खरे ख्रिस्ती म्हणजे कोण आहेत ? "Who are real Christians?"
व्याख्या: एक ख्रिस्ती व्यक्ती
किंवा इंग्रज़ीत ‘Christian’ ह्याचा
शब्द्कोषातील परिभाषाप्रामाणे अर्थ "प्रभू येशू
ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा अनुयायी किंवा ख्रिस्त येशूच्या शिकवणीवर आधारित धर्म" असा
आहे. पण वास्तवात ही वरील व्याख्या 'ख्रिस्ती असणे' ह्याचा
बायबलप्रमाणे खरोखर अर्थ मांडण्यात कुठेतरी कमी पडते. मुळांत "ख्रिस्ती"
ह्या शब्दाचा शब्दशः
अर्थ “ख्रिस्ताचे
अनुयायी असणे" किंवा "ख्रिस्ताच्या पक्षाच्या असणे.” इथे
संबोधलेला ख्रिस्त म्हणजे स्वतः "प्रभु
येशु ख्रिस्त "
मग खरे ख्रिस्ती कोण आहेत?
पवित्र शास्त्राप्रमाणे "प्रभु येशु ख्रिस्ताच्या
आत्म्याने चालणारे मनुष्य हेच खरे ख्रिस्ती
आहेत. म्हणजेच ज्या मनुष्यांमध्ये ख्रिस्ताचा आत्मा वसतो तेच स्वतःला ख्रिस्ती म्हणू शकतात. (रोमकरांस पत्र ८: १४). त्या
मनुष्यांमध्ये येशूचे सर्व गुण आढळून येतात. एक
खरा ख्रिस्ती खरंच देवाचे मूल आहे, देवाच्या
खऱ्या कुटुंबाचा एक भाग व त्यालाच ख्रिस्ती नाव
लागते.
रोमकरांस
पत्र ८:१४
"कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत."
------------------------------------------------------------------------------------------------------
उगम: बायबलमध्ये 'ख्रिस्ती' हा
शब्द पहिल्यांदा अंत्युखियामध्ये उदयास आला, जेथे येशू
ख्रिस्ताच्या अनुयायांना पहिल्याने "ख्रिस्ती" म्हणून संबोधिले गेले
होते, कारण
त्यांची वागणूक, कृती
आणि भाषण येशू ख्रिस्तासारखे होते. (प्रेषितांची कृत्ये ११:२६ वाचा) याव्यतिरिक्त "ख्रिस्ती"
हा शब्द बायबलमधील नवीन करारामध्ये अजून दोन वेळा वापरलेला आहे. (प्रेषितांची
कृत्ये २६:२८, १
पेत्र ४:१६).
प्रेषितांची
कृत्ये ११:२६
"... आणि शिष्यांना "ख्रिस्ती" हे नांव पाहिल्याने अत्युखियात मिळाले."
पेत्र
४:१६
"ख्रिस्ती ह्या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू
नये; या नावामुळे देवाचे गौरव करावे."
कालांतराने, "ख्रिस्ती" ह्या शब्दाने दुर्दैवाने त्याचे खूप महत्व गमावले
आहे आणि तो अनेकदा कोणा धार्मिक व्यक्ती किंवा कोणा उच्च नैतिक मूल्ये असणऱ्या
व्यक्तीसाठी ज्याला कदाचित येशू ख्रिस्ताचा खरा अनुयायी म्हणता येणार
नाही, त्यासाठी
वापरला जातो.
'ख्रिस्ती' हा
एक धर्म नसून एक ‘जीवनशैली’ आहे
आज
जगात असे अनेक लोक स्वतःला ख्रिस्ती मानतात जे प्रत्येक्षात खर्या अर्थाणे येशू
ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवत नाहीत. त्याचप्रमाणे अनेक लोकं ते रविवारी नियमितपणे
चर्च ला जतात म्हणून स्वतःला ख्रिस्ती समजतात. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्ष्यात
घेतली पाहिजे ती ही आहे कि, चर्चमध्ये
जाऊन, गौर -गरिबांची
केलेली सेवा, किंवा
एक चांगला दानशुर मनुष्य असणे हे कोणाही मनुष्याला
"ख्रिस्ती" ठरवत नाही. तसेच गळ्यांत क्रुसाची ताईत
घालणे, एका
चर्चचे सभासद असणे किंवा नियमितपणे
मिस्साबलीला उपस्थित असणे किंवा चर्चच्या कामांत सहभागी असणे हेहि आपणाला "ख्रिस्ती" असे ठरवत नाही.
मुळांत ख्रिस्ती हा केवळ धर्म नसून ती एक जीवनशैली आहे व
जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. ती जीवनशैली म्हणजे स्वतः प्रभु येशू ख्रिस्ताची जीवनशैली; म्हणजेच त्याचा स्वभाव, त्याची चित्तवृत्ती व त्याचे सर्व गुण
ह्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याचे वर्तन असणे. थोडक्यात म्हणजे प्रभु येशु ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यानसमोर ठेवून त्याच्या
आत्म्याने चालविले जाऊन त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून आपले जीवन जगणे. महत्वाचे गोष्ट म्हणजे प्रभु
येशू ख्रिस्ताने कोणताही धर्म स्थापन केला नव्हता. हे सर्व धर्म व त्यातील पंथ हे
केवळ मनुष्यांची निर्मिती आहेत.
स्वतःला ख्रिस्ती म्हणविणारा मनुष्य येशू ख्रिस्तावर
विश्वास ठेवणारा असला पाहिजे
प्रेषित
पौलाने इफिसकरांस
पत्रात म्हटल्याप्रमाणे, कृपेनेच
विश्वासाच्याद्वारे (येशूच्या नावावर) तुमचे तारण झालेलं आहे. कोणा
मनुष्याच्या हातून नव्हे, तर
हे देवाच्या कृपेमुळे हे शक्य झाले आहे. (इफिसकरांस पत्र २:८ वाचा)
इफिसकरांस
पत्र २:८
"कारण कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि तुमच्या हातून
झालेले असे नाही, तर हे देवाचे दान आहे.”
एक
खरा ख्रिस्ती व्यक्ती हा आहे, जो
येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून त्याच्या कार्यात विश्वास आणि श्रद्धा ठेवण्याबरोबर
त्याच्या मरणांत आणि
पुनरुत्थानावर सुद्धा
विश्वास ठेवतो. प्रेषित योहान
म्हणतो कि, जितक्याने
त्याच्यावर (म्हणजे ख्रिस्तावर) विश्वास ठेवला, तितक्यांना
देवाने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला आहे. (योहान १:१२ वाचा) त्याचप्रमाणे जे
त्याच्या पवित्र आत्म्याने चालविले असे आहेत (रोमकरांस पत्र ८:१४ वाचा) तेच मनुष्य
ख्रिस्ताचे मुले म्हणून गणले जातात; आणि तेच
खरे ख्रिस्ती आहेत व त्या ख्रिस्तामधील सर्व अभिवचनाचे वाटेकरी आहेत.
योहान
१:१२
"परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर
विश्वास ठेवणार्यांना त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला."
रोमकरांस पत्र ८:१४
"कारण
जितक्यांना चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत."
ह्याचाच
अर्थ ख्रिस्ती होण्यासाठी प्रभू येशूवर विश्वास असणे असून त्याच्या पवित्र
आत्म्याप्रमाणे चालणे हे क्रमप्राप्त
आहे.
येशू ख्रिस्ताने शिकविल्याप्रमाणे चालतात किंवा त्याच्या
आज्ञेप्रमाणे चालणाऱ्यांस ख्रिस्ती गणण्यात येते
शास्त्रामध्ये
प्रभू येशू स्वतः म्हणतो की जर
तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल, म्हणजेच स्वतःला ख्रिस्ती म्हणवीत
असाल, तर
तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. (योहान १४:१५ वाचा) खऱ्या ख्रिस्तींचे चिन्ह
म्हणजे इतरांवर प्रेम व देवाचे सर्व वचनाच्या व आज्ञांच्या
प्रति आज्ञाधारकता ही आहे. (१ योहान २:३-६ वाचा).
योहान
१४:१५
"माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल."
१
योहान २:३- ६
"आपण त्याच्या (म्हणजे येशू ख्रिस्ताच्या) आज्ञा पाळल्या तर त्यावरून
आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून
त्याच्या आज्ञा पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला
कळून येते कि, आपण त्याच्या ठायी आहो. मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्याने तो (म्हणजे येशू ख्रिस्त) जसा चालला तसे स्वतःही चालले
पाहिजे."
ह्या
वचनाच्या शेवटी योहान म्हणतो ‘मी
त्याच्या ठायी राहतो; म्हणजेच
स्वतःला ख्रिस्ती म्हणविणारा मनुष्य, येशूने शिकविलेल्या सर्व आज्ञा पाळत असला पाहिजे, आणि जसा येशू ख्रिस्त
ह्या जगात चालला तसेच चालले पाहिजे; तरच तो मनुष्य स्वतःला खरा ख्रिस्ती म्हणवू शकतो.
चांगली कर्म करण्याने नाही, तर
नवा जन्म प्राप्त करण्याने एक मनुष्य ख्रिस्ती गणला जातो
पवित्र
शास्त्र बायबल आपणाला शिकविते कि, कोणा
मनुष्याने चांगली कामे केली म्हणून तो देवापुढे मान्य ठरत नाही. प्रेषित पौल पवित्र
शास्त्रातील आपल्या तिताला पत्रात म्हणतो की, आपले
तारण आपण केलेल्या चांगल्या कृत्यांमुळे होणार नाही; तर त्याच्या (म्हणजे येशूच्या) दयेने होणार आहे. त्यानेच
आम्हां मनुष्यांना नव्या जन्माचे स्नान (म्हणजेच पाण्याचा बाप्तिस्मा) व पवित्र आत्म्याने केलेले
नवीकरणाच्या ह्यांच्याद्वारे तारले आहे. (तिताला पत्र ३:५ वाचा) ह्यामुळे
कोणीही मनुष्य आपल्या चांगल्या कृत्यांमुळे आपण तारण मिळविले अशी बढाई मारू शकत
नाही.
तिताला
पत्र ३:५
"तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व
पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास
तारिले.”
पवित्र
शास्त्र बायबल आपणाला असेही शिकविते कि एक नवीन जन्म पावलेला व्यक्ती (Born Again), ज्याने
येशू ख्रिस्तावर विश्वास आणि श्रद्धा ठेवली आहे व जो
त्याच्या सर्व आज्ञा पळून ख्रिस्ताच्या आदर्श पाळतो, तो व्यक्ती
जो ख्रिस्तासाठी स्वतःच्या पापांसाठी व देहस्वभावांसाठी मेला आहे, व ज्याने ख्रिस्त येशूला परिधान
केले आहे (गलतीकरांस पत्र ३:२७ वाचा) त्यालाच खरा ख्रिस्ती गणणयात येते. इथे
ख्रिस्ताला परिधान करणे म्हणजे त्याच्या आत्म्याने भरलेले किंवा त्याच्या
आत्म्याप्रमाणे चालणे. (योहान ३: ३; योहान
३:७, १
पेत्र १:२३ वाचा)
गलतीकरांस
पत्र ३:२७
"कारण तुम्हांमधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी
ख्रिस्ताला परिधान केले आहे;"
एक ख्रिस्ती मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे पवित्र व
शुद्ध असतो
स्वतःला ख्रिस्ती किंवा ख्रिस्ताचे मुले म्हणविणाऱ्यांनी स्वतःला जसा ख्रिस्त पवित्र होता तसे पवित्र राखले पाहिजे. (१ पेत्र १:१५-१६ वाचा) म्हणजेच पापापासून स्वतःला अलिप्त ठेवून आपल्या सर्व आचरणात स्वतःला पवित्र व शुद्ध राखणाऱ्या मनुष्यालाच ख्रिस्ती गाण्ण्यात येते.
१
पेत्र १:१५-१६
"तर तुम्हांस पाचारण करणारा (म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त) जसा पवित्र आहे तसे
तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, 'तुम्ही
पवित्र असा, कारण मी पवित्र आहे."
ज्या
माणसात प्रभू येशूचे सर्व गुण आढळतात, तेच खरे ख्रिस्ती आहेत कारण
त्यांच्यात ख्रिताचा वास करतो
येशू
ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतर पेंटेकॉस्टच्या दिवशी सर्व श्रद्धावंतांवर पवित्र
आत्मा पाठविण्यात आला. तो आत्मा म्हणजे स्वतः 'प्रभू येशूचा
आत्मा' आहे.
(योहान १४:२६ वाचा) आणि ज्या ज्या मनुष्यांमध्ये तो देवाकडून पवित्र आत्मा
आहे, तेच
केवळ ख्रिस्ती गणले
जातात. (रोमकरांस
पत्र ८:१४ वाचा)
रोमकरांस
पत्र ८:१४
"कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितकेच देवाचे पुत्र आहेत;"
योहान
१४:२६
"तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा
तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या
सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल."
प्रभू
येशूचा आत्मा ज्या मनुष्यामध्ये आहे, त्यामध्ये येशूचा स्वभाव व सर्व गुण आढलून येतात. (गलतीकरांस
पत्र ५:२२ वाचा) ते गुण म्हणजे "प्रीति, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता
व इंद्रियदमन हे
आहेत. ह्याचाच
अर्थ एका मनुष्याने स्वतःला ख्रिस्ती म्हणविण्यासाठी त्यामध्ये हे सर्व वरील गुण
आढळून आले पाहिजेत.
गलतीकरांस
पत्र ५:२२
"आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ , प्रीति, आनंद, शांती, सहनशीलता,ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशाविरुद्ध नियमशास्त्र नाही."
अंत्युखियामध्ये येशू
ख्रिस्ताच्या अनुयायांना पहिल्याने "ख्रिस्ती" म्हणून ह्याच
कारणामुळे संबोधिले गेले
होते; कारण
त्यांची वागणूक, कृती
आणि भाषण येशू ख्रिस्तासारखे होते. (प्रेषितांची कृत्ये ११:२६ वाचा)
प्रेषितांची
कृत्ये ११:२६
"... आणि शिष्यांना "ख्रिस्ती" हे नांव पाहिल्याने अत्युखियात
मिळाले."
हे
वरील सर्व गुण जर एका ख्रिस्ती म्हणविणाऱ्या मनुष्यात आढळत नसतील तर तो मनुष्य
स्वतःला फसवितो.
ह्याचा
अर्थ असा आहे कि, प्रभू
येशू ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवणाऱ्यालाच ख्रिस्ती गाण्यात
येते. म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळून त्याचे चारित्र्य व स्वभाव आचरणार्यांनाच खरे
ख्रिस्तित्व प्राप्त होते. एक ख्रिस्ती मनुष्यामध्ये येशू
ख्रिस्ताचे चित्तवृत्ती व गुण अढळणे क्रम:प्राप्त आहे. एक खरा
ख्रिस्ती खरंच देवाचे मूल आहे, देवाच्या
खऱ्या कुटुंबाचा एक भाग व त्यालाच ख्रिस्तामध्ये नवीन जीवन दिले गेलेले आहे.
खरे ख्रिस्ती प्रभू येशू ख्रिस्ताचे राज्य या जगात येण्याचे
वाट पाहत असतात
प्रभू
येशूने दिलेल्या त्याच्या अभिवचनाप्रमाणे ह्या पृथ्वीवर पुन्हा गौरवाने परत
येणार आहे आणि अखंड युगानुयुग राज्य करणार आहे. (योहान १४:१-३ वाचा)
योहान
१४:१-३
“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ
घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.”
त्यामुळे
त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसऱ्यांदा गौरवांत येणे व त्याचे
राज्य या पृथ्वीवर येण्याची फार उत्कंठतेने वाट पाहणाऱ्यांना ख्रिस्ती म्हटले
जाते. कारण जे लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणवितात ते ह्या जगात किंवा जागीतील गोष्टीत
सामील होत नाहीत कारण त्यांचे लक्ष हे नेहमी स्वर्गीय गोष्टीकडे लागलेले असते.
खरे ख्रिस्ती प्रभू येशू ख्रिस्तामधील शारीरिक व आत्मिक अभिवचनाचे भागीदार आहेत
जे जे मनुष्य प्रभू येशू मध्ये विश्वास ठेवतात व त्याच्या
मध्ये आहेत ते ते सर्व त्याच्यामधील सर्व शारीरिक आणि आत्मिक अभिवचने व दानांचे ते वतनदार आहेत.(इफिसकरांस पत्र १:३)
इफिसकरांस पत्र १:३
“आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता
धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला
ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;”
इतकेच नव्हे तर खरे ख्रिस्ती त्या ख्रिस्ताच्या दुःखाचेहि
सहभागी आहेत;
म्हणजेच ख्रिस्ताप्रमाणे ह्या जगात सत्यासाठी दुःख भोगत असतात.
फिलिप्पैकरांस पत्र
१:२९
“कारण
त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर
ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता दुःखही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.”
१ थेस्सलनीकाकरांस
३:३-४
“तो असा की, ह्या संकटात कोणी घाबरू नये; कारण
आपण ह्यासाठीच नेमलेले आहोत, हे तुम्ही स्वत: जाणून आहात. कारण आम्ही तुमच्याजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हांला सांगून ठेवले की, आपल्याला
संकटे भोगायची आहेत; आणि त्याप्रमाणे घडलेही, हे
तुम्हांला कळले आहे.”
२ थेस्सलनीकाकरांस
१:४-५
“ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही सोसत असलेल्या सर्व
संकटांत तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखवता त्यांबद्दल देवाच्या मंडळ्यांतून
आम्ही स्वत: तुमची वाखाणणी करतो.
ते
देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे; तो
न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दु:ख सोसत आहात त्या देवाच्या
राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.”
करिंथकरांस दुसरे
पत्र ४:१०-१२
“आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा
हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरीरांत प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूप्रीत्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती
सोपवलेले आहोत, ह्यासाठी की, येशूचे
जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे. आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवते.”
इतकेच नव्हे तर खरे ख्रिस्ती त्या ख्रिस्ताच्या दुःखाचेहि सहभागी आहेत; म्हणजेच ख्रिस्ताप्रमाणे ह्या जगात सत्यासाठी दुःख भोगत असतात.
सर्व ख्रिस्ती लोकांचे खरे नागरिकत्व स्वर्गीय आहे
प्रत्येक खऱ्या ख्रिस्ती लोकांचे लक्ष हे स्वर्गाकडे असते
कारण त्यांचे खरे नागरिकत्व स्वर्गीय आहे. म्हणून ते सर्व पृथ्वीवरील गोष्टींच्या
मागे न लागता स्वर्गातील गोष्टी/ संपत्ती मिळविण्यासाठी
यत्न करतात. प्रभू येशूने दिलेल्या त्याच्या अभिवचनाप्रमाणे ह्या
पृथ्वीवर पुन्हा गौरवाने परत येणार आहे आणि त्याच्यी वाट पाहणाऱ्या सर्वांना
त्याच्या बरोबर सार्वकालिक स्वर्गीय जीवन वतन मिळणार आहे. (योहान १४:१-३ , फिलिप्पैकरांस पत्र ३:२० , तीताला पत्र २:१२-१३ , यहूदाचे पत्र १:२१ वाचा)
फिलिप्पैकरांस पत्र
३:२०
"आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत;"
योहान १४:१-३
“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला
आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.”
तीताला पत्र २:१२-१३
सारांश: शेवटी
सारांश हाच आहे कि रोज चर्चला जातो किंवा ख्रिस्ती घरात जन्म घेतला म्हणून किंवा
चांगले कृती केल्यामुळे किंवा एखादा दानधर्म केल्याने कोणीही मनुष्य ख्रिस्ती म्हणविला
जात नाही. ख्रिस्ती हा केवळ धर्म नसून ती एक जीवनशैली आहे.
पवित्र
शास्त्राप्रमाणे "प्रभु
येशु ख्रिस्ताच्या आत्म्याने चालणारे मनुष्य खरे ख्रिस्ती आहेत”. तर
जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवतो; म्हणजेच
त्याच्या मरणांत आणि
पुनरुत्तस्थानांत विश्वास ठेवून त्याच्या आज्ञा पाळतो, व
त्याच्या आत्म्याने चालविला जाऊन
ज्या मनुष्यामध्ये येशू
ख्रिस्ताचे चित्तवृत्ती व गुण अढळतात ,तोच मनुष्य खरा ख्रिस्ती गणणयात
येतो.
सर्व
ख्रिस्ती मनुष्य प्रभू येशू ख्रिस्तामधील शारीरिक व आत्मिक अभिवचनाचे वतनदार
आहेत. तसेच ख्रिस्ती लोकांचे खरे नागरिकत्व स्वर्गीय आहे म्हणून त्यांचे लक्ष हे
स्वर्गाकडे असते आणि ते पृथ्वीवरील गोष्टीत
रमत नाहीत.
तसेच
फक्त खऱ्या ख्रिस्ती मनुष्यालाच स्वर्गातील सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळेल. आमेन
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India
© 2016 - 2020 Digital सुवार्तिक All Rights Reserved