Thursday, 7 July 2016

Christian Gospel - Is Assumption of Mary true ? मरियेचे खरंच स्वर्गारोहण झाले आहे काय ?

मरियेचे खरंच स्वर्गारोहण झाले आहे काय ? "Is Assumption of Mary true ?”



पार्श्वभूमीमरीया भक्ती ही रोमन कॅथॉलिक चर्च आणि काही सनातनी ख्रिस्ती पंथांमध्ये रुजलेली एक मुख्य प्रथा आहे. ते त्यांच्या मतानुसारमरीया भक्तीला अनेक तत्वांचा आधार सांगतात. त्या तत्त्वांत मुख्यतः मरिया ही “देवाची आई”, मरियेचा पवित्र (पापविरहित) जन्ममरीयेची शाश्वत कौमार्य आणि मरियेचे स्वर्गारोहण हे आहेत. पण ह्या सर्व तत्वांचा शास्त्रांतील संदर्भ शोधल्यास ह्या सर्व तत्वांना पवित्र शास्त्रामध्ये कुठलाही आधार सापडत नाही. म्हणजेच हे सर्व तत्वे हे मानवनिर्मित असूनमानवी बुद्धी आणि तत्वज्ञानावर आधारित आहेत. आज आपण ह्यातील 'मरियेचे स्वर्गारोहणह्या तत्वावर प्रकाश टाकू या. 

शिकवणीचा उगम: मरियेचे स्वर्गारोहण ही शिकवण असे शिकविते की येशूची आईच्या मृत्यूनंतर तिचे पुनरुत्थान झालेतिला गौरवविण्यात आले आणि सदेही स्वर्गात घेण्यात आले. मरियेचे स्वर्गारोहण ही शिकवण रोमन कॅथोलिक चर्च आणि काही अंशी पूर्वीय संतांनी ख्रिस्ती पंथात शिकवली जाते.

ह्या शिकवणीची सुरुवात बायझेंटाईन साम्राज्यापासून ६ व्या शतकात झाली, जेथे ते तिच्या नावाने एक वार्षिक सण साजरा करीत असत.  त्यानंतर हळू हळू ती पाश्चिमात्य प्रदेशात पसरत गेली ज्यात मरियेचे पुनरुत्थान आणि मरीयेच्या शरीराचे उदात्तीकरण व गौरव ह्यांच्या स्मरणार्थ एक सण  साजरा होऊ लागला. तो सण जो मधल्या युगांपासून सुरु झाला तो आजपर्यंत दर वर्षी  १५ ऑगस्तच्या दिवशी साजरा केला जातो. मुख्य म्हणजे ह्या शिकवणीला रोमन कॅथॉलिक चर्चचे पोप पायस बारावे ह्यांनी १९५० साली रोमन कॅथॉलिक चर्चची अधिकृत तत्व म्हणून बनविण्यात आली.

रोमन कॅथॉलिक चर्चची ह्या शिकवणीची अधिकृत प्रत आपल्याला ह्या खालील संकेत स्थळावर वाचायला मिळेल.

Catechism of Catholic Church (Paragraph 6. Mary - Mother of Christ, Mother of the Church - verse 966)

http://www.vatican.va/archive/ccc_css/archive/catechism/p123a9p6.htmhttp://www.vatican.va/archive/ccc_css/archive/catechism/p123a9p6.htm

बायबलमधील नोंदवलेले स्वर्गारोहणाचे उदाहरणे

ह्यापूर्वी बायबलमध्ये हनोख व एलीया ह्या दोघांचे स्वर्गारोहण झालेले आपल्याला आढळते. (उत्पत्ति ५:२४ २ राजे २:११ वाचा) . त्यामुळे देवाला मरियेचे ही स्वर्गारोहण करणे अशक्य नाही आणि त्याची शक्यता नाकारता ही येत नाही. परंतु ह्यात समस्या अशी आहे की मरियेचे स्वर्गारोहण ह्या शिकवणीला बायबलमध्ये कुठलाही आधार नाही. बायबलमध्ये मरियेच्या मृत्यूची नोंद नाही किंवा प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय नंतर बायबलमध्ये तिचा उल्लेख सुद्धा नाही

मग कोणी म्हणेल कि मग ही शिकवण विकसित करण्यामागे काय उद्धेश आहे ?

ही शिकवण रुजविण्यामागे रोमन कॅथॉलिक चर्चचा उद्देश

ह्या शिकवणी मागचा मुख्य उद्देश हा मरियेला तिच्या पुत्रा (म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त) सामान दाखविण्याच्या हा आहे. ज्या प्रमाणे येशूचे मरणांतून तिसऱ्या दिवशी पुनरुत्थान झाले (लूक २४:७) व तो सदेही स्वर्गात घेतला गेला (म्हणजेच त्याचे स्वर्गारोहण झाले - प्रेषितांचे कृत्ये १: ९), तसेच ही शिकवण मरीयेला येशू समान दाखविण्याचा प्रयत्न करते. मुळांत ही शिकवण जरी पाखंडी गणण्यांत येत नसलीतरी ही कल्पना रोमन कॅथॉलिक चर्चने, मरीयेच्या भक्तीचे व तिच्या प्रार्थनेचे प्रमाण म्हणून रुजवले आहे. मरियेचे स्वर्गारोहण शिकवणे म्हणजेच मरीयेला आराध्य दैवत म्हणून घोषित करणे असे आहे. कारण जर ती स्वर्गात नेली गेली नसली तर मग तिची भक्ती ही व्यर्थ ठरत होती. पण इथे महत्वाचे हे आहे की ह्या शिकवणीला शास्त्रात कोणताही आधार नाही; म्हणजेच ही शिकवण मनुष्यांच्या तार्किक बुद्धीवर व कल्पनेवर आधारित आहे.

मरियेचे स्वर्गरोहण न झालेले असल्याचे काही संदर्भ

पहिल्याने येशूच्या स्वर्गरोहणानंतर मरीया ही इतर प्रेषितांबरोबर त्या वरच्या माडीवर होतीजेथे पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला होता. त्यानंतर सर्व प्रेषितत्यांची सुवार्ता व त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे घडामोडी हे प्रेषितांचे कृत्ये ह्या पुस्तक लिहिले गेले आहेत.त्यात मरीया व तिच्या स्वर्गरोहणाबद्दल कुठेही लिहिलेले सापडत नाही. 

मात्र प्रेषित कृत्यांत मरियेचे  स्वर्गारोहण का बरे सापडत नाही ? 

ह्याचा विचार होणे जरुरीचे आहे. कारण जर मरियेचे खरंच स्वर्गरोहण झाले असेल तर ह्या पुस्तकात त्याची नोंद होणे क्रमप्राप्त असे होते. ह्यावरून मरियेचे स्वर्गरोहण झाले नसल्याचे काही अंशी सिद्ध होते.

दुसरे कारण म्हणजे आपल्या अंत:समयीम्हणजेच क्रुसावर असताना येशूने मरीयेला प्रेषित योहानाकडे सोपवले होतेम्हणजे तिची काळजी प्रेषित योहानावर सोपवली होती. (योहान १९:२६-२७ वाचा). त्याच योहानाने बायबलमधील एक शुभवर्तमान आणि ३ पत्रे लिहिली आहेत. 

तसेच योहानाने त्याचे शुभवर्तमानाचे पुस्तक हे प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर लिहिले आहे. त्यात त्याने ३:१३ मध्ये स्पष्टपणे असे लिहिले आहे कि, स्वर्गांतून उतरलेला (व स्वर्गात असलेला) जो मनुष्याचा पुत्र (म्हणजे प्रभू येशू) त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. 

म्हणजेच येशू नंतर स्वर्गात कोणीही चढून गेलेले नाही. त्यात मरियाही गेलेली नाही; नाहीतर योहानाने तसे लिहिले असते, कारण येशूनंतर तोच मरियेची काळजी वाहत होता असे शास्त्र आपल्यायाला सांगते. 


योहान३:१३
"स्वर्गांतून उतरलेला (व स्वर्गात असलेला) जो मनुष्याचा पुत्र (म्हणजे प्रभू येशू) त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही."


नंतर योहानाने जी ३ पत्रे लिहिली म्हणजेच (१,,३ योहानाचे पत्र) हे सर्व लिखाण इ.स ८५-९० मध्ये लिहिली गेली आहेत (स्कॉफीइल्ड बायबल पंडित/लेखक मतानुसार). 
म्हणजेच येशूच्या मृत्यूनंतर जवळपास ६० वर्षांनंतर हे पुस्तके लिहिली गेली. जर तोपर्यंत मरियेचे स्वर्गारोहण झाले असतेतर योहानाने (जो तिचा सांभाळ करणारा होता) त्याने आपल्या पत्रात त्याचा उल्लेख केला असता. पण तसे झाल्याचे आपल्याला दिसत नाही. म्हणजेच इथे आपल्याला मरियेचे स्वर्गरोहण झालेले नाही ह्यावर विश्वास ठेवायला जागा आहे. 


सारांश:  शेवटी सारांश हाच आहे की मरियेचे स्वर्गारोहणावर संभ्रम आहेह्या शिकवाणीमागे रोमन कॅथॉलिक चर्चचा मुख्य उद्देश हा मरियेला देवासमान किंवा (सम- भागीदार) सामान दाखविण्याच्या असा आहे. ह्याचाच अर्थ रोमन कॅथॉलिक चर्चने ही शिकवण आपल्या इतर चुकीच्या तत्वांना आधार देण्यासाठी विकसित केली आहे, ज्याला काहीही अर्थ नाही. 

मुळांत ज्या शिकवणीला पवित्र शास्त्रात काहीहि आधार नाही, त्या शिकवणीला रोमन कॅथॉलिक चर्चने आपल्या भक्तीचे तत्व म्हणून स्वीकारून त्यावर आपली आस्था व भक्ती स्थापने, हे कितपत योग्य आहे ते आपल्या प्रत्येकाला ठरवायचे आहे.




सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.

Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                            

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक