पापक्षमा - व्याख्या: पापक्षमा ज्याला इंग्रजीत "Remission
of Sin" म्हटले आहे, ह्याचा अर्थ हा म्हणजे ‘पापांची क्षमा किंवा पापाच्या डागापासून मुक्ति' असा होतो.
पापक्षमेची
गरज
ह्या जगात जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा पापांत
जन्मलेला आहे. (रोमकरांस पत्र ३:२३ वाचा) प्रेषित योहानाने पण आपल्या पत्रात ह्याला
दुजोरा देतो (१ योहान १:८, १० वाचा) हे पाप जरी त्या मनुष्यांनी प्रत्येक्षात
केलेले नसले, तरी ते त्यात आढळते. कारण ते पाप मनुष्यांत वरश्याने आले; म्हणजेच आदाम व हव्वा ह्यांचे पाप त्यांच्यातून
आज सर्व मानवजातीत चालून आले आहे. (रोमकरांस पत्र ५:१२ वाचा)
रोमकरांस पत्र ३:२३-२४
"कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे
पडले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून
प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात."
१ योहान १:८, १०
"आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवितो, व आपल्या ठायी सत्य नाही..... आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवितो, आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. "
रोमकरांस पत्र ५:१२
"एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे
मरण शिरले; आणि सर्वानी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा
प्रकारे मरण पसरले.”
तसेच कोणीही पापी मनुष्याला तारण / सार्वकालिक जीवन / मोक्ष / स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाही. कारण शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की पापाचे वेतन/ शेवट हे मरण आहे. (रोमकरांस पत्र ६:२३ वाचा)
रोमकरांस पत्र ६:२३
"कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये
सार्वकालिक जीवन आहे."
हे मरण म्हणजे दोन्ही शारीरिक व आत्मिक मरण
होय. शारीरिक मरण म्हणजे पापद्वारे उपजले रोग, विकार इत्यादी ह्याने आलेले मरण आणि आत्मिक मरण म्हणजे नाश - म्हणजेच मेल्यानंतर
आत्मा स्वर्गात न जाता नरकात जाऊन तेथे न विजणाऱ्या अग्नीत त्याला आलेला मृत्यू.
ह्याच कारणासाठी मनुष्यांना नीतिमत्व म्हणजेच, आपल्या पापांपासून मुक्ति मिळवून व शुद्ध होणे क्रमप्राप्त आहे. कारण स्वर्ग आणि त्यात वसणारा परमेश्वर देव हे दोघेही
पवित्र व शुद्ध आहेत.
नीतिमत्व ही अशी स्थिती आहे जेथे मनुष्याचे पाप
पुसले जातात; असे की जणू त्याने 'पाप केलेच नाही' आणि त्याला 'नीतिमान' गणण्यात येते. म्हणूनच स्वर्गात जाण्यासाठी प्रत्येक मनुष्यांना
पापक्षमा (नीतिमत्व) अत्यावश्यक आहे; आणि बायबालप्रमाणे ती पापक्षमा केवळ येशू
ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच मिळू शकते. ते कसे ते सविस्तरपणे आपण पुढे पाहू या.
पापक्षमा हा विषय वाचकांना बारकाईने समजण्यासाठी, तो आपण तीन भागात विभागला आहे. ते तीन भाग म्हणजे:
पापक्षमेच्या या मागील भागात आपण पहिले की, पापक्षमा केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मिळते, कारण रक्तात जीवन आहे; त्याचेच रक्त निर्दोष व पवित्र आहे. त्याबरोबर आपण हेही पाहिले की पापक्षमेचा अधिकार केवळ प्रभू येशू
ख्रिस्त ह्यालाच आहे; कारण त्यानेच मनुष्यांच्या पापांसाठी कालावरी क्रुसावर खंडणी म्ह्णून आपले
पवित्र निष्कलंक रक्त अर्पण केले आहे; अन्य कोणी नाही!!!
या भागात आपण "पापक्षमा कशी मिळवावी” ह्याकडे लक्ष लावू या.
पापक्षमा
कशी मिळवावी
पृथ्वीवर मनुष्यांकडे पापक्षमेचा एकच स्रोत आहे; तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त!!! प्रभू येशूच्या स्वर्गरोहणानंतर
त्याच्या प्रेषितांनी प्रेषित कृत्ये १३:३८ प्रमाणे सुवार्तेची घोषणा केली ती अशी
""म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या (येशूच्या) द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे;"
""म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या (येशूच्या) द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे;"
आता कोणी म्हणेल पापक्षमा येशूच्या द्वारे
मिळते ते समजले आहे, पण ती कशी मिळवावी ? त्यासाठी प्रक्रिया काय आहे ? किंवा कोणत्या कृती केल्याने पापक्षमा मिळवता
येते ? तर ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे अशी कोणतीही ठोस प्रक्रिया नाही.
पण त्यासाठी तीन व्यापक असे टप्पे आहेत; ते म्हणजे
१) पापी असल्याची जाणीव
२) देवाकडे आपल्या पापांची कबुली व त्यासाठी
पाश्च्याताप करून येशूच्या नावात बाप्तिस्मा घेणे
३) येशूच्या अर्पणावर विश्वास व कबुली
पापी
असल्याची जाणीव
ह्या जगात जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा पापांत
जन्मलेला आहे. पण मनुष्य तो स्वतः पापी आहे हे कबुल करायला
तयार होत नाही, कारण प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या
दृष्टीने नीतिमान असतो. पण त्यात सत्य नाहीये. प्रेषित योहन आपल्या पत्रात म्हणतो
की आपण पापी नाही असे जो म्हणतो तो स्वतःला फसवतो व आपण येशूला लबाड ठरवितो. (१
योहान १:८ वाचा)
१ योहान १:८
"आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवितो, व आपल्या ठायी सत्य नाही..... आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवितो, आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. "
जो कोणी आपण पापी आहो असे मनातच नाही त्याला
पापक्षमेचा काहीही उपयोग नाही; कारण पापक्षमा होण्यासाठी प्रथम ते आहे असे त्या
मनुष्याला जाणवले पाहिजे. म्हणूनच पापक्षमा प्राप्त करणाऱ्या प्रत्येक मनुष्यांने प्रथम आपण पापी
आहो असे आपल्या मनात कबुल करणे क्रमप्राप्त आहे.
देवाकडे
आपल्या पापांची कबुली व त्यासाठी पाश्च्याताप करून येशूच्या नावात बाप्तिस्मा घेणे
ह्यानंतर त्या मनुष्याला आपण केलेले सर्व पापे व अपराधे
आठवून त्या प्रत्येकांबद्दल पश्च्याताप करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेणे अनिवार्य आहे.
पश्चाताप करणे ह्याचा अर्थ म्हणजे आपल्या
पापांबद्दल दुःख / खेद व्यक्त करून पापांपासून परावृत्त होणे किंवा त्या पापाचा मार्ग
सोडून देणे.
बाप्तिस्मा हा विधी मनुष्याच्या आंतील देवाच्या
कृपेचे काम पूर्ण झालेले आहे, ह्याची बाहेरील कबुली आहे. बाप्तिस्मा एक लाक्षणिक भाह्य विधी आहे; तो हे प्रतीत करतो की, मनुष्य येशू ख्रिस्तामध्ये आपल्या पापांसाठी
पश्चाताप करून मरतो आणि येशू ख्रिस्तामध्ये पुरला जाऊन त्याच्याबरोबर पुनुरुस्थित
होतो. (१ पेत्र ३:२१ वाचा) इथे मरणे म्हणजे वास्तविक मरणे नव्हे, तर स्वत्व:ला / पापी देहस्वभावाला मारणे किंवा स्वतःचा त्याग
करणे. (रोमकरांस पत्र ६:३, कलस्सेकरांस पत्र २:१२ वाचा)
१ पेत्र ३:२१
"त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ
देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे, असा आहे."
रोमकरांस पत्र ६:३
" किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला
तितक्यांनी त्याच्या मरणांत बाप्तिस्मा घेतला, ह्याविषयी तुम्ही अजाण आहा काय ?"
कलस्सेकरांस पत्र २:१२
"तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले
गेला, आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या
देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठविलेही गेला;"
येशूच्या स्वर्गरोहणानंतर पेंटेकॉस्टच्या दिवशी
पेत्राने केलेल्या घोषणेत त्याने हेच सांगितले होते (प्रेषितांचे कृत्ये २:३८ वाचा). प्रेषित योहानहि त्याच्या पत्रात आपल्याला हेच
सांगतो. (१ योहान १:९ वाचा)
प्रेषितांचे कृत्ये २:३८
“पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी
म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हाला पविता आत्म्याचे दान प्राप्त होईल. “
१ योहान १:९
"जर आपण आपली पापे पदरी घेतले, तर तो (येशू) विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची
क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून दूर करील."
आता ही पापांची कबुली व त्याबद्दल पाश्च्याताप
हे थेट परमेश्वर देवाकडे करावी; कोणा धर्मगुरू, धर्म प्रचारक ह्यांच्याकडे नाही!! त्यांच्याकडे का
नाही हे सर्व आपण अगोदरच्या भागात पहिलेले आहे. मनुष्यांमधील कोणाचाहि नाश व्हावा
अशी देवाची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पाश्च्याताप करून जीवन मिळवावे
हीच त्याची इच्छा आहे. (२ पेत्र ३:९ वाचा) त्यानेच सर्वांसाठीच तारणाचा हा
मार्ग मोकळा केला आहे. (प्रेषित कृत्ये ४:१२ वाचा)
२ पेत्र ३:९
"...तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वानी पाश्च्याताप करावा अशी आहे."
प्रेषित कृत्ये ४:१२
"आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव
आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”
येशूच्या
अर्पणावर विश्वास व कबुली
पश्च्याताप करून येशू नावाने बाप्तिस्मा घेणे
म्हणजेच, प्रभू येशूने केलेले अर्पण ह्यावर आपण आपला विश्वास घोषित करणे व त्याला आपला व्ययक्तिक तारणारा म्हणून घोषित करणे हे होय; असे की त्याने आपल्या पापांसाठी स्वतःचे रक्त
अर्पण केले. कारण रक्ताशिवाय पापक्षमा होणे शक्य नाही हे आपण अगोदरच्या भागात
पहिले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणे व त्याच्या नावात बाप्तिस्मा घेणे म्हणजेच
त्याच्या त्या अर्पणामध्ये सहभागी होणे. म्हणजे आपण आपल्या पापांसाठी
त्याच्याबरोबर क्रुसावर खिळले जातो, त्याच्याबरोबर आपल्या पापांसाठी व देहस्वभावासाठी मरतो आणि तो जसा उठला तसे आपणही
उठविले जातो. (कलससैकरांस पत्र २:१२ वाचा)
कलससैकरांस पत्र २:१२
"तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले
गेला, आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या
देवाच्या कृतीवरील विश्वासाच्याद्वारे त्याच्याबरोबर उठविलेहि गेला."
बायबलप्रमाणे आपण केवळ येशूवरच्या विश्वासानेच
पापक्षमा मिळवू शकतो; तो विश्वास की "येशूला देवाने तुमच्या
आमच्या पापांसाठी अर्पण व्हावे म्हणून जगात पाठविले आहे." आपल्या
कोणत्याही चांगल्या कृत्याने नाही, कोणत्या दानधर्माने नाही, उपवास किंवा तपाने नाही, तर केवळ येशूच्या कृपेने व त्यावच्यावरच्या विश्वासाने तारले जातो. प्रेषित पौलहि आपल्या पत्रात
हेच घोषित करतो. (इफिसकरांस पत्र २:८-९ वाचा)
इफिसकरांस पत्र २:८-९
"कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे
आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून (चांगले) कर्मे केल्याने हे
झाले नाही."
प्रभू येशूनेहि मरीया माग्दालिनाला पापक्षमा
करताना म्हटले होते की “तुझ्या
विश्वासाने तुला तारिले आहे.” तिने केलेल्या कोणत्या
चांगल्या कर्माने नव्हे. (लूक ७:५० वाचा) प्रेषित पौलहि आपल्या रोमकरांस
पत्रात हेच घोषित करतो. (रोमकरांस पत्र १०:९, रोमकरांस पत्र ३:२२, रोमकरांस पत्र ४:२४-२५ वाचा)
लूक ७:५०
"मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारिले आहे, शांतीने जा."
रोमकरांस पत्र १०:९
"की येशू प्रभू आहे असे जर 'तू आपल्या मुखाने कबूल करिशील आणि देवाने त्याला
मेलेल्यांतून उठविले असा 'आपल्या अंत:करणात' विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणात विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो
मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.”
रोमकरांस पत्र ३:२२
"हे देवाचे नितीमत्व (पापक्षमा) तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे
विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे; त्यांत भेदभाव नाही."
रोमकरांस पत्र ४:२४-२५
"तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठविले
त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यां आपणालाही ते (नितीमत्व) गणले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून
देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे."
पण आता कोणी म्हणेल मी तर ख्रिस्ती आहे. कोणीही
ख्रिस्ती असला तरी त्याला पाप करायला मोकळीक नाही. त्यालाहि पापक्षमेची तेवढीच गरज
आहे. एकदा कोणाही मनुष्याला पापक्षमा झाली म्हणून त्या मनुष्याने परत परत तेच पाप करत राहू नये, तर देवाला समर्पित होऊन त्या पापापासून कायम परावृत्त होणे गरजेचे आहे.
सारांश: पाप क्षमा मिळवण्यासाठी कोणाही मनुष्याने प्रथम तो पापी असल्याची जाणीव होणे गरजेचे आहे. ह्यानंतर त्याने देवाकडे आपल्या त्या पापांची कबुली देऊन व
त्यासाठी पाश्च्याताप करून येशूच्या नावात बाप्तिस्मा घेणे क्रमप्राप्त आहे.
येशूच्या नावात बाप्तिस्मा घेणे म्हणजेच येशूमध्ये आपल्या पापांला मरणे.
प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याच्या नावांत बाप्तिस्मा घेतल्यावर मिळणारा पवित्र आत्मा हाच आपल्याला पापांपासून शुद्ध राखून सार्वकालिक जीवनात नेण्यास समर्थ आहे.
ह्या सर्व प्रक्रियेतुन मनुष्यांना पापक्षमा मिळत असते (नीतिमत्व) व पर्यायाने सार्वकालिक जीवन मिळते.
प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याच्या नावांत बाप्तिस्मा घेतल्यावर मिळणारा पवित्र आत्मा हाच आपल्याला पापांपासून शुद्ध राखून सार्वकालिक जीवनात नेण्यास समर्थ आहे.
ह्या सर्व प्रक्रियेतुन मनुष्यांना पापक्षमा मिळत असते (नीतिमत्व) व पर्यायाने सार्वकालिक जीवन मिळते.
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2020 Digital सुवार्तिक All Rights Reserved
No comments:
Post a Comment