Friday, 26 August 2016

Christian Gospel - Remission of sin: Who has authority to remit sins? पापक्षमा करण्याचा अधिकार फक्त प्रभू येशूलाच आहे; धर्मगुरू किंवा इतर कोणालाही नाही!!!!

पापक्षमा करण्याचा अधिकार कोणाला आहे ? Remission of sin: Who has authority to remit sins?




पापक्षमा
 - व्याख्या: पापक्षमा ज्याला इंग्रजीत "Remission of Sinम्हटले आहेह्याचा अर्थ हा म्हणजे पापांची क्षमा किंवा पापाच्या डागापासून मुक्तिअसा होतो.

पापक्षमेची गरज

ह्या जगात जन्मलेला प्रत्येक मनुष्य हा पापांत जन्मलेला आहे. (रोमकरांस पत्र ३:२३ वाचाप्रेषित योहान पण आपल्या पत्रात ह्याला दुजोरा देतो (१ योहान १:८१० वाचा) हे पाप जरी त्या मनुष्यांनी प्रत्येक्षात केलेले नसलेतरी ते त्यात आढळतेकारण ते पाप मनुष्यांत वरश्याने आलेम्हणजेच आदाम व हव्वा ह्यांचे पाप त्यांच्यातून आज सर्व मानवजातीत चालून आले आहे. (रोमकरांस पत्र ५:१२ वाचा)

रोमकरांस पत्र ३:२३-२४
"कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेतदेवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात."

१ योहान १:८१०
"आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलोतर आपण स्वतःला फसवितोव आपल्या ठायी सत्य नाही..... आपण पाप केले नाहीअसे जर आपण म्हटलेतर आपण त्याला लबाड ठरवितो,  आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. "

रोमकरांस पत्र ५:१२
"एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरलेआणि सर्वानी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.”

तसेच कोणीही पापी मनुष्याला तारण / सार्वकालिक जीवन / मोक्ष / स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाहीकारण शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की पापाचे वेतन/ शेवट हे मरण आहे.  (रोमकरांस पत्र ६:२३ वाचा)

रोमकरांस पत्र ६:२३
"कारण पापाचे वेतन मरण आहेपण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे."

हे मरण म्हणजे दोन्ही शारीरिक  आत्मिक मरण होय. शारीरिक मरण म्हणजे पापद्वारे उपजले रोगविकार इत्यादी ह्याने आलेले मरण आणि आत्मिक मरण म्हणजे  नाश - म्हणजेच मेल्यानंतर आत्मा स्वर्गात न जाता नरकात जाऊन तेथे न विजणाऱ्या अग्नीत त्याला आलेला मृत्यू. ह्याच कारणासाठी मनुष्यांना नीतिमत्व म्हणजेच, आपल्या पापांपासून मुक्ति मिळवून व शुद्ध होणे क्रमप्राप्त आहे.  कारण स्वर्ग आणि त्यात वसणारा परमेश्वर देव हे दोघेही पवित्र व शुद्ध आहेत.

नीतिमत्व ही अशी स्थिती आहे जेथे मनुष्याचे पाप पुसले जातातअसे की जणू त्याने 'पाप केलेच नाही' आणि त्याला 'नीतिमानगणण्यात येतेम्हणूनच स्वर्गात जाण्यासाठी प्रत्येक मनुष्यांना पापक्षमा (नीतिमत्वअत्यावश्यक आहे;  आणि बायबालप्रमाणे ती पापक्षमा केवळ येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच मिळू शकतेते कसे ते सविस्तरपणे आपण पुढे पाहू या.

पापक्षमा हा विषय वाचकांना बारकाईने समजण्यासाठीतो आपण तीन भागात विभागला आहेते तीन भाग म्हणजे:


मागील भागात आपण पहिले आहे कीपापक्षमा केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मिळतेअन्य कशाने ही नाहीया भागात आपण "पापक्षमा करण्याचे अधिकार कोणाला आहेत किंवा पापक्षमा कोण करू शकतो" ते पाहू या.

खरंच पाप क्षमा / माफ करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

हा विषय आणि मुद्धा फार महत्त्वाचा आहेकारण हा मनुष्याचा मृत्यूनंतर किंवा हयातीत असताना सुद्धा सार्वकालिक जीवनप्राप्ति केवळ ह्यांवर अवलंबून आहेआजच्या ख्रिस्ती जगतामध्ये आपल्याला ह्याविषयी दोन मुख्य वैचारिक प्रवाह पाहायला मिळतात.

1) पहिला वैचारिक प्रवाह: रोमन कॅथोलिक व लुथरन पंथीय मानतात की परमेश्वराने पापक्षमेचा अधिकार धर्मगुरू (फादरबिशपपोप इत्यादीह्यांना अधिकार दिला आहेम्हणून ते लोकांचे पापे जाणून घेऊन, त्यांना क्षमादान देऊ शकतातत्यासाठी ते पवित्र शास्त्रातील योहान २०:२३ हा संदर्भ पुढे करतातहया वचनाव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणतेही इतर संदर्भ नाहीत.

योहान २० :२३
"ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करितां त्यांची क्षमा झाली आहेआणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत."

2) दुसरा आणि बहुसंख्य वैचारिक प्रवाह: हे वरील दोन पंथ सोडल्यास इतर बहुसंख्य ख्रिस्ती समाज ह्या तत्वांवर आधार सांगतो कीपापक्षमा केवळ प्रभु येशू ख्रिस्तच करू शकतोअन्य कोणीही नाहीमग तो व्यक्ती कितीहि मोठा धार्मिक असला तरीहीकारण तो स्वतः पापी असताना इतरांचे पाप कसे काय क्षमा / माफ करू शकतो ?

आता ह्याबाबत कितीही मतप्रवाह असले तरी त्यातून खरा आणि चुकीचा कोणता हे केवळ त्याला पवित्र शास्त्रातील असलेला आधार/ संदर्भ ह्यावरून ठरवता येईल. ह्या दोन्ही मतप्रवाहला आपण पवित्र शास्त्राच्याप्रमाणे तपासून पाहू या.

प्रथम आपण प्रभू येशू ह्यासंदर्भात काय म्हणतो ते पाहू या.

१) पक्षघाती मनुष्यास पापक्षमा मत्तय शुभवर्तमानात स्वतः प्रभू येशू एका पक्षघाताने पीडित माणसाला बरे करताना म्हणतो की'मुलातुझ्या  पापांची क्षमा झाली आहे.’ आता इथे तो मनुष्य पक्षघाताने आजारी आहेतर येशूने त्याला बरे करणे एवढेच अपेक्षित असतानायेशू त्याला म्हणतो की तुला पापक्षमा झाली आहे. (मत्तय :मार्क :१० वाचा)

मत्तय :
"तथापि मनुष्यांच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांस समजावे म्हणून ..."

मार्क :१०
"परंतु मनुष्याच्या पुत्राला (येशूलापृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हांस समजावे म्हणून."

तरी आपण हे वरील संदर्भ नीट वाचले तर आपल्याला समजेल की येशू तेथे त्या माणसाला आरोग्याबरोबर हेतुपरस्पर पापक्षमाही करतोह्या मागे त्याच्या उद्देश तिथे उपस्थित शास्त्रीपरुशीसमोर व लोकांसमोर 'पृथ्वीवर पापक्षमा करण्याचा अधिकार केवळ त्यालाच आहे' हे प्रस्थापित करणे हा होता.

२) मरिया मग्दालीयाची पापक्षमायेशूची सर्व लोकांसमोर पापक्षमेचे हे दुसरे उदाहरण. लूक लिखित शुभवर्तमानातमध्ये एके ठिकाणी शिमोन परश्यानी येशूला भोजनाचे आमंत्रण दिले होते. त्या ठिकाणी मरीया मग्दालीया (जी एक पापी स्त्री म्हणून गणली जात होती) तिथे येऊन तिने येशूला तेलाभ्यंग केला. नंतर तिने आपल्या आसवांनी येशूचे पाप धुतले व आपल्या केसानी ते पुसले. तेव्हा येशू तिला म्हणला की 'तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.' (लूक ७:४८ वाचा)

लूक ७:४८
"मग त्याने तिला म्हटलेतुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

तेव्हा तेथे उपस्थित लोकांमध्ये ह्याविषयी चर्चा सुरू झाली की पाप क्षमा करणारा हा कोण आहे ?'  मुळात इथे पण येशू पुन्हा "तोच पाप क्षमा करू शकतो' हे विदित करू इच्छित होता.

३) उजव्या हाताकडील चोर : येशूला ज्यावेळेस क्रुसावर खिळले होतेतेव्हा त्याच्या बाजूला दोन अट्टल गुन्हेगारांना पण क्रुसावर खिळले होते. प्रथम ते दोघेहि येशूची थट्टा करीत होते. पण नंतर त्यातील उजव्या हाताकडे चोराला आपल्या कृत्याबद्दल खेद /पश्च्याताप वाटला व त्याने येशूला त्याची तो जेव्हा पुन्हा येईल आठवण करण्यास विनंती केली. तेव्हा येशू त्याला म्हणाला की 'आजच तू माझ्याबरोबर सुखलोकांत असशील.' म्हणजेच त्या चोराचे पाप त्याच क्षणी माफ होऊन त्याचे तेव्हाच तारण झाले. (लूक २३:४३ वाचा)

लूक २३:४३
"तो त्याला म्हणालामी तुला खचित सांगतोतू आज माझ्याबरोबर सुखलोकांत असशील."

४) व्यभिचारी स्त्रीची पापक्षमा: एके वेळी येशुची परीक्षा पाहण्यासाठी शास्त्री एका व्यभिचारी स्त्रीला (जिला ते धोंडमार करावा म्हणून) धरून तिला येशू पुढे आणतातआणि तो तिच्या पापाबद्दल काय म्हणतो ते पाहण्यास उत्सुक होते. ( योहान ८:७९ -११ वाचा) पण येशू त्या लोकांचे अंतःकरण जाणून होता. तेव्हा तो म्हणतो, ‘जो मनुष्य निष्पाप आहे तो तिला प्रथम दगड मारील. पण कोणीही तिला दगड मारावयास धजला नाहीकारण ते सर्व पापी आहेत हे ते जाणून होते. तेव्हा येशूला तिला तिच्या पापाबद्दल क्षमा करून पुन्हा पाप न करण्याची ताकीद देतो.

योहान ८:७९ -११
"....तो उठून त्यांना म्हणालातुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा....हे शब्द ऐकून वृद्धांपासून तो थेट शेवटल्या माणसांपर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले.”
"नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणालाबाई तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय ती म्हणालीप्रभुजी 'कोणी नाही.तेव्हा येशू तिला म्हणाला ,मीही तुला दंड ठरवीत नाहीजापण ह्यापुढे पाप करू नको.."

ह्या घटने मधून येशू असे हे स्पष्ट करू इच्छितो की 'जो मनुष्य स्वतः पापी आहे, त्याला दुसऱ्यांवर दोषारोप करण्याचा अधिकार नाही'. ह्यावरून एक महत्वाचा प्रश्न  म्हणजेजर एका पापी माणसाला दुसऱ्या पापी माणसाला दोष लावता येत नाहीतर मग तोच पापी मनुष्य दुसऱ्यांचे पाप कसे काय क्षमा करू शकतो ?

ह्या वरील सर्व उदाहरणांमधून आपल्याला हे स्पष्ट होते कीकेवळ "प्रभू येशू ख्रिस्तालापापक्षमा करण्याचा अधिकार आहे. ह्यानंतर प्रभू येशू सोडून अन्य कोणाला पापक्षमेचा अधिकार आहे काहे आपण शास्त्रात तपासून पाहू या.

प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांचे पापक्षमेबद्दल काय मत आहे

नवीन करारात कोणत्याही प्रेषितांनी कोणाचेही पापक्षमा केल्याचा उल्लेख सापडत नाही.  ते नेहमी त्यांच्या श्रोत्यांना येशू ख्रिस्ताकडे निदर्शित करत होते. त्या सर्वानी पापक्षमेसाठी येशूच्या नावाची घोषणा केली. (प्रेषितांचे कृत्ये १३:३८ वाचा)

प्रेषितांचे कृत्ये १३:३८
"म्हणून बंधुजनहोतुम्हांला हे ठाऊक असो कीह्याच्या (येशूच्याद्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे;"

ह्याचे  कारण  ते स्वतः  पापी असल्याचे कबूल करत होते (१ पेत्र ३:१८ वाचा) आणि लोकांना पापक्षमेसाठी एकच निर्दोष निष्कलंक असा जो येशू ख्रिस्त ह्याकडे निदर्शित करत होते. (२ करिंथकरांस ५:२११ योहान १:८ वाचा)

१ पेत्र ३:१८ मध्ये प्रेषित पेत्र "आपल्या पापांची" म्हणतो "तुमच्या" पापांची म्हणत नाहीकारण त्याला माहित होते कीइतर लोकांप्रमाणे त्यालाहि पापक्षमेचे तितकीच गरज आहे. म्हणून तो इतरांची पापक्षमा करण्यास धजला नाही. प्रेषित योहानही त्याच्या पत्रात ह्याला दुजोरा देताना आपण पाहतो. 

१ पेत्र ३:१८
"कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेंहि पापांबद्दलम्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिताएकदा मारणे सोसले,तो देहरूपांत जीवे मारला गेला आणि आत्म्यांत जिवंत केला गेला;"

२ करिंथकरांस ५:२१
"ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्या करिता पाप केले असे केलेह्यासाठी कीआपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे."

१ योहान १:८
"आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलोतर आपण स्वतःला फसवितोव आपल्या ठायी सत्य नाही..... जर आपण आपली पापे पदरी घेतलीतर तो (म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त) विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करीलव आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाहीअसे जर आपण म्हटलेतर आपण त्याला लबाड ठरवितो,  आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. "

प्रेषित पौलाने देखील आपल्या सर्व पत्रात "आपल्या" "तुमच्याआमच्या" ह्या शब्दाचा वापर केला आहे. (इफिसकरांस पत्र १:७४:३२१ करिंथकरांस १५:३कलससैकरांस पत्र २:१३ वाचा) म्हणजेच तोही आपल्या स्वतःला पापी समजून इतरांची पापक्षमा करण्यास लायक मनात नव्हताआणि म्हणूनच पापक्षमेसाठी लोकांना येशूकडे निदर्शित दाखवत होता.

इफिसकारांस पत्र १:
"त्याच्या (म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या) कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ति म्हणजे आपल्या आपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे;"

इफिसकरांस पत्र ४:३२
"....जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा."

कलससैकरांस पत्र २:१३
"जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देहस्वभावाची सुंता न झाल्याने मेलेले होतां त्या तुम्हांस त्याने त्याच्याबरोबर जिवंत केलेत्याने (म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताने) आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली;"

१ करिंथकरांस १५:३
".....शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला;"

जेव्हा येशूचे शिष्य व प्रेषित हे जर पापक्षमा करण्यास धजले नाहीत व त्यांनी त्यासाठी येशूकडे बोट केलेतिथे आजचे धर्मगुरू लोकांचे पापक्षमा करण्यात मोठेपणा मिरवतात. म्हणजेच याचाच अर्थ आजच्या धर्मगुरूंना येशूच्या शिष्यांपेक्षा येशू जास्त समजला आहे असे काय कधीच नाही!!!! 

लोकांचे पापक्षमा करून हे धार्मिक पुढारी आपल्या स्वतःला येशूच्या प्रेषितांवर व खुद्द प्रभू येशू समान करत नाहीत काय हे सत्य आपल्याला समजून घ्यायला हवे. मुळांत जो स्वतः पापी आहे त्याला इतरांच्या पाप क्षमा करायचा अधिकारच नाही.

देव आणि मनुष्य ह्यांमधे केवळ एकच मध्यस्थतो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त

आता आपण जाणून आहोत कीपाप हे परमेश्वरापुढे गुन्हा आहे आणि पापी मनुष्य हा गुन्हेगार आहे. मग इथे पापक्षमा करणारा हा स्वतः परमेश्वर देव असू शकतो किंवा कोणी मध्यस्थ असू शकतो. पण प्रभू येशू व्यतिरिक्त मनुष्य आणि परमेश्वर देव ह्यांमध्ये कोणीही मध्यस्थ नवीन कारारानंतर झाला नाही. जुन्या करारात मुख्य याजक हा वर्षातून एकदा लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित म्हणून कोकऱ्याचे/बकऱ्याची रक्त घेऊन परम पवित्र स्थनात (म्हणजेच देवापुढे) जाऊन मध्यस्थी करत असत. (लेवीय ४ अध्याय - पापार्पणे वाचा) पण तिथेही मुख्य याजकाला पापक्षमा करण्याचा अधिकार नव्हता. तो फक्त एक मध्यस्थाचे काम करत असे.

महत्वाचे म्हणजे त्या अर्पणाने (कोकऱ्याचे/बकऱ्याची रक्त) मनुष्यांची पापे केवळ झाकली जात होतीकायम पुसली जात नव्हती. त्यामुळे ते पाप तसेच रहायचे (पण झाकलेले). परत तो मुख्य याजक हा स्वतःला काटेकोरपणे शुद्ध राखत असे. (लेवीय १६ व २१ अध्याय - याजकाचे पावित्र्य वाचा) सर्व अशुद्ध विधीपासून स्वतःला अलिप्त ठेवत असे. कारण जर त्याच्यात एक जरी दोष असून जर त्याने परम पवित्र स्थानात प्रवेश केलाच (जेथे स्वतः परमेश्वर उतरत असे)तर तो तेथेच मरून पडत असे; कारण ते स्थान अति पवित्र असे होते. परमेश्वरापुढे कोणतेही पाप व अशुद्धता टिकू शकत नाही.

आता इथे प्रश्न असा येतो की आजच्या युगातील जे धर्मगुरू जे लोकांचे पाप क्षमा करण्यास सरसावतात, ते स्वतःच्या शुद्धते बाबत किती खात्री देऊ शकतात ? काय त्यांच्या स्वतःची पाप क्षमा झाल्याची त्यांना खात्री आहे का कारण शास्त्र आपल्याला म्हणते की देवापुढे सर्व मनुष्य हे पापी आहेत व ते सर्व देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. कारण मनुष्य वासनेने जन्मलेला प्रत्येक मनुष्यांत पाप आढळते हे आपण अगोदरच पहिले आहे. मग हे आजच्या युगांतील सर्व धर्मगुरू पण पापी आहेत असे बायबल म्हणते. (रोमकरांस पत्र ३:२३-२४ वाचा)

रोमकरांस पत्र ३:२३-२४
"कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत;

आणि मग स्वतः पापी असतानाआजचे धर्मगुरू इतरांचे पाप क्षमा कसे काय क्षमा करू शकतात ? हाच एक मोठा प्रश्न आहे.

त्याउलट नवीन करारात आपण वाचतो की येशूने अनेकांची पापे पुसून त्यांच्या पापांची क्षमा केली. आता हे कसे काय शक्य आहे तर ह्याचे उत्तर हे आहे की,  येशू ख्रिस्त म्हटल्या शरीरात स्वतः परमेश्वर देव पृथ्वीवर अवतरला होताम्हणून तो पापांची उघड आणि सर्रासपणे क्षमा करू शकत होता. तो स्वतः नवीन करारातील मुख्य याजक व मध्यस्थ बनून आला आणि सर्व लोकांच्या पापांसाठी त्याने प्रायश्चित म्हणून स्वतःचेच पवित्र रक्त अर्पण केले. (इब्रीकरांस  अध्याय वाचा) तेथे येशूच स्वतः याजक होता व अर्पणाचा कोकरा हे दोन्ही पण तोच होता. (योहान १:२९ वाचा) आता तोच आपल्या सर्व मनुष्यांच्या पापांसाठी स्वर्गात मध्यस्थी करणारा याजक आहे. (इब्रीकरांस पत्र १०:२१ वाचा)

योहान १:२९
दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो (बाप्तिस्मा करणारा योहान) म्हणालाहा पाहाजगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!!”

इब्रीकरांस ७:२६-२७
"असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होतेतो पवित्रनिर्दोषनिर्मळ, असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहुन उंच करण्यात आलेला आहे.

त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठीमग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही,कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदांच करून ठेवले आहे."

इब्रीकरांस पत्र १०:२१
"आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे;"

ह्या प्रमुख याजकाला  (म्हणजे प्रभू येशूला) जुन्या करारातील याजकाप्रमाणे स्वतःच्या शुद्धीसाठी व लोकांच्या म्हणजे तुमच्याआमच्या पापांसाठी प्रतिदिवशी अर्पण करण्याची गरज नाहीकारण त्याने स्वतःलाच अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. (यशया ५३:१२१ तीमिथ्याला पत्र २: ५रोमकरांस पत्र ८:३४इब्रीकरांस पत्र ७:२५१ योहान २:१रोमकरांस पत्र ११:२७ वाचा) तसेच त्याला स्वतःला शुद्ध करण्याची त्याला गरज नव्हती; कारण तो सर्वांगी शुद्ध व पवित्र असा होता व त्याने कोणतेही पाप केले नाही (१ पेत्र २:२२ वाचा)येशू स्वतःने त्याचा तो पापक्षमेचा अधिकार लोकांसमोर पुन्हा पुन्हा विदित केलेला आपण वर वाचतो.

१ तीमिथ्याला पत्र २ : ५
कारण एकच देव आहेआणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशु हा मनुष्य एकाच मध्यस्थ आहे".

रोमकरांस पत्र ८:३४
"तर दंडाज्ञा करणारा कोणजो मेळा इतकेच नाही,तर मेलेल्यांतून उठला आहेजो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीहि करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे."

१ पेत्र २:२२


"त्याने पाप 'केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही."

इब्रीकरांस पत्र ७:२५
"ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहेकारण त्याच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.”

१ योहान २:१
"...जर कोणी पाप केलेतर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे,"

यशया ५३:१२
".....त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली."

रोमकरांस पत्र ११:२७
"जेव्हा मी त्यांची पापे हरण करीनतेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल."

तसेच  देव आणि मनुष्यांमधील मध्यस्थ स्वतः पापविरहित असला पाहिजे; कारण कोणीही पापी मनुष्य देवापुढे उभा राहू शकत नाही. येशू सोडून अन्य कोणाही मनुष्याचा पापविरहित जन्म झाला नाहीसर्व मनुष्यजात ही शरीराच्या वासनेने उत्पन्न झाली असून पापी आहे. आजच्या काळांतले स्वतःला याजक म्हणवणारे धर्मगुरू पापविरहित आहे का त्यांना त्यांच्या निर्दोषतेबद्दल खात्री आहे का तर नाही.

त्यामुळे केवळ देव आणि मनुष्य ह्यांमधे केवळ येशूच मध्यस्थी करू शकतो आणि पर्यायाने तोच केवळ पापक्षमा करू शकतो.


प्रभू येशूच मनुष्यांच्या पापांसाठी रक्ताची खंडणी अर्पिल्यामुळेतोच केवळ मनुष्याचे पापक्षमा करू शकतो

ज्या माणसाने मनुष्यांच्या पापांसाठी खंडणी भरली तोच केवळ पापक्षमा करू शकतोआणि तो व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त!! मनुष्यांना खरी आणि परिपूर्ण शांती व अनंतकाळचे जीवन मिळण्याची शाश्वती केवळ येशू ख्रिस्ताने मनुष्यांच्या पापासाठी मोजलेली खंडणी ह्याच्याचद्वारे आहे. प्रेषित पौल रोमकरांस पत्रात हेच स्पष्ट करतो. (रोमकरांस पत्र ५:१, इफिसकारांस पत्र १:७ वाचा )

रोमकरांस पत्र ५:१
"म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे."

इफिसकारांस पत्र १:७ वाचा 

"त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या  ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली  मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे."

कोणत्या धर्मगुरु किंवा कोणता प्रचारक मनुष्यांच्या पापांसाठी आजपर्यंत मेला / मारला गेला आहे एकही नाही. म्हणून ते कोणीही मनुष्याचे पापक्षमा करू शकत नाहीत. केवळ प्रभू  येशुनेच मनुष्यांच्या पापांसाठी मरण पत्करले आणि म्हणून त्यांचे पापही केवळ तोच माफ करू शकतो.

मग योहान २० :२३ ह्या वचनाचे काय ?

आजच्या ख्रिस्ती जगतात रोमन कॅथोलिक व लुथरन पंथीय परमेश्वराने त्यांना पापक्षमेचा अधिकार धर्मगुरू (धार्मिक पुढारी -प्रचारकफादरबिशपपोप इत्यादीह्यांना दिला आहे म्हणून मानतात; आणि म्हणून ते लोकांचे पापे जाणून घेऊन त्यांना क्षमादान देऊ शकतातत्यासाठी ते पवित्र शास्त्रातील योहान २०:२३ हा संदर्भ पुढे करताततो संदर्भ नक्की काय म्हणतो हे आपण पाहू या.

योहान २० :२३
"ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करितां त्यांची क्षमा झाली आहेआणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत."

ह्या वचनात कुठेच केवळ धर्मगुरूंनाकिंवा धार्मिक पुढाऱ्यांना पापक्षमा करायला सांगितले नाही. म्हणजेच हे वचन जसे धर्मगुरूंना तसेच सामान्य लोकांनाहि लागू आहे. मग धार्मिक धर्मगुरू आपल्याला पापक्षमेचा विशिष्ट अधिकार आहे असे कसे म्हणतात ? मुळांत देवावाचून कोणीही पापक्षमा करू शकत नाही. ह्या वचनाचा खरा अर्थ हा आहे कीयेशूने त्यांना आप-आपसात एकमेकांना क्षमा करण्यास सांगितले आहे.

येशूने शिष्यांना प्रार्थना करताना हेच शिकवले होते की 'जसे आम्ही इतरांचे पापक्षमा करतोतसेच तू आमचे पापक्षमा कर'. (मत्तय ६:१२ वाचा)

मत्तय ६:१२
“…आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हांस सोड;”

जेथे प्रभू येशूनेच शिकवले की पापक्षमेची विनंती परमेश्वराकडे करातेथे हे धर्मगुरू लोकांना भुलवून त्यांचे पापक्षमा करायला स्वतःला पुढे करून खुद्द येशूला खोटे ठरवू पाहत आहेत. प्रभू येशू मत्तय शुभवर्तमानातहि (कृतघ्न चाकराचा दृष्टांत - मत्तय १८:२१- ३५ वाचा) आणि मार्क शुभवर्तमानातहि परत तेच आज्ञापितो. (मार्क ११:२५-२६ वाचा)

मार्क ११:२५-२६
"आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा कराअशासाठी कीतुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.

इथे प्रभू म्हणतो कीतुमच्या अपराधांची क्षमा व्हावी म्हणून प्रथम तुम्ही इतरांचे पापांची क्षमा करा. इथे "इतरांचे" म्हणजेच आपसांत एकमेकांना क्षमा करण्यास येशूने आज्ञापिले आहे आणि ह्यांचप्रमाणे योहान २०:२३ मध्येहि त्याचा हाच संदेश आहे. त्याबरॊबरच ह्याठिकाणी प्रभू येशू हेही म्हणतो की'जर तुम्ही इतरांचे पाप क्षमा करणार नाहीतर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही'. इथेही हेच स्पष्ट होते की अंतिम पापक्षमा करण्याचा अधिकार फक्त देवाकडे (म्हणजेच येशूकडे) आहे. 

म्हणजेच पापक्षमा कोण करतो तर स्वर्गीय पिता!!! कोणीहि मनुष्य नव्हे.

जरी आपण काही वेळ मान्य केले की येशूने त्यांना (धर्मगुरूंना) पापक्षमेचा अधिकार दिला आहे (जो मुळांत दिला नाही), तर मग प्रेषितांनी पण इतरांची पापे क्षमा करायला हवी होती. पण बायबलमध्ये कुठेही कोणत्याही प्रेषिताने कोणाचेहि पाप क्षमा केले नाहीत. त्यांनी लोकांना पापक्षमेसाठी येशूकडेच निदर्शित केले.

त्याबरोबरच प्रेषित पौल असेहि म्हणतो की जशी देवाने ख्रिस्ताद्वारे तुम्हांला क्षमा केलीतशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा. (इफिसकरांस पत्र ४:३२ वाचा)

इफिसकरांस पत्र ४:३२
"... जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केलीतशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा."

कलससैकरांस पत्र ३:१३
"एकमेकांचे सहन कराआणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा कराप्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा;"

म्हणजेच एकतर प्रेषित येशूची ही आज्ञा (योहान २० :२३) समजण्यास कमी पडले असावेकिंवा येशूचे प्रेषितांपेक्षा आजच्या धार्मिक पुढार्यांना शास्त्र जास्त कळते असेच म्हणावे लागेलजे कोणत्याही दृष्टीने योग्य होणार नाही!!! म्हणजेच ह्या वचनाचा खरा अर्थ हा आहे कीयेशूने त्यांना आप-आपसात एकमेकांना क्षमा करण्यास सांगितले आहे.

मग काय आजचे पापक्षमा करणारे धर्मगुरू चुकत आहेत ?

होय!! असेच म्हणावे लागेल. सत्य हे आहे की आजचे धार्मिक पुढारी व धर्मगुरू हे येशूच्या काळांतील शास्त्र्यांसारखे आहेतज्या विषयी प्रभू येशूनेहि सावध राहायला सांगितले आहे.  (मत्तय २३ :१३ वाचा)

मत्तय २३ :१३
"अहो शास्त्र्यांनोअहो परूश्यानोढोंग्यांनोतुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करितां तुम्ही स्वतःहि आंत जात नाही व आंत जाणाऱ्यांनाहि आंत जाऊ देत नाही. "

त्यांना स्वतःच्या पापक्षमेबद्दल शाश्वती नाही आणि वरून ते इतरांचे पाप क्षमा करावयास स्वतःला पुढे करतात. ते त्यांच्या मानवी बुद्धीवर आधारित अशा चुकीच्या शिकवणीने लोकांना भुलवतात. रोमन कॅथॉलिक चर्च ज्या तात्विक आधारांवर पापक्षमा करण्याचा अधिकार सांगतातते तत्व बायबलमधील वचनांवर कमी आणि मनुष्यांच्या तत्वज्ञानांवर (म्हणजेच धर्मशिक्षण ज्याला इंग्रजीत "Catechismम्हणतात) जास्त आधारलेले असे आपण पाहतो. प्रभू येशूने मार्क शुभवर्तमानात आपल्याला ह्याविषयी आगाऊच सावध केले आहे.

मार्क ७:७ वाचा
"ते व्यर्थ माझी उपासना करितातकारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतातते असतात मनुष्यांचे नियम."

ह्यामुळे ते स्वतःचे व लोकांच्या पण पतनांस कारणीभूत ठरतात; अशामुळे ते लोकांना पापक्षमा व पर्यायाने सार्वकालिक जीवनात जाण्यापासून रोखतात.

ह्यां सर्व वाचनाच्या आधारे  पाप क्षमा केवळ प्रभू येशू  ख्रिस्ताकडेच मागातोच तुमचे पापक्षमा करण्यास समर्थ आहेकोणी धर्मगुरूप्रचारक धार्मिक नेतेबिशप इत्यादी कोणीही नाहीकारण ते स्वतः पापी आहेत.



सारांश: ह्या सर्व वरील पवित्र शास्त्रातील संदर्भावरून आपल्याला हे स्पष्ट होते कीअसा एकच व्यक्ती आहे जो मनुष्यांची पापे क्षमा करू शकतोअसा एकच व्यक्ती आहे ज्याने आपल्या पापांसाठी खंडणी भरली आहे; तोच केवळ एक मध्यस्थ व सार्वकालिक जीवन देणारा, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त!!!! आणि ती पापक्षमा मनुष्यांना प्रभू येशू ख्रिस्तावर व त्याच्या त्या कालवारीवर केलेल्या अर्पणावर ठेवलेल्या विश्वासाने मिळते
म्हणून पाप क्षमा केवळ प्रभू येशू कडेच मागातोच तुम्हांला नीतिमत्व (पापे क्षमा होणे) प्रदान करण्यास समर्थ आहेकोणी धर्मगुरूप्रचारकधार्मिक नेतेबिशप इत्यादी कोणीही पापक्षमा करण्यास समर्थ नाही. आमेन




सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.

Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                                  

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक