मूर्तिपूजा म्हणजे नक्की काय आहे ? “What actually
is Idolatry?”
व्याख्या: मूर्तिपूजेची वेबस्टर शब्दकोशानुसार व्याख्या अशी आहे : "मूर्ती किंवा काही व्यक्ती किंवा काही गोष्टींची जास्त भक्ती किंवा ओढ किंवा उपासना". एक मूर्ती ही एक खऱ्या देवाच्या बदल्यात असणारी कोणतीही वस्तू आहे. बायबलच्या काळात मूर्तिपूजेची सर्वात प्रचलित रूप म्हणजे विविध खोट्या दैवतांच्या प्रतिमांची पूजा करणे हे होते.
तसेच मूर्तिपूजेचे दोन प्रकार आहेत; ते म्हणजे भौतिक आणि अध्यात्मिक मूर्तिपूजा.
प्रथम आपण भौतिक म्हणजेच आपल्या डोळ्यांना दिसणारी मूर्तीपूजेवर प्रकाश टाकू या.
सुरुवातीपासून, देवाने इस्राएली लोकांबरोबर केलेल्या करारप्रमाणे, देवाने इस्राएली लोकांना केवळ त्याचीच उपासना करणाचे आज्ञापिले होते. निर्गम २०:३-५ वाचा) त्याच्या आज्ञेप्रमाणे
इस्राएली लोकांना अगदी अन्य / खोट्या दैवतांची नावे उचारण्यास देखील मनाई होती. (निर्गम २३:१३ वाचा) कारण असे केल्याने ते त्यांचे (म्हणजे मूर्तीचे) अस्तित्व
मान्य करतात आणि स्वीकारतात असे होईल व त्यांची शक्ती व लोक प्रभाव ह्यावर विश्वास
ठेवणास कारणीभूत असे होतील. देवाने इस्राएली लोकांस खोट्या दैवतांची भक्ती करणाऱ्या इतर संस्कृतींशी
सोयरीक जुळवण्यास निषिद्ध केला होता; कारण देवाला माहीत होते कि, असे केल्याने त्यांच्याकडून मूर्तिपूजेच्या आज्ञापालनासंदर्भात तडजोड होईल.
निर्गम २० :३-५
"माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत. आपल्यासाठी कोरीव
मूर्ती करू नको; वर आकाशांतील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलांतील कशाचीही प्रतिमा
करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; "
निर्गम २३:१३
"मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्याविषयी सावध
राहा; इतर देवांचे नाव देखील घेऊ नका; ते तुमच्या मुखांतून ऐकू येऊ नये."
इस्राएलाचा बहुतेक इतिहास असा आहे की: त्यांची
मूर्तीपूजा, शिक्षा, जीर्णोद्धार आणि क्षमा व पुन्हा मूर्तिपूजेकडे
वळणे असा आहे. १ व २ शमुवेल आणि १ व २ राजे ह्यांचे पुस्तके, असेच विध्वंसक उदाहरणे प्रकट करतात. जुन्या
करारातील संदेष्टे हे अविरतपणे इस्राएल लोकांस, त्यांच्या मूर्तीपूजेचे भयानक परिणामाबद्दल सांगत असत. बहुतेक वेळा
लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि मूर्तीपूजा विरुद्ध देवाचा क्रोध
राष्ट्रावर ओतला गेला. पण आपला देव फार दयाळू आहे म्हणून लोकांनी पश्चात्ताप
केल्यानंतर, त्याने त्यांना क्षमा करून त्याने त्यांचा पुन्हा
जीर्णोद्धार केला.
नवीन करारात देखील संत पौलाने आपल्याला
मूर्तिपूजेबद्दल आगाऊच सावध करून ठेवले आहे. (प्रेषितांचे कृत्ये १७:२९ वाचा)
प्रेषितांचे कृत्ये १७:२९
"तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्यांच्या चातुर्याने व
कल्पनेने कोरलेले सोने, रूपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखे देव आहे असे आपल्याला वाटता काम नये.”
आजच्या जगातील मुर्त्या हे सर्व मनुष्यांचे कल्पनेने व चातुर्याने बनवलेले असे आहेत. प्रत्यक्षात, मूर्ती दगड किंवा लाकूड किंवा निर्जीव वस्तू हे मूर्तीमध्ये गणले जातात आणि त्यांची शक्ती फक्त उपासकच्या मनात अस्तित्वात असते. पवित्र शास्त्राही अनेक उदहारणाद्वारे हे साक्ष देते कि, केवळ परमेश्वर देव एकटाच उपासनेच्या योग्य आहे. मूर्तिपूजा देवापासून त्याचे गौरव हिरावून घेते; जे न्याय्य रीतीने फक्त देवाची आहे आणि देव ते कधीही सहन करणार नाही. (यशया ४२:८ वाचा)
यशया ४२:८
"मी परमेश्वर आहे; हे माझे नाम आहे; मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही; मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही ."
आजही पुतळे आणि चिन्ह ह्यांसमोर मुजरे करणारे
अनेक असे धर्म आहेत, पण देवाचे वचनाप्रमाने ते निषिद्ध आहे.
मूर्तिपूजेत हिंदू धर्म हा आघाडीवर असला, तरीही आजचे ख्रिस्ती
धर्मातील रोमन कॅथॉलिक व काही प्रोटेस्टंट पंथीय हेहि बऱ्यापैकी मूर्तिपूजेकडे
झुकल्याचे आपण पाहतो. देवाची मूर्तीपूजेबद्दलची तीव्र भावना आपल्याला दहा आज्ञेमधील पहिल्या आज्ञेत प्रतिबिंबित होते, ज्यात तो म्हणतो "तुम्हांला माझ्या शिवाय अन्य देव नसावेत.” (निर्गम २०:३-५ वाचा)
आजचे रोमन कॅथॉलिक पंथामध्ये अशी मूर्तिपूजा सर्रासपणे चालू आहे.
ह्या बद्दल अधिक माहितीसाठी " रोमन कॅथॉलिक पंथीय मूर्तिपूजक आहेत का ? - Do Roman Catholics practice Idolatry?" हा ब्लॉग पोस्ट वाचा.
आजचे रोमन कॅथॉलिक पंथामध्ये अशी मूर्तिपूजा सर्रासपणे चालू आहे.
ह्या बद्दल अधिक माहितीसाठी " रोमन कॅथॉलिक पंथीय मूर्तिपूजक आहेत का ? - Do Roman Catholics practice Idolatry?" हा ब्लॉग पोस्ट वाचा.
मुळांत हे समजून घेणे गरजेचे आहे कि, मूर्तिपूजेची व्याप्ती ही मूर्ती व प्रतिमा आणि खोट्या दैवतांची पूजा ह्या सर्वांहून
पलीकडील गोष्ट आहे. आजच्या काळांतील आधुनिक मूर्ती अनेक आणि विभिन्न आहेत.
आजच्या जगात मूर्तिपूजेचा जसा भौतिक प्रकार आहे तसा अध्यात्मिक प्रकार ही अस्तित्वात आहे. जी मूर्तीपूजा आपण डोळ्याने पाहतो व अनुभवतो ती आहे "भौतिक" मूर्तिपूजा . उदा . मूर्तीपुढे दंडवत घालणे. तसेच माणसाच्या मनात वसणारी आणि आपल्या डोळ्यांना न दिसणारी ती "अध्यात्मिक" मूर्तिपूजा आहे. उदा. मनुष्यांत असणारा पैशाच्या / धनाचा लोभ.
अध्यात्मिक मूर्तिपूजेबद्दल अधिक माहितीसाठी "अध्यात्मिक मूर्तिपूजा काय आहे?" हा आमचा ब्लॉग पोस्ट वाचा.
जरी कोणी अगदी पुतळ्यासमोर मुजरा केला नसला, त्यांच्या हृदयात हि मूर्तिपूजा सुप्तपणे आढळू शकते. देवाव्यतिरिक्त कोणतीही वस्तूची ओढ / आवड ही मूर्तिपूजेत गणली जाते; मग ती तुमची श्रीमंती / पैसा किंवा असू दे, गाडी असू दे किंवा सौंदर्य. ह्या सर्वांची मूर्ती एक मनुष्य आपल्या हृदयात अनावधानाने बनवत असतो. एक मनुष्य आपल्या मनात दुसऱ्या मनुष्याची मूर्ती देखील बनवू शकतो. गर्व, स्वकेंद्रित वृत्ती, लोभ, खादाडपणा, मालमत्ता प्रेम हेही देवासमोर बंड आहेत आणि मूर्तिपूजेमध्ये गणले जातात. म्हणून देवाला त्यांचा फार वीट आहे.

सारांश: शेवटी मूर्तिपूजा ही मूर्ती व प्रतिमा आणि
खोट्या दैवतांची पूजा तर आहेच; पण ह्या सर्वांहून पलीकडील गोष्ट आहे.
शास्त्राप्रमाणे केवळ परमेश्वर देव एकट्याचीच उपासना करणे योग्य आहे. मुळांत मूर्तिपूजा म्हणजे देवापासून त्याचे गौरव हिरावून घेऊन ते इतर वस्तुंना देणे.
मग ते वस्तू सजीव असो व निर्जीव.
तसेच मूर्तिपूजेचे दोन प्रकार आहेत; ते म्हणजे भौतिक आणि अध्यात्मिक मूर्तिपूजा.
देवाव्यतिरिक्त कोणतीही वस्तूची ओढ / आवड ही मूर्तिपूजेत गणली जाते; मग ती तुमची श्रीमंती / पैसा किंवा असू दे, गाडी असू दे किंवा सौंदर्य. ह्या सर्वांची मूर्ती एक मनुष्य आपल्या हृदयात अनावधानाने बनवत असतो. गर्व, स्वकेंद्रित वृत्ती, लोभ, खादाडपणा, मालमत्ता प्रेम हेही मूर्तिपूजेमध्ये गणले जातात व ते देवाविरुद्ध बंडाप्रमाणे आहेत; म्हणून देवाला त्यांचा फार वीट आहे.

म्हणून आज प्रत्येक मनुष्यांना गरज आहे ती अशा सर्व मूर्तींपासून
स्वतःला अलिप्त करण्याची, व केवळ त्या परमेश्वर देवाला भजण्याची..आमेन
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Contact Details / संपर्क माहिती :
ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:
Email : digitalsuvartik.vasai@gmail.com
Mob: 8850752437
Digital सुवार्तिक
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक All Rights Reserved
No comments:
Post a Comment