“सुवार्ता” हा तारणाचा व समेटाचा असा शुभ संदेश आहे केवळ ज्याद्वारे मनुष्य पापांतून मुक्त होऊन सार्वकालिक जीवन / मोक्ष प्राप्त करू शकतो. या पृथ्वीवरील सर्व मानवजातीत पाप आढळून आल्यामुळे, आपण सर्व मनुष्य देवापासून विभक्त असे झालेलो आहोत. हे पाप मनुष्यांत उत्पतीच्यावेळी देवाविरूद्ध केलेले बंड किंवा आज्ञाभंग
ह्यामुळे शिरले आहे. या पापाचे परिणाम म्हणजे आपल्या जीवनातील
शून्यता, आपल्यामध्ये आढळणारा व न पुसला
जाणारा पापाचा दोष आणि शेवटी अटळ असलेल्या मृत्युचे व त्याचे एक विशिष्ट भय हे आहेत.
ह्या पापांतून मुक्त होण्याचा परिणामी सार्वकालिक जीवनाचा मार्ग कोणाही
मनुष्याला ठाऊक नव्हता. त्यामुळे सर्व मनुष्यांचा अंत हा पापांत होत होता व परिणामी
कोणाही मनुष्याला सार्वकालिक / अनंत जीवन मिळू शकत नव्हते. ह्या पापांत मनुष्याची
अवस्था फार बिकट झाली होती.
तरीही त्या अति दयाळू परमेश्वर देवाने
आम्हां मनुष्यांवर प्रीती केल्यामुळे, आपल्या स्वतःच्या पुत्राला (येशूला) जगात ख्रिस्त (म्हणजे मसीहा) म्हणून पाठविले; ह्यासाठी
की त्याने स्वतःच्या अर्पणाने आपले सर्व पाप व आपल्यासाठी अटळ
असलेले मरण स्वतःवर घेऊन देव व मनुष्यांमध्ये समेट घडवून त्यांमधील तुटलेला संबंध पुन्हा प्रस्थापित करावा; आणि आपल्याला देवाबरॊबर सार्वकालिक जीवन हे दान द्यावे. आमेन
सविस्तर स्पष्टीकरण:
उत्पातीत एदेन बागेत आपले अध्य पालक आदम आणि हव्वा ह्यांनी देवाबरोबर केलेल्या आज्ञाभंगामुळे मनुष्यांत व जगात पापाचा उगम झाला. ते पाप
त्यांच्यापासून चालत आजवर आपल्यापर्यंत येऊन पोहचले आहे; ते इतके की जगातील कोणीही
मनुष्य पापविरहित नाही. तेव्हा तेथे परमेश्वर देव हा
अतिपवित्र असल्यामुळे त्या दोघांच्या ह्या पापामुळे देव व
मनुष्य ह्यांच्यामधील असलेला संबंध तुटला गेला; कारण देव पवित्र होता आणि मनुष्य पापी झाली होता. पाप आणि पवित्रता ह्याची
भागी/मिलाफ कधीही होत नाही. परिणामी अमर्त्य असा मनुष्य मर्त्य बनला आणि रोग, दुःख व
अशांती ह्यांचा मनुष्यांच्या जीवनात प्रवेश झाला.
ह्यांच पापामुळे आपला मृत्यू हा अटळ आहे व होता.
परंतु या
पापी स्थितीत हतबल झालेल्या व मृत्यूच्या स्वाधीन असलेल्या आपल्यावर परमेश्वर
देवाला दया आली व त्याने आपल्यावर प्रीती करून आपल्या मुक्ती साठी महान
अशी समेटाची योजना आखली. ती योजना म्हणजे आपल्याला पापांच्या व मृत्यूच्या
बंधनातून मुक्त करण्यासाठी त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला मनुष्य बनून जगात
पाठवले. हा पुत्र म्हणजे आपला 'प्रभू येशू ख्रिस्त' होय. ह्यासाठी
कि त्याने आपल्यावरचा पापांचा दोष व त्यातून उद्भवणारे मरण स्वतःवर घेऊन त्या कालवारी क्रुसावर त्याच्या पवित्र रक्ताची खंडणी भरून आपले तारण करावे. (कारण कोणतीही मुक्ती खंडणी दिल्या वाचून होत नाही)
परमेश्वराच्या
ह्या योजनेप्रमाणे येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांचे पाप स्वतःवर घेऊन त्याने मरण
पत्करले. तोच येशू जगात मनुष्याप्रमाणे असूनसुद्धा पवित्र व
निष्कलंक राहिला आणि त्याने देवपित्याचे आज्ञापालन करून त्याच्या
सर्व इच्छेप्रमाणे केले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी पापांवर व मरणावर विजय मिळवून तो पुनरुस्थीत झाला. त्याने मरणावर व कबरेवर आणि अधोलोकावर विजय
मिळविला. तो येशू जिवंत होऊन लोकांच्या देखत स्वर्गात घेतला गेला आहे.
तोपर्यंत कोणीही मनुष्य पुनरुस्थित (मरणावर विजयी )होऊ शकला नव्हता कारण त्या
प्रत्येक मनुष्यांत पाप व पापांचे गुण आढळून आले होते. आता त्याच्या
ह्या अर्पणावर विश्वास ठेवणारे प्रत्येक मनुष्य जण
त्याच्या सारखेच पापांवर व मरणावर विजय मिळवण्यास समर्थ होतात. त्याच्या रक्ताखाली येणारा प्रत्येक मनुष्य नीतिमान (म्हणजे पाप विरहित) ठरतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणावर विश्वास ठेवणे म्हणजेच
परमेश्वर देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवणे व पर्यायाने देवाने योजलेल्या महान समेटाच्या योजनेवर विश्वास ठेवणे होय.
ह्याच त्या निर्माणकर्त्या परमेश्वराच्या महान मुक्तीच्या योजनेचा संदेश /
वार्ता ह्याला "सुवार्ता" म्हणतात. हा संदेश आपल्या सर्वांसाठी शुभ
आणि एक आनंदाचा संदेश आहे आणि सार्वकालिक जीवनाची अशा निर्माणकरण्यास
समर्थ आहे.
त्याच्या
ह्या अर्पणाने त्याने देव आणि मनुष्य ह्यांमधील तुटलेला संबंध पुन्हा प्रस्थापित
केला आहे. प्रभू येशूचे पवित्र रक्त आपले आजवरचे
सर्व पाप पुसून टाकते व त्याने पाठविलेला पवित्र आत्मा आपल्याला ह्यापुढेही
पापापासून शुद्ध राखून सार्वकालिक जीवन मिळविण्यास मार्गदर्शन करितो. म्हणूनच
त्याच्या ह्या पवित्र अर्पणावर व पुनरुस्थानावर विश्वास ठेवून आपल्या पापाबद्दल
पाश्च्याताप करणाऱ्या आपल्याला व इतर सर्वांना त्याने त्याच्यासारखे सार्वकालिक जीवन हे दान दिले
आहे. ह्यामुळे आता आपल्यामधील पापाचा दोष व मृत्यूचे भय त्याने नष्ट केल्यामुळे
आपले जीवन सार्वकालिक शांतीने भरले आहे.
त्या प्रभू येशू
ख्रिताने मरणावर विजय मिळविल्यामुळे आता आकाशांत, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली सर्व अधिकार त्याच्याकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे जो जो
प्रत्येक मनुष्य प्रभू येशू वर विश्वास ठेवून त्याच्या वचनांत व आज्ञेत आपले जीवन
व्यतीत करतो त्याला व स्वर्गीय नागरिकत्वा बरोबर सार्वकालिक जीवन हे मिळणार आहे.
तोच प्रभू परमेश्वर आपल्या अभिवचनाप्रमाणें ह्या जगाच्या शेवटी येऊन त्याच्यावर
व त्याने पाठविलेल्या पुत्र येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वाना स्वर्गीय राज्यात नेण्यासाठी येणार आहे व सार्वकालिक जीवन हे
वतन देणार आहे. त्या प्रभू येशूने त्याचा आत्मा म्हणजेच “पवित्र आत्मा” हा त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना देऊ
केला आहे. हा आत्मा त्या सार्वकालिक जीवनाचा विसर (Token) असा आहे. तो आत्मा विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा मार्गदर्शक असा आहे आणि तो
सर्वाना सत्यात व पवित्रेत राखतो आणि पापांपासून दूर ठेवतो.
तो पवित्र आत्मा प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वाना जसा येशूने मृत्यूवर
विजय मिळवला तसा मृत्यूवर विजय मिळवण्यास
समर्थ बनवतो. म्हणून प्रत्येक मनुष्याने त्याची (म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची) विश्वासाने वाट
पाहत, पापांपासून दूर राहून पवित्र आत्म्याच्या
प्रेणेने आपले जीवन पवित्र व निष्कलंक राखण्याचा प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.
तो अभिवचन देणारा परमेश्वर विश्वनीय आहे आणि तो लवकर येईलच. आमेन.
“आता जे रहस्य (सुवार्ता) गतयुगात गुप्त ठेवले
होते, परंतु आता जे प्रकट
झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन
देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या (संत पौल ) सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हांला स्थिर
करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो.” आमेन.
सुवार्तेचा शास्त्रीय संदर्भ
Ø
सर्व मनुष्य हे पापी आहेत
१) रोमकरांस पत्र ५:१२
"एका
माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी
पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले."
२) रोमकरांस पत्र ३:२३ -२४
"कारण सर्वांनी (म्हणजे आपण) पाप केले आहे
आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत; देवाच्या
कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते (म्हणजे आपण) विनामूल्य
नीतिमान ठरतात.”
३) रोमकरांस पत्र ६:२३
"कारण पापाचे
वेतन मरण आहे;"
Ø देवाने मनुष्यांवर
प्रीती करून आपला एकुलता एक पुत्राला जगात पाठवले
४) योहान ३:१६-१७
"देवाने जगावर
एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी
त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त
व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या
द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले."
५) योहान
१६:२८
"..आणि त्याच्या (येशू ख्रिस्ताच्या) वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्या द्वारे
जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरून असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर (देवाबरोबर) त्याच्या रक्ताच्या द्वारे समेट करावा हे पित्याला बरे
वाटले.". मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून मी पित्याकडे जात आहे.”
६) रोमकरांस पत्र ५:८-९
"परंतु देव
आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी
असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात
आल्यामुळे आपण विशेषकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत."
Ø येशू ने केले परमेश्वर देवाचे आज्ञापालन
७ )
योहान ५:३०
“मला स्वत: होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण
मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे
करायला पाहतो.”
८)
रोमकरांस पत्र ५:१८-१९
“तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व
प्राप्त होते. कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने
पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ
जण नीतिमान ठरतील.”
९)
फिलिप्पैकरांस पत्र २:६-८
“तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने
मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.”
Ø प्रभू
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पाश्च्याताप करणाऱ्या सर्वांस विनामूल्य तारणाचे
दान
१०) योहान
५: २४
“मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला
सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे.”
११)
प्रेषितांचे कृत्ये ३:१९
"तेव्हा तुमची पापे पुसून
टाकली जावीत म्हणून पाश्च्याताप करा व वळा;"
१२)
प्रेषितांचे कृत्ये ३:३८
"पेत्र त्यांना म्हणाला, "पाश्च्याताप
करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या
नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल...."
१३)
रोमकरांस पत्र १०:९-१०
“की, येशू प्रभू
आहे असे जर 'तू आपल्या मुखाने' कबूल करशील आणि देवाने
त्याला मेलेल्यांतून उठवले असा 'आपल्या अंत:करणात' विश्वास
ठेवशील तर तुझे तारण होईल."
Ø प्रभू
येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्यांना सर्वांस मिळणारे
पवित्र आत्माचे दान (सार्वकालिक जीवनासाठी मार्गदर्शक)
१४) योहान
१४:१६
“मी पित्याला विनंती
करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा
आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे.
१५)
योहान १४: २६
"तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा
तुम्हांला सर्वकाही शिकवील..."
१६ )
योहान १६:१३
: " तरी
तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणार्या गोष्टी तुम्हांला कळवील. तो माझा गौरव करील; कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हांला
कळवील. "
Ø प्रभू येशूने आपल्या पुनरुत्थानाद्वारे मरणावर विजय मिळविला आहे
१७) करिंथकरांस
पहिले पत्र १५:५५-५७
“अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?” मरणाची
नांगी पाप, आणि पापाचे बळ
नियमशास्त्र आहे; परंतु
जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती
असो.”
Ø प्रभू
येशू ख्रिस्ताच्या अर्पणाने देव आणि मनुष्य ह्यांच्यात समेट व उत्पत्तीत तुटलेले
नाते पुन्हा प्रस्थापित
१८)
कलस्सैकरांस पत्र १:२०
"आणि त्याच्या (येशू
ख्रिस्ताच्या) वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्या द्वारे जे सर्व
काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरून असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा
स्वतःबरोबर (देवाबरोबर) त्याच्या रक्ताच्या द्वारे समेट करावा हे पित्याला बरे
वाटले."
Ø आकाश, पृथ्वी आणि पृथ्वीखाली सर्व अधिकार आता प्रभू
येशू ख्रिस्ताच्या हाती आहेत
१९) मत्तय
२८:१८-२०
" तेव्हा
येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने
बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना
पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”
२०) फिलिप्पैकरांस
पत्र २:९-११
"ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल
करावे."
Ø प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा पृथ्वीवर आपल्या गौरवासह पुन्हा येणार आहे
२१) योहान
१४:२८
‘मी जातो आणि
तुमच्याकडे येईन,’ असे
जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी
पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे."
२२) थेस्सलनीकाकरांस
४:१३-१७
"बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी
आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे
येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हांला सांगतो की, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या
आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः
स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने
उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला
सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू."
२३) करिंथकरांस
पहिले पत्र १५:५१-५३
"पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ; क्षणात, निमिषात, शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील, आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे."
Ø
प्रभू येशूची येणाची विश्वासाने व धीराने वाट
पाहणार्यांना मिळणारे प्रतिफळ
२४) इब्री
लोकांस पत्र १०:३४-३७
"कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक
चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे
प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार
फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हांला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण “अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही;"
२५) फिलिप्पैकरांस
पत्र ३:२०
"आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत;"
२६) तीताला
पत्र २:१२-१३
"धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा
गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या
युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे."
२७) यहूदाचे
पत्र १:२१
“सार्वकालिक जीवनासाठी
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतीमध्ये राखा.”
२८) योहान
१४:१-३
“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ
आहेत; नसत्या तर मी
तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो.
आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे
पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे
तुम्हीही असावे.”
२९) यहूदाचे पत्र १:२१
“सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू
ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि
आपणांस देवाच्या प्रीतीमध्ये राखा.”
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र
शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
No comments:
Post a Comment