Wednesday, 10 August 2016

Christian Gospel - Truth about New Birth (Born Again) - नवीन जन्माबद्दल सत्य

नवीन जन्माबद्दल सत्य “Truth about New Birth"




पार्श्वभूमी: जगात जन्मांस आलेल्या प्रत्येक माणसांना स्वर्गात जाण्याची किंवा मोक्ष मिळवण्याची एक त्रीव्र इच्छा असते आणि प्रत्येक जण आपापल्या परीने स्वर्गात जाण्याचा मार्ग शोधात असतो. त्यासाठी कोणी धर्माचा आधार घेतो, तर कोणी कर्माचा म्हणजेच चांगले कृत्यांचा आधार घेत असतो; आणि ह्या आधारांवर ते प्रत्येक जण स्वर्गात जाणार असल्याचा दावा करत असतात. पण ह्या सर्व तर्कांना काहीही आधार नाही असेहि आपण पाहतो; कारण कोणीही मनुष्य मरणानंतर स्वर्गात जाऊन परत आल्याचे आपल्या ऐकिवात नाही. त्यामुळे स्वर्गात जाण्याचा मार्ग सांगणारा असा कोणताही स्रोत उपलब्ध नाही, केवळ एक व्यक्ती सोडून. ह्या जगात असा एकच व्यक्ती आहे जो स्वतः स्वर्गांतून पृथीवर आलेला आहे आणि पुन्हा स्वर्गात वर चढलेला आहे. तो व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त; जो स्वतः परमेश्वर देव आहे. आणि तोच आपल्याला स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवू शकतो.तो मार्ग त्याने आपल्या पवित्र शास्त्र बायबल मध्ये विधीत केला आहे.  

पवित्र शास्त्रामध्ये योहानाच्या शुभवर्तमानाच्या पुस्तकातप्रभू येशू ख्रिस्ताने(जो स्वतः देव)स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळवण्याबाबत एकमेव मार्ग सुचित केला आहेतो म्हणजे "नवा जन्म" किंवा "पुनरुजीवन" “Born Again." त्याशिवाय मानुष्यांना तारण किंवा मोक्ष मिळू शकत नाही. आज आपण हा "नवा जन्म" म्हणजे नक्की काय आहे आणि तो कसा मिळवावा ते पाहू या. 

व्याख्या: एक पुनरुजीवीत ख्रिस्ती व्यक्ती किंवा नव्याने जन्मलेला ख्रिस्ती हा असा व्यक्ती आहे ज्याने त्याच्या पापांबद्दल पश्चात्ताप करून त्याच्या तारणासाठी जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळला आहे आणि परिणामी देवाच्या अखंड कुटुंबाचा एक भाग बनला आहे. शब्दशः "पुनर्जन्म" याचा अर्थ म्हणजे "वरून जन्मलेला" असा आहे.

आता हे तर उघड सत्य आहे की पुनरुजीवीत होण्यासाठी प्रथम त्या व्यक्तीचा मृत्यू होणे आवश्यक आहेमनुष्याला त्याच्या ह्या मर्त्य देहाद्वारे स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाही कारण हे शरीर अगोदरपासून पापी आहेत्याचप्रमाणे पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की पापाचे वेतन/ शेवट हे मरण आहे.  (रोमकरांस पत्र ६:२३ वाचा)

रोमकरांस पत्र ६:२३
"कारण पापाचे वेतन मरण आहेपण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे."

हे मरण म्हणजे दोन्ही शारीरिक व आत्मिक मरण होय. शारीरिक मरण म्हणजे पापद्वारे उपजलेले रोगविकार इत्यादी, ह्याने आलेले मरण; आणि आत्मिक मरण म्हणजे आत्म्याचा नाश - म्हणजेच मेल्यानंतर मनुष्याचा आत्मा स्वर्गात न जाता नरकात जाऊन तेथे न विजणाऱ्या अग्नीत त्याला आलेला मृत्यू. म्हणून प्रत्येक  मनुष्यांना  स्वर्गात जाण्यासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी प्रथम त्याच्या शरीरात असलेल्या पापांसाठी व देहस्वभावासाठी मेले पाहिजे. ज्याप्रमाणे एका बीजाला झाडात रूपांतर होऊन एक वैभवी जीवन मिळवण्यासाठी पहिले मरावे लागतेतसाच हा प्रकार आहे.

मग काय मनुष्य खरंच मेलेला आहे ?

होयपवित्र शास्त्र आपल्याला हेच सांगते.  इथे मरण पावणे म्हणजे वास्तविक शरीराचे मरणे नव्हेतर अध्यात्मिक/आत्मिक मरणे हे आहे.  (ज्याला अध्यात्मिक पतन सुद्धा म्हटलेलं जाते)ह्याबद्दलचे उत्तर आपल्याला उत्पत्तीत सापडते आणि आपण मनुष्य कसा मरण पावला (पतित झाला) हे पहिल्याने पाहू या.

मनुष्याचे अध्यात्मिक पतन / मरण कसे झाले ??

होयपवित्र शास्त्र आपल्याला हेच सांगते. उत्पतीत जेव्हा देवाने आदाम आणि हव्वा ह्या दोघांना एदेन बागेत ठेवलेतेव्हा देवाने त्यांना बागेतील दोन वेगळ्या झाडांबद्दल निर्देश दिले होतेपहिले झाड म्हणजे जीवनाचे झाड आणि दुसरे म्हणजे बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणारे झाड. त्या दोघांना देवाने जीवनाचे झाडांतून येथेच्छ फळ खाण्यास परवानगी दिली होतीपण त्या बरोबरच  बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणारे झाडांतून त्यांना फळ खाण्यास सक्त मनाई केली होतीव त्यांना अशी ताकीद दिली होती की ज्या दिवशी तुम्हे ते फळ खाल, त्याच दिवशी तुम्ही खचित मराल. दुर्दयवाने त्या दोघांनी सैतानाकडून फसून त्यांनी देवाची आज्ञा मोडून बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडांतून फळ खाल्लेच. आता सर्वाना हा प्रश्न पडतो कीदेवाने सांगितले होते कि तुम्ही ज्यादिवशी ते फळ खालत्याच देवाशी खास मरालमग ते त्या दिवशी मेले का नाहीत पण मी तुम्हांला सांगतो की देवाने सांगितल्याप्रमाणे ते त्याच दिवशी मेलेपतित झालेशरीराने नव्हे पण आत्म्याने!!!

उत्पत्ति २:१६-१७
"तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यांस एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतीलकरून वाटेल त्या झाडाचे फळ येथेच्छ खापण बऱ्यवाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नकोकारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील."

त्या आज्ञाभंगामुळे त्यांचा देवाबरोबरचा संबंध तुटला व ते पापात पडले गेले. पापांबरोबर रोग व पीडा व कष्ट मनुष्यांत शिरले. त्यांच्या देहस्वभाव हा पापी झाला. तेच पाप आदाम - हव्वा ह्यांच्यापासून वारशाने आपल्यात चालून आले. त्यामुळे जन्मजात बालकांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वच पापी गाण्यात येतात. (रोमकरांस पत्र ३:२३-२४ वाचा)

रोमकरांस पत्र ३:२३-२४
"कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेतदेवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात."

त्यामुळे आपण सर्व देवापासून फार दूर आहोत. 

उत्पत्तीत झालेल्या पहिल्या पापाबद्दल अधिक माहितीसाठी आमचा "मूळ पाप" - Original Sin हा ब्लॉग पोस्ट वाचा. 

प्रत्येक पापी मनुष्यजो पाप करतो तो "आध्यात्मिकरित्या" मेलेला किंवा मृत झालेला आहे. (इफिसकरांस पत्र २:१-२कलस्सेकरांस पत्र २:१३ वाचासत्य हे आहे की, मनुष्य आपल्या पापांमुळे व देहस्वभावामुळे देवाच्या कुटुंबाचे सदस्य होऊ शकत नाहीआणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळण्याच्या कोणताही हक्क नाही.

इफिसकरांस पत्र २:१-२
"तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेला होतांत्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होतां,"

आता तार्किकदृष्ट्या असा प्रश्न उपस्थित होतो की काय खरंच मनुष्यांना पुनरुजीवीत होणे आवश्यक आहे का ?

खरंच मनुष्यांना पुनरुजीवीत होणे आवश्यक आहे का ?

ह्या प्रश्नाचे उत्कृष्ट उत्तर म्हणजे योहान ३ :१-२१ हा उतारा आहे. ह्या उताऱ्यात प्रभु येशू ख्रिस्त आणि निकदेम ह्या दोघांमध्ये तारणाबद्दल झालेले संभाषण आहे. इथे निकदेम हा एक प्रमुख परुशी व सेंहेड्रिन सभेच्या (यहूदी सत्ताधारी आस्थापना) एक सदस्य होता. निकदेम रात्रीच्या वेळी येशूकडे काही प्रश्न घेऊन आला होता. तो येशूकडे रात्रीच्या वेळी  आला होता कारण त्यांच्या मनात यहुद्यांबद्दलची भीती ही होती. त्यावेळी येहुदी लोकं प्रभू येशू ख्रिस्ताचा द्वेष करत होते. 

पवित्र शास्त्रात ह्या ठिकाणी प्रभू येशू निकदेमला सांगतो की नव्याने जन्मल्याशिवाय कोणाही मनुष्याला देवाच्या राज्यात (म्हणजेच स्वर्गात) जाता येणार नाही.

योहान ३:३-७
"येशू त्याला म्हणालामी तुम्हांला खचित सांगतोनव्याने जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहतां येत नाही. निकदेम त्याला म्हणालाम्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल त्याला मातेच्या उदरांत दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय ? .येशूने उत्तर दिले कीमी तुम्हांला खचित खचित सांगतोपाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यांवचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहाने जन्मलेले देह व आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे."

त्यामुळेच प्रत्येक मनुष्य ज्याला सार्वकालिक / अनंत जीवनमोक्ष प्राप्त करायचे आहे,त्याचा नवा जन्म होणे / पुनरुजीवीत होणे आवश्यक आहे.


नवा जन्म कसा प्राप्त करावा ?

मनुष्याच्या नैसर्गिक जन्मासारखेच नवीन जन्माचे देखील तीन घटक आहेत - पाणीरक्त आणि आत्मा.

जेव्हा एक स्त्री एका बाळाला जन्म देते तेव्हा पहिली गोष्ट बाहेर येते ते म्हणजे पाणी, नंतर रक्त , नंतर जीवन (आत्मा). ह्याचप्रकारे नवीन जन्मात देखील याच तीन घटकांचा (पाणी, रक्त आणि आत्मा) समावेश होतो.




नवीन जन्माचे प्राप्त करण्याचे टप्पे आहेत.  ते म्हणजे

१) पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे नीतिमत्व 

२) येशूच्या रक्ताद्वारे पवित्रीकरण

३) पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा.

ह्याप्रकारे देव खरोखर एका व्यक्तीमध्ये पवित्र आत्म्याने वास करण्यापूर्वीत्या व्यक्तीला हे तीन टप्पे पार करणे आवश्यक आहेत : ते म्हणजे नीतिमत्व प्राप्तीपवित्रीकरण (किंवा शुद्धीकरण) आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. देव कधीच एका पापी मनुष्यामध्ये वास करत नाही. त्यासाठी त्या मनुष्याने त्याच्या पापांबद्दल पश्चात्ताप करून  त्यांची क्षमा मिळवून म्हणजेच नीतिमत्व प्राप्त करून स्वतःला शुद्ध केल्यानंतरच पवित्र आत्मा त्याच्यामध्ये वास करू शकतो (पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा).

करिंथकरांस पत्रात प्रेषित पौलाने एका मानवी शरीराला मातीच्या भांड्याची उपमा दिलेली आहे.

२ करिंथकरांस पत्र ४:७
"ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे,...."


तशाच एका काचेच्या भांड्यांच्या माध्यमांतून आपण एका पापी मनुष्याचे अगोदरचे जुने रूप व नवीन जन्मानंतरचे त्या माणसाचे नवे रूप खालील ग्राफिक्सच्या माध्यमांतून ह्या विषयाबरोबर पाहणार आहोत. 

खालील ग्राफिक्समध्ये एका पापी मनुष्याचे रूप दाखवले आहे. 




पहिला टप्पा - नीतिमत्व प्राप्त करणे “Justification”





एका पापी व्यक्तींच्या जीवनामध्ये देवाच्या कृपेचे पहिले कार्य म्हणजे त्याला नीतिमत्व प्रदान करणे हे आहे.

रोमकरांस पत्रात संत पौल म्हणतो की सर्वानी पाप केले आहे आणि पापी व्यक्तींना सार्वकालिक जीवन मिळण्याचा कोणताही हक्क नाही. पण येशू ख्रिस्तावर विश्वासाद्वारे आपण सर्व विनामूल्य नीतिमान ठरतोम्हणजेच येशू ख्रिस्ताने आपल्या पापांचे प्रायश्चित म्हणून त्याचे स्वतःचे रक्त अर्पण केले आणि त्याच्या या कृत्यावर विश्वास ठेवून आपल्याला नीतिमत्व प्राप्त होते . (रोमकरांस पत्र ३: २२-२४ वाचा)

रोमकरांस पत्र ३:२२-२४
"हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहेत्यात भेदभाव नाही. कारण सर्वानी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेतदेवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात."

ह्याचाच अर्थ परमेश्वर देव येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आपल्याला विनामूल्य नीतिमान ठरवतो. आपण जेव्हा पापी असल्याची कबुली देतो व त्या पापांसाठी पश्चात्ताप करून येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करून आणि त्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतो; तेव्हा देव आपल्याला निरपराध / नीतिमान ठरवितो. आपल्या पुत्राच्या (येशू ख्रिस्ताच्या) रक्ताद्वारे देव आपल्या पापांकडे दुर्लक्ष करून आपल्याला तारण व सैतानाच्या प्रभाव व शक्तीपासून सुटका देतो. तो आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवतो व सुवार्तेद्वारे नीतिमत्वाचे दान स्वीकारण्यास सांगतो.


बाप्तिस्म्याचा खरा अर्थ

बाप्तिस्मा जो एक बाहेरील विधी आहे तो हे प्रतीत करतो कीमनुष्य येशू ख्रिस्तामध्ये पापांसाठी पश्चाताप करून मरतो आणि येशू ख्रिस्तामध्ये पुनरुस्थित होतो.  (कलस्सेकरांस पत्र २:१२ वाचा) इथे मरणे म्हणजे वास्तविक मरणे नव्हेतर स्वत्व:ला / पापी देहस्वभावाला मारणे किंवा स्वतःच्या देहस्वभावाचा त्याग करणे. (गलतीकरांस पत्र ५:२४ वाचाबाप्तिस्मा हा विधी मनुष्याच्या आंत देवाचे कृपेचे काम पूर्ण झालेले आहे, ह्याची बाहेरील कबुली आहे.


कलस्सेकरांस पत्र २:१२
"तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेलाआणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविलेही गेला;"

गलतीकरांस पत्र ५:२४
"जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे."

परंतु इथे लक्ष्यात घेण्यासारखी महत्वाचे गोष्ट ही आहे कीबाप्तिस्मा घेण्याअगोदर मनुष्यांना आपल्या पापांसाठी पश्चाताप करणे आवश्यक आहे.

पश्चाताप करणे ह्याचा अर्थ म्हणजे; एका पापी मनुष्याला आपल्या पापांची जाणीव होऊन त्याने आपल्या पापांबद्दल दुःख / खेद व्यक्त करून पापांपासून परावृत्त होणे / पापाचा मार्ग सोडून देणे.

म्हणजेच नीतिमत्व प्राप्त करण्यासाठी देवाच्या वचनांवर विश्वास ठेवून आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेणे हे आवश्यक आहे. (रोमकरांस पत्र १०:९-१० वाचाप्रेषितांचे कृत्ये ह्या पुस्तकामध्ये प्रेषित पेत्र तारणाबद्दल हेच सांगतो. (प्रेषितांचे कृत्ये २:३८ वाचा) येशूच्या नावाने पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे मनुष्य हे प्रतीत करतो कीत्या क्षणापासून तो पापाला मेला आहे आणि त्यानंतरचे त्याचे जीवन हे त्याने येशू ख्रिस्तासाठी जगण्याचे ठरवले आहे.

प्रेषितांचे कृत्ये २:३८
"पेत्र त्यांना म्हणालापश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्ह्णून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्याम्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.”

रोमकरांस पत्र १०:९-१०

की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणात विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते."


दुसरा टप्पा - पवित्रीकरण (शुद्धीकरण) “Sanctification”







एका पापी व्यक्तींच्या जीवनामध्ये देवाच्या कृपेचे दुसरे कार्य म्हणजे त्याचे पवित्रीकरण हे आहे.

पवित्रीकरण ही तारणासाठी अशी एक कृपा आहे, जिच्या द्वारे पश्चाताप केल्यानंतर पापी व्यक्तीचे शरीररुपी भांडे पूर्वी केलेल्या पापांपासून शुद्ध केले जाते व हे त्याचे जीवन देवाच्या कार्यासाठी वेगळे केले जाते. (२ थेस्सलनीकाकरांस पत्र २:१३रोमकरांस पत्र ६:२२ १ थेस्सलनीकाकरांस पत्र ४:३-४ वाचाकारण प्रेषित पौल त्याच्या इब्रीकरांस पत्रात लिहितो कीकोणाही मनुष्याला त्याने त्याचे शरीर शुद्ध केल्याशिवाय देवाला पाहता येत नाही. म्हणजेच शुद्ध झाल्याशिवाय मनुष्याला पवित्र आत्मा मिळू शकत नाही. (इब्रीकरांस पत्र १२:१४ वाचा)

२ थेस्सलनीकाकरांस पत्र २:१३
"बंधुजनहोप्रभूच्या प्रियजनांनोतुम्हांविषयी आम्ही देवाची उपकारस्तुति नेहमी केली पाहिजेकारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;"

रोमकरांस पत्र ६:२२
"परंतु तुम्हांला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हांला मिळत आहेत्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे."

१ थेस्सलनीकाकरांस पत्र ४:३,,,
"कारण देवाची इच्छा ही आहे कीतुमचे पवित्रीकरण व्हावे,.......तर पवित्रतेने व अब्रूचे तुम्हांतील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. …….देवाला न ओळ्खणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हेतर पवित्रतेने व अब्रूने तुम्हांतील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.....कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे."

इब्रीकरांस पत्र १२:१४ वाचा

"सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्यांवाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा;"

पवित्रीकरणात तो व्यक्ती स्वतःस झाडून स्वच्छ करून सजविल्याचा अनुभव करतो. त्याच्यातील सर्व वाईट सवयी आणि दुर्गुण हळूहळू काढून घेतले जात असल्याचा अनुभव त्या व्यक्तीस घडतो व त्याचे मन पवित्र आत्म्याने पवित्र जीवनाच्या दिशेने वळू लागते. पापाचे मूळ (जे पूर्वीपासून मनुष्यांत वास्तव्य करून होते व जे मनुष्याला पाप करण्यास पुन्हा पुन्हा परावृत्त करत असते ) बाहेर  टाकले जाते. 

पवित्रीकरण म्हणजेच एकवेळा पापापासून शुद्ध झाल्यावर पुन्हा पुन्हा तेच पाप न करणे किंवा त्या पापापासून दूर पाळणे हे होय. आपल्या देहांत असलेले पापी देहस्वभाव व देहाची कर्मांना ठार मारणे किंवा नष्ट करणे. कारण ही कर्मे जर मनुष्यांत असली तर त्या मनुष्याला नवीन जन्म (किंवा स्वर्गात प्रवेश) मिळणार नाही. (गलतीकरांस पत्र ५:१९-२३कलस्सैकरांस पत्र ३:५ वाचा)

गलतीकरांस पत्र ५:१९-२३
"देहाची कर्मे तर उघड आहेतती ही: जारकर्मअशुद्धपणाकामातूरपणामूर्तीपूजाचटकेवैरकलहमत्सररागतटफुटीपक्षभेदहेवादारूबाजीरंगेलपणा आणि अशा इतर गोष्टीह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो कीअशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही."

कलस्सैकरांस पत्र ३:५७-१०
"तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्मअमंगळपणाकामवासनाकुवासनाव लोभ -ह्याला मूर्तिपूजा म्हणावे-हे जीवे मारात्यामुळे देवाचा कोप होतो…तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगात होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होतापरंतु आता क्रोधसंतापदुष्टपणनिंदाव मुखाने शिवीगाळ करणेही सर्व आपणांपासून दूर कराएकमेकांशी लबाडी करू नका: कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे; आणि जो नवा मनुष्यआपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरुपप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहेत्याला तुम्ही धारण केला आहे." 


पवित्रीकरण म्हणजेच आपल्यामध्ये असलेला तो जुना पापी आत्मा (जो उत्पत्ती पासून मनुष्य मात्रांमध्ये चालत आलेला आहे) तो काढून नवा आत्मा धारण कारणे हे होय. (यहेज्केल ३६:२६,  यहेज्केल  ११:१९ वाचा)

यहेज्केल ३६:२६
"मी तुम्हांला नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहांतून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हांला मांसमय हृदय देईन. " "

यहेज्केल  ११:१९
मी त्यांना एकच हृदय देईन, तुमच्यात नवीन आत्मा घालीन; मी त्यांच्या देहांतून पाषाणहृदय काढून टाकून त्यांना मांसमय हृदय देईन. " 

सारांश: थोडक्यात पवित्रीकरण हा एक संपूर्णपणे आश्चर्यकारक अनुभव आहे, जो मनुष्यात नवा आत्मा उत्पन्न करून त्यांच्यात नेहमी शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्याची इच्छा निर्माण करतो व त्यातून पापाची भावना संपूर्णपणे  काढून टाकतो


तिसरा टप्पा - पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा “Baptism of Holy Spirit”




एका पापी व्यक्तींच्या जीवनामध्ये देवाच्या कृपेचे तिसरे आणि शेवटचे कार्य म्हणजे त्याचा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हे आहे.

प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गरोहांच्या वेळी तेथे उपस्थित शिष्यांना व लोकांना म्हणाला की, तो पवित्र आत्मा येण्याची वाट पाहा आणि तो आला की तुम्हांस सामर्थ्य प्राप्त होईल, (जे सामर्थ्य येशू ख्रिस्तात होते) आणि तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. (प्रेषितांचे कृत्ये १:८ वाचा) म्हणजेच हा बाप्तिस्म्या तर सामर्थ्याचा बाप्तिस्मा आहेज्याद्वारे देवाचे सामर्थ्य त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांवर उतरते.

प्रेषितांचे कृत्ये १:८
"परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल,.....व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल."

हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मा म्हणजे खुद्द परमेश्वर देव आत्मारूपाने मनुष्यांत वस्ती करणे. पण देव शुद्ध असल्यामुळे अशुद्धतेत राहत नाहीम्हणून मनुष्याना अगोदरच्या दोन टप्प्यांतून (म्हणजेच नीतिमत्व व शुद्धीकरण) जाणे अत्यावश्यक आहे. ज्यावेळी मनुष्य शुद्ध होतोत्यावेळी त्याचा देह हा जिवंत देवाचे मंदिर म्हणून जाणले जाते (रोमकरांस पत्र ६:१९ वाचा)ज्यात खुद्द देव आत्मारूपाने उतरून आपले कार्य करतो.  त्यावेळेपासून देव त्या शरीराचा मालक होतो. म्हणून जेव्हा हा आत्मा मनुष्यांवर उतरतोतेव्हा तो मनुष्य देखील देवासारखे महत्कृत्येंचमत्कारआरोग्यदान इत्यादी ..कार्य करण्यास समर्थ होतो. (मार्क १६:१७-१८ वाचा)

रोमकरांस पत्र ६:१९
"तुमचे शरीरतुम्हांमध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांस ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही;"

मार्क १६: १७-१८
"आणि विश्वास धारणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील: ते माझ्या नावाने भुते काढतीलनव्यानव्या भाषा बोलतीलसर्प उचलतीलव कोणत्याही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाहीत्यांनी दुखणाइतांवरहात ठेवले म्हणजे ते बरे होतील."

हा पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना सत्याचा मार्गदर्शक पण आहे, जो त्यांना तारणापर्यंत घेऊन जातो (योहान १६:१३ वाचा) व त्यांना त्यांच्या सर्व शत्रूंच्या सामर्थ्यावर अधिकार देतो(मार्क १६: १७-१८ वाचा)

योहान १६:१३
"तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल;"

हा पवित्र आत्मा मनुष्यांना जगावर (म्हणजेच त्यांच्या जगीक वृत्ती व देहस्वभाव)स्वतःवर व सैतानावर विजय व अधिकार देतो. (रोमकरांस पत्र ८:१-२ वाचा



रोमकरांस पत्र ८:१-२

"म्हणून ख्रिस्त येशुमध्ये असलेल्याना दंडाज्ञा नाहीच. कारण ख्रिस्त येशुमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियमत्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे."

हा पवित्र आत्मा देवाचा असल्यामुलेतो मनुष्य त्याचे आधीचे वाईट गुण व स्वभाव दूर करून, देवाचे गुण व स्वभाव प्रकट करू लागतो; आणि तुम्हाला देवाचे गुण (म्हणजेच येशूचे गुण) माहित आहेतच. (गलतीकरांस पत्र ५:२२-२३ वाचा) थोडक्यात म्हणजे तो मनुष्य खुद्द देवाला पृथ्वीवर प्रतिबिंबित करु लागतो.


गलतीकरांस पत्र ५:२२-२३
"आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळप्रीतीआनंदशांतीसहनशीलताममताचांगुलपणा,विश्वासूपणासौम्यताइंद्रियदमन हे आहेअशाविरुद्ध नियमशास्र नाही."

शेवटी हा आत्मा म्हणजेच तारणाचा शिक्का विसार किल्ली आहेज्याद्वारेच केवळ मनुष्यांस स्वर्गात प्रवेश मिळवू शकतो. (इफिसकरांस पत्र १:१३-१४२ करिंथकरांस पत्र ५:५ वाचा) प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मनुष्यांना स्वर्गीय राज्याचे वतन देण्याचे देवाने अभिवचन दिले आहे. त्या वतनाचा एक भाग म्हणून पवित्र आत्मा हा विसार (Token) म्हणून देण्यात आला आहे. त्या विसाराशिवाय मनुष्यांना स्वर्गात प्रवेश मिळविता येणार नाही.

इफिसकरांस पत्र १:१४
देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून ......खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे.

नव्या मनुष्याचे जीवितक्रम

नवा मनुष्याचे जीवितक्रमाबद्दल प्रेषित पौलाने इफिसकरांस पत्रात सविस्तरपणे लिहिलेले आहे. (इफिसकरांस पत्र ४:१७-३१ वाचा)

इफिसकरांस पत्र ४:२३-२४
"आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावेआणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश (देवासमान) निर्माण केलेला मनुष्य धारण करावा."


हा नवा मनुष्य पावित्र्य व नीतिमत्व ह्यांनी युक्त असून त्याचे शरीर हे देवा समान आहे असे शास्त्र आपल्याला सांगते.





प्रत्येक खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला नवीन जन्म प्राप्त करण्यासाठी या वरील तीन टप्प्यांतून जाणे क्रम:प्राप्त आहे. नव्याने जन्मलेला / पुनरुजीवित ख्रिस्ती व्यक्तीलाच स्वर्गात प्रवेश / मोक्ष मिळू शकतो.


सारांश: मनुष्यांच्या मुक्तीसाठी परमेश्वराने नवीन जन्म हा एकमेव मार्ग योजिलेला आहे. मनुष्यांना तारण किंवा मुक्ती मिळवून स्वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी प्रथम स्वतःच्या पापापासून दूर होणे (नीतिमत्व प्राप्ती)स्वतःला शुद्ध करणे व पापांवर जय मिळवणे (पवित्रीकरण) आणि पवित्र आत्मा मिळवणे (पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा) ह्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. त्याशिवाय त्याला स्वर्गात प्रवेश / मोक्ष मिळू शकत नाही. 
नवा जन्म प्राप्त केल्यानंतर मिळणारा पवित्र आत्मा (जो खुद्द देवाचा आत्मा आहे) हाच मनुष्यांसाठी  स्वर्गात जाण्याची किल्ली आणि मार्गदर्शक आहे.


सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.


Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                                

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक