Friday, 15 July 2016

Christian Gospel - Do Roman Catholics practice Idolatry? रोमन कॅथॉलिक पंथीय मूर्तिपूजक आहेत का ?

रोमन कॅथॉलिक पंथीय मूर्तिपूजक आहेत का ? “Do Roman Catholics practice Idolatry?”

     


व्याख्या: मूर्तिपूजेची वेबस्टर शब्दकोशानुसार व्याख्या अशी आहे : "मूर्ती किंवा काही व्यक्ती किंवा काही गोष्टींची जास्त भक्ती किंवा ओढ किंवा उपासना". एक मूर्ती ही एक खऱ्या देवाच्या बदल्यात असणारी कोणतीही वस्तू आहे. बायबलच्या काळात मूर्तिपूजेची सर्वात प्रचलित रूप म्हणजे विविध खोट्या दैवतांच्या प्रतिमांची पूजा करणे हे होते.



तसेच मूर्तिपूजेचे दोन प्रकार आहेत; ते म्हणजे भौतिक मूर्तिपूजा (Physical) आणि अध्यात्मिक  मूर्तिपूजा (Spiritual)

अध्यात्मिक मूर्तिपूजेबद्दल अधिक माहितीसाठी "अध्यात्मिक मूर्तिपूजा काय आहे?" हा आमचा ब्लॉग पोस्ट वाचा. 

आता ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण रोमन कॅथॉलिक पंथीय मूर्तिपूजक आहेत का ? ह्या प्रश्नावर प्रकाश टाकु या. 

दुर्दैवाने होय!!! आमचे रोमन कॅथॉलिक श्रद्धावंतांना अगोदरपासून असे शिकवले आहे की पुतळेवस्तुआणि इतर लेख ह्यांचा वापर हा स्वीकारार्ह आहे आणि उपासनेसाठी त्यांचा उपयोग अगदी आवश्यक आहे. रोमन कॅथोलिक चर्च असे शिकविते कीचर्चमध्ये असणाऱ्या प्रतिमा आणि चिन्हे हे प्रत्यक्षात उपासनेसाठी केली नाहीतते फक्त दृष्य सहाय्यासाठी असतात.

प्रत्येक्षात उपासनेत प्रतिमा न वापरण्याचे खूप चांगली कारणे आहेत. सर्व प्रथमभौतिक प्रतिमांचा उपासनेसाठी केलेला वापर हा पवित्र शास्त्र बायबलमध्ये शिकविल्याप्रमाणे "आत्म्याने व खरेपणाने" देवाची उपासना करण्याच्या आदेशाचे सरळ उल्लंघन आहे. (योहान ४:२३-२४ वाचा).

योहान ४:२४
"देव आत्मा आहेआणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे".

तसेचदेव प्रत्येक्षात कसा दिसतो हे कोणालाही माहीत नाहीआणि नवीन करारामध्ये संत योहान हेच स्पष्ट करतो. (योहान १:१८ वाचा) देव आत्मा आहे  (योहान ४:२४ वाचा)आणि त्याचे चिन्हात्मक प्रतिनिधित्व म्हणून त्याचे चित्र रेखाटणे हे त्याला अनादरशील आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेला कोणीही मनुष्य आजवर जिवंत नाही किंवा कोणाकडेही येशू ख्रिस्ताचे मानवी स्वरूपातील चित्र उपलब्ध नाही, कारण तो पृथ्वीवर होता तेव्हा कॅमेरे नव्हते. त्याच्या स्वरूपाचे वर्णन फक्त यशाया मध्ये सापडते ते हे कीत्याला "भव्य स्वरूप किंवा ऐश्वर्य नव्हते". (यशया ५३:२३ वाचा).

योहान १:१८
देवाला कोणीही कधीच पाहिले नाहीजो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.

यशया ५३:२३
कारण तो त्याजपुढे रोप्यासारखारुक्ष भूमीतील अंकुरांसारखा वाढलात्याला रूप नव्हतेत्याला शोभा नव्हतीत्याजकडे पाहिले तर त्याजवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते.

दुर्देव हेच की, येशू ख्रिस्ताच्या भौतिक वर्णनाचा अभाव असून देखील त्याचे चित्रण करण्यासाठी कॅथोलिक चर्च थांबले नाही. त्यांनी आपल्या म्हणजे मनुष्यांच्या कल्पनेने देवाच्या अनेक मुर्त्या तयार केल्या आहेत आणि स्वतःला मूर्तिपूजेत वाहून घेतले. संत पौलाने आपल्याला आहेत अशा सर्व मुर्त्यांबद्दल आगाऊच सावध करून ठेवले आहे. (प्रेषितांचे कृत्ये १७:२९ वाचा)

प्रेषितांचे कृत्ये १७:२९
"तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्यांच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोनेरूपे किंवा पाषाणह्यांच्या आकृतीसारखे देव आहे असे आपल्याला वाटता काम नये."

कॅथॉलिक चर्चची मूर्तिबद्दल असलेली आस्थेचे कारण:

कॅथॉलिक चर्च मानते की "मूर्ती आपल्याला देवाकडे बोट दाखवते". म्हणजेच ती आपल्याला देवाकडे नेते. ज्या मूर्तीला तोंड आहे पण बोलता येत नाहीकान आहेत पण ऐकू येत नाही आणि आपल्या स्वतःचा बचाव करता येत नाहीती कशी काय आपल्याला देवाकडे नेऊ शकते. (स्रोत्रसंहिता १३५:१५-१८ वाचा)

स्रोत्रसंहिता १३५:१५-१८
"राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेतत्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाहीत्यांना डोळे आहे पण दिसत नाही. त्यांना कां आहेत पण ऐकू येत नाहीत्या बनविणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात".

मुळांत देवाला मूर्तीचा फार वीट आहे. बायबलही आपल्याला हेच सांगते की; मूर्तीचा आणि देवाचा काय संबंध ख्रिस्ताचा आणि मूर्तीचा काय संबंध देवाचे मंदिर तर आपण मनुष्य आहो आणि तो आपल्यामध्ये आत्म्यारूपाने वास करू इच्छितो. (२ कॅरिंथ ६ :१६ वाचा)

२ कॅरिंथ ६ :१६
"देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहो"

रोमन कॅथॉलिक चर्च मध्ये पसरलेली मूर्तिपूजा

आज आपण पाहतो की, सर्व कॅथोलिक चर्चसंस्थाकॉन्व्हेंट्समठआणि इतर प्रत्येक कॅथोलिक चर्च संलग्न इमारतीमध्येअशेरा देवीचे स्तंभसंपूर्ण देवाच्या चित्रेपिता परमेश्वरयेशू ख्रिस्तपवित्र आत्मामरीयायोसेफ व गौरविण्यात आलेले संतांचे पुतळे स्थापिले आहेत. असे पुतळे भरपूर प्रमाणात आहेतअशा भरपूर वस्तू काही संतांची हाडांचे तुकडे म्हणून पण आहेत. या सर्व गोष्टीना फार उच्च व पवित्र वस्तू असल्याचे मानून त्यांना गौरविले जाते. त्यांना नमन केले जातेत्यांचे चुंबन घेतले जातात व काही वेळा त्यांच्या पुढे घुडघे ही टेकले जातात. येथे मूर्तिपूजा सर्रासपणे केली जातेजी अख्रिस्ती लोकांना पण अभिप्रेत आहे
.
कॅथॉलिक चर्चचे मूर्तिपूजेबद्दल स्पष्टीकरण:

तरी पण रोमन कॅथॉलिक लोकं आपण मूर्तिपूजा करतो हे मान्य करत नाहीतत्यांना पूर्वीपासून असे शिकविण्यात आले आहे कीते मूर्तीची पूजा करत नाहीत, ते फक्त मूर्तीच्या प्रति आदर दाखवितात/ व्यक्त करतात. पण इथे समस्या ही आहे कीजरी मूर्तीला आदार देणे हे योग्य आहे असे जरी आपण ग्राह्य धरले (जे मुळात चुकीचे आहे) तरी पण मूर्तीला आदर देणे हे म्हणजे देवापेक्षा दुसऱ्या कशालातरी सन्मान देणे असे आहेत्यामुळे मूर्तीला आदर देणे ही पण एक प्रकारची मूर्तिपूजा आहे.

म्हणूनच कॅथॉलिक पंथीय एक प्रकारची मूर्तिपूजा करतात आणि पर्यायाने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात. त्यांचे डोळे आणि अंत: करण सतत खोटी शिकवण ऐकत आल्यामुळेआंधळे झाले आहेत. देवच त्यांना खऱ्या आणि खोट्यामधला भेद समजावो.

आज त्यांना (कॅथॉलिक पंथीयांना) गरज आहे ते सत्य समजून घेण्याची व पश्चाताप करून देवाकडे क्षमा मागण्याची! ते जो पर्यंत ते सत्याचा शोध घेत नाहीततोपर्यंत आपण त्यांना देवाच्या सक्षम हातात सोडून दिले पाहिजेत्यांनी जर मूर्तिपूजेचा त्याग करून देवाकडे क्षमेची याचना केली तर देव  त्यांनी आजवर केलेली मूर्तिपूजा ह्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे ते अज्ञान असे समजून त्यांना क्षमा करील. संत पौल मुर्तीपुजेबद्दल आपल्याला हेच सांगतो कीअज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली. (प्रेषितांचे कृत्ये १७:२९-३० वाचा)

प्रेषितांचे कृत्ये १७:२९-३०
"तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्यांच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोनेरूपे किंवा पाषाणह्यांच्या आकृतीसारखे देव आहे असे आपल्याला वाटता काम नये. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केलीपरंतु आता सर्वानी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करितो."


सारांश:  शेवटी सारांश हाच आहे की रोमन कॅथॉलिक चर्च जरी मान्य करत नसले तरीही ते सर्रासपणे मूर्तिपूजा करतात. रोमन कॅथॉलिक पंथीय मूर्तीचे चुंबन घेतातत्यांना नमन करतात. सर्वसमर्थ परमेश्वराला कोणीही पाहिलेले नसताना त्याची मूर्ती करूनत्या मूर्तीला नमन करणे हे देवापुढे मोठे पाप गणले जाते. 
त्या देवासाठी असलेली महिमा हे कॅथॉलिक लोकंमूर्ती आणि पुतळ्यांना अर्पितात आणि पर्यायाने देवाच्या कोपला कारणीभूत ठरतात. पण त्यांना (कॅथॉलिक पंथीय) आज गरज आहे ती सत्याचा शोध घेण्याची आणि मूर्तिपूजेपासून अलिप्त होण्याची !!!!



सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.

Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                              

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक