व्याख्या: 'मध्यस्थ' म्हणजे दोन भिन्न व्यक्ती मधील एक समान दुवा.
त्या दोन व्यक्ती मधील भिन्नता ही अनेक प्रकारची असू शकते. (विचार, संस्कृती, वर्ण, किंवा जात इत्यादी) मुळात मध्यस्थाची गरज लागतेच कशाला? जेव्हा दोन भिन्न
व्यक्तींना संवाद साधावयाची गरज भासते, पण थेट संवाद होणे शक्य नसते, तेव्हा एक मध्यस्थ कामी येतो.
पार्श्वभूमी: आपण ह्या ब्लॉगद्वारे असच्याच दोन भिन्न
व्यक्तीमध्ये मध्यस्थी करणारा तिसऱ्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. ह्या
दोन व्यक्तीमध्ये एक अद्वितीय भिन्नता आढळून येते. ही भिन्नता म्हणजे, त्यातील एक व्यक्ती अत्यंत पवित्र आहे, तर दुसरा पापी आहे. हे दोन व्यक्ती म्हणजे
अनुक्रमे प्रभू परमेश्वर आणि मनुष्य होय; आणि ह्या दोघांमध्ये मध्यस्थी करणारा व्यक्ती म्हणजे 'प्रभू येशू ख्रिस्त'.
पण
आजचे बहुतांश ख्रिस्ती जगतात मरिया मातेला ही प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर
"मध्यस्थ" म्हणून संबोधले जाते. ह्या शिकवणीचा उगम हा रोमन कॅथॉलिक
चर्चने केला व कालांतराने त्यांच्यातून बाहेर निघालेल्या प्रोटेस्टंट पंथीय
ह्यांनी ती शिकवण अंगिकारलेली आपण पाहतो. रोमन कॅथोलीक चर्चच्या मतानुसार मारिया
ही 'प्रभू येशूची' आई ह्या नात्याने सर्व ख्रिस्ती श्रद्धावंतांची
पण आई अशी आहे. तसेच तिला संदेहीं स्वर्गात घेण्यात आल्यानंतर ती तिथे
सर्व श्रद्धावंतासाठी अविरत मध्यस्थीची प्रार्थना करत असते (ज्याला इंग्रज़ीत 'Intercession' म्हटले जाते) ज्यामुळे सर्व मनुष्यांना देणग्या व
सार्वकालिक जीवन मिळवून देण्यात मदत करते. ती स्वर्गात राहून सर्व मनुष्यांसाठी
तिच्या ह्या मातृत्वाच्या भूमिकेतून मध्यस्थी करत असते.
रोमन
कॅथॉलिक चर्चची ह्या शिकवणीची अधिकृत प्रत आपल्याला ह्या खालील संकेत स्थळावर
वाचायला मिळेल.
Catechism of Catholic Church (Paragraph
6. Mary - Mother of Christ, Mother of the Church - verses- 967-970, 975)
पण
आता कोणी म्हणेल की, मुळात मनुष्य व देव ह्या दोघांमध्ये
मध्यस्थाची गरज लागतेच कशाला ? तर ह्याचे कारण आहे ते म्हणजे उत्पत्तीत देव
आणि मनुष्य ह्यांचे तुटलेले संबंध !!
देव
आणि मनुष्य ह्यांचे तुटलेले संबंध
उत्पतीत
देवाने पृथ्वीवर सर्व सृष्ट वस्तूंबरोबर मनुष्यांना देखील निर्माण केले. ते आदम
आणि हव्वा हे होते, आणि ते देवाच्या प्रतीरूपाचे असे होते. देवाने
त्यांना एदेन बागेत ठेवले आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर सत्ताधारी असे नेमिले.
देव रोज संध्याकाळी म्हणजे शिळोप्याच्या वाऱ्याच्या वेळी त्यांची भेट घेत असे.
त्यावेळी देव आणि मनुष्यांमध्ये थेट संवाद होत असे, कारण ते तिघेही पवित्र असे होते. सैतानाने हव्वेला भुलवून, मनुष्याकडून पाप (देवाचा आज्ञाभंग) घडविले, तेव्हा ते दोघे भ्रष्ट होऊन पापात पडले. ह्या पापामुळे देवाचे आणि मनुष्यांचे सबंध तुटले गेले, कारण देव पवित्र होता आणि मनुष्य पापी झाला होता; आणि पवित्र आणि अपवित्र (पापी) ह्यांचा मिलाप कसा होणार ? जसा उजेड आणि अंधार ह्यांचा मिलाप होणे शक्य नाही, तसे तेहि होणे शक्य नाही. ह्यामुळे देव आणि मनुष्य ह्यामध्ये मोठी भिंत उभारली
गेली. मनुष्य एदेन बागेतून बाहेर फेकला गेला. त्यावेळेपासून देव आणि मनुष्य
ह्यांचे जे सबंध कायमचे तुटले गेले. त्यांच्या ह्या पापामुळे, जे त्यांच्यातून आज सर्व मनुष्य जातीत पसरल्या गेल्यामुळे, आजही मनुष्य देवाशी थेट संबंध साधू शकत नाही. जोपर्यंत मनुष्यांना पापांची
क्षमा होत नाही, तो पर्यंत तो देवासमोर येऊ शकत नव्हता किंवा त्याच्याशी संबंध
स्थापित करू शकत नव्हता.
देवाने
मोशेद्वारे स्थापलेल्या जुन्या कराराच्या नियामशास्त्राप्रमाणे, रक्त अर्पिल्या शिवाय पाप क्षमा होत नसे. त्याप्रमाणे तो याजक वर्षातून
एकदा त्या परम पवित्र स्थानात (जेथे देवाचा वास होता)
जाऊन देवाची भेटत असे आणि लोकांच्या पापाबद्धल प्रायश्चित म्ह्णून निर्दोष
कोकऱ्याचे रक्त अर्पण करीत असे. परंतु ह्या विधीने केवळ पाप झाकले जात होते; पाप संपूर्णपणे धुतले जात नव्हते आणि म्हणून मनुष्यांशी देवाचा थेट
संवाद होऊ शकत नव्हता.
परंतू
देवाची मनुष्यांवर होती व फार प्रीती आहे. त्याला मनुष्यांच्या त्या हतबल स्थिथीची
फार कीव आली. तेव्हा त्याने मनुष्यांबरोबर तुटलेल्या सबंध पुन्हा खऱ्या अर्थाने
स्थापण्यासाठी एक महान मुक्तीची संकल्पना आखली. ती मुक्ती म्हणजे त्यांच्या
पापांपासून मनुष्यांची मुक्ती!!!! (इफिसकरांस पत्र २:१३-१६ वाचा)
इफिसकरांस
पत्र २:१३-१६
“परंतु जे तुम्ही पूर्वी 'दूर' होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या रक्ताच्या
योगे 'जवळचे' झाला आहा. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे; त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पडली; त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे
आज्ञाविधीचे नियमशास्त्र; ह्यासाठी की, स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने
शांती प्रस्थापित करावी; आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव
जीवे मारून त्यांच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा ;
....कारण
त्याच्याद्वारे (म्हणजे येशूच्या) आत्म्याच्या योगे आपणां
उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. "
त्या
संकल्पनेत त्याने जुना करार (जो मनुष्याचे पाप संपूर्णपणे पुसू शकत नव्हता) रद्द करून, मनुष्यानबरोबर एक नवा करार स्थापन केला. (इब्री लोकांस पत्र १०:१-१८) आणि तो स्थापण्यासाठी तो स्वतः मनुष्य रूप धारण करून तो पृथ्वीवर अवतरला.
म्हणजेच त्याने स्वत: मनुष्यांच्या रुपात पृथ्वीवर जन्म घेऊन आपले बलिदान करून
आपल्या रक्ताने मनुष्यांच्या पापांसाठी एकदाचेच प्रायश्चित करावे, जेणेकरून त्यांचे देवाबरोबर समेट करून त्या उभयंतांमध्ये पूर्वी तुटलेले सबंध
पुन्हा प्रस्थापित करावे.
ह्याप्रमाणे
तो महान परमेश्वर ह्या भूतलावर 'मनुष्याचा पुत्र' म्हणून मरीयेच्या पोटी ‘येशु’ म्हणून जन्मी आला आणि
त्याच्या प्रायश्चिताच्या निर्दोष रक्ताने खंडणी भरून
त्याने मनुष्यांना देवाबरोबर जोडले. ह्याचा अर्थ असा आहे की, मनुष्यांना पापांपासून मुक्त करण्यासाठी तो स्वत: निर्दोष कोकरा बनून आला आणि
आपल्याला स्वतःला त्याने प्रायश्चित म्हणून अर्पण केले. ह्याकारणामुळे देव आणि मनुष्य ह्यांमधे
प्रभू येशु हा एकच मध्यस्थ आणि मुख्य याजक असा झाला, अन्य कोण नाही. (इब्री लोकांस पत्र ७: २४-२५)
इब्री
लोकांस पत्र ७: २४-२५
“पण हा 'युगानुयुग' राहणारा असल्यामुळे ह्यांचे याजकपण अढळ आहे.
ह्यांमुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्याना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा (येशू ख्रिस्त) सर्वदा जिवंत आहे .”
त्यामुळे
तेथे देवासमोर येशू सोडून अन्य कोणीही मध्यस्थी करू शकत नाही; मग ती पवित्र मरिया माता असो व कोणी संत असो वा कोणी अन्य व्यक्ती असो. कारण
फक्त येशूने आपल्या स्वत:ला मनुष्यांसाठी अर्पण केले, अन्य कोणीही नाही. (इब्री लोकांस पत्र ९: १४-१५) (इब्री लोकांस पत्र १२: २४) इफिसकरांस पत्रामध्ये आपण वर वाचले की "त्याच्या (म्हणजे येशूच्या) द्वारेच आपला पित्याजवळ प्रवेश होतो" कोणा मरीयेद्वारे किंवा संतांद्वारे नव्हे! (इफिसकरांस पत्र २:१३-१६ वाचा)
इब्री
लोकांस पत्र ९: १४-१५
"तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक
अशा स्वतःस देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्सद्विवेकबुद्धी जिवंत
देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषकरून शुद्ध करील”?
आणि
तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकारिता आहे की, पहिल्या कराराखाली झालेल्या उलंघनापासून खंडणी भरून प्राप्त
केलेली मुक्ति होण्यासाठी मृत्यू झाल्याने,सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना
मिळावे".
इब्री
लोकांस पत्र १२: २४
"नव्या कराराचा मध्यस्थ येशु, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहा";
पण
रोमन कॅथॉलिक पंथाच्या शिकवणीत ते मरिया मातेला मध्यस्थ म्ह्णून गणतात. ते का आणि
त्या शिकवणीत किती तथ्य आहे ते आपण आता पाहू या.
मरिया
माता मध्यस्थ असल्याची शिकवणीचा उगम
काही
ख्रिस्ती पंथांच्या शिकवणीप्रमाणे (प्रामुख्याने रोमन कॅथॉलिक चर्च) येशूच्या काना गावी
पहिल्या चमत्कारावेळी, त्याच्या आईने म्हणजे मरीया हिने मध्यस्थी
केली. आणि ह्यावरून ते मरियेला देव आणि मनुष्य ह्यामध्ये मध्यस्थ म्हणून
संभोद्तात. पण ते खरे नाही; आणि त्या शिकवणीत काही एक
तथ्य नाही.
आपण
जर ते वचन उघडून नीट वाचले तर आपल्याला हे कळेल कि, येशूने मारीयेच्या सांगण्यावरून तो चमत्कार
केला नाही. तर त्याने त्याच्या मर्जीनुसार, त्याच्या नियोजित वेळ आल्यावर तो केला. (योहान २: २-५ वाचा)
योहान
२ : ३ - ५
“मग द्राक्षारास संपला तेव्हा येशूची आई त्याला
म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारास नाही. येशु तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय सबंध ? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकारांना
म्हणाली, हा तुम्हांला जे सांगेल ते करा”.
मुळात
त्याने तेथे मरीयेची मध्यस्थी सपशेल नाकारली आणि हे सिद्ध केले कि,देवाच्या
इच्छेमध्ये कोणीही मनुष्य आड येऊ शकत नाही किंवा मध्यस्थी करू शकत नाही. उलटपक्षी
मरीया असे म्हणते कि, तो तुम्हाला जे सांगेल तसे करा. ती असे नाही
म्हणत ‘मी सांगते तसे करा किंवा मी त्याला सांगते, मग तुम्ही तसे करा.’ ह्यात तिने त्या चाकरांना
येशूच सर्व अधिकारी आहे व त्याचाच शब्द हा अंतिम आहे
असे दाखवून दिले आहे.
प्रभू
येशूने तो मध्यस्थ असल्याची दिलेली ग्वाही
बायबलमध्ये
प्रभू येशु स्वतः म्हणतो कि, माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत
नाही . (योहान १४: ६ वाचा) ह्या वाचनावरून येशु ख्रिस्त हे प्रतीत करतो कि, देव आणि मनुष्य ह्यांमध्ये मीच केवळ मध्यस्थ आहे, अन्य कोणी नाही.
योहान
१४: ६
"येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही".
त्याने
इथे असे म्हटले नाही कि, माझ्याद्वारे आणि मरिया हिच्या द्वारे पित्याकडे
कोणी येत नाही. तर त्याने केवळ 'माझ्याद्वारे' म्हटले आहे.
संत
पौल ज्याने बायबलचा नवीन कराराचा बहुतेक भाग देवाच्या प्रकटीकरणाने लिहिला, तो देखील ह्या गोष्टीला दुजोरा देत आहे. (१ तीमिथ्याला पत्र २ : ५ वाचा)
१
तीमिथ्याला पत्र २ : ५
“कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशु हा मनुष्य एकच
मध्यस्थ आहे".
तसेच
पौल रोमकरांस पत्रात म्हणतो कि, देवापुढे कोण उभा राहील किंवा त्याचा मंत्री
कोणाला होता येईल ? (रोमकरांस पत्र ११: ३४ वाचा) ह्याचा अर्थ असा आहे कि, कोणीही मर्त्य मनुष्य देवापुढे उभा राहू शकत नाही, किंवा देवाला सल्ला देऊ शकत नाही, व पर्यायाने मध्यस्थी पण करू शकत नाही. मग ती
मरिया माता असो वा कोणीही संत/ महापुरुष असो. कोणीही देवापुढे मध्यस्थी करू शकत नाही, ‘प्रभू येशू ख्रिस्ता’ खेरीज.
रोमकरांस
पत्र ११ : ३४
"प्रभूचे मन कोणी ओळखिले आणि त्याचा मंत्री कोण
होता "?
जुन्या
करारामध्ये परमेश्वर यिर्मयाद्वारे सांगतो,
‘तू मला हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन.’ (यिर्मया ३३: ३ वाचा))
तो असे नाही म्हणत कि तू कोणा मरिया नामक मध्यस्ताकरवी मला हाक मार. कारण देवाला
त्याच्या आणि मनुष्यांच्या मध्ये कोणीही अन्य व्यक्ती नको आहे; (आणि
इथे येशू हा स्वतः देव आहे). म्हणजे जसे एदेन बागेत देव
आणि मनुष्य (आदम आणि हव्वा) ह्यांचे संबंध होते, तसे त्याला हवे आहेत.
यिर्मया
३३: ३
"परमेश्वर हे नाम धारण करणारा म्हणतो कि, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन,"
मुळात
कोणाहि मनुष्यावर दया किंवा कृपा करायचा हा अधिकार केवळ देवाला आहे. त्याच्या मर्जीस येते
त्यावर तो दया करतो आणि त्याच्या मर्जीस येते त्यावर तो कृपा करतो. (रोमकरांस
पत्र ९ : १५ - १८)
ह्याचा अर्थ असा आहे कि, कोणी अन्य व्यक्तीने सांगून परमेश्वर देव कुठलीही गोष्ट करत नाही, कारण तो सार्वभौम (म्हणजेच सर्व अधिकारी) असा परमेश्वर
आहे.
रोमकरांस
पत्र ९ : १५ - १८
"कारण तो मोशेला म्हणतो,'ज्या कोणावर मी दया करितो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा
करितो त्यांच्यावर मी करुन करीन'. ह्यावरून हे इच्छा बाळगणाऱ्यावर नव्हे किंवा
धावपळ करणाऱ्यावर नव्हे, तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे".
ह्यावरून
हे स्पष्ट होते कि, कोणा मनुष्यावर दया किंवा त्याचे पाप क्षमा
करण्यासाठी त्याला कोणालाही विचारण्याची गरज भासत नाही. किंवा कोणा मध्यस्थाची गरज
भासत नाही, केवळ 'येशू ख्रिस्ता' खेरीज!!
सारांश: ह्या सर्व वरील वचनाचे
तात्पर्य हेच आहे कि, देव आणि मनुष्य ह्यामध्ये
केवळ ‘प्रभू येशु ख्रिस्त’ हाच एक मध्यस्थ आहे, अन्य कोणीही नाही. कोणी मारिया माता, संत किंवा इतर कोणी महापुरुष देवासमोर मध्यस्थी तर
सोडून द्या, उभा सुद्धा राहू शकत नाही.
म्हणून
तुमच्या सर्व मागण्या, गरजा, इच्छा किंवा पाप क्षमेसाठी
विनंती ही तुम्ही केवळ प्रभू येशुकडे प्रार्थनेद्वारे घेऊन जा. तोच तुमची मदद करण्यास समर्थ आहे, अन्य कोणीही नाही. कारण तोच केवळ सार्वभौम देव आहे. आमेन
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2018 Digital सुवार्तिक All Rights Reserved
No comments:
Post a Comment