Monday, 4 July 2016

Christian Gospel - Is 'Immaculate conception' of Mother Mary scriptural? मरियेचा ‘पापविरहित जन्म’ शास्त्राप्रमाणे आहे काय ?


मरियेचा पापविरहित जन्म शास्त्राप्रमाणे आहे काय ? "Is Immaculate conception of Mother Mary scriptural?”



मरीया भक्ती ही रोमन कॅथॉलिक चर्च आणि काही सनातनी ख्रिस्ती पंथांमध्ये रुजलेली एक मुख्य प्रथा आहे. ते त्यांच्या मतानुसारमरीया भक्तीला अनेक तत्वांचा आधार सांगतात. त्या तत्त्वांत मुख्यतः मरिया ही “देवाची आई”, मरियेचा पवित्र (पापविरहित) जन्ममरीयेची शाश्वत कौमार्य आणि मरियेचे स्वर्गारोहण हे आहेत. पण ह्या सर्व तत्वांचा शास्त्रांतील संदर्भ शोधल्यास ह्या सर्व तत्वांना पवित्र शास्त्रामध्ये कुठलाही आधार सापडत नाही. म्हणजेच हे सर्व तत्वे हे मानवनिर्मित असूनमानवी बुद्धी आणि तत्वज्ञानावर आधारित आहेत. आज आपण ह्यातील 'मरियेचा पवित्र जन्मह्या तत्वावर प्रकाश टाकू या. 

पार्श्वभूमी'पापविरहित जन्मज्याला इंग्रज़ीत 'Immaculate Conceptionम्हणतातही शिकवण रोमन कॅथॉलिक चर्चद्वारे विकसित केलेली आहे. ही शिकवण१८५४ साली रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये अधिकृत तत्त्वप्रणाली म्हणून स्वीकारण्यात आली. त्याअगोदर ह्या शिकवणीची कुठेही नोंद सापडत नाही. त्यांच्या ह्या शिकवणीच्या अधिकृत निवेदन असे प्रतीत करते की "पवित्र कुमारी मरीयेलातिच्या जन्माच्या वेळेपासून देवाच्या असामान्य कृपेद्वारेयेशू ख्रिस्त - जो मानवजातीचा तारणारा ह्याच्या गुणवत्तेला धरूनमूळ पापाचे सर्व डागांपासून अलीप्त ठेवणयात आले आहे". मूलत: 'पापविरहित जन्महा असा एक विश्वास/धारणा आहे कीमरीया ही मूळ पापापासून (आदाम आणि हव्व्हे चे पाप) संरक्षित होतीम्हणजेच मरीयेमध्ये नैसर्गिक पाप नव्हते आणि ती संपूर्णपणे निष्कलंक अशी होती.

रोमन कॅथॉलिक चर्चची ह्या शिकवणीची अधिकृत प्रत आपल्याला ह्या खालील संकेत स्थळावर वाचायला मिळेल.

Catechism of Catholic Church (Paragraph 2. "Conceived by the Power of the Holy Spirit and Born of the Virgin Mary" verse – 490-493)


पण आपल्याला कुठेही असे शिकवीत नाही, किंवा ह्या तत्वाला शास्त्र बायबलमध्ये कुठलाही आधार सापडत नाही. बायबल कोठेही मरीयेचे वर्णन 'असामान्य' असे करीत नाही; फक्त एक सामान्य महिला, जिला देवाने प्रभु येशू ख्रिस्ताची जननी होण्यासाठी निवडले.

तरी मरीया ही निःसंशयपणे एक धार्मिक स्त्री होती.(लुक १:२८ वाचा) मरीया खात्रीने एक चांगली पत्नी आणि आई होती. येशूने ही निश्चितपणे आपल्या आईवर ह्रदयापासून प्रीती केली. (योहान १९:२७ वाचापण बायबल आपल्याला "मरीयाही संपूर्णपणे पवित्र होती"असा विश्वास धरण्याची कोणतेही कारण देत नाही. खरं तर बायबल आपल्याला असा विश्वास धरण्यासाठी प्रत्येक कारण देते कीफक्त येशू ख्रिस्त हाच असा व्यक्ती होताजो पाप पापबाधित झाला नाही किंवा त्याने एकही पाप केले नाही. स्वतः देवाचं देवाचं अवतार/रूप असल्यानेयेशू हा पापसंसर्गापासून अलिप्त होता.  (रोमकरांस पत्र ३:२३२ करिंथकारांस पत्र ५:२११ पेत्र २:२२१ योहान ३:५ वाचा)

स्पष्टीकरण: रोमन कॅथोलिक चर्च असे मानते की मरियेचा 'पापविरहित जन्महा फार महत्वाचा ह्यासाठी आहे कीत्याशिवाय येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्रतेत होणे शक्य झाले नसते. म्हणजेच येशूला पवित्र राखण्यासाठी देवाने मरियेला पण पवित्रतेत राखले. पण हे तसे नाही. कारण आपल्याला माहीत येशू चमत्कारिकरित्या मरीयेमध्ये गर्भधारित होऊन आलाजी त्या वेळेला कुमारी होती. म्हणजेच त्याचा जन्ममरीयेच्या आणि योसेफाच्या वासनेने झाला नाहीतर देवाच्या आत्म्याने / शब्दाने मरियेला गर्भधारित केले. म्हणून तो (येशू) पवित्र होता. ह्यालाच म्हणतात 'पापविरहित जन्म'. मरीयेबद्दल असे बायबल मध्ये कुठेही लिहिलेले नाही. ह्याचाच अर्थ मरियेचा जन्म तर तिचे आई- वडिलांच्या वासनेने झाला होता असे प्रतीत होते. मग जर मरियेची आई जर पापी होती, तर मग मारियेचा जन्म पापविरहित कसा असू शकतो ह्याचा अर्थ मरियेचा जन्म पापात झाला. कोणी म्हणेल ते कसे शक्य आहे ?. (तर ईयोब १४:१४स्तोत्रासहिंता ५१:५ ह्या वचनाचा अर्थ असा आहे की प्रत्येक मनुष्यप्राणी जो ह्या जगात जन्मतोतो पापी आहे. हे पाप त्यांनी केले नसून आपले आद्य आई वडील (आदाम आणि हव्वा) ह्याकडून आपल्यात आले आहे.)

स्तोत्रासहिंता ५१:५
पाहामी जन्माचाच पापी आहेमाझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.

ईयोब १४:१४
मनुष्य निष्कलंक कोठून असणार स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार ?

म्हणजेच रोमन कॅथॉलिक शिकवण जी मारियेचा पण पापविरहित जन्म सांगतेते शास्त्राप्रमाणे नाही किंवा त्याला पवित्र शास्त्रामध्ये कुठलाही संदर्भ / आधार सापडत नाही. 


सारांश: शेवटी ह्यावरून आपल्याला हे प्रतीत होते कीमरीयेचा ''पापविरहित जन्मही संकलपनेला पवित्र शास्त्रात संदर्भ सापडत नाही. त्याउलट बायबल आपल्याला हे शिकवते की केवळ येशूचा जन्म ''पापविरहितअसा झाला होता. ह्याचाच अर्थ असा आहे की, रोमन कॅथॉलिक चर्चने विकसित केलेली ही शिकवण जी मरियेचा पण पापविरहित जन्म सांगते, ती अशास्त्र आहे व पर्यायाने अनावश्यक आहे.


सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.


Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                              

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक