Thursday, 8 February 2018

Christian Gospel - What are Old and New Testaments in Bible ? - बायबलमधील जुना आणि नवीन करार हे दोन भाग म्हणजे नक्की काय आहेत ?

बायबलमधील जुना आणि नवीन करार हे दोन भाग म्हणजे नक्की काय आहेत ?

पार्श्वभूमी: बायबल हे जरी एकसंघ पुस्तक असले तरी त्यात जुना आणि नवीन करार हे दोन भाग आहेत असे आपण पाहतो. हे दोन भाग नक्की काय आहेत ? त्यांचे विभागणीचे प्रयोजन काय आहे ? त्यांना 'करार' म्हणून काय संबोधले गेले आहे ? आणि जर ते खरोखर करार असतील तर ते करार कोणामध्ये झालेले आहेत ? असे अनेक प्रश्न बायबल वाचणाऱ्या सर्व माणसांमध्ये उपस्थित होणे सहाजिक आहे. या अशा सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण ह्या ब्लॉगमध्ये करणार आहोत.

एक 'करार' ज्याला इंग्रेज़ीत 'Covenant' किंवा 'Agreement' म्हटले जाते हे दोन वेगवेगळ्या व्यक्ती, संस्था इत्यादी मधील झालेला विशेष मुद्यांवर झालेला समेट किंवा कोणत्यातरी गोष्टींबद्दल झालेले एकमत आहे.

प्रत्येक करारात दोन किंवा तीन किंवा अधिक असे भिन्न बाजू किंवा व्यक्ती किंवा संस्था असू शकतात. ह्या भिन्न व्यक्तींमध्ये करार किंवा संमती घडवणारा किंवा त्या दोन बाजूना जोडणारा एक दुवा असा कोणी एक किंवा अधिक व्यक्ती असतात ज्याला 'मध्यस्थ' म्हणून संबोधले जाते. ह्या मध्यस्ताच्या साक्षीने कोणताही करार केला जातो, किंवा त्या कराराचा तो मध्यस्थ एकमेव साक्षी असतो.

त्याचप्रमाणे कोणताही करारामध्ये दोन्ही व्यक्तींकडून विशेष अशा कृती, देवणघेवण अपेक्षित असतात, ज्या करण्यासाठी ते त्या कराराप्रमाणे बांधील असतात. जर त्यामधील एका किंवा दोघां व्यक्तीने ते कृती करणे नाकारले तर तेथे त्या कराराचा भंग होतो.

बायबल मधील जुना करार म्हटलेले भागाची सुरवात हि उत्पत्ती पुस्तकापासून सुरु होऊन ती प्रभू येशूच्या जन्मापर्यंत येऊन संपते. तसेच नवीन करार म्हटलेले पुस्तकाची सुरवात हि येशूच्या जन्मापासून ते जगाच्या योहानाला झालेल्या जगाच्या शेवटाबद्दल झालेल्या प्रकटीकरण ह्यापर्यंत येऊन संपते. 


बायबलमधील ६६ अधिकृत पुस्तके

जुना करार
३४
नहूम
उत्पत्ती
३५
हबक्कूक
निर्गम
३६
सफन्या
लेवीय
३७
हाग्गय
गणना
३८
जखऱ्या
अनुवाद
३९
मलाखी
यहोशवा

नवीन करार
शास्ते
४०
मत्तयकृत शुभवर्तमान
रुथ
४१
मार्ककृत शुभवर्तमान
१ शमुवेल
४२
लुककृत शुभवर्तमान
१०
२ शमुवेल
४३
योहानकृत शुभवर्तमान
११
१ राजे
४४
प्रेषितांचे कृत्ये
१२
२ राजे
४५
रोमकरांस पत्र
१३
१ इतिहास
४६
१ करिंथकरांस पत्र
१४
२ इतिहास
४७
२ करिंथकरांस पत्र
१५
एज्रा
४८
गलतीकरांस पत्र
१६
नेहम्या
४९
इफिसकरांस पत्र
१७
एस्तेर
५०
फिलिप्पैकरांस पत्र
१८
इयोब
५१
१ थेस्सलनीकाकरांस पत्र
१९
स्त्रोत्रसंहिता
५२
२ थेस्सलनीकाकरांस पत्र
२०
नीतीसूत्रे
५३
तिमथ्याला पहिले पत्र
२१
उपदेशक
५४
तिमथ्याला दुसरे पत्र
२२
गीतरत्न
५५
तीताला पत्र
२३
यशया
५६
फिलेमोनाला पत्र
२४
यिर्मया
५७
इब्रीलोकांस पत्र
२५
विलापगीत
५८
याकोबाचे पत्र
२६
यहेज्केल
५९
पेत्राचे पहिले पत्र
२७
दानिएल
६०
पेत्राचे दुसरे  पत्र
२८
होशेय
६१
पेत्राचे तिसरे पत्र
२९
योएल
६२
योहानाचे पहिले पत्र
३०
अमोस
६३
योहानाचे दुसरे  पत्र
३१
ओबद्या
६४
योहानाचे तिसरे पत्र
३२
योना
६५
याहुदाचे पत्र
३३
मीखा
६६
योहानाला झालेले प्रकटीकरण

जुना करार हा पहिल्याने केलेला एक करार होता. परंतु काही कारणास्तव ह्या करारानंतर दुसरा एक करार करण्यात आला; ह्या नव्याने केलेल्या कराराच्या तुलनेत तो आधीचा करार हा "जुना" म्हणून संबोधला गेला. तसेच नव्याने केलेल्या कराराला "नवीन" करार म्हणून संबोधण्यात आले.

जुना करार

उत्पत्तीत परमेश्वर देवाने मनुष्याची निर्मिती केली ज्यांना देवाने आपली मुले असे आपल्या प्रतिरुपाचे असं निर्माण केले. परमेश्वराला मनुष्यांबरोबर सह्भागीता करण्यात फार आनंद होत असे, म्हणून तो रोज संध्याकाळी मनुष्यांशी येदेन बागेत भेट घेत असे. (उत्पत्ती)

परंतु देवाची मुले अशा मनुष्यांकडून येदेन बागेत आज्ञाभंगाचे पाप घडल्यामुळे परमेश्वर देव आणि हया पापामुळे मनुष्य हा पापी व पर्यायाने शापीत असा झाला. त्यामुळे देव आणि मनुष्यांमधला असलेला संबंध / सह्भागीता तुटली गेली.  ह्याचे कारण असे कि परमेश्वर देव हा अतिपवित्र आहे आणि मनुष्य हा पापामुळे अपवित्र/ शापीत झाला होता; त्यामुळे त्यांची एकवाक्यता होऊ शकत नव्हती. कालांतराने देवाबरोबरची हि सह्भागीता तुटल्यामुळे मनुष्यावर शाप, दुःख, रोग आणि पर्यायने मृत्यू हि लादली गेली. कारण कोणत्याही पापाचे वेतन हे मरण आहे.

देवाच्या सह्भागीताविना मनुष्याचे जीवन हे दिशाहीन आणि कष्टमय होऊन बसले. ह्यासाठी त्याला गरज होती म्हणजे देवाबरोबरचा तुटलेला संबंध पुन्हा जोडण्याची. परंतु मनुष्य आपणहुन देवाबरोबर संबंध पुन्हा स्थापित करण्यास पात्र नव्हता. परमेश्वर देवहि मनुष्यांबरोबर सह्भागीता करण्यासाठी तळमळत होता. परंतु त्यासाठी मनुष्याला पुन्हा पवित्र होणे गरजेचे होते. परंतु पापात पुरेपूर भरकटलेला मनुष्य पूर्णपणे पवित्र होणे शक्य नव्हते. देवही मनुष्याची हि अडचण जाणून होता. तेव्हा त्याला मनुष्याची फार दया आली व त्याने मनुष्यांना ह्या मूलभूत समस्येविषयी साहाय्य करण्याचे ठरविले. त्याने मनुष्यांसाठी एक किमान पवित्रतेचा एक निकष ठरविला. तो म्हणजे देवाबरोबर सह्भागीतेसाठी मनुष्याला एक किमान पवित्रतेत असणे गरजेचे आहे. ती किमान पवित्रता राखण्यासाठी त्याने मनुष्याना 'दहा आज्ञा' दिल्या. परमेश्वराने मनुष्यांबरोबर 'सह्भागीता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी' हा करार केला; आणि हा करार त्यांने आपल्या निवडलेल्या इस्राएल लोकांबरोबर केला.

इस्राएल लोक मिसरांतून वचनदत्त प्रदेश म्हणजेच कनान ह्याकडे रानांतून निर्गमन करत असताना परमेश्वराने हा करार घडवून आणला. ह्या कराराचा मध्यस्थ 'मोशे' संदेस्था हा होता. ह्या कराराच्या वेळी परमेश्वर देव स्वतः सिनाय पर्वतावर उतरला जे हा करार घटित करण्यात आला. ह्या कराराच्या अपेक्षा म्हणून बांधील कृती म्हणून 'दहा आज्ञा' देण्यात आल्या. ह्याप्रमाणे त्या दहा आज्ञा पळणाऱ्याला प्रमेश्वराकडून आशीर्वाद मिळेल व ते न पाळणार्यांना प्रमेश्वराकडून शाप असे ह्या कराराचा मसुदा किंवा गाभा आहे. (अनुवाद २८ वाचा)

थोडक्यात म्हणजेच ह्या करारात इस्राएल लोकं देवाच्या आज्ञा व त्याने दिलेल्या नियमशास्र पाळण्यास बांधील होते; त्याबदल्यात देव त्यांना संरक्षण व आशीर्वाद देण्यास बांधील होता.

तसेच ह्या करारानुसार पापक्षमा मिळवण्यासाठी देवाने काही अटी व शर्ती ठेवल्या होत्या. त्या करारानुसार प्रत्येक मनुष्याला आपल्या पापांबद्दल प्रायश्चित म्हणून वर्षांतून एकदा एक निर्दोष कोकरायचे रक्त अर्पण करणे आवश्यक होते. त्या कोकऱ्याचे रक्त मनुष्याचे पाप पूर्णपणे पुसून साफ करत नव्हते; तर केवळ त्यांचे पाप झाकत होते. म्हणजे मूळ पाप तसेच राहत होते; परंतु झाकल्यामुले ते दिसत नसे. (मनुष्याचे पाप संपूर्णपणे पुसून साफ करण्यास एका निष्कलंक व निर्दोष मनुष्याचे अर्पण आवश्यक होते. परंतु त्यावेळी कोणीही मनुष्य निर्दोष उपलब्ध नव्हता; म्हणून हे अर्पण शक्य नव्हते.) मनुष्यांच्या पापांबद्दल अर्पिले जाणारे हे रक्त  म्हणजेच "कोकऱ्याचे रक्त" ह्यावर हा जुना करार प्रस्थापित केला गेला आहे.

तसेच परमेश्वराच्या आज्ञा व त्याचे विधी पाळणारे सर्व मनुष्य परमेश्वराचे सेवक म्हणून गणले जात होते.
परंतु ह्या काराराप्रमाने मनुष्याला आदामाबरोबर देवाची सह्भागीता होती तशी मुक्त व थेट सह्भागीतेची मुभा नव्हती. तसेच मनुष्यातील केवळ एक मनुष्य म्हणजे 'मुख्य याजक' वर्षांतून एकदाच नेमिलेल्या वेळी देवाशी भेट घेऊ शकत होता. त्यासाठी विधी व वेळ निश्चित केलेली होती. त्यासाठी हि त्या याजकाला शुद्धतेचे कठोर विधी व नियम पाळावयाचे होते; नाहीतर जर तो याजक अपवित्र असता जर देवासमोर गेला तर तो मरून पडत असे. त्याशिवाय त्या एका याजकाशिवाय बाकीचे सर्व मनुष्य देवाच्या सह्भागीतेपासून वंचितच होते. म्हणजेच मनुष्यांना परमेश्वर देवाशी सह्भागीता करण्यासाठी एका पवित्र असेलेला याजकाची (म्हणजेच मध्यस्थाची) गरज लागत असे.

परंतु ह्या जुन्या करारात बऱ्याच त्रुटी होत्या. त्यात मुख्य म्हणजे ह्या करारात पाप संपूर्णपणे साफ होत नसे; तर ते केवळ झाकले जात होते. दुसरी म्हणजे हा करार केवळ पापाची जाणीव करून देत होता; परंतु पापांतून संपूर्ण मुक्ती मिळवून सार्वकालिक जीवन मिळवण्याचा मार्ग दाखवत नव्हता. कारण ते पाप तसेच झाकलेले राहत होते, संपूर्णपणे नष्ट होत नव्हते. त्यामुळे बहुतेक मनुष्य नियमशास्र पाळण्यास असमर्थ ठरल्याने त्यांचा शेवट पापांतून उद्धभवलेल्या मृत्यूत होत असे. तिसरी त्रुटी म्हणजे हा करार मनुष्याचा देवाबरोबर थेट संबंध स्थापित नव्हता. (कारण त्यासाठी त्यांना एका याजकाची गरज लागत असे) आणि चौथी त्रुटी म्हणजे हा करार केवळ देवाने निवडलेल्या इस्राएल लोकांना लागू होता; त्यामुळे जगातील इस्राएल व्यतिरिक्त इतर मनुष्य जाती, वंश, कुळे हे सर्व ह्या कारारापासून वंचित होते आणि पर्यायाने देवापासून संपूर्णपणे अज्ञानी होते.

जुन्या करारातील ह्या वरील सर्व त्रुटी भरून काढण्यासाठी परमेश्वर देवाने मनुष्यांबरोबर दुसरा म्हणजेच "नवीन" करार प्रस्थापित करण्याचे ठरविले. (इब्रीकरांस पत्र ८:७ वाचा) 

इब्रीकरांस पत्र ८:७

" कारण तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता."

महत्वाचे म्हणजे जुना करार अद्याप अंमलात असताना देवाने नवीन करार प्रस्थापित होण्याचे भाकीत केले होते; ते म्हणजे जुन्या करारातील संदेष्टे मोशे, यिर्मया आणि यहेज्केल या सर्वांनी आपल्या संदेशात नवीन कराराच्या सर्व गोष्टींकडे निर्देषित केले होते. तसे पाहिले तर, जुना करार हा तात्पुरता दिलेला करार होता; नवीन करार हाच मूळ व खरा करार होता व आहे.

नवीन करार

हा नवीन करार म्हणजे परमेश्वर देवाने मनुष्यमात्रांना दिलेले एक वचन आहे की तो सर्व मनुष्यांचे पापांची क्षमा करील आणि ज्यांचे अंतःकरण त्याच्याकडे वळतील अशा सर्व लोकांशी तो सह्भागीता पुनरप्रस्थापित करेल. तसेच प्रभू येशू ख्रिस्त हा ह्या नवीन कराराचा मध्यस्थ आहे, आणि त्याचा वधस्तंभावरचे अर्पण हे ह्या कराराचे प्रमाण म्हणून दिलेले आहे. (लूक २२:२० वाचा ).

लूक २२:२०

"त्याप्रमाणे भोजन झाल्यावर  त्याने प्याला घेऊन म्हटले, "हा प्याला माझ्या 'रक्तात' नवा 'करार' आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे."

नवीन करार मूलतः इस्रायलला दिला गेला होता आणि त्यात फलदायीपणा, आशीर्वाद आणि वाचनदत्त देशातील शांततापूर्ण अस्तित्व असलेला अभिवचन सामाविष्ट आहे. यहेज्केल 36: 28-30 मध्ये देव म्हणतो, "मग मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या देशात तुम्ही राहाल; तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईल; . . . मी धान्य पिकताच पण तुझ्या तोंडावर थुंकोणी करीत नाही. मी तुमच्या फळबागा आणि शेतात द्राक्षे झालो पाहीन आणि द्राक्षारस व द्राक्षमळे याचा नाश केला जाईल." ह्या पवित्र शास्त्रातील संदर्भावरून हा नवा करार इस्राएल लोकांसाठी देण्यात आला होता स्पष्ट होते. कालांतराने ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर, विदेशींना नवीन कराराच्या आशीर्वादात आणले गेले. 

ह्या नवीन करारामध्ये जुन्या करारात असलेली मुख्य त्रुटी म्हणजेच 'मनुष्यांची संपूर्ण पापक्षमेची गरज' पूर्ण केली गेली आहे. कारण जुन्या करारात अर्पण केले जात असलेले त्या बैलांचे व कोकऱ्याचे रक्त मनुष्याचे पाप पूर्णपणे पुसून साफ करत नव्हते; तर केवळ त्यांचे पाप झाकत होते. म्हणजे मूळ पाप तसेच राहत होते. (इब्रीकरांस पत्र १०:४ वाचा)

इब्रीकरांस पत्र १०:४
"कारण बैलांचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून तो (म्हणजे येशू) जगात येते वेळेस म्हणला, ' यज्ञ व अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हतीतू माझ्यासाठी शरीर तयार केले;"

मनुष्याचे पाप संपूर्णपणे पुसून साफ करण्यास एका निष्कलंक व निर्दोष मनुष्याचे अर्पण आवश्यक होते. परंतु त्यावेळी कोणीही मनुष्य निर्दोष उपलब्ध नव्हता; कारण पाप / देहवासनेंतून जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा पापी असा गणला गेला आहे. ह्याचा संबंध मूळ पाप जे आदाम हव्वाने केले, त्याच्याशी आहे.

मूळ पाप काय आहे ह्यावर सविस्तर माहितीसाठी आमचा 'मूळ पाप' The Original Sin हा आमचा लेख वाचा.

ही निर्दोष निष्कलंक मनुष्याची गरज येशू ख्रिस्ताने भरून काढली. येशू ख्रिस्ताचा जन्म हा कोणाही मनुष्य / देहवासनेतून झाला नव्हता; तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झाला होता. त्यामुळे त्यावर मूळ पापाचा दोष नसून तो निष्कलंक होता.


रोमकरांस पत्र ५:-

"परंतु देव अपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो कीआपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावलातर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेषकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहो."


मत्तय २६:२८
"हे माझे (नव्या) 'कराराचे रक्तआहेहे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे."

म्हणून देव स्वतः येशूच्या रुपाने तो निष्कलंक 'कोकरा' बनून आला आणि त्याने संपूर्ण मानवजातीसाठी स्वतःचे रक्त त्या काळावरीच्या वधस्तंभावर अर्पण केले. त्याचे रक्त हे पवित्र रक्त मानवजातीचे पाप झाकत नाही तर संपुर्णपणे पुसून साफ करण्यास समर्थ आहे; म्हणून त्याला पाहून बाप्तिसमा करणारा योहानाने साक्ष दिली कि "हा पहा जगाची पापे हरण करणारा देवाचा कोकरा." (योहान १ :२९ वाचा)


योहान १ :२९
"दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, "हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!"

त्याच्या ह्या अर्पणाने त्याने सर्व मानुष्यांसाठी पूर्ण पापक्षमेचा मार्ग उपलब्ध करून दिला. येशू ख्रिस्ताने हे अर्पण करून संपुर्ण मानवजातीसाठी एकदाचेच प्रायश्चित केले आहे; म्हणजेच जुन्या कराराप्रमाणे मनुष्याना प्रत्येक वर्षी नवे अर्पण करण्याची आता गरज राहिली नाही. म्हणून नवीन करारात कोणाही मनुष्याला कोणताही कोकरा किंवा अजून काहीही अर्पण करण्याची गरज नाही. 

१ योहान १:
"पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहेआणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करिते."


इब्रीकरांस पत्र ९:२८

"त्याअर्थी ख्रिस्त 'पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठीएकदांच अर्पिला गेला,”

इब्रीकरांस पत्र ९:२२
"नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होतेआणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही."

प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्याअर्पणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मनुष्याला पापक्षमेचे दान फुकट मिळते. 


रोमकरांस पत्र ३:२२
"हे देवाचे नितीमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहेत्यांत भेदभाव नाही."

फक्त त्यासाठी त्या मनुष्याला आपण केलेल्या पापांबद्दल पाश्चयातप करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिसमा घेण्याची गरज आहे. म्हणजेच नवीन कराराने मनुष्यांना संपुर्ण पापक्षमेचा मार्ग उघडून दिला; जो जुन्या करारात उपलब्ध नव्हता.

जगातील मनुष्यांना पापक्षमा केवळ येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तानेंच मिळते ह्यावर अधिक माहितीसाठी  पापक्षमा: केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच मिळते. Remission of sin: Only by Blood of Lord Jesus Christ. हा आमचा लेख वाचा.

नवीन काराराराचे दुसरी महत्वाचे गोष्ट म्हणजे 'सार्वकालिक जीवन'. जुन्या करारात आज्ञा पाळणार्यांना सार्वकालिक जीवयाविषयी कुठलेच अभिवचन देण्यात आले नव्हते; त्यांना केवळ शारीरिक आशीर्वाद आणि भौतिक वतन देण्याचे अभिवचन परमेश्वराने दिले होते. पण नवीन करारात मात्र सार्वकालिक जीवनाची तरतूद केली गेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वाना पापक्षमेबरोबर  सार्वकालिक जीवनाचे दान देण्याचे अभिवचन देण्यात आले आहे.

तिसरी आणि ह्या नवीन कारारामधली सर्वात महत्वाची तरतूद म्हणजे 'देव आणि मनुष्य ह्यांमध्ये समेट घडून त्यांच्यातील सहभागीता पुन्हा पुनर्स्थापित होणे'.  (इफिसकरांस पत्र २:१३-१६ वाचा)

इफिसकरांस पत्र  २:१३-१६

परंतु जे तुम्ही पूर्वी 'दूरहोता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या रक्ताच्या योगे 'जवळचेझाला आहा. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहेत्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पडलीत्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्रह्यासाठी कीस्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावीआणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्यांच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा ; ....कारण त्याच्याद्वारे (म्हणजे येशूच्या) आत्म्याच्या योगे आपणां उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. "

जो कोणी मनुष्य प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपले पाप कबूल करून प्रभू येशूच्या नावाने बाप्तिसमा घेईल, त्याला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हा पवित्र आत्मा म्हणजे खुद्द परमेश्वराचा आत्मा. हा तोच आत्मा आहे जो येशू ख्रिस्तामध्ये होता. हा आत्मा मिळणारा व्यक्ती आपोआप देवाच्या सह्भागीतेत सामील होतो. त्याची आणि देवाची देवाणघेवाण सुरु होते. जुन्या करारात असा पवित्र आत्मा सर्वांना देण्यात आला नव्हता. हा मार्ग केवळ येशू ख्रिस्ताने घडवून आणलेल्या देव आणि मनुष्य ह्यांच्यातील समेटाने खुला झाला.

नवीन करारातील चौथी तरतूद म्हणजे ह्या करारात परमेश्वर देवाने 'इस्राएल लोकांबरोबर परराष्ट्रीय लोक ह्यांना पण ह्या करारात सामील केले.' आपण पाहतो कि देवाने जुना करार आपल्या खास निवडलेल्या इस्राएल लोकांबरोबर केला होता. पण नवीन करारामध्ये देवाने जगातील इतर राष्ट्रे, लोकं, जाती, वंश ह्यांनाही सामील केले व त्यांनाही आपल्याबरोबर सह्भागीतेत वाटा दिला. म्हणजेच देवाने जगातील राष्ट्र रसत्रांमधील भेद नष्ट केला आणि सर्व मनुष्यांना समान दर्जा दिला. (१ योहान २:२ वाचा) 

१ योहान २:२
"आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे."

तसेच नवीन करारातील देवावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञा पळणाऱ्या लोकांना देवाने त्याचे'मुले' म्हणून संबोधले आहे. जेथे जुन्या करारात लोकांना देवाने आपले सेवक म्हणून गणले होते. जसा घरातील पुत्र एका सेवकापेक्षा अधिक प्रिय आणि श्रेष्ट असतो तसाच नवीन करारातील लोकांना जुन्या करारातील लोकांपेक्षा जास्त अधिकार, अभिवचने आणि आशीर्वाद बहाल करण्यात आले आहेत. (गलतीकरांस पत्र ४:६-७ वाचा)

गलतीकरांस पत्र ४:६-७ 
"ह्यात उद्देश हा की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात, म्हणून देवाने "अब्बा! बापा!" अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणांत पाठवले आहे."

आणखीन जुन्या करारात नियमशास्त्र आणि त्यातून होणारी दंडाज्ञा होती; परंतु नवीन करारात परमेश्वराची कृपी आली. जुन्या करारातील लोकं हि नियमशास्त्राच्या अधीन होती; पण नवीन करारातील लोकं हि नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेचा अधीन आहेत. (रोमकरांस  पत्र ६:१४ वाचा) जुन्या कराराचा मध्यस्थ मोशे ह्याच्याद्वारे नियमशास्र आले तसे नवीन करारात प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे कृपा आली.

रोमकरांस  पत्र ६:१४ 
"तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. "

शेवटी जुन्या करारातील नियमशास्त्र हे मनुष्यांना केवळ उल्लंघन किंवा पाप ह्यांची जाणीव करून देत होते; परंतु त्यावर उपाय किंवा त्या पापांतून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवत नव्हते. तेच नवीन करारात नियमशास्त्रा ऐवजी प्रमेश्वराकडून कृपा आली आणि हि कृपा मनुष्यांना पापांची जाणीव तर करून देतेच पण त्यांतून बाहेर पडून शुद्ध होण्याचा मार्ग सुचविते; त्यांना पापक्षमा मिळवून देऊन नीतिमान बनविते.

थोडक्यात म्हणजे जुन्या करारात मोशेद्वारे नियमशास्र आले व त्याबरोबर मृत्यू हा आला; परंतु नवीन करारात प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे कृपा आली व कृपेबरोबर जीवन तेही अनंत काळाचे जीवन आले. आमेन.


Difference between Old Covenant and New Covenant in Bible



सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.



Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved





                           
                                       

Search Digital सुवार्तिक