतच पापक्षमेचा मार्ग खुला आहे. तो मेल्यावर त्याला पापक्षमेसाठी संधी
उपलब्ध नाही. म्हणजेच रोमन कॅथॉलिक चर्चची शिकवण चुकीची आहे की नाही? म्हणजेच, जर
त्या मृत आत्म्यांना तेथे पापक्षमा मिळतच नसेल, तर
आजपर्यंत मेलेल्या सर्व मृत लोकांसाठी जिवंत मनुष्यांनी केलेली प्रार्थना व्यर्थ
आहे. त्याचबरोबर त्यांच्या
नवे केलेले सत्कर्मे/चांगले कर्मे / दानधर्म किंवा
त्यांच्या नवाने अर्पिलेले मिस्साबली हे सर्व व्यर्थ आहेत.
रो. कॅथो. शिकवण २) जस जसे त्या मृत
आत्म्याचे पापे शुद्ध होतात, तस-तसे तो आत्मा स्वर्गातकडे वर नेला जातो.
वरील संदर्भात आपण हे पाहतो की अधोलोक व सुखलोक ह्यांमधे एक मोठी दरी आहे; जेणेकरून
ह्या ठिकाणच्या लोकांना तेथे (म्हणजे सुखलोकांत) प्रवेश मिळू नये. आता हे वचन रोमन
कॅथॉलिक शिकवण खोटी ठरविते की नाही? तुम्हीच ठरवा.
रोमन कॅथॉलिक चर्चचा क्षालनस्थळाबद्दल
मकाबीचा संदर्भ
वर मांडलेल्या उताऱ्यातून रोमन कॅथॉलिक चर्चचा
मकाबीचा संदर्भहि फोल आहे असे आपण पाहतो. मुळात मकाबीचे पुस्तक हे अधिकृत
बायबलमध्ये अगोदरपासून नव्हते; ते नंतर त्यात सामील केले गेले. आणि ते का
सामील केले गेले त्याचे कारण आता कोणीही सांगू शकेल; कारण
रोमन कॅथॉलिक तत्वज्ञान्यांना त्या पुस्तकातील संदर्भावर ही शिकवण उभारायची होती.
क्षालनस्थळाची
शिकवण उभारण्यामागे रोमन कॅथॉलिक चर्चचे संभव्य उद्देश
वरील सर्व लेखात आपण पाहिले की, कॅथॉलिक
चर्च शिकवते त्याप्रमाणे मृत्यूनंतर पापक्षमा मिळावी असे क्षालनस्थान अशी जागाच
नाही. (कारण मृत्यूनंतर एकतर सुखलोक किंवा अधोलोक, हे
दोनच पर्याय आहेतह्याचाच अर्थ ह्या शिकवणीवर आधारलेले रोमन कॅथॉलिक सर्व तत्वे हे
निव्वळ खोटी आहेत. जसे उदा. मृतांसाठी केलेल्या प्रार्थना, त्यांच्या नावाने केलेले दानधर्म, त्यांच्या नावाने अर्पिलेले मिस्साबली ... इत्यादी, हे
सर्व व्यर्थ आहेत.
कोण म्हणेल की रोमन कॅथॉलिक तत्वज्ञान्याना हे
सर्व क्षालनस्थळ नाकारणारे संदर्भ माहित नाहीत काय ?
तर त्यांना ते जरूर माहित आहेत. पण त्यातहि
काही जण सत्य माहित असून सुद्धा मोठ्या धार्मिक पुढाऱ्यांपुढे आपले मूग गिळून
बसलेले आहेत; कारण ते रोमन कॅथॉलिक चर्चविरुद्ध जाऊन
आपल्यावर त्यांचा रोष घेऊ इच्छित नाहीत. कारण इतिहासात आपण पाहतो की, रोमन
कॅथॉलिक चर्च विरुद्ध असलेल्यांना छळ, सभाबहिष्क्रुत करणे ह्यांपासून ते मरण
दंडापर्यंत शिक्षा झाली आहेत.
आता प्रश्न हा उभारतो तो असा, जर जी शिकवण चुकीची आहे आणि ज्याला बायबलमध्ये अधिकृत आधार सापडत नाही; तरीपण रोमन कॅथॉलिक चर्च ही शिकवण उभारण्याचा अट्टहास का ?
तर ह्याचे कारण पहिले व रोमन कॅथॉलिक चर्चने घोषित
केलेलं कारण म्हणजे, त्या निमित्ताने लोकांमध्ये व चर्चमध्ये संवाद
वाढवावा असे आहे. म्हणजेच मृतांसाठी प्रार्थनावेळी, मिस्साबलीच्या
वेळी सर्व लोकं एकत्र जमतात, आणि त्यांचे धार्मिक बंध अजून मजबूत होतात.
दुसरे, महत्वाचे आणि म्हणून रोमन कॅथॉलिक चर्चने दाबून ठेवलेले कारण म्हणजे, त्यातून चर्चला
आर्थिक निधी मिळतो. मृतांच्या नावे अर्पिलेले मिस्साबली, दानधर्म (Vincent De Paul), चर्चमधील उपयोग वस्तू (जसे की बाकडं, खुर्च्या व इतर) हे त्यात गणले जातात.
क्षालनस्थळ
ह्या शिकवणीचा रोमन कॅथॉलिक चर्चचे केलेला आर्थिक गैरवापर
रोमन कॅथॉलिक चर्चने पोप लिओ दहावे ह्यांच्या काळांत क्षालनस्थळ ह्या शिकवणीचा गैरवापर करून रोममध्ये सेंट पीटरच्या बॅसिलिकाला पुन्हा बांधण्यासाठी पैसे उभारण्याचा प्रयत्न केला.
त्यासाठी चर्चने "Treasury of Merits" "पुण्याची ठेव"
हि शिकवण विकसित केली. या शिकवणानुसार काही लोक इतके पवित्र होते की ते पापांपेक्षा चांगले कर्म अधिक करत असत. हे सर्व चांगले कर्म एक
"ट्रेजरी ऑफ मेरिट्स' किंवा 'पुण्याची ठेव' म्हणून ओळखले जाणारा एक
"खजिना" मध्ये साठविले जात असत आणि ह्या खजिना वापरण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त पोपकडे होती. तसेच हे चांगले कर्म हे 'अनुच्छादन' ज्याला इंग्रज़ीत 'Indulgence' किंवा क्षमापत्रे म्हणून म्हणतात, म्हणून विकले जाऊ शकतात. आणि हेच 'अनुच्छादन' ज्याला इंग्रज़ीत 'Indulgence'
किंवा क्षमापत्रे विकून पोप लिओ दहावे ह्यांनी रोममध्ये सेंट पीटरच्या बॅसिलिकाला पुन्हा बांधण्यासाठी पैसे उभारले होते ह्याला इतिहास साक्षी आहे.
रोमन चर्च नुसार हे 'अनुच्छादन'
'Indulgence' विकत घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मरणानंतर त्याला "क्षालनस्थळातील त्याच्या पापांबद्दल होणाऱ्या यातने” पासून सुटका किंवा आराम किंवा उसंत मिळत असे. असे हे Indulgence विकून रोमन कॅथॉलिक चर्चने अगणित असा आर्थिक निधी उभारला होता; सेंट पीटरच्या बॅसिलिकेचे काम पूर्ण झाले.
'अनुच्छादन' : व्याख्या - एखाद्या मनुष्याला त्याच्या पापांसाठी मोजावी लागणारी शिक्षा कमी करण्याचा एक सोपा मार्ग; ज्याद्वारे मृत्यूनंतर क्षालनस्थळात त्याच्या "पापांसाठी असलेली क्षणिक शिक्षा" कमी होऊ शकते.
त्यांचा ह्या प्रथेविरुद्ध तर मार्टिन लुथर ह्या सुधारकाने (जो स्वतः एक रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होता) आवाज उठवला आणि त्यातून प्रोटेस्टंट हा पंथ जन्माला आला. रोमन कॅथॉलिक चर्चच्या ह्या शिकवणी प्रमाणे इतर पुष्कळ खोट्या शिकवणीविरुद्ध प्रोटेस्टंट पंथीयांनी आवाज उठवून, त्यांचे सत्य लोकांपर्यंत पोहचविले.
हे 'अनुच्छादन' 'Indulgence' चे सत्य बाहेर येऊ नये आणि त्यावर आधारित चर्चचा आर्थिक स्रोत बंद होऊ नये म्हणून अशा सर्व प्रोटेस्टंट पंथियांचा आवाज दाबण्याचे काम रोमन कॅथॉलिक चर्चने आरंभिले आणि त्यात अगणित लोकांची निखालस कत्तल केली गेली; जे अतिशय क्रूर व निंदनीय आहे.
सारांश इतकाच कि ‘क्षालनस्थळ’ ह्या शिकवणीचा गैरवापर करून त्यावर आधारित 'अनुच्छादन' 'Indulgence' किंवा क्षमापत्रे विकून रोमन कॅथॉलिक चर्चने गतकाळात अगणित आर्थिक निधी उभारला होता; जे अतिशय चुकीचे व निषेधार्य आहे.
सारांश:
रोमन कॅथॉलिक चर्चने काही विशेष उद्धेशाने, बायबलमधील काही मोजक्या संदर्भचा चुकीचा अर्थ काढून व त्यांचा विपर्यास करून
ही क्षालनस्थळाची शिकवण उभारली
आहे. पण वरील सर्व संदर्भावरून आपल्याला कळते की, रोमन कॅथॉलिक चर्च शिकवते त्याप्रमाणे, क्षालनस्थळ, जेथे मृत्यूनंतरही पापक्षमा मिळू शकेल, अशी एक जागाच मुळांत बायबलमध्ये सापडत नाही. (त्याजागी अधोलोक व सुखलोक ह्यांचे संदर्भ सापडतात) म्हणजेच मेल्यानंतर नीतिमान आत्मे सुखलोकांत जातात व अनीतिमान (किंवा पापी)
आत्मे अधोलोकांत जातात.
बायबलप्रमाणे येशूचे रक्त मनुष्यांच्या सर्व
पाप जिवंतपणे माफ करण्यास समर्थ आहे; त्यासाठी मृत्यूनंतर क्षालनस्थळात जाऊन मग पापक्षमा मिळवण्याची प्रश्नच उद्भवतच नाही.
तसेच त्या गरीब लाझरच्या गोष्टीवरून आपल्याला
समजते की, मेल्यानंतर कोणाहि मनुष्याचे कशाने ही पापक्षमा
होत नाहीत. म्हणजेच मृतांसाठी केलेली प्रार्थना, मिस्साबली, सत्कर्मे, ह्या कसल्याही गोष्टींनी मृत आत्म्याचे पापक्षमा होत नाहीत; म्हणून ते सर्व व्यर्थ आहेत. हे सर्व विधी रोमन कॅथॉलिक चर्चने आपल्या विशिष्ट
स्वार्थसाठी जन्माला घातल्या आहेत; आणि लोकं पुर्विपारपासून हे विधी अज्ञानाने व आंधळेपणाने पाळत आले
आहेत.
तसेच ‘क्षालनस्थळ’ ह्या शिकवणीचा गैरवापर करून त्यावर आधारित 'अनुच्छादन' 'Indulgence' किंवा क्षमापत्रे विकून रोमन कॅथॉलिक चर्चने गतकाळात
अगणित आर्थिक निधी उभारला होता; जे अतिशय चुकीचे व निंदनीय आहे.
त्याचप्रमाणे मनुष्यांच्या आयुष्यात त्याच्या
मृत्यनंतर ते पांढऱ्या राजासनाच्या न्यायापर्यंत, ह्या दोन्ही घटनांमध्ये पापक्षमेसाठी संधीच उपलब्ध नाही असे आपल्याला बायबल
शिकवते; कारण मृत्यूनंतर सरळ आणि केवळ न्याय आहे.
त्यामुळे मनुष्यांनी मृत्यू अगोदर आपल्या
पापांबद्दल क्षमा मिळवून आपले तारण साधण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; कारण त्यानांतर पापक्षमेची संधीच उपलब्ध नाही. आमेन.
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.