Friday, 15 July 2016

Christian Gospel - What is Spiritual Idolatry? आध्यात्मिक मूर्तिपूजा म्हणजे काय आहे ?

आध्यात्मिक मूर्तिपूजा म्हणजे काय आहे ? “What is Spiritual Idolatry?”





व्याख्या: मूर्तिपूजेची वेबस्टर शब्दकोशानुसार व्याख्या अशी आहे : "मूर्ती किंवा काही व्यक्ती किंवा काही गोष्टींची जास्त भक्ती किंवा ओढ किंवा उपासना". एक मूर्ती ही एक खऱ्या देवाच्या बदल्यात असणारी कोणतीही वस्तू आहे. बायबलच्या काळात मूर्तिपूजेची सर्वात प्रचलित रूप म्हणजे विविध खोट्या दैवतांच्या प्रतिमांची पूजा करणे हे होते.


तसेच मूर्तिपूजेचे दोन प्रकार आहेत; ते म्हणजे भौतिक आणि अध्यात्मिक मूर्तिपूजा. 


आता ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण अध्यात्मिक मूर्तिपूजा म्हणजेच आपल्या डोळ्यांना न दिसणारी मूर्तीपूजेवर प्रकाश टाकु या. 

व्याख्या: आध्यात्मिक मूर्तिपूजा म्हणजे देवाबरोबर अप्रामाणिक असणे. त्याला "आध्यात्मिक व्यभिचार" सुद्धा म्हणतात; कारण आपण एक देवाला सोडून अन्य दैवतांच्या किंवा वस्तूंच्या मागे लागतो. (हे आपल्या पत्नी बरोबर अप्रामाणिक असणे ह्या सारखे आहे)देवाव्यतिरिक्त कोणतीही वस्तूची ओढ / आवड ही मूर्तिपूजेत गणली जातेमग ती तुमची श्रीमंती / पैसा किंवा असू देगाडी असू दे किंवा सौंदर्य. ह्या सर्वांची मूर्ती एक मनुष्य आपल्या हृदयात अनावधानाने बनवत असतो. एक मनुष्य आपल्या मनात दुसऱ्या मनुष्याची मूर्ती देखील बनवू शकतो. गर्वस्वकेंद्रित वृत्तीलोभखादाडपणामालमत्ता प्रेम हेही देवासमोर बंड आहेत आणि मूर्तिपूजेमध्ये गणले जातात. म्हणून देवाला त्यांचा फार वीट आहे.

त्यामध्ये जगातील गोष्टींची अयोग्य आवड/आकर्षण ही येत असतात. पवित्र शास्त्र बायबल जगाबरोबर मैत्री करणाऱ्या लोकांना " व्यभिचारी लोक" म्हणून गणते व देवाचे अशा लोकांबरोबर वैर आहे. (याकोब ४:४-५ वाचा).

याकोब ४: ४-५
"अहो अविश्वासू लोकांनोजगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहेहे तुम्हांस ठाऊक नाही कायजो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे."

थोडक्यात आध्यात्मिक मूर्तिपूजा म्हणजे देवाचा द्वेष होयजगातील प्रणालीत्याचे बनावट मूल्येनालायक उद्योग आणि अनैसर्गिक वासना हे देवाच्या शुद्ध संबंधापासून आम्हांला दूर नेत असतात. आध्यात्मिक व्यभिचार हा देवाच्या प्रेमला त्यागून; जगातील मूल्ये आणि इच्छा स्वीकारणे हे आहे. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे हे आहे. (१ योहान ५:३रोम ८: ७-८१ योहान २: १५-१७ वाचा)

१ योहान ५:३ वाचा
"देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होयआणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवितेआणि ज्याने जगावर जय मिळविला तो म्हणजे आपला विश्वास.”

जुन्या करारामध्ये इस्राएल लोकांनी यहोवा देवाच्या पूजेबरोबर इतर दैवतांची पूजा (उदा. बाल दैवत) मिसळण्याचा प्रयत्न केला. (शास्ते ३:७: १ राजे १६ : ३१-३३,  यिर्मया १९:५ वाचा).

आध्यात्मिक मूर्तिपूजेमध्ये कोणत्याही स्वरूपातील मूर्तिपूजा ही समाविष्टीत होते. नवीन करारातयाकोब आध्यात्मिक व्यभिचाराची व्याख्या अशी करतो "एकीकडे देवावर प्रेम करतो असे सांगणे आणि दुसरीकडे जगाशी मैत्री करणे" आता कोणी म्हणेल देव तर आपल्यला  दिसत नाही, मग त्याच्यावर प्रीती कशी काय करायची तर योहान आपल्याला म्हणतो कि देवावर प्रीती करणे म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळणे. (याकोब ४: ४-५ वाचा)

आध्यात्मिक व्यभिचार करणारा व्यक्ती म्हणजे - स्वतःला एक ख्रिस्ती म्हणवणारा असला तरीही त्याची खरी ओढ आणि प्रेम जगाच्या वस्तूंवर/ सैतानाच्या वस्तूंवर (जगातील सुखेत्यांचे प्रभावआराम व आर्थिक सुरक्षाव तथाकथित स्वातंत्र्य) असणारा आहे.

देवाच्या विरुद्ध आध्यात्मिक व्यभिचार ही संकल्पना संपूर्ण जुना करारामध्ये एक प्रमुख विषय आहे. (यशया ५४:५यिर्मया ३:२०,  यहेज्केल १६:१५-१९ वाचा). ही संकल्पना होशेय या पुस्तकात विशेषतः अधोरेखित केली आहे.(होशेय २ : २-५ : ३१-५९: १ वाचा). नवीन करारामध्ये प्रभू  येशू  ख्रिस्त म्हणतो कि, "कोणीही दोन धन्यांची सेवा करू शकत नाही. एकतर आपण एकाचा द्वेष करू शकतो आणि दुसऱ्यावर प्रेम करु शकतो. (मत्तय ६:२४ वाचा)

मत्तय ६:२४
"कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाहीकारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करीलअथवा एकाशी निष्ठने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.”

बायबल आपल्याला आर्जवते कीजग किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करु नका; कारण जो कोणी जगावर प्रेम करतोत्याच्यामध्ये पित्याविषयी (परमेश्वर देवाचे) प्रेम नाही. (१ योहान २: १५-१६ वाचा)

१ योहान २: १५-१६
जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नाका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासनाडोळ्यांची वासना व संसारा विषयींची  फुशारकीही पित्यापासून नाहीततर जगापासून आहेत; "

आध्यात्मिक मूर्तिपूजा /व्यभिचार हे म्हणजे मनुष्याने एक पाऊल जगात आणि दुसरे पाऊल स्वर्गात ठेवण्याचा प्रयत्न करणे असे आहे. आम्ही एकावेळी दोन्ही असू शकत नाही. जगाविषयी प्रेम हे प्रामुख्याने मनाची एक वृत्ती आहे आणि आपण आपल्या मनात देवाचे एक नवीन प्रेम उपजीवित करून  आपल्यातील जगीकपण फेकून देऊ शकतो.

आध्यात्मिक मूर्तिपूजेला टाळण्यासाठीप्रेषित पौल आपल्याला असे सुचित करतो कि "आपले अंत:करण वरील म्हणजेच स्वर्गीय गोष्टींकडे लावा, जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहेपृथ्वीवरील गोष्टींकडे नाही (कलस्सैकरांस पत्र  ३: २ वाचा).

कलस्सैकरांस पत्र  ३: २
"वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका."

स्वर्गीय गोष्टी म्हणजे स्वर्गीय जीवन किंवा सार्वकालिक जीवन हे आहे. कारण जग आणि जगातील सर्व गोष्टी हे व्यर्थ आहेत. पवित्र शास्त्रात शल्मोन राजा आपल्या उपदेशकाच्या पुस्तकात हेच म्हणतो. (उपदेशक १ अध्याय वाचा)

उपदेशक १: २
"व्यर्थ हो व्यर्थ! असे उपदेशक म्हणतोव्यर्थ हो व्यर्थ! सर्व काही व्यर्थ".

ह्या वचनाचा अर्थ म्हणजे जग आणि जगातील सर्व वस्तू हे व्यर्थ आहेतम्हणून मनुष्याने त्याच्या मागे लागू नयेतर प्रत्येकांनी देवाच्या स्वर्गीय राज्याची आवड धारावी.


सारांश:  शेवटी सारांश हाच आहे की, बायबलप्रमाणे परमेश्वर देव सोडून अन्य कोणत्याही गोष्टींवर प्रीती करणे ही मूर्तिपूजा आहे. तसेच मूर्तिपूजेचे दोन प्रकार आहेत; ते म्हणजे भौतिक आणि अध्यात्मिक मूर्तिपूजा. मग ते प्रत्यक्षात मूर्ती असो व जगातील इतर गोष्टी असो (जगातील सुखेत्यांचे प्रभावआराम व आर्थिक सुरक्षावस्तूव्यक्तीधन- संपत्ती इत्यादी )

परमेश्वर देवाला ह्या दोन्ही प्रकारच्या मूर्तिपूजेचा फार वीट आहे; म्हणून मनुष्याने हे जग आणि जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नयेतर प्रत्येक मनुष्यांनी देव आणि त्याच्या स्वर्गीय राज्याची आवड धारावी. आमेन



सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्रबायबल सोसायटी ऑफ इंडियाह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.

Contact Details / संपर्क माहिती 

ह्या वरील विषयावर किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क साधू शकता:

Email : digitalsuvartik.vasai@gmail.com

Mob: 8850752437

Digital सुवार्तिक 
Marathi Christian Gospel - India

© 2016 - 2020 Digital सुवार्तिक  All Rights Reserved

                              

No comments:

Post a Comment

Search Digital सुवार्तिक