“पांढऱ्या राजासनाचा न्याय” “White Throne Judgement”
पार्श्वभूमी: हजारो वर्षांपासून आपण सर्व मर्त्य मनुष्य "मृत्यू नंतरचे जीवन" ह्याबद्दल विचार करीत आहोत. पवित्र शास्त्रातील जुन्या करारात ईयोबाने तो शाश्वत प्रश्न विचारला आहे की
"मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?“ (ईयोब १४:१४ वाचा)
आजच्या एकविसाव्या शतकात देखील मर्त्य मनुष्याकडून अजूनही हाच प्रश्न विचारला जात आहे. त्यात २००० वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त खरोखर मृतांतून उठला ह्यावर विश्वास ठेवणे हे आजच्या मनुष्यांसाठी फार आश्चर्यकारक आहे. परंतु ह्यात एकमात्र सत्य हे आहे कि, प्रभू येशू ख्रिस्त हा मृतांतून उठला आहे आणि तो आजही जिवंत आहे. तरी पण पवित्र शास्त्र ह्या संदर्भात काय सांगते ते आपण ह्या खालील लेखात पाहू या.
"मनुष्य मृत झाल्यावर पुनः जिवंत होईल काय?“ (ईयोब १४:१४ वाचा)
आजच्या एकविसाव्या शतकात देखील मर्त्य मनुष्याकडून अजूनही हाच प्रश्न विचारला जात आहे. त्यात २००० वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त खरोखर मृतांतून उठला ह्यावर विश्वास ठेवणे हे आजच्या मनुष्यांसाठी फार आश्चर्यकारक आहे. परंतु ह्यात एकमात्र सत्य हे आहे कि, प्रभू येशू ख्रिस्त हा मृतांतून उठला आहे आणि तो आजही जिवंत आहे. तरी पण पवित्र शास्त्र ह्या संदर्भात काय सांगते ते आपण ह्या खालील लेखात पाहू या.
व्याख्या: सुखलोक हा स्वर्गाचाच एक भाग आहे, जेथे नीतिमान आत्मे विसावा घेत प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत आहेत. इथे चीर आनंद आणि सुख आहे. त्याचप्रमाणे अधोलोक हा एक मृत क्षेत्र आहे जो नरकाचा भाग आहे. इथे फार यातना व कष्ट आहेत.
मृत्यूनंतरच्या जीवनाचा विषय हा वाचकांच्या सोयीसाठी आम्ही तीन भागात विभागला आहे.
ह्या
भागात आपण पांढऱ्या राजासनाचा न्याय म्हणजे नक्की काय ते सावितरपणे पाहू या.
बायबल आपल्याला शिकवते की मृत्यूनंतर मनुष्य
आपल्या शरीराने मारतात, पण आत्म्याने जिवंत असतात; कारण आत्मा मरत नाही. ह्याला मनुष्य ‘शरीराने झोपी जाणे’ असेही म्हणतात. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तर प्रभू येशूच्या दुसऱ्या
येण्यापर्यंत जे सर्व मृत मनुष्य नीतिमान (म्हणजेच पापविरहित) असे मरण पावले आहेत, ते सुखलोकांत आहेत. तेथे ते सुख उपभोगत विसावा घेत आहेत. त्याचप्रमाणे जे
मनुष्य अनीतिमान म्हणून मरण पावले आहेत ते व देवाविरुद्ध बंडखोरी करणारे दूत हे
अधोलोकांत यातना भोगीत आहेत. ह्या दोन्ही ठिकाणातील आत्मे हे प्रभू येशुच्या
दुसऱ्या येण्याची फार आतुरतेने वाट पाहत आहेत.
पहिले मरण
प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यानंतर पृथ्वीवर
आणि आकाशात काही मोठे चिन्हे आणि भयानक घटना (युद्धे , पीडा इत्यादी) ह्या घडतील. त्यात पृथीवरील सर्व मनुष्यांना
मरणाचा अनुभव येईल; त्यांचे शरीर क्षय
पावल्यामुळे ते त्यांच्या आत्म्यांत रूपांतर होतील व त्यांना सुखलोकांतील आणि
अधोलोकांतील आत्मे येऊन मिळतील. ह्यालाच ‘पहिले मरण’ असे म्हटले जाते; पहिले मरण म्हणजे शरीराचे मरण. हे सर्व आत्मे त्या राजासनावर बसलेला व्यक्ती समोर न्यायासाठी उभी
राहतील.
ह्या राजासनासमोर सर्व मानवी आत्म्यांचा न्याय
होईल आणि प्रत्येक आत्म्याला ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे निश्चित वतन
मिळेल. हे वतन म्हणजे एकतर 'सार्वकालिक जीवन' किंवा 'नरकांतला
मृत्यू'. ह्या न्यायाला ‘पांढऱ्या
राजासनाचा न्याय’ किंवा ‘शेवटचा
न्याय’ म्हणून म्हटले जाते. (प्रकटीकरण
२०:११-१५ वाचा) ह्या न्यायाचे वर्णन दानिएल ह्याने पण
आपल्या पुस्तकात केले आहे. (दानिएल ७:१० वाचा)
प्रकटीकरण २०:१३-१५
"नंतर मोठे पांढरे 'राजासन' व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला, त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली; त्यांकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहानथोरांना
मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले.
त्या वेळी पुस्तके उघडली गेली; तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते; आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा
न्याय 'ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे' ठरविण्यात आला.
तेव्हा समुद्राने अपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर
सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी अपल्यांतील मृतांस बाहेर
सोडले; आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे
प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला.
तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरांत टाकली
गेली.अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.
ज्या कोणाचे नाव 'जीवनाच्या पुस्तकांत लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरांत टाकला गेला."
ह्या न्यायामध्ये ज्यां कोणाची नावे 'कोंकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात' लिहिलेली असतील, म्हणजेच जे नीतिमान असे सापडतील, त्यांचे तारण होऊन ते वाचले जातील व त्यांच्यावर दुसऱ्या मरणाचा प्रसंग येणारच
नाही; आणि ते सर्वकाळ प्रभू येशू बरॊबर वास करतील.
कोंकऱ्याच्या
जीवनाच्या पुस्तक
कोंकऱ्याच्या जीवनाचे पुस्तक हे असे स्वर्गातील
पुस्तक आहे, ज्यात फक्त नीतिमान मनुष्यांची नावे लिहिली
जातात. ह्याच नीतिमान मनुष्यांच्या आत्म्याचे तारण होणार आहे; इतर आत्म्यांचा नाही. ह्या पुस्तकाबद्दल प्रभू येशूने पवित्र शास्त्रात लूक शुभवर्तमानात उल्लेख
केला आहे. (लूक १०:२० वाचा) आणि हेच ते पुस्तक आहे जे त्या पांढऱ्या
राजासनाचा न्यायामध्ये उघडले जाईल. (प्रकटीकरण २०: १५ वाचा)
लूक १०:२०
"तथापि भुते तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना."
प्रकटीकरण २०: १२, १५
“त्या वेळी पुस्तके उघडली गेली; तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे
होते; आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून
मृतांचा न्याय 'ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे' ठरविण्यात आला.
ज्या कोणाचे नाव 'जीवनाच्या पुस्तकांत लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरांत टाकला गेला."
ह्या पुस्तकाबद्दल पवित्र शास्त्रातील इतर
संदर्भ (दानिएल ७:१०, फिलिप ४:३, स्तोत्र ६९:२८, प्रकटीकरण ३:५, प्रकटीकरण १३:८, २१:२७ )
दुसरे मरण
परंतु ज्यां कोणाची नावे 'कोंकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात' लिहिलेली नसतील, म्हणजेच जे कोणी अनीतिमान (पापी) गणण्यात येतील, ते सर्व त्या अधोलोक व मरण ह्याच्याबरोबर त्या अग्नीच्या सरोवरात टाकले जातील.
जेथे ते सर्वकाळ यातना भोगणार आहेत. ह्यालाच ‘दुसरे मरण’ म्हणजेच आत्म्याचे मरण म्हटले जाते. इथेच या युगाची समाप्ती होईल.
पांढऱ्या
राजासनाचा न्यायासनापुढे होणाऱ्या निवाड्याचे सविस्तर विश्लेषण
ज्या प्रमाणे या पृथ्वीवरील न्यायव्यवस्थेत
न्यायाधीशाने न्याय केल्याशिवाय कोणालाही दोषी ठरविले जात नाही. त्याच्याप्रमाणे
देवही कोणा मनुष्याचा न्याय झाल्याशिवाय दोष लावत नाही. तो प्रत्येकांना वाचण्याची
समान संधी उपलब्ध करून देतो, कारण तो कृपावंत व दयेचा सागर असा आहे.
त्याने मनुष्यांना अजून संधी दिलेली आहे. जो पर्यंत ही संधी आहे तोपर्यंत
मनुष्यांनी त्याचा लाभ घेऊन स्वतःचे तारण साधून घ्यावे. पण तारणाची ही वेळ
संपल्यावर मग, त्याच्या दयेचा अंत होईल. मग उरलेले सगळे त्या
न्यायात ओढले जातील.
न्याय म्हटल्यावर त्याचा निवाडा /निकाल येणे क्रमप्राप्त आहे. म्हणजेच त्या न्यायानंतर प्रत्येक आत्म्याला
त्यांचा निकाल मिळणार आहे.
ह्या न्यायामध्ये प्रभू येशूने तो भूतलावर
असताना योहान शुभवर्तमानात म्हटल्याप्रमाणे प्रत्येकांना त्यांचे वतन मिळणार आहे.
(योहान ५:२८-२९ वाचा) येथे येशूने ह्या दोन्ही ठिकाणातील आत्म्यांना कोणाला
काय वतन मिळणार आहे ते अगदी स्पष्ट केले आहे.
योहान ५:२८-२९
"ह्याविषयी आश्चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची
वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी
दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी
वेळ येत आहे."
त्याचबरोबर मनुष्यांना सतर्क करण्यासाठी प्रभू
येशूने ह्या न्यायाचा निवाडा अगोदरच जाहीर केला आहे; म्हणजेच मनुष्याने त्यातून
बोध घेऊन सतर्क व्हावे, आपले मार्ग शोधावे आणि पापांपासून दूर राहून ते
नीतिमत्व मिळवावे. (योहान ३:१६-२०, ८:१२ वाचा) तसेच प्रभू येशूने हेही म्हटले की जे
ह्या शरीराचा घात करतात त्यांना भिऊ नका, तर जो शरीराबरोबर आत्म्याचाही नाश करू शकतो
त्याला भ्या. (मत्तय १०:२८ वाचा)
योहान ३:१६-२०
"देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर (म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त) विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ
नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा
करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून
पाठविले.
जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. "
जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. "
निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश (म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त) आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची
आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी
वाईट कृत्ये करितो तो प्रकाशाचा द्वेष करितो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नये
म्हणून प्रकाशाकडे येत नाही; "
योहान ८:१२
"पुढे येशू त्यांना म्हणाला, "मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील."
मत्तय १०:२८
"जे शरीराचा घात करितात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ
नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकांत नाश करावयास
जो समर्थ आहे त्याला भ्या."
देवाने ह्या वरील वचनात सर्व मनुष्यांना ह्या
न्याय व त्याच्या निकालाबद्दल आगाऊच बजावून ठेवले आहे; म्हणून कोणीही मनुष्य त्यावेळी आम्हांला हे माहित नव्हते असे म्हणू शकत नाही.
ह्याचा अर्थ मनुष्यांना अजून संधी आहे तोपर्यंत, त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपल्या
स्वतःला पापापासून परावृत्त करणे अत्यावश्यक आहे; कारण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वाना सार्वकालिक जीवन प्राप्त करून देण्याचे अभिवचन देवाने दिले आहे. जर कोणी तसा विश्वास धरत नाही तर तो मनुष्य कोणत्या
निकालासाठी पात्र आहेत हे त्यांनी आजच समजून घ्यावे.
सुखलोकांतील
आत्म्यांचे वतन:
सुखलोकांतील आत्म्यांवर न्यायचा प्रसंग येणार
नाही.
ह्या वरील वचनात जे जीवनाच्या पुनरुत्थानासाठी
जे आत्मे आहेत, ते म्हणजे सुखलोकांतील नीतिमान आत्मे!!! आणि त्यांचीच नवे हे त्या 'कोंकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात' लिहिलेली असतील. आपण अगोदर वाचले की
सुखलोकांतील आत्म्यांना नीतिमान गणण्यात आले आहे; आणि म्हणूनच त्यांचा न्याय होणार नाही.
आता कोणी म्हणेल की हा कसला न्याय; म्हणजे त्यांचा न्यायच होणार नाही ? आणि का ?
ह्याचे कारण प्रभू येशू स्वतः योहान
शुभवर्तमानात देतो. (योहान ३:१८, योहान ५:२४ वाचा)
योहान ३:१८
“जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही.”
योहान ५:२४
"मी तुम्हांला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला
पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे;
आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो
मारणांतून जीवनांत पार गेला आहे."
आता कोणी म्हणेल ह्या नीतिमानांवर एवढी
मेहेरबानी का ? त्यांना हे नीतिमत्व कुठून प्राप्त झाले ? तर ह्याचा उत्तर म्हणजे
ह्या सर्व मनुष्यांनी येशू ख्रिस्तावर व त्याने केलेल्या स्वतःच्या अर्पणावर विश्वास
ठेवला; आणि म्हणून त्यांना हे नीतिमत्व विनामूल्य
देण्यात आले. (रोमकरांस पत्र ३:२२, रोमकरांस पत्र १०:९ वाचा)
रोमकरांस पत्र ३:२२
"हे देवाचे नितीमत्व (पापक्षमा) तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे
विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे; त्यांत भेदभाव नाही."
रोमकरांस पत्र १०:९
"की येशू प्रभू आहे असे जर 'तू आपल्या मुखाने कबूल करिशील आणि देवाने त्याला
मेलेल्यांतून उठविले असा 'आपल्या अंत:करणात' विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणात विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो
मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.”
त्या न्यायामध्ये सुखलोकांतील आत्म्यांचा कैवार
हा खुद्द प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतःकडे घेईल; कारण त्या सर्व आत्म्यांनी पृथ्वीवर असताना
येशू ख्रिस्ताच्या त्या नितीमत्वाच्या कृतीवर (म्हणजेच क्रुसावरील अर्पणावर)
विश्वास ठेऊन ‘येशूला आपला तारणारा’ म्हणून स्वीकारले होते. तो विश्वास तेव्हा त्यांना नितिमत्व प्रदान करील. ह्याचे कारण म्हणजे, जो कोणी येशूच्या अर्पणावर विश्वास ठेवतो, त्यांचे सर्व पापे येशूच्या रक्ताखाली येऊन कायम पुसले जातात आणि त्यांना
नीतिमान गणले जाते. (योहान ५: ८-९, २४, ३:१६,३६, ६:४७,
रोमकरांस पत्र ३:२२,२६, ५:१८,२१, ६:२२ वाचा)
योहान ५:२४
"मी तुम्हांला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला
पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे;
आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो
मारणांतून जीवनांत पार गेला आहे."
योहान ३:१६
"देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र
दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर
विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."
योहान ६:४७
"मी तुम्हांला खचित खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला
सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे."
योहान ३:३६
"जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला
सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या
दृष्टीस जीवन पडणार नाही; पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो."
रोमकरांस पत्र ३:२२
"हे देवाचे नितीमत्व (पापक्षमा) तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे; त्यांत भेदभाव नाही."
रोमकरांस पत्र ३:२६
"म्हणजे आपले नितिमत्व सांप्रतकाळी असे
व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे
असावे."
रोमकरांस पत्र ५:८-९
"परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला. तर आता
त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेषकरून त्याच्या द्वारे
देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहो."
रोमकरांस पत्र ५:१८
"तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना
दंडाज्ञा होते, तसे नितीमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नितिमत्व
प्राप्त होते."
रोमकरांस पत्र ५:२१
"अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य
केले तसे कृपेने नितीमत्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू
ह्याच्या द्वारे राज्य करावे."
रोमकरांस पत्र ६:२२
"परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त
केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ
तुम्हांला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे."
म्हणून जेथे त्यांचे पापे व अपराधच नाहीत तेथे
न्याय नाही व दंडाज्ञा पण नाही. (रोमकरांस पत्र ८:१-२, १०:४, ६:२३
वाचा)
तेथे सुखलोकांतील नितीमानांचा कैवारी/ वकील हा स्वतः
प्रभू येशू ख्रिस्त असेल (१ योहान २:१वाचा), जो त्यांना त्यांचे सार्वकालिक वतन
म्हणजेच सार्वकालिक जीवन मिळवून देईल. (इब्रीकरांस पत्र ९:१५ वाचा) म्हणून
सुखलोकांतील सर्व आत्मे ह्यांना प्रभू येशू बरोबर सार्वकालिक असे विजयी जीवन
प्राप्त होईल; व ते प्रभू येशू बरोबर युगानुयुग राज्य करतील.
"म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना
दंडाज्ञा नाहीच. कारण ख्रिस्त येशुमधील जीवनाचा आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या
नियमापासून मुक्त केले आहे."
रोमकरांस पत्र १०:४
"कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला
नितिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियामशास्राची समाप्ती असा आहे."
रोमकरांस ६:२३ (वेतन)
"कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे."
इब्रीकरांस पत्र ९:१५
"आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरता आहे कि, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने , सार्वकालिक वारशाने अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे."
"आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरता आहे कि, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने , सार्वकालिक वारशाने अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे."
१ योहान २:१
"...जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी (Advocate) आहे,"
ह्या न्यायामध्ये ज्यां कोणाची नावे 'कोंकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात' लिहिलेली असतील, म्हणजेच जे नीतिमान असे सापडतील, त्यांचे तारण होऊन ते वाचले जातील व त्यांच्यावर दुसऱ्या मरणाचा प्रसंग येणारच
नाही; आणि ते प्रभू येशू बरॊबर सर्वकाळ वास करतील.
अधोलोकांतील
आत्म्यांचे वतन:
दुसरे मरण
परंतु कोणाची नावे 'कोंकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात' लिहिलेली नसतील, ते सर्व त्या अधोलोक व मरण ह्याच्याबरोबर त्या
अग्नीच्या सरोवरात टाकले जातील. जेथे ते सर्वकाळ यातना भोगणार आहेत. ह्याला दुसरे मरण म्हणजेच आत्म्याचे मरण म्हटले जाते. ह्या दुसऱ्या मरणाची
सविस्तर माहिती प्रकटीकरण २१:८ मध्ये लिहिलेली आहे.
प्रकटीकरण २१:८
"परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ,'खून करणारे,' जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, क सर्व लबाड माणसे ह्यांच्या वांट्यास अग्नीचे व
गंधकाचे सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”
ह्याचाच अर्थ ज्यांनी कोणी प्रभू येशूवर
विश्वास न ठेवून आपल्या पापांत जगत राहिले, त्या सर्वाना त्या पांढऱ्या राजासनाचा न्यायाला
सामोरे जावे लागेल. त्या सर्वांचा निकाल काय आहे हे आपण अगोदर वाचले आहे.
त्यासर्वांचा न्याय होऊन त्या सर्व आत्म्यांना त्या सार्वकालिक अग्नीत टाकले जाईल.
हेच ते दुसरे मरण.
म्हणून आज मनुष्याला गरज आहे
ती प्रभू येशूवर विश्वास ठेऊन आपल्या पापांपासून परावृत्त होऊन एक शुद्ध जीवन
जगण्याचे!! नाहीतर ह्या पांढऱ्या राजासनाचा न्यायात त्यांचा निभाव लागणार नाही.
सारांश:
- प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यानंतर सर्व मानवी आत्म्यांचा त्या प्रत्येकाचा कृत्यांबद्दल न्याय होण्यासाठी एक अंतिम न्याय येत आहे; आणि तो म्हणजे पांढऱ्या राजासनाचा न्याय. ह्या न्यायात प्रत्येक मनुष्याचे (नीतिमान किंवा अनीतिमान ) आत्मे त्या पांढऱ्या राजासनासमोर उभे राहणार आहेत.
- ह्या न्यायाचा निकाल असा असणार आहे; नीतिमान आत्म्यांना सार्वकालिक जीवन मिळणार आहे, आणि अनीतिमान आत्म्यांचा त्या अग्नीत नाश केला जाणार आहे.
- ज्या मनुष्यांनी पृथीवर असताना प्रभू येशूवर व त्याच्या त्या बलिदानावर विश्वास ठेऊन व आपल्या पापांपासून परावृत्त होऊन एक शुद्ध असे जीवन जगण्याचा प्रयत्न केला, ते सर्व आत्मे नीतिमान म्हणून गणण्यात येणार आहेत. आणि त्यांचीच नावे त्या कोंकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आढळतील. त्याउलट ज्या मनुष्याने येशूच्या नावाचा धिक्कार करून आपल्या पापांत जगण्यात आनंद मानला, हे सर्व आत्मे पापी (अनीतिमान) म्हणून गणण्यात येणार आहेत.
- हे सर्व देवाने अगोदरपासूनच ठरवून ठेवले आहे व ते सर्व मनुष्यांना आगाऊच सांगून पण ठेवले आहे. म्हणून कोणीही मनुष्य त्यावेळी आम्हांला हे माहित नव्हते असे म्हणू शकत नाही. ह्याचा अर्थ मनुष्यांना अजून संधी आहे तोपर्यंत, त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवून आपल्या स्वतःला पापापासून परावृत्त करणे अत्यावश्यक आहे; नाहीतर ते कोणत्या निकालासाठी पात्र आहेत हे त्यांनी आजच समजून घ्यावे.
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2020 Digital सुवार्तिक All Rights Reserved
No comments:
Post a Comment