बालकांचा बाप्तिस्मा शास्त्राप्रमाणे आहे काय ?
Is Infant Baptism scriptural?
व्याख्या: ‘बाप्तिस्मा’ म्हणजे इंग्रजीत 'Baptism' शब्द मूळ ग्रीक शब्द "Baptizo" ज्याच्या अर्थ "धुणे " (To wash) ह्यांतून आला आहे.
ख्रिस्तीकरण: ख्रिस्तीकरण म्हणजे ‘ख्रिस्ती’ (Christian) होणे म्हणजे ख्रिस्ताचे अनुयायी (followers) होणे.
बाप्तिस्म्याची गरज: ख्रिस्ती तारणासाठी एक मूलभूत गरज आहे ती
म्हणजे नव्याने जन्म घेण्याचा. नव्याने जन्म घेण्याचे तीन टप्पे आहेत; ते म्हणजे मनुष्याला नीतिमत्व प्राप्त करणे, पवित्रीकरण आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. ह्या तीन टप्यांतील प्राथमिक
टप्पा, ज्यात मनुष्याला नीतिमत्व प्रदान केले जाते, त्यात मनुष्यांना पश्चाताप करून प्रभू येशूच्या नावाने “पाण्याचा
बाप्तिस्मा” घेणे क्रमप्राप्त आहे.
त्याचप्रमाणे प्रभू येशूने प्रत्येक ख्रिस्ती
व्यक्तीला लावून दिलेले असे तीन भौतिक पवित्र नियम आहेत; ह्यांपैकी 'पाण्याचा बाप्तिस्मा' हा एक आहे. हे तीन पवित्र नियम किंवा
सॅक्रामेंट हे खालील प्रमाणे आहेत:
१. सहभोजन / प्रभूच्या मेजावरील भोजन (Communion)
२. पाय धुणे Feet
Washing)
३. पाण्याचा बाप्तिस्मा (Water Baptism)
प्रभू येशू ख्रिस्त पवित्र शास्त्रात मार्क १६:१६ मध्ये आपल्याला स्पष्ट्पणे हे सुचित करतो की, बाप्तिस्मा हा पापांपासून मुक्त होऊन (म्हणजेच नीतिमत्व प्राप्त करणे) नवा जन्म प्राप्त करून
सार्वकालिक जीवन / मोक्ष प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे.
मार्क १६:१६
"जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे
तारण होईल; जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल."
पार्श्वभूमी: आज आधुनिक ख्रिस्ती लोकांमध्ये (मुख्यतः
रोमन कॅथॉलिक व काही प्रोटेस्टंट पंथीय) बाळांना त्यांच्या जन्मानंतर काही
आठवड्यामध्ये "ख्रिस्तीकरण" करतात (किंवा त्यांच्या 'बाप्तिस्मा'चा
विधी करतात). ह्या प्रथेमध्ये नवजात अर्भकाचा बाप्तिस्मा आणि नामकरण हे केले जाते. पण तुम्हांला जाणून आश्चर्य वाटेल की बालकांच्या
बाप्तिस्म्याला शास्त्रात कोणताही वैद्य आधार सापडत नाही. बायबलमध्ये कुठे ही
बालकांच्या बाप्तिस्माबद्दल उल्लेख सुद्धा नाही. पूर्वीपार ख्रिस्ती लोकांमध्ये
अशी कोणती ही प्रथा नव्हती. आज आपण ही प्रथा आणि त्याची पद्धत सुद्धा बायबलप्रमाणे
कशी नाही हे जाणून घेऊ या.
महत्वाचे म्हणजे समर्पण आणि बाप्तिस्मा ह्या
दोन वेगळ्या विधी आहेत. इथे वाचकांनी लक्ष्यात घ्यावे की, बायबलमध्ये बालकांचे समर्पण करणे सांगितले आहे, पण बालकांचा बाप्तिस्मा करणे सांगितले नाही.
येशू
ख्रिस्ताचा बाप्तिस्मा कधी झाला होता ?
येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा वयाच्या तिसाव्या वर्षी बाप्तिस्मा करणारा योहानाच्या हातून झाला होता. (मत्तय ३:१३- १७ वाचा).
कोणी म्हणेल येशूच्या जन्माच्या वेळी त्याचे बाप्तिस्मा झाला होता, तर तसे नाही.
तेव्हा त्याचे आठव्या दिवशी मंदिरात समर्पण झाले होते, बाप्तिस्मा नाही. (लूक २ :२२-२४ वाचा)
मत्तय ३:१३
"तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला".
लूक २ :२२
"पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे 'शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर' ते त्याला वर येरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे;"
मत्तय ३:१३
"तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला".
लूक २ :२२
"पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे 'शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर' ते त्याला वर येरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे;"
बाप्तिस्मा
आणि समर्पण ह्यांतील मूलभूत फरक
आता बाप्तिस्मा आणि समर्पण ह्यात फार फरक आहे. बाप्तिस्मा तो व्यक्ती
आपल्या मर्जीनुसार घेतो आणि समर्पण कोणी दुसरा व्यक्ती त्यांच्या मर्जीने करतो
(म्हणजेच आई वडील).
बालकाचे समर्पण: हा विधी म्हणजे त्या नवजात
बालकाला देवाच्या हाती सोपविणे. त्याचे रक्षण व काळजी ही देवाकडे सोपविणे.
इथे लक्ष्यात घेण्यासारखे हे आहे की समर्पण झाले म्हणून ते
बालक ख्रिस्ती होत नाही. त्यासाठी त्याला बाप्तिस्मा घेणे आवश्यक आहे.
बाप्तिस्मा विधी: ह्या विधीत एक मनुष्य आपल्या पापांसाठी मरून
आपले आयुष्य देवाला अर्पण करतो. म्हणजेच आपले आयुष्य देवासाठी व्यतीत करण्याची
कबुली देतो. आणि जेव्हा तो मनुष्य बाप्तिस्मा घेतो, तेव्हा तो येशू ख्रिस्ताला
परिधान करतो,(गलतीकरांस
पत्र ३:२७ वाचा) म्हणजेच तो मनुष्य 'ख्रिस्ती' गणला जातो.
गलतीकरांस पत्र ३:२७
"कारण तुम्हांमधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला
आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे;"
रोमन कॅथॉलिक चर्चने हे दोन्ही विधी एक
केल्यामुळे हा प्रकार अशास्त्र ठरत आहे.
बालकांचे देवाकडे समर्पण हे त्या बालकाच्या
अजाणतेत होऊ शकते. परंतु बाप्तिस्मा हा विधी त्या बालकाला किंवा प्रौढांना
स्वेच्छेने घ्यावयाचा असतो. हा ह्या दोघांतला महत्वाचा फरक आहे.
त्याचप्रमाणे बाप्तिस्मा (आणि नवीन जन्म)
झाल्याशिवाय कोणीही मनुष्य स्वतःला ‘ख्रिस्ती’ म्हणू शकत नाही.
मुळांत बाप्तिस्मा हा प्रौढांसाठी असलेला विधी
आहे. त्याला प्रभू येशू व त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवून व पाश्च्याताप
केल्यानंतरच बाप्तिस्मा घ्यावयाचा असतो; आणि त्या नंतरच तो मनुष्य 'ख्रिस्ती' किंवा ख्रिस्ताचा अनुयायी असा गणला जातो. आपले
जीवन देवाला देणे हे एक प्रौढ व्यक्तीच ठरवू शकतो; त्या बालकाचे पालक त्याच्यासाठी हा निर्णय घेऊ
शकत नाहीत. हे गोष्टी एक नवजात अर्भक करू शकत नाही आणि म्हणूनच तो बाप्तिस्मा घेऊ
शकत नाही. ते कसे ते आपण आता पाहू या.
बालक
बाप्तिस्मा प्रथा
बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला
बाप्तिस्मा घेण्याची एक विशिष्ट विधी सुचवितो. देवाचे वचन आपल्याला असे सूचविते की
बाप्तिस्मा होण्यापूर्वी 'विश्वास' असणे आवश्यक आहे. मार्क लिखित शुभवर्तमान मध्ये प्रभू येशू
म्हणतो की, तुम्ही जाऊन सर्व जगात जाऊन संपूर्ण श्रुष्टीला
सुवार्तेची घोषणा करा. जो 'विश्वास' धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो 'विश्वास' धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. (मार्क १६:१५-१६ वाचा)
मार्क १६:१५-१६ वाचा
“मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण श्रुष्टीला सुवार्तेची
घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल.”
हे वरील वचन आपल्याला हे सुचविते की वैध
बाप्तिस्मासाठी विश्वास असला पाहिजे. हा विश्वास कोणावर ? तर प्रभू येशू ख्रिस्तावर व त्याच्या
सुवार्तेवर विश्वास असला पाहिजे. विश्वास हा
सुवार्ता ऐकून ती समजण्याने येतो. आपले लहान नवजात बालक हे काहीही ऐकून समजू
शकत नाहीत. पर्यायाने विश्वास धरू शकत नाहीत. त्यामुळे बालकास बाप्तिस्मा देणे हे
अशक्य आहे.
बायबल मधील ह्या संदर्भात आणखी एक उदहरण आपण
पाहू या
प्रभू येशूच्या स्वर्गरोहणानंतर जेव्हा प्रेषित
पेत्र जेव्हा तारणाची सुवार्तेची घोषणा करतो, तेव्हा तो म्हणतो की, पश्च्याताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण
येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. (प्रेषितांचे कृत्ये २:३८ वाचा)
प्रेषितांचे कृत्ये २:३८
"पेत्र त्यांना म्हणाला, पश्च्याताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही
प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल".
हे वरील वचन असे सुचविते की, तारणासाठी बाप्तिस्मा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने, आपल्या पापांबद्दल पश्च्याताप केला पाहिजे. पण अर्भकांना
पापचे ज्ञान नसते. बालकांना पापाची जाणीव होत नसते. म्हणून जेव्हा
त्यांना पापाची जाणीवच नाही, तेथे त्यांना पाश्च्याताप करण्याचा प्रश्नच
येत नाही. आपले लहान नवजात बालक हे पश्च्याताप करू शकत नाहीत. पर्यायाने
बाप्तिस्मा ही घेऊ शकत नाहीत.
आता
कोणी म्हणेल लहान नवजात अर्भकाने कुठे पाप केले आहे ?
हो! बायबल आपल्याला तसेच सुचविते. कारण पाप हे मानवप्राण्यांच्या उत्पत्तीपासून आदाम आणि हव्वा ह्यांच्या आज्ञाभंगामुळे मनुष्यप्राण्यांमध्ये शिरले आणि त्याद्वारे ते सर्व माणसामध्ये पाप आणि पर्यायाने मरण हे शिरले. (रोमकरांस पत्र ५:१२ वाचा)
रोमकरांस पत्र ५:१२ वाचा
"एक माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे
मरण शिरले; आणि सर्वानी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये
अश्या प्रकारे मरण पसरले".
जुन्या करारामध्ये स्तोत्रकर्ता दावीद राजा
म्हणतो की मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी
आहे. (स्तोत्रासहिंता ५१:५ वाचा) हे तो फक्त त्याच्या स्वतः बद्दल म्हणत नसून
संपूर्ण मानव जातीबद्दल म्हणत आहे. प्रामाणीक ईयोबाच्या पुस्तकात ईयोब म्हणतो की
मनुष्य निष्कलंक कोठून असणार ? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार ?
(ईयोब १४:१४ वाचा)
स्तोत्रासहिंता ५१:५
“पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.”
ईयोब १४:१४
मनुष्य निष्कलंक कोठून असणार ? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार ?
ह्या वचनाचा अर्थ असा आहे की प्रत्येक
मनुष्यप्राणी जो ह्या जगात जन्मतो, तो पापी आहे. हे पाप त्यांनी केले नसून आपल्या
अध्य आई वडील (आदाम आणि हव्वा) ह्याकडून आपल्यात आले आहे. म्हणजेच बायबलप्रमाणे
नवजात बालके ही पापी गणले जातात.
आता प्रश्न असा पडतो की, जर बायबलमध्ये बालक बाप्तिस्मा नाही तर ही प्रथा कुठून
उदयास आली ? आणि ती कोणी आणली ?
बालक
बाप्तिस्मा प्रथेचा उगम
ह्या शिकवणीचा उगम व प्रसार:
इतिहासात पाहिले असता, बालक बाप्तिस्मा ह्या प्रथेचा उगम हा २ शतकाच्या सुमारास झाला. रोमन सम्राट
कॉन्स्टन्टाईन ह्यांचा कथित रूपांतर हा रोमन कॅथॉलिक चर्चसाठी एक मोठा जयोत्सव
म्हणून गणला जातो. त्यांनी 'ख्रिस्ती' हा रोमचा 'अधिकृत' धर्म म्हणून घोषित केला. ह्यानंतर 416 A.D. पारित केलेल्या पहिल्या कायद्यामध्ये अर्भकाचा
बाप्तिस्मा ह्याचाहि वटहुकूम पारित केला गेला. ह्यामुले रोममध्ये जन्मलेला
प्रत्येक बालकांचा अधिकृत रोमन धर्मगुरू यांच्या हस्ते बाप्तिस्मा होणे
क्रमप्राप्त केले गेले. ज्यांनी ह्याला नाकारले त्यांना 'यानाबाप्टिस्ट' (Anabaptists) म्हणून गाण्यात येत असे आणि त्यांचाह्या कारणांमुळे फार छळ
सुरु केला गेला. नंतर ट्रेंट जनरल परिषद, सातव्या सत्र (इ.स. १५४७) मध्ये बालक
बाप्तिस्मा ही प्रथा रोमन कॅथॉलिक चर्चची अधिकृत शिकवण म्हणून स्वीकारली गेली; जी आजवर चालू आहे.
रोमन
कॅथॉलिक चर्च प्रमाणे बालक बाप्तिस्म्याचा शास्त्रातील आधार
ही शिकवण रोमन कॅथॉलिक चर्च मधून आली ज्यामध्ये
नवजात बालकाचा बाप्तिस्मा आणि नामकरण हे केले जाते. पण कॅथॉलिक चर्च ह्या प्रथे
मागे ठोस बायबलमध्ये संधर्भ देऊ शकत नाही. ते फक्त एक कमकुवत असा संदर्भ देतात तो असा की; नवीन करारामध्ये संत पौला द्वारे तुरुंग
अधिकारी आणि त्याच्या "घराण्याने" म्हणजे घरच्या सर्व माणसांनी
बाप्तिस्मा घेतला होता. (प्रेषितांचे कृत्ये १६:२५-३४ वाचा) ह्यात कॅथॉलिक चर्च हा तर्क काढते की
"सर्व घराण्या" मध्ये नवजात बालके ही आली असतील आणि त्यांनी पण
बाप्तिस्मा घेतला असेल. हा तर्क केवळ तर्क आहे आणि ह्याने मुळात तिथे बालके होती, ज्यांचा बाप्तिस्मा झाला, असे कुठे ही प्रतीत होत
नाही. ही रोमन कॅथॉलिक चर्चची बायबल सोडून असलेले तर्कशास्त्र म्हणजेच "धर्मवचन"
(ज्याला इंग्रजी मध्ये catechism म्हटले जाते) ह्यावर आधारित आहे.
मुळांत बालक बाप्तिस्मा बालकांचे ख्रिस्तीकरण
(म्हणजे ख्रिस्ती) करू शकत नाही. कारण बायबल येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा
घेऊन त्याचे वचन पाळून त्याप्रमाणे आचरण करणाऱ्यांस "ख्रिस्ती"
म्हणते. (प्रेषितांचे कृत्ये २:३८, प्रेषितांचे कृत्ये ११:२६ वाचा )
थोडक्यात सांगायचे म्हणजेच बालक बाप्तिस्मा हा
बायबलवर आधारित नसून मनुष्याच्या तर्कशास्त्रावर आधारित आहे. आता आपण बालक
बाप्तिसीमेची पद्धत कशी बायबलप्रमाणे चुकीची आहे ते पाहू या.
बालक
बाप्तिस्मा पद्धत
बाप्तिस्मा हा विधी हा मुळात पाण्याशी निगडित
आहे. बायबल आपल्याला बाप्तिस्मा पाण्यात डुबून / बुडून घेण्यास शिकवते. पण रोमन
कॅथॉलिक चर्च आणि काही प्रोटेस्टंट पंथीय शिंपडून बाप्तिस्मा देतात, जो बायबलप्रमाणे नाही.
बाप्तिस्मा करणारा योहानाने ही लोकांना पाण्यात
बुडवून बाप्तिस्मा दिला. (मत्तय ३:१६ वाचा) ह्यात म्हटले आहे की येशू
पाण्यातून वर आला, म्हणजेच तो पाण्यात डुबला गेला होता. पुढे
प्रेषित्यांच्या कृत्यांमध्ये जेव्हा फिलिप्प हबशी षंढाला बाप्तिस्मा देतो, तेव्हा पण ते दोघे पाण्यात उतरतात असे लिहिले आहे. (प्रेषितांचे कृत्ये
८:३८ वाचा)
मत्तय ३:१६
"मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यांतून वर आला आणि पाहा, आकाश उघडले."
प्रेषितांचे कृत्ये ८:३८
"तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले; आणि फिलिप्प व षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले; आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला".
ह्या वरील वचने आपल्याला हे सुचित करतात की, बाप्तिस्मा हा पाण्यात उतरून डुबून / बुडून घ्यावा, नुसते पाणी शिंपडून नव्हे! (रोमन कॅथॉलिक पद्धत)
सारांश: ह्या वरील सर्व वचनांनी आपल्याला हे प्रतीत
होते की, बालकाचा बाप्तिस्मा हा देवापुढे आणि
शास्त्राप्रमाणे वैध नाही. मुळांत समर्पण आणि बाप्तिस्मा हे दोन वेगळे विधी आहेत. रोमन कॅथॉलिक चर्चने हे दोन्ही विधी एक केल्यामुळे हा प्रकार अशास्त्र
ठरत आहे.
बालकांचे देवाकडे समर्पण (देवाच्या हाती
सोपविणे) हे त्या बालकाच्या अजाणतेत होऊ शकते. परंतु बाप्तिस्मा हा विधी त्या
बालकाला किंवा प्रौढांना स्वेच्छेने घ्यावयाचा असतो. आपले जीवन देवाला देणे हे एक प्रौढ व्यक्तीच ठरवू शकतो; त्या बालकाचे पालक त्याच्यासाठी हा निर्णय घेऊ शकत नाहीत; आणि पर्यायाने ते त्या बालकाला बाप्तिस्मा देऊ शकत नाहीत.
त्याचप्रमाणे बाप्तिस्मा (आणि नवीन जन्म)
झाल्याशिवाय कोणीही मनुष्य स्वतःला ‘ख्रिस्ती’ म्हणू शकत नाही. बाप्तिस्म्यासाठी
येशूवर व त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवणे व आपल्या पापांसाठी पाश्च्याताप करणे
आवश्यक आहे, जे कोणत्याही नवजात अर्भकाला शक्य नाही. वर
त्याला पापाची जाणीव नसल्यामुळे तो पाश्च्याताप करू शकत नाही. ह्या कारणांमुळे
नवजात अर्भकाचा बाप्तिस्मा ह्याला शास्त्रात कोणताही अधिकृत आधार सापडत नाही.
त्याचबरोबर बायबलमध्ये बाप्तिस्मा हा पाण्यात
उतरून डुबून / बुडून घेण्यास शिकविले आहे, पाणी शिंपडून नव्हे!!!
सत्य हे आहे की, ही बालक बाप्तिस्म्याची शिकवण रोमन कॅथॉलिक चर्चने ख्रिस्ती लोकांवर
लादलेल्या इतर मानवनिर्मित शिकवणीप्रमाणे एक आहे. आता बालक बाप्तिस्म्या संदर्भात मानवनिर्मित तत्वज्ञावर आधारित शिकवणीवर भरंवसा ठेवायचा किंवा बायबलमधील वचनांचा आधार घ्यायचा हा प्रत्येक मनुष्याने ठरवण्याचा विषय आहे.
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2020 Digital सुवार्तिक All Rights Reserved