Monday, 1 August 2016

Christian Gospel - "Original Sin" - मूळ पाप

मूळ पाप "Original Sin?"


पार्श्वभूमी: वर्षानुवर्षे आम्हां ख्रिस्ती श्रद्धावंतांना हे शिकवले गेले व आपण असा की विश्वास ठेवला कीआपले आद्य पालक आदाम व हव्वा ह्यांनी एदेन बागेच्या मध्यभागी असलेल्या वृक्षापासून सफरचंद खाल्ले; जे खाण्यास देवाने त्यांना निषिद्ध केले होते. म्हणून त्यांच्या ह्या आज्ञाभंगाच्या पापामुळे संपूर्ण जग पापात पडले गेले.

पण ह्यांत लोकांच्या मनात अनेक असे प्रश्न उपस्थित होतात ते असे कीसफरचंदाचा व पापाचा काय संबंधआज जेव्हा आपण सफरचंद खातो तेव्हा आपण पाप करतो असे आपल्याला तरी जाणवत नाही. मग उत्पत्तीच्यावेळी सफरचंद खाल्याने पाप कसे झाले ? तसेच ते सफरचंद खरंच सफरचंद होते कि अजून काय होते ? आजच्या ह्या पोस्टमध्ये ह्याविषयी सविस्तर माहिती घेऊ या. 

आदाम व हव्वेने खरंच एक सफरचंद खाल्ले होते काय ?

आता ह्या ठिकाणी एक सफरचंदच का असावे जेव्हा देवाच्या वचनात सफरचंदाचा उल्लेख त्याआधी कुठे झाला नाही ? बायबल आपल्याला सांगते कि देवाने त्यांना बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खायला निषिद्ध / माना केले होते. (उत्पत्ति २:१६-१७ वाचामग येथे सफरचंदाचा उल्लेख कुठून होऊ लागला ह्याचा काहीहि संदर्भ शास्त्रात सापडत नाहीमुळांत सत्य हे आहे की, एक सफरचंद खाल्ल्यामुळे समस्त मानव जातीचे पतन झालेलं नाही.  

उत्पत्ति २:१६-१७
"तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेच्छ खापण बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नकोकारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील."

ज्यामुळे मनुष्य पापांत पडला ते जर सफरचंद नव्हतेतर मग ते नक्की काय होते ?

तो एक व्यभिचार होता!!!

व्यभिचाराचा अर्थ: आपल्या पतीबरोबर /पत्नीबरोबर केलेला अप्रामाणिकपणा.

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेलपण सत्य हे आहे कीहव्वा - आपली आध्य आई हिने सर्पाशी संभोग किंवा व्यभिचार केला; आणि आदाम तिच्या त्या पापांचा सहभागी झाला. ह्या व्यभिचारामुळे आणि पर्यायाने देवाच्या आज्ञेचा भंग केल्यामुळे त्या दोघांचेम्हणजे आदाम व हव्वा ह्यांचे पतन झालेकुठल्याही सफरचंदाने किंवा इतर कोणत्याही फळाने नाही !! ह्या आज्ञाभंगामुळे व पतनामुळे ह्या जगात पाप शिरले आणि पर्यायाने जग व जगातील मानव जातीसह सर्वस्ववार देवाचा शाप आलाजो आजवर तसाच चालू आहे.

सर्प बीज

इथे आपल्याला सर्प बीजाचा खरा अर्थ आणि प्रत्येक्षात एदेन बागेत नक्की काय घडले ह्याचे प्रकटीकरण मिळते. शास्त्र आपल्याला सांगते की हव्वेला सापाने भुरळ घालून फसविले. मुळांत  इथे सापाने हव्वेला फसविले म्हणजेच हव्वेला भ्रष्ट केले.

शास्त्रात आपण वाचतो कीसैतानाची स्वर्गात परमेश्वर देव व त्याचा आद्य देवदूत मिखाइलपेक्षाही स्वत:चे एक मोठे राज्य तयार करण्याची महत्वाकांक्षा होतीज्यात त्याने देवाविरुद्ध बंडाळी केली; आणि त्यामुळे त्याला व त्याला ह्या बंडाळीत साथ देणाऱ्या इतर असंख्य दूतांना स्वर्गांतून खाली म्हणजे पृथ्वीवर टाकण्यात आले.

आपल्या ह्या पतानाचा सैतानाला बदला हवा होताआणि म्हणून तो या पृथ्वीवर आपल्या वाईट योजना राबवू पाहत होता. त्यासाठी त्याने देवाचा पृथ्वीवर येऊ घातलेला संकल्प त्याने भ्रष्ट करण्याचे ठरविले.

हा देवाचा संकल्प सैतानाने तो स्वर्गात असताना पहिला होता. परंतु हा संकल्प भ्रष्ट करणे तसे सोपे नव्हते हे तो जाणून होता. ह्या कारण आदाम हा पृथ्वीवर देवाच्या पुत्र म्हणून होताजो सर्वस्वी सिद्ध पुरुष होता. त्याला पृथ्वीवरील सर्व गोष्टींवर अधिकार होता. ह्या आदामाला तो कधीच फसवू किंवा भ्रष्ट करू शकत नव्हताहे सैतान पूर्णपणे जाणून होता. पण स्त्री - म्हणजे हव्वा, ही देवाची सिद्ध इच्छेने झाली नव्हतीकारण ती आदामानंतर घडविली गेली होती. आणि ह्याचा कारणामुळे ती काहीशी कमकुवत होती. सैतानाने हे अचूक हेरले होते; व त्याने स्त्रीला फसविण्याचा संकल्प आखला. 

आता हे जाणून घेणे महत्वाचे आहे कीदेवाप्रमाणे सैतानही एक आत्मा आहे. ह्या आत्म्या रूपाने सैतान मनुष्यांशी शारीरिक संबंध करू शकत नव्हता आणि त्याला मनुष्यांना आत्मिकरित्या भ्रष्ट करणे शक्य नव्हते. त्यासाठी सैतानाला एका शरीराची गरज लागणार होती. पण एदेन बागेत आदाम आणि हव्वा सोडून इतर कोणीही मनुष्य नव्हते; कारण बाकी सर्व प्राणीमात्र होते. म्हणून त्याचा तो दुष्ट उद्देश साध्य करण्यासाठी सैतानाला केवळ एकमेव मार्ग दिसत होतातो म्हणजे एदेन बागेत सर्प म्हटलेल्या प्राण्यात प्रवेश करणे !

मनुष्यांप्रमाणे प्राण्यांना आत्मा नसतो हे जरी खरे असले तरी पण कोणताही आत्मा कोणत्याही प्राण्यांत शिरून त्याचा ताबा घेऊ शकतो. तसेच एदेन बागेत सर्प हा प्राणी मनुष्याच्या रूपाचा मिळताजुळता होता व मनुष्यांसारखा बोलू व विचार करू शकत होता. ह्यासाठी सैतानाने सर्पाच्या  ह्या शारीरिक वैशिष्ट्यांचा फायदा घेण्याचे ठरविले.

सैतान हा एक आत्मा आल्यामुळे त्याला हव्वे बरोबर थेट संबंध/ संभोग साधून तिला भ्रष्ट करून तिच्यात आपले दुष्ट बीज टाकू शकत नव्हता. त्यामुळे त्याने त्यासाठी सर्पाचा वापर केला. त्यात त्याने सापात शिरून सर्पाचा संपर्ण ताबा घेतला. त्यानंतर तो हव्वेला भुलविण्यासाठी योग्य वेळ शोधू लागला. कारण जोपर्यंत तिच्याबरोबर आदाम होता तोपर्यंत सैतान तिला कधीच भुलवू शकत नव्हताहे तो जाणून होता. म्हणून तो तिला एकटे असण्याची वाट पाहू लागला.

मनुष्यांच्या दुर्दैवाने त्याला ती संधी मिळालीच!!!! त्याने सर्पाद्वारे हव्वेला भुरळ (कामासक्त करून) घालून फसविले आणि तिच्याशी शारीरिक संबंध साधला. इथेच सैतानाने मनुष्यांजातीला भ्रष्ट केले. त्याच्याअगोदर हव्वे बरोबर आदामाने शारीरिक संबंध साधला नव्हताकारण  मनुष्यांची प्रजोत्पनासाठी देवाची तशी मूळ इच्छा नव्हती. सैतानाने मनुष्याचे बीज मनुष्यात पडण्याअगोदरत्यात सर्पाचे बीज मिसळून मनुष्यजातीला भ्रष्ट केले. (प्रजोत्पनासाठी देवाची कोणती इच्छा होती ती आपण पुढे पाहू या). ह्या शारीरिक संबंधातून / संभोगातून 'काईनहा जन्माला आला - ज्यामध्ये सैतानाचे पूर्ण आत्मिक व शारीरिक वैशिष्टयांबरोबर पशुवृत्ती (सर्पाची वृत्ती) आढळून आली.

आता कोणी म्हणेल की सैतानाने ह्या संबंधासाठी "सर्पाचाच" वापर का केला ?

ह्याचे उत्तर शास्त्रात सापडते (उत्पत्ति ३:१ वाचा). शास्त्र आपल्याला सांगते कि पृथ्वीवर सर्व प्राण्यांमध्ये साप हा फार धूर्त होता आणि मनुष्य व सापाच्या रूपात फार साधर्म होते.

उत्पत्ति ३:१
"परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचारांत सर्प फार धूर्त होता."

तो एक पशु असून सुद्धा मनुष्यांसारखा बोलू व विचार करू शकत होताइतका की तो जवळजवळ एक मनुष्यच होता. तो एक सरळ कण्याचा चिंपँझी (एक प्रकारचा वानर) व मनुष्य ह्यामधल्या रूपाचा होतापण त्यातल्या त्यात तो मनुष्याच्या रूपाचा मिळताजुळता होता. महत्वाचे म्हणजे तो इतका मनुष्यांसारखा होता कि त्याचे बीज मनुष्यांच्या बीजांशी जुळत होते व ते जुळलेही !!! ह्यांतून हव्वेला गर्भ राहिला आणि काईनहा जन्माला आलाजो सैतानचे बीज होता. आणि काईनापासून पाप जगात प्रथम अस्तित्वात आले. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की काईन हा दुष्टाचा होता कारण त्याची कृत्ये ही दुष्ट होती. (१ योहान ३:१२ वाचा)

१ योहान ३:१२
"काईन त्या दूष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला…."

आता कोणी म्हणेल हे वरील गोष्ट खरी कशावरुन ?

१. सर्प बीजाचा उल्लेख
तर ह्याचे उत्तर आपल्याला उत्पत्ती ३ अध्यायामध्ये सापडते. (उत्पत्ति ३:१५ वाचा) येथे देव सर्पाला म्हणतो की मी तुझ्यामध्ये आणि स्त्रीमध्ये वैर स्थापीनतुझ्या आणि तिच्या (म्हणजे हव्वेच्या) संतती ह्यांमध्ये मी परस्पर वैर स्थपीन.

इंग्रज़ी भाषांतरामध्ये "Seed म्हणजे "बीज" म्हटलेलं आहे. आता हव्वेने जर सफरचंद खाल्लंआणि मग सर्पाचा आणि स्त्रीचा संबंध येतोच कुठून तर मग इथे आता ह्या ३ अध्यायामध्ये बीजाचा संधर्भ येतोच कुठून ? असे अनेक प्रश्न उभे राहतात. सत्य हेच आहे कीसैतानाने मनुष्याचे बीज मनुष्यात पडण्याअगोदरत्यात सर्पाचे बीज मिसळून मनुष्यजातीला भ्रष्ट केलेहेच तर शास्त्रातील ह्या ओळींमध्ये दडलेले प्रकटीकरण आहे; ते हेच की ते एक फळ (सफरचंद) नसून त्याचा अर्थ एक व्यभिचार म्हणून आहे.

उत्पत्ति ३:१५
आणि तू व स्त्रीतुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थपीनती तुझे डोके फोडलीतू तिची टांच फोडिशील."

२. मनुष्याला तो नग्न असल्याचा आलेली प्रचिती

शास्त्रात असे लिहिले आहे की "त्यांनी ते फळ खाल्यावर लगेच त्यांना त्यांच्या नग्नतेचे ज्ञान प्राप्त झाले आणि त्यामुळे त्याच्या नग्नतेच्या लाजेने ते देवापासून लपले व त्यांनी आपली नग्नता झाकण्यासाठी अंजिराच्या पानांचे कटी वस्त्रे तयार केली. (उत्पत्ति ३:७-८ वाचा)

उत्पत्ती ३:६-७ वाचा
"तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसहि दिलेव त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यांस कळून आले;"

आता सफरचंद खाल्ल्याने अचानक नग्नतेची प्रचीती कशी काय येऊ शकते आणि त्यांना आपल्या गुप्तांग झाकण्याची गरज कशी काय भासू शकते ? ह्यावरून आपल्याला अधिक स्पष्ट होते कीते सफरचंद नसून तो एक व्यभिचार / संभोग होता!!!

स्त्रीचे बीज

स्त्री बीज ह्याचा शब्दशः अर्थ 'देवाचा मानवी देहामध्ये "पुनरुत्पादन" (Reproductionहे होतेतसेच सर्प बीज म्हणजे 'सैतान मानवी वंशामध्ये स्वत:चे अस्तित्व प्रकट करणे' हे होते. शास्त्र आपल्याला  सांगते की देवाने आपला आत्मा मनुष्यांत फुंकला (टाकला)म्हणून ते देवाची मुले गणली गेली होती. पण सैतान एक देवनिर्मित आत्मा असल्यामुळे देवासारखे मनुष्यांमध्ये आपले बीज टाकू शकत नव्हता. म्हणून त्याने ही वरील संकल्पना आखून आपले बीज मनुष्यांत (म्हणजे हव्वेत) टाकले;  म्हणजेच स्वतःला व आपल्यातील दुष्टपणाला मानवजातीत सामील केले. थोड्याक्यात म्हणायचे तर सैतानाने देवाच्या नंदनवनात निंदणाचे बीज पेरले.

हेच प्रभूं येशुने तो जगात असताना त्याने सांगितलेल्या "निंदणाचा दृष्टांतात" स्पष्ट केले आहे. (मत्तय १३:३८ वाचा) सैतानापासून जन्माला आलेला काईनाला "सर्प बीज" म्हटले आहे.

मत्तय १३:३८
"शेत हे जग आहेचांगले बी हे राज्याचे पुत्र आहेतनिंदण हे त्या दृष्टाचे पुत्र आहेतते पेरणारा वैरी ब सैतान आहेकापणी ही युगाची समाप्ति आहेआणि कापणारे हे देवदूत आहेत;"

हव्वेच्या प्रेमामुळे आदामही पापांत पडला गेला

आता कोणी म्हणेल हव्वे फसूंन  व्यभिचार केला होता नामग आदाम कसा काय पापांत पडला. तर शास्त्र आपल्याला सांगते कीस्त्रीने ते फळ खाल्ले व नंतर येऊन तिचा पती आदाम ह्यालाहि ते दिले. (उत्पत्ती ३:६ वाचा) जे त्यानेहि खाल्ले. म्हणजेच त्यानेहि तिच्याशी शारीरिक संभोग केला. आणि इथेच तोहि पापांत पडला. त्याने हव्वेच्या प्रेमापोटी हे केले. 

उत्पत्ती ३:६ वाचा
"तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसहि दिलेव त्याने ते खाल्ले."

मनुष्य आणि प्राणी ह्यामधील तुटलेली उत्क्रांत साखळी

ह्या आज्ञाभंगामुळे देवाने आदाम आणि हव्वा ह्यांना एदेन बागेंतून बाहेर घालविले आणि त्यांना शाप दिला. त्याबरॊबर त्याने सर्पालाही शाप देऊन त्याच्या रूप कायमचे पालटून टाकले. हव्वा आणि सैतानामध्ये हे अनैतिक कृत्ये घडल्यानंतर, देवाने सर्पाला शाप दिला. त्याने सर्पाचे संपूर्ण रूप बदलून टाकले. सर्प जो रूपाने मनुष्याच्या फार जवळचा असा होतात्याचे सर्व हाडं देवाने बदलून त्याला आताच्या रुपात म्हणजे पोटावर रांगणारा प्राणी केलेआणि देव त्याला शाप देऊन म्हणाला की "तू हे कृत्य केले म्हणून तू सर्व प्राण्यांमध्ये शापग्रस्त असा होशील व पोटावर चालशील व आयुष्यभर माती खाशील." (उत्पत्ति ३:१४ वाचा)

उत्पत्ति ३:१४
"तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणालातू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यांपेक्षा तू शापग्रस्त होतू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील;"

आजच्या युगातील विज्ञानाने कितीही शोध लावायचा प्रयत्न केला, तरीहि त्यांना मनुष्य व प्राणी ह्यांमधील त्या गायब साखळीचा शोध लागायचा नाहीह्याची देवाने तरतूद देवाने अगोदरच करून ठेवली आहे. पण हे सत्य जे आपल्याला आज प्रकट झाले आहे की, खरंच मनुष्य व प्राणी ह्यांचे एकेकाळी मिलन झाले होतेज्यावेळी हव्वा ही जीवनाच्या मार्गापासून बहकली होती.

मनुष्याच्या प्रजोत्पनाची देवाची असणारी इच्छा

ह्यासाठी आपल्याला देवाने आदामाला कसे निर्माण केले ते पाहणे गरजेचे आहे. आपण पाहतो देवाने आदामाला आपल्या मुखांतुन निघणाऱ्या शब्दाने उत्पन्न केले.  त्याचे शरीर मातींतुन उत्पन्न केले गेले होते. म्हणून देवाची आदामाच्या संततिच्या प्रजोत्पनबद्दलसुद्धा हीच मूळ संकल्पना होती. देवाची इच्छा होती की मनुष्याने त्याच्याप्रमाणे शब्द बोलून आपली संतती उत्पन्न करावी. पण सैतानाने ती संकल्पनाच भ्रष्ट करून मनुष्यांस शारीरिक संभोगातून प्रजोत्पनाची पद्धत दाखविली.

ह्या आज्ञाभंगाचे परिणाम म्हणजे मनुष्य व पृथीववर आलेला देवाचा शाप

ह्या मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळेदेवाने त्यांना शाप दिला. त्याने मनुष्यांबरोबर त्या सर्पास शाप तर दिलाचपरंतु संपूर्ण श्रुष्टीसहि शाप दिला. देवाने हव्वेला तिने एक सफरचंद खाल्यामुळे अजून सफरचंद खाण्याचा शाप दिला नाही. तर तिचे दुःख त्याने वाढवूनतिला क्लेशाने लेकरे प्रसावण्याचा शाप दिला; कारण हव्वेने लेकरे प्रसावण्याचा चुकीचा मार्ग निवडला होता; जो देवाच्या सिद्ध इच्छेप्रमाणे नव्हता. (उत्पत्ति ३: १६ वाचा) देवाचा मूळ संकल्प हा होता की मनुष्याने त्याच्यासारखे शब्दाने आज्ञा करून लेकरे निर्माण करावेतकारण देवाने अगोदर आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने मातींतून मनुष्य आदाम घडविला होता.

उत्पत्ति ३: १६
"तो स्त्रीला म्हणालामी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणीत करीनतू क्लेशाने लेकरे प्रसवशीलतरी तुझा ओढा नावऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील."

मनुष्यांच्या पापांमुळे भूमीवरही शाप आलाआणि तीच पृथ्वी अजूनपर्यंत त्या शापाखाली आहे. ती त्यावेळेपासून काटे कुसळे उगवू लागली. देवाने त्या दोघांना एदेन बागेंतून बाहेर घालवून दिले. (उत्पत्ति ३:२३ वाचा)

उत्पत्ति ३:२३
"यास्तव ज्या जमिनींतून त्यास उत्पन्न केले होतेतिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्यांस एदेन बागेंतून बाहेर काढून लाविले."

मनुष्य आणि देव ह्यांमधले नाते तुटले गेले

ह्या आज्ञाभंगामुळे देवाचे आणि मनुष्यांचे संबंध तुटले गेले. जी सहभागीता देवामध्ये व आदाम-हव्वा ह्यांमध्ये होत होती ती थांबली; कारण मनुष्य पापी होऊन अशुद्ध झाला होता व देव निष्पाप असून शुद्ध होता. त्या दोघांमध्ये एक आड भिंत उभी राहिलीजी आजपर्यंत आहे. ह्याच कारणामुळे आपण आजपर्यंत देवाला पाहू शकत नाही. एका मनुष्यामुळे जगात पाप आले. (हव्वा ही सुद्धा आदमामध्ये गणली जातेकारण ती आदामातून निर्माण केलेली होती) देवापासून मनुष्य तुटल्यापासून मनुष्यांवर पापाने आणि पर्यायाने मृत्यूने सत्ता मिळविलीआणि मूळ अमरत्व परिधान केलेला मनुष्य मर्त्य बनला.

पृथ्वीवर झालेली मनुष्यांची प्रजोत्पनाची

ह्यानंतर हव्वेद्वारे काईन व हाबेल हे दोघे जन्मांस आले. त्यातला काईन त्या दुष्टचा (म्हणजेच सर्पापासून सैतानाचा होता) व त्याची कृत्ये दुष्ट होती. (१ योहान ३:१२ वाचा). परंतु हाबेल हा आदामापासून (म्हणजेच आदामाचे बीज होता) असून  मेंढपाळ होता. इथे सैतानापासून व आदामापासून म्हणजे त्यांच्या बीजाद्वारे जन्मलेले असे हे दोघे आहेत. नंतर आपण वाचतो की ह्याच काईनाने इर्षेस पेटून आपल्या भाऊ हाबेल ह्याचा खून केला. हाबेलानंतर आदामापासून शेथ जन्मांस आला. (उत्पत्ति ४:२५-२६ वाचा) त्यानंतर काईन आणि शेथापासून सर्व मानवी प्रजा निर्माण झाली जी आजपर्यंत चालत आहे.

इथे महत्वाचा मुद्धा हा आहे की ह्यांच्याबरोबर उत्पत्तीतले पाप आजपर्यंत चालत आले. म्हणून आपण सगळे देवाच्या दृष्टीने पापी गणले जातो. ही पापीवृत्तीहा देहस्वभावहा रागही ईर्ष्याहा खुनशी स्वभाव जो आपल्यात आढळतो व त्याबरोबर आपल्यात आढळणारे सर्व रोग व पीडा व मृत्यू हे सर्व त्या काईनाची (पर्यायाने सैतानाची) देणगी आहेत.

१ योहान ३:१२
"काईन त्या दूष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे."

मग काय मनुष्याचे व देवाचे संबंध पुन्हा कधीच जुळणार नाहीत का ?

आपला परमेश्वर एक दयावंत देव आहे. म्हणून उत्पत्तीत मनुष्यांबरोबर तुटलेले संबंध पुन्हा नव्याने जोडण्यासाठी त्याने एक महान मुक्तीचा संकल्प योजला.

तो संकल्प  म्हणजे "ज्या एका मनुष्याद्वारे (म्हणजेच आदामाद्वारे) मनुष्यांत पाप आले, तशाच एका मनुष्याद्वारे (म्हणजेच येशू ख्रिस्ताद्वारे) मनुष्यांस जीवन आणि ते म्हणजे सार्वकाळीक जीवन मिळावे." ( रोमकरांस पत्र ५:१९इफिसकरांस पत्र  २:१३-१६ वाचा)

रोमकरांस पत्र ५:१९
"कारण जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होतेतसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील."

इफिसकरांस पत्र  २:१३-१६
परंतु जे तुम्ही पूर्वी 'दूरहोता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या रक्ताच्या योगे 'जवळचेझाला आहा. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहेत्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पडलीत्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्रह्यासाठी कीस्वतःच्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावीआणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्यांच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा ; ....कारण त्याच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणां उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. "


परमेश्वर देवाने स्वतः पृथीवर मनुष्यांचा जन्म घेऊन 'येशूहे नाव धारण केलेत्याच येशूच्या शरीराने त्याने मनुष्यांच्या आज्ञाभंगाच्या दोषासाठी बलिदान दिले त्याच्या ह्या बलिदानाने देवाचे मनुष्यांबरोबर तुटलेले संबंध पुन्हा नव्याने जोडले गेले आहेत; व त्याचबरोबर सर्व मनुष्यांसाठी तारणाचा मार्ग खोलून दिला (रोमकरांस पत्र ५:- वाचा) ते कसे ते आपण पुढ्याच्या भागात पाहू या.

सारांश: ह्या सर्व घटनांतून आपल्याला हे समजते की आपले पहिले आई हव्वा ही सफरचंद खाण्यामुले पापात पडली नसूनतर तिने सर्पाबरोबर (म्हणजेच सैतानाबरोबर) केलेला व्यभिचार/ शारीरिक संभोग ह्यामुळे पापात पडली. ह्या तिच्या (व आदामाच्या) आज्ञाभंगामुळे जगात आणि मनुष्यांत पाप शिरले. पापामुळे मनुष्याचे देवाबरोबरचे संबंध तुटले आणि ह्यामुळे सर्व रोगपीडा व मृत्यू मनुष्यांत शिरला आणि मूळ अविनाशी असा देवाचा पुत्र मनुष्य विनाशी (मर्त्य) बनला.
परंतु मनुष्यांना त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करण्यासाठी परमेश्वर देव स्वतः 'येशू' बनून मनुष्य शरीरात ह्या पृथीवर अवतरला व त्याने आपले शरीर क्रुसावर अर्पण म्हणून दिले. त्याच्या ह्या बलिदानाने त्याने देवाचे आणि मनुष्यांचे तुटलेले संबंध पुन्हा नव्याने जोडून मनुष्यांना सार्वकालिक जीवन हे दान दिले. आमेन. 





सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.


Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved



                            

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक