Monday, 5 February 2018

Christian Truths - Is Celebrating the First Holy Communion biblical ? प्रथम ख्रिस्त शरीर हा सोहळा साजरा करणे हे शास्त्राप्रमाणे आहे काय ?

Is Celebrating the First Holy Communion biblical ? प्रथम ख्रिस्त शरीर हा सोहळा साजरा करणे हे शास्त्राप्रमाणे आहे काय ?







पार्श्वभूमी: प्रथम ख्रिस्त शरीर ह्या विधीचा अर्थ असा आहे की त्या मुलांनी प्रथमच प्रभूचे भोजन घेतले आहे. पण या विधीचा एवढा मोठा सोहळा साजरा करणे इतके त्यात कोणते महत्व आहे ? आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल कि 'पहिले ख्रिस्त शरीर' ह्या विधीचा पवित्र शास्त्रात कुठेच संदर्भ सापडत नाही किंवा त्याचा उल्लेख सुद्धा कुठे सापडत नाही. पहिले ख्रिस्त शरीर हा विधी मुळात रोमन कॅथोलिक चर्चच्या मुलांना शिकवणीचा एक भाग आहे; जो त्यांच्या सात सकर्मेंट ह्या दैवी तत्वज्ञानावर मधील एक आहे. 

रोमन कॅथोलिक तत्वज्ञानाप्रमाणे सकर्मेंट हे असे कृत्ये आहेत ज्याने मनुष्य देवाला संतोषवू पाहतो किंवा देवाची मर्जी संपादन करतो. ह्या सात सकर्मेंट मधील पहिले म्हणजे त्या बालकाचा 'बाप्तिसमा' (Baptism) होतो किंवा त्याचे ख्रिस्तीकरण करण्यात येते. हे सकर्मेंट त्या बालकाच्या अज्ञानतेत दिला जातो. त्यानंतर ते बालक / बालिका जेव्हा हा ख्रिस्ती शिकवणींतून जातो तेव्हा तो त्याची पहिली कबुली देण्यास तयार होतो. ह्याला 'समेट' किंवा 'प्रायश्चित' म्हटले जाते ज्यात ते बालक धर्मगुरुकडे जाऊन आपल्या पापांची कबुली देतो. त्यानुसार धर्मगुरूंनी सुचवलेले प्रायश्चित केल्यानंतर ते बालक रोमन कॅथोलिक पद्धतीप्रमाणे  प्रभूच्या भोजनात सहभागी होतो, आणि प्रथम ख्रिस्त शरीर घेण्यास पात्र ठरतो. 

प्रथम ख्रिस्त शरीर  कॅथॉलिक चर्चने विकसित केलेल्या सात सॅक्रामेंट पैकी दुसरे सॅक्रामेंट आहे. 


सविस्तर स्पष्टीकरण:

'सॅक्रामेंट' ची शिकवण पवित्र शास्त्रावर आधारित नाही 

पहिल्याने सॅक्रामेंट विषयी ही जी शिकवण रोमन कॅथॉलिक चर्चने विकसित केली आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे किंवा शास्त्रावर आधारित नाही. त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे सकर्मेंट हे असं कृत्ये आहेत जे मनुष्याने केल्याने देवाला संतोष होतो किंवा त्याद्वारे तो देवाची मर्जी संपादन करतो. ह्यात शिकवणीत असे सात सकर्मेंट आहेत.

खरे पाहिले असता, परमेश्वर देव अशा कोणत्याही मनुष्याच्या कृत्यांनी किंवा सॅकॅरामेन्ट ह्यांनी संतोषविला जात नाही. परमेश्वर देव केवळ मनुष्याने त्याच्या आज्ञा पाळल्याने संतोष पावतो, कारण कोणीही देहस्वभावाचा मनुष्य देवाला सांतोषवू शकत नाही. (रोमकरांस पत्र ८:५ वाचा)

रोमकरांस पत्र ८:५
“जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.”

त्याजप्रमाणे देवाला कशात संतोष आहे हे त्याने मीखाच्या पुस्तकात लिहिले आहे. (मीखा ६:८ वाचा)

मीखा ६: ६-८
मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याच्यापुढे येऊ काय? हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या ह्यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय?”  हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?”


म्हणजे परमेश्वर देवाला मनुष्याने नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यात संतोष आहे, कोणत्याही सॅक्रामेंट मध्ये नाही.

 पापक्षमा करण्याचा अधिकार केवळ परमेश्वर देवाला आहे; कोणा धर्मगुरू, बिशप ह्यांना नाही 

तसेच कोणीही मर्त्य मनुष्य दुसऱ्या मनुष्याला पापक्षमा प्रदान करू शकत नाही, कारण तो स्वतः मनुष्य असून पापी असतो. केवळ परमेश्वर देवच मनुष्याचे पापे क्षमा करू शकतो. 

आता इथे प्रश्न असा येतो की आजच्या युगातील जे धर्मगुरू जे लोकांचे पाप क्षमा करण्यास सरसावतात, ते स्वतःच्या शुद्धते बाबत किती खात्री देऊ शकतात ? काय त्यांच्या स्वतःची पाप क्षमा झाल्याची त्यांना खात्री आहे का ? कारण शास्त्र आपल्याला म्हणते की देवापुढे सर्व मनुष्य हे पापी आहेत व ते सर्व देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. कारण मनुष्य वासनेने जन्मलेला प्रत्येक मनुष्यांत पाप आढळते हे आपण जाणतो. मग हे आजच्या युगांतील सर्व धर्मगुरू पण पापी आहेत असे बायबल म्हणते. (रोमकरांस पत्र ३:२३-२४ वाचा)  

रोमकरांस पत्र ३:२३-२४
"कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;

आणि मग स्वतः पापी असतानाआजचे धर्मगुरू इतरांचे पाप क्षमा कसे काय क्षमा करू शकतात ? हाच एक मोठा प्रश्न आहे.

त्याउलट पवित्र शास्त्र आपल्याला असे शिकवते कि, देव आणि मनुष्य ह्यां दोघांमध्ये केवळ प्रभू येशू ख्रिस्त हा एकच मध्यस्थ आहे. (१ तिमिथ्य २:५ वाचा) म्हणजेच पापक्षमेसाठी केवळ प्रभू येशू ख्रिस्त हाच केवळ एक मध्यस्थ आहे; कोणीही धर्मगुरू, किंवा धार्मिक पुढारी नाही.

१ तीमिथ्याला पत्र २ : ५
कारण एकच देव आहेआणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशु हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे".

ह्या वचनानुसार मनुष्यांनी आपली पापे कोणा मनुष्यांकडे किंवा धर्मगुरूंकडे न कबूल करता ती थेट परमेश्वर देवाकडे प्रार्थनेत कबूल करावी; कारण केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्येच पूर्ण पाप क्षमा मिळते. पवित्र शास्त्रात शिकवलेली पापक्षमा देवाकडूनच आहे; कोणा मानवी धार्मिक विधीवर नव्हे.

पापक्षमा करण्याचा अधिकार कोणाला आहे ह्या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचा  पापक्षमा करण्याचा अधिकार कोणाला आहे ? - Who has authority to remit sins? हा  ब्लॉग वाचा 

त्याचप्रमाणे पापक्षमा कशी मिळवावी ह्याची अधिक माहितीसाठी आमचा पापक्षमा कशी मिळवावी? - How to receive remission of sins? हा ब्लॉग वाचा.

म्हणजेच पहिले ख्रिस्त शरीर हा विधी रोमन कॅथोलिक चर्चने विकसित केलेल्या अनेक  मानवनिर्मित विधीमधला एक विधी आहे ज्याला शास्त्रात कोणताही आधार सापडत नाही. 

तरीपण परमेश्वर देवाची अशी इच्छा आहे कि, प्रत्येक मनुष्याने हे निश्चित जाणून घ्यावे कि - येशू ख्रिस्त आपल्या पापांसाठी क्रुसावर मरण पावला आणि आपण त्याच्याद्वारेच आपण पापक्षमा मिळवू शकतो. तसेच त्याची दुसरी इच्छा हि आहे कि प्रत्येक मनुष्यांनी त्याच्या म्हणजे प्रभू भोजनात सहभागी होऊन त्याने कालवारीवर एकदाच केलेल्या अर्पणाची सदैव आठवण करावी.

सारांश: प्रत्येक मनुष्यांनी त्याच्या प्रभू भोजनात सहभागी होऊन प्रभू येशूने कालवारीवर एकदाच केलेल्या अर्पणाची सदैव आठवण करावी ही जरी परमेश्वराची इच्छा असली, तरी त्याचा असा मोठा  सोहळा साजरा करण्याचा संदर्भ पवित्र शास्त्रात कुठेच सापडत नाही.

तसेच पवित्र शास्त्राप्रमाणे पापक्षमा करणायचा अधिकार केवळ परमेश्वराला देवाला आहे; म्हणून  कोणीही धर्मगुरू, किंवा धार्मिक पुढारी ह्यांच्यापुढे आपल्या पापांची कबुली दिल्याने कोणाही मनुष्याचे पापक्षमा होत नाही; कारण धर्मगुरू हेहि मनुष्य असून स्वतः पापी आहेत असे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते.

सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.



Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                           
                                       



No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक