"येशू - स्वर्गाकडे जाण्याचा एकमेव मार्ग" "Jesus the only way
to Heaven"
पार्श्वभूमी: ह्या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा एक दिवस मरणार आहे. मृत्यूनंतरच्या जीवनावर आजच्या जगामध्ये अनेक मतमतांतरे आहेत. त्याजबरोबर आजचे बहुतेक धर्म हे शिकवतात की मृत्यूनंतर मनुष्याच्या आत्म्याला तारण / मोक्ष मिळून तो आत्मा चीर विसाव्यात जातो. मग तो ख्रिस्ती असलातर तो स्वर्गात जातो किंवा तो हिंदू असला तर तो कैलासवासी होतो, असा भिन्नभिन्न लोकांचा समज आहे. हे सर्व मान्य सत्य आहे कि, जसा स्वर्ग आहे तसा नरकही आहे.
पुर्विपारपासून मनुष्यांत असा समज रुजवलेला आहे कि, मनुष्याने त्याच्या आयुष्यांत चांगले काम केले असल्यास त्याचा आत्मा स्वर्गात जातो, किंवा मनुष्याने पाप किंवा इतरांचे वाईट केले असल्यास त्याचा आत्मा हा नरकात जातो. पण इथे प्रश्न पडतो स्वर्गीय जीवनात प्रवेश (म्हणजेच तारण) कशापासून मिळते ? सत्य हे आहे की पापांत पडलेल्या या जागांचा नाश हा अटळ आहे. तर ह्या नाशांतून व पापांतून वाचणे म्हणजेच तारण होणे. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला केवळ स्वर्गात जाण्याची इच्छा आहे, त्यासाठी त्याला पापांपासून तारण मिळवण्याची नितांत गरज आहे. पवित्र शास्त्र बायबलप्रमाणे स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त!!! ते कसे ते आपण आता ह्या ब्लॉग पोस्टद्वारे पाहू या.
प्रभू
येशू ख्रिस्तच स्वर्गाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे काय ?
होय!! प्रभू येशू ख्रिस्तच स्वर्गाचा एकमेव मार्ग आहे. हे वाक्य जरी आजच्या आधुनिक माणसांना अतिशयोक्ती वाटत असले तरी ते तितकेच सत्य आहे. पवित्र शास्त्र (बायबल) हेच शिकविते की येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा
तारणाचा आणि पर्यायाने स्वर्गाचा मार्ग नाहीच!! बायबल हेही सांगते की तारण मिळवणे म्हणजेच
स्वर्गात जाणे; कारण सार्वकालिक जीवन फक्त स्वर्गातच मिळू शकते. येशू ख्रिस्त स्वतः पृथ्वीवर असताना हेच म्हणाला होता असे आपण योहान
शुभवर्तमानाच्या पुस्तकात वाचतो. (योहान १४:६ वाचा)
इथे तो म्हणतो की मार्ग सत्य व जीवन मीच आहे; आणि माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे (जो स्वर्गात आहे) कोणीही येत नाही. यात तो स्वर्गाकडे जाण्याचे पुष्कळ मार्गांमधला एक आहे असे नाही, तर तो एकमेव मार्ग आहे. कारण कोणाही मनुष्याचे पापक्षमा झाल्याशिवाय त्याला त्याला स्वर्गात प्रवेश नाही; आणि ती पापक्षमा केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे मिळते. म्हणून कोणीही व्यक्ती; मग तो कितीहि नावाजलेला, उच्च ज्ञानी किंवा विद्या पारंगत असला, तरीहि येशूकडे आल्यावाचून त्याला स्वर्गात प्रवेश मिळूच शकत नाही.
इथे तो म्हणतो की मार्ग सत्य व जीवन मीच आहे; आणि माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे (जो स्वर्गात आहे) कोणीही येत नाही. यात तो स्वर्गाकडे जाण्याचे पुष्कळ मार्गांमधला एक आहे असे नाही, तर तो एकमेव मार्ग आहे. कारण कोणाही मनुष्याचे पापक्षमा झाल्याशिवाय त्याला त्याला स्वर्गात प्रवेश नाही; आणि ती पापक्षमा केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाद्वारे मिळते. म्हणून कोणीही व्यक्ती; मग तो कितीहि नावाजलेला, उच्च ज्ञानी किंवा विद्या पारंगत असला, तरीहि येशूकडे आल्यावाचून त्याला स्वर्गात प्रवेश मिळूच शकत नाही.
योहान १४:६
“येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही."
प्रभू येशूने या वचनाव्यतिरिक्त अजून अनेक
ठिकाणी तोच केवळ एकमेव स्वर्गाचा मार्ग असल्याचे सुचित केलेले आहे. त्याजबरोबार तो म्हणतो की त्याचे शब्द हे जीवन आहेत.
(योहान ६:६३ वाचा)
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना येशूने सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले आहे. (योहान ३:१३-१५ वाचा) तोच मेंढरांचे द्वार आहे. (योहान १०:७, ९ वाचा). तोच जीवनाची भाकर आहे. (योहान ६:३५ वाचा). येशूच पुनरुत्थान व जीवन आहे. (योहान ११:२५ वाचा) प्रभू येशू व्यतिरिक्त ह्या सर्व पदव्यावर कोणीही आपला अधिकार सांगू शकत नाही.
योहान ६:६३
".... मी जी वचने तुम्हांला सांगितले आहेत ती आत्मा व जीवन आहेत;"
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना येशूने सार्वकालिक जीवन देण्याचे अभिवचन दिले आहे. (योहान ३:१३-१५ वाचा) तोच मेंढरांचे द्वार आहे. (योहान १०:७, ९ वाचा). तोच जीवनाची भाकर आहे. (योहान ६:३५ वाचा). येशूच पुनरुत्थान व जीवन आहे. (योहान ११:२५ वाचा) प्रभू येशू व्यतिरिक्त ह्या सर्व पदव्यावर कोणीही आपला अधिकार सांगू शकत नाही.
योहान ३:१३-१५
“स्वर्गांतून उतरलेला (व स्वर्गात असलेला) जो मनुष्याचा पुत्र त्याचावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला
नाही.....ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो तो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक
जीवन प्राप्त व्हावे."
योहान १०:७,९
"म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हांला खचित खचित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.
.....मी
दार आहे, माझ्याद्वारे कोणी आंत जाईल तर त्याला
तारणप्राप्ति होईल;"
योहान ११:२५
"येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल;"
प्रभू येशू व्यतिरिक्त त्याच्या शिष्यांनी तोच (म्हणजेच येशू) स्वर्गाच्या मार्ग असण्याची घोषणा केली व अनेक वचनांमध्ये
ह्या सत्याला दुजोरा दिला आहे. ते कसे ते आपण पाहू या.
प्रेषितांनी केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तारणाची घोषणा
केली
प्रेषितांनी सुवर्तेच्या घोषणेवेळी 'प्रभू येशूचे मरण व पुनरुत्थान' ह्यावर अधिक भर दिला. प्रेषित पेत्राने सेंहेंद्रीन सभेमध्ये 'येशूच स्वर्गाचा मार्ग' असल्याचे जाहीर केले. (प्रेषितांचे कृत्ये ४:१२ वाचा)
प्रेषितांचे कृत्ये ४:१२
"आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव
आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही."
प्रेषित पौलानेहि अंतुखियातील यहुदी
प्रार्थनागृहात 'प्रभू येशू ख्रिस्त हाच एकमेव तारणारा' म्हणून घोषित केले. (प्रेषितांचे कृत्ये १३:३७-३८ वाचा)
प्रेषितांचे कृत्ये १३:३७-३८
"परंतु ज्याला देवाने उठविले तो कुजला नाही. म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हांला पापांची क्षमेची घोषणा करण्यात
येत आहे;"
संत पौल तिमथ्याला पत्रात हे लिहितो की, देव आणि मनुष्य ह्यांमध्ये येशूच एकमेव मध्यस्थ आहे, अन्य कोणी नाही. (१ तीमिथ्याला पत्र २: ५ वाचा)
१ तीमिथ्याला पत्र २ : ५
“कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशु हा
मनुष्य एकाच मध्यस्थ आहे".
प्रेषित पौल दुसऱ्या एका ठिकाणी हे घोषित करतो
की, परमेश्वर देवाने ही मुक्तीची योजना आखली की; उत्पत्तीत आदाम आणि हव्वेच्यावेळी देवाचा
मनुष्यांबरोबर तुटलेल्या सबंध पुन्हा खऱ्या अर्थाने स्थापण्यासाठी, त्याने (म्हणजेच
खुद्द परमेश्वर देवाने) स्वत: पृथ्वीवर मनुष्यांच्या रुपात जन्म ह्यासाठी घेतला की त्याने येऊन आपले स्वतःचे बलिदान करून आपल्या
रक्ताने मनुष्यांसाठी एकदाचेच प्रायश्चित करावे; जेणेकरून मनुष्यांचे देवाबरोबर समेट करून पूर्वी तुटलेले सबंध पुन्हा
प्रस्थापित करावे. (इफिसकरांस पत्र २:१३-१६ वाचा)
इफिसकरांस पत्र २:१३-१६
“परंतु जे तुम्ही पूर्वी 'दूर' होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या रक्ताच्या
योगे 'जवळचे' झाला आहा. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे; त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पडली; त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे
आज्ञाविधीचे नियमशास्त्र; ह्यासाठी की, स्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने
शांती प्रस्थापित करावी; आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव
जीवे मारून त्यांच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा ;
....कारण
त्याच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणां उभयतांचा पित्याजवळ (म्हणजेच स्वर्गात) प्रवेश होतो. "
त्याचबरोबर प्रेषित योहान यानेहि 'येशू नामाद्वारेच पाप क्षमा' मिळण्याची सुवार्ता घोषित केली. कारण कोणाही मनुष्याचे पापक्षमा झाल्याशिवाय त्याला त्याला स्वर्गात प्रवेश
नाही; आणि ती पापक्षमा केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे मिळते. (१ योहान २:२, १२ वाचा)
१ योहान २:२,१२
“आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याहि
पापांबद्दल आहे......मुलांनो मी तुम्हांस लिहितो, कारण त्याच्या (म्हणजेच येशूच्या) नावामुळे तुमच्या पापांची तुम्हांस क्षमा झाली आहे."
ह्या सर्व वरील संदर्भावरून आपल्याला समजते कि, मनुष्यांना स्वर्गातील सार्वकालिक जीवनप्राप्ति ही केवळ प्रभू येशू
ख्रिस्तामुळेच शक्य झाली आहे. खुद्द प्रभू येशूने हि आपल्या प्रार्थनेद्वारे हे स्पष्ट केले आहे की सार्वकालिक जीवन देण्यास (पर्यायाने पाप क्षमा करण्यास) केवळ तोच समर्थ आहे; आणि हे सामर्थ्य व अधिकार त्याला त्याच्या
स्वर्गीय पित्याकडून मिळाले आहे. (योहान १७:२-४ वाचा)
योहान १७:२-४
"जे तू त्याला (म्हणजे येशू स्वतःला) दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावें, म्हणून तू मनुष्यमात्रांवर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम (पाप क्षमा व सार्वकालिक जीवन दान) तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव
केले आहे."
तो हेही म्हणतो की ज्या कामासाठी किंवा
उद्धेशासाठी त्याला पृथ्वीवर पाठवण्यात आले होते, ते त्याने पूर्ण केले. ते काम म्हणजे जगातील लोकांना पापापासून परावृत्त करणे, त्यांच्या पापांसाठी प्रायश्चित म्हणून स्वतःस अर्पण करून त्यांना पापक्षमा
मिळवून देणे व त्याच्या ह्या क्रुसावरील बलिदानावर (व पर्यायाने परमेश्वरावर) विश्वास ठेवणाऱ्यां लोकांना सार्वकालिक जीवन हे दान देणे.
पापक्षमा
व तारण केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारेच मिळते
मनुष्यांना सार्वकालिक जीवन (म्हणजेच स्वर्गीय जीवन) मिळवण्यासाठी पापांची क्षमा व त्यापासून मुक्ती मिळणे क्रमप्राप्त आहे. ती मुक्ती देण्यासाठी येशूने आपला स्वतःचा प्राण अर्पण केला; व त्याच्या या अर्पणावर विश्वास ठेवणाऱ्यांना येशूने नितीमत्व (म्हणजेच पापमुक्ती) प्रदान केली. (रोम ३:२२, ४:२४-२५, १०:९-१०, इब्रीकरांस पत्र १०:१९-२० वाचा)
मनुष्यांच्या पापासाठी पापांची खंडणी म्हणून केवळ येशुनेच आपले रक्त दिले आणि म्हणूनच त्यांचे पाप क्षमा करून त्यांचे तारण करण्याचा अधिकार फक्त त्याच्याकडेच आहे, अन्य कोणाकडे नाही. केवळ येशूच्या रक्तद्वारेच तुम्हां आम्हां पापी मनुष्यांना पवित्रस्थानात (म्हणजेच स्वर्गात) प्रवेश करण्याचे धैर्य आले आहे. (मरिया माता, संत किंवा कोणा फादर, बिशप, पोप अथवा साधू -संत, मौलवी ह्यांच्याद्वारे स्वर्गात प्रवेश मिळत नाही)
मनुष्यांच्या पापासाठी पापांची खंडणी म्हणून केवळ येशुनेच आपले रक्त दिले आणि म्हणूनच त्यांचे पाप क्षमा करून त्यांचे तारण करण्याचा अधिकार फक्त त्याच्याकडेच आहे, अन्य कोणाकडे नाही. केवळ येशूच्या रक्तद्वारेच तुम्हां आम्हां पापी मनुष्यांना पवित्रस्थानात (म्हणजेच स्वर्गात) प्रवेश करण्याचे धैर्य आले आहे. (मरिया माता, संत किंवा कोणा फादर, बिशप, पोप अथवा साधू -संत, मौलवी ह्यांच्याद्वारे स्वर्गात प्रवेश मिळत नाही)
रोमकरांस पत्र ३:२२
"हे देवाचे नितीमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या
द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे; त्यांत भेदभाव नाही."
रोमकरांस पत्र ४:२४-२५
"तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठविले
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यां आपणालाही ते (नितीमत्व) गणले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून
देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे."
रोमकरांस पत्र १०:९-१०
“की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने
त्याला मेलेल्यांतून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण
होईल. कारण जो अंतःकरणात विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो
त्याचे तारण होते."
इब्रीकरांस पत्र १०:१९-२०
"म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यांतून म्हणजे स्वदेहांतून जो नवीन व
जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परम पवित्रस्थानात (म्हणजेच स्वर्गात) येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे;"
प्रभू येशूच्या सुवर्तेच्या काळांत जेव्हा लोकं
त्याची सोबत सोडून जाऊ लागली तेव्हा, येशूने त्याच्या शिष्यांनाहि त्यांना त्याला सोडण्याची
इच्छा आहे का ? म्हणून विचारले असता; प्रेषित पेत्र येशूला म्हणाला की, सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत व
देवाचा पवित्र पुरुष आपण आहा.(योहान ६:६६-६९ वाचा)
योहान ६:६६-६९
"ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते
पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पत्राने त्याला उत्तर दिले, प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळआ आहेत; आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र
तो पुरुष आपण आहा."
म्हणुन आज मनुष्यांनाही पेत्राप्रमाणे हाच
विश्वास धारवायचा आहे की, सार्वकालिक जीवन किंवा स्वर्गीय जीवन केवळ
प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच आहे; आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त हाच स्वर्गाचा
एकमेव मार्ग आहे.
सारांश: स्वर्ग हा पवित्र असल्यामुळे तिथे कोणत्याही पापाला व पर्यायाने पापी मनुष्यांना प्रवेश नाही. म्हणूनच स्वर्गात जाण्यासाठी मनुष्यांना नीतीमत्व (पापमुक्ती) मिळणे आवश्यक आहे; येशूने आपल्या स्वतःच्या रक्ताच्या अर्पणाद्वारे ते नीतीमत्व मनुष्यांस फुकट मिळवून दिले आहे. जो कोणी त्याच्यावर (व त्याने केलेल्या अर्पणावर विश्वास ठेवतो), त्याला त्याने हे नितीमत्व व पर्यायाने सार्वकालिक जीवन
म्हणजेच स्वर्गीय जीवन देऊ केले आहे.
मनुष्यांच्या पापांसाठी केवळ येशूने अर्पण
केल्यामुळे, मनुष्यांस पाप क्षमा व सार्वकालिक जीवन
देण्याचा अधिकार व सामर्थ्य केवळ येशुकडेच आहे; अन्य कोणाकडेही नाही. प्रभू येशू स्वतःनेही आपल्या वचनात हेच
सांगितले आहे. म्हणून तोच स्वर्गाचा एकमेव मार्ग व द्वार असा
आहे.
म्हणूनच तारणप्राप्ती / मोक्षप्राप्ती / स्वर्गात जाण्यासाठी मनुष्यांनी केवळ प्रभू
येशू ख्रिस्ताकडेच येणे गरजेचे आहे. मरिया माता, कोणत्याही संत किंवा कोणा फादर, बिशप, पोप अथवा साधू -संत, मौलवी ह्यांच्याकडे जाऊन स्वर्गात प्रवेश मिळणे शक्य नाही. आमेन
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2020 Digital सुवार्तिक All Rights Reserved
No comments:
Post a Comment